बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नो सोइंग केले होते त्या बीया रुजून छोटी दोन पाने डोकावू लागली आहेत. माझे या पूर्वी कोलंबाईन रुजवायचे प्रयत्न ( बीया फ्रीज मधे ठेवणे आणि स्नो सोइंग) अयशस्वी झाले होते. यावर्षी पुन्हा एकदा प्रयत्न म्हणून स्नोसोइंग केले होते त्याला यश आले. Happy
कोलंबाईन रुबीची छोटी रोपं -
columbine ruby.jpg

मस्त आहेत फोटो!
बाय द वे, मला एक गोष्ट सांगेल का कोणी? इथे डालास च्या हवामानात कढीपत्ता कसा लावावा? बॅकयार्ड मधे लावता येतो की कुंडीतच लावावा लागतो? बाहेर लावल्यास हिवाळ्यामधे काही प्रॉब्लेम येतो का?

माऊचे फोटो पाहिले नव्हते...मस्त. आमची एकदाही मिरचीची झाडं नीट वाढली नाहीयेत.

यंदा को आणि के पहिल्यांदी लावलेत. एंजॉय.

KALEKO.gif

+१ .. Happy

माझ्याकडच्या मागच्या वर्षी मरायला टेकलेल्या लिलीज् शेवटी मेल्यासारख्या वाटल्या पण आता ह्या सीजन मध्ये एकदम तरतरी आली आहे त्यांनां .. एक-दोन जागी तर एकेका बल्ब मधून दोन तीन कोंब फुटले की काय असं वाटतंय .. काहींचे कोंब येतानाच कळ्या घेऊन आलेत तर काही नुसतेच वाढतात .. नो फुलं .. निसर्गाची करणी .. हे बघा ..

हे मागच्या वर्षी मरायला टेकलेले ..

Lily1.jpgLily2.jpg

आणि आता ह्या वर्षीचे तरतरी आलेले ..

IMG_3581.JPGIMG_3864.JPGIMG_3865.JPGIMG_3867.JPGIMG_3866_0.JPG

सहीच सशल आणि वेका.
निसर्गाची करणी म्हंटल की नारळात पाणी आठवतं. Happy
गेल्या हिवाळ्यापूर्वी स्नो सोइंग करून ट्युलिप आणि daffodils चे बल्ब लावले होते. प्रत्येकी १०-१० लावले असतील, जास्तीच. ट्युलिपचे २ फक्त आले. बाकी उकरून पाहिलं तर बरेचसे कुजलेले किंवा काही कोरडे ठाक आढळले. होम डीपोतून बल्ब आणलेले आणि माती उकरून पुरलेले. गेल्यावर्षी प्रचंड स्नो झाला आणि ४ -५ महिने पुरलेल्या जागेवर फुट - दोन फुट स्नो कायम होता. वितळायला लागल्यावर बर्फाची लादी होती. त्या बल्बच्या पिशवीवर असचं पुरायला सांगितलेलं. माकाचु?

मस्तच सशल. रंग छान आहे. माझ्याकडे कुंडीत (जमीनीत नव्हे) आहेत केशरी लिली लावलेल्या. दोन वेगळ्या रंगाचे डेलियाही आहेत.

@sneha1
डॅलसचा झोन बहुधा ७ आहे. कढीपत्ता वाढायला ऊष्ण हवामान लागते. त्यामुळे कढीपत्ता जमिनीत लावता येणार नाही. रोप कुंडीत लावून कुंडी हिवाळ्यात (नोव्हेंबर ते मार्च / एप्रिल ) घरात आणावी लागेल.

मागच्या आठवड्यात लिलीज् बद्दल एव्हढी एक्साइट झाले नी जिंक्स् केलं बहुतेक .. :|

आज इकडे इस्ट बे मध्ये ११० तापमान .. बघा, काय अवस्था झाली ह्या हीटने ..

IMG_3897.JPGIMG_3898.JPG

माउ, छान बाग.
वेका, को आणि के छानच आलेत.
सशल, रंग छान आहे लिलीचा. पण ११० म्हणजे सुकणारच गं!
यावर्षी स्ट्रॉबेरीज काढून कंटाळा आला. शेजारची ,ओळखीची बच्चे कंपनी मात्र खुश आहेत. पहिल्यांदाच लावलेल्या टोमाटियोला फुलं आलेत. टोमॅटो, वांगी, मिरच्या वगैरे एका पक्षाने उपटून टाकले. आता पुन्हा नविन रोपं करुन लावलेत. रॅडिश, कांदे वाढतायत. एका मित्राने उत्साहाने 'बिटर मेलन्स फॉर यु ' म्हणत कारल्याची दोन रोपं दिलेत. त्यामुळे कारले आवडत नसूनही मांडव घाला वगैरे सोपस्कार केले.
यावर्षी आम्हाला स्प्रिंग क्लिनिक साठी एका कंपनीकडून ओरीएंटल आणि एशियाटिक लिलीचे डोनेशन मिळाले. दोन इवेंट्सना वाटून उरलेल्या लिली मेंब्रांच्या घरी गेल्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ७० कांदे काही जमिनीत आणि काही खोक्यात माती पसरुन लावलेत.

ग्लॅडीओला एकदाचा फुलला. बरेच दिवस नुसतीच पानं मोठी झाली पण कळी यायचं नाव घेईना. मग एकदम तीन कळ्या आल्या आणि दोन रंगाची फुलं आली.


*
*

दोन फुलं आल्यावर झुडपाला भार सहन होईना मग एक फुल तोडलं.

डेलियाला पण दोन कळ्या आल्या आहेत. पण फुलल्या नाही अजून.

ग्लॅडिओला माझ्याकडे पण २ वर्श फुलला आता काही यायच नाव नाही! त्याच आधी नुसत पातच दिसत मग हळुहळु फुल डोकावतात.

मस्त आहेत फुलं. माझ्याकडेही एकदाच (ज्या वर्षी लाव्ला) तेव्हाच मस्त फुलला आता पातच इतक्या उशीरा येते की फुलणे-वगैरे काही होत नाही.

शेवटल्या फोटोतला रंग मस्त आहे!

मनी, ओल्ड एज होम, नर्सिंग होम अशा ठिकाणी विचार. शाळेची किंवा लायब्ररीची बाग असेल तर ते घेतील. तुमच्या भागातील मास्टर गार्डनर्स ना विचार. गावातील बर्‍याचशा छोट्या ग्रीन स्पेसेस, फेअर ग्राउण्ड्स वगैरेची देखभाल पार्क अ‍ॅन्ड रिक्रिएशन त्यांच्यावर सोपवते. त्यामुळे अशी डोनेशन हवी असतात. (स्वानुभव :))

स्नोसोइंगमधील कोरीऑप्सिस फुलले
IMG_5236 (400x299).jpg

Pages