Submitted by समीर चव्हाण on 25 June, 2014 - 01:07
एखाद्या पोरट्यापरी मन गुंता करते
सोडवता नाही आला की दंगा करते
साधे-सोपे जीवन सोडुन अपुली तृष्णा
कठीणतेहुन कठीणतेचा पिच्छा करते
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते
तुझी आठवण येता-येता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते
आता डोळेझाक जाणिवेपोटी करतो
मेलेल्यांचीसुध्दा कोणी चिंता करते
‘समीर’ असून जिथे-तिथे, नव्हता कोठेही
काय नवल जग रितेपणाची हव्वा करते
समीर चव्हाण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या पोरट्यापरी मन गुंता
एखाद्या पोरट्यापरी मन गुंता करते
सोडवता नाही आला की दंगा करते
साधे-सोपे जीवन सोडुन अपुली तृष्णा
कठीणतेहुन कठीणतेचा पिच्छा करते
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते
तुझी आठवण येता-येता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते
‘समीर’ असून जिथे-तिथे, नव्हता कोठेही
काय नवल जग रितेपणाची हव्वा करते
मतला फार सुंदर, वरचे शेरही आवडले.
'हव्वा' ह्या शब्दाचा वापर फार आवडला. हवा ने तो परीणाम साधला गेला नसता असे वाटले.
सुरेख!!!
सुरेख!!!
एखाद्या पोरट्यापरी मन गुंता
एखाद्या पोरट्यापरी मन गुंता करते
सोडवता नाही आला की दंगा करते.......क्या बात ! क्या बात !!
साधे-सोपे जीवन सोडुन अपुली तृष्णा
कठीणतेहुन कठीणतेचा पिच्छा करते..... अगदी अगदी !
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते......वा !
यावरून माझा एक शेर आठवला इथे नमूद करायची गुस्ताखी करतेय क्षमस्व !
आयुष्याने केले आहे निरिच्छ इतके
कशी पूर्तता करू तुझ्या माफक इच्छांची
गझल सुरेखच!
धन्यवाद !
-सुप्रिया.
हवा आणि हव्वा ह्यात काही फरक
हवा आणि हव्वा ह्यात काही फरक आहे का ? 'हव्वा'चा नेमका अर्थ काय आहे ?
गझल छान आहे.
सुंदर आवडली
सुंदर
आवडली
उत्तम गझल
उत्तम गझल
>> काय पाहिजे त्यालाही ठाऊक
>>
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते
तुझी आठवण येता-येता राहुन जाते
पाठलाग करण्याचा मन कंटाळा करते
<<
वा!
सर्व शेर उत्त्तम सर्व आवडले
सर्व शेर उत्त्तम सर्व आवडले
सगळ्यांचे मनापासून आभार.
सगळ्यांचे मनापासून आभार.
मस्तच .....
मस्तच .....
वाह क्या बात है .. खूप आवडली
वाह क्या बात है .. खूप आवडली
व्वाह!
व्वाह!
सर्वच शेर छान!! व्वा!!
सर्वच शेर छान!!
व्वा!!
गजल आवडली .. सर्वच शेर मस्त
गजल आवडली ..
सर्वच शेर मस्त ..
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे
काय पाहिजे त्यालाही ठाऊक कुठे पण
निरिच्छ होण्याची ते मोठी इच्छा करते
..... आवडला शेर