आयजीच्या जीवावर

Submitted by परदेसाई on 4 May, 2015 - 16:22

'प्रवीण, अरे ही chocolates पण नेणार आहेस का? मग ती पण बॅगेत टाक', नेहा नेहमीप्रमाणे bag भरायला मदत करत होती. शेजारी tv वर काही तरी कार्यक्रम चालू होता. भारतात जायच्या बॅगा भरून व्यवस्थीत रचून ठेवल्या होत्या. आता शेवटची handbag घेऊन त्यात काहीतरी कोंबाकोंबी चालू होती. एवढ्यात tv चा नूर पालटला. हिरो हिरवीन नाहीसे होऊन अचानक बातम्या चालू झाल्या…
'India state of xxx-pradesh has suffer from a huge earthquake. Thousands of people have been ..'
'बाप रे, हे आणि काय नवीन?' प्रवीण मनातल्या मनात म्हणाला.
'भारतात हल्ली हे भुकंपाचं प्रमाण खूपच वाढलंय', बॅग भरताना त्याच्या डोक्यात तेच विचार चालले होते.
'नेहा, पटकन ग्रीन-प्लस च्या site वर जा. आणि क्रेडीटकार्डावरून त्याना ५०० डॉलर मदत पाठव. अश्यावेळी इथे बसून आपण अजून काय करणार म्हणा?' तो पुटपुटत म्हणाला. 'आणि हो, तो टॅक्सीवाला आला का बघ, त्याला आठवण करण्यासाठी फोन कर, नाहीतर परत ट्रेन साठी धावावं लागेल '.
-----------
पीटर स्मिथ सकाळीच गोल्फ खेळायला निघाला होता. सकाळच्या वेळी त्याच्या आवडत्या गोल्फाकोर्सावर वेळ घालवायला त्याला आवडत असे. सोबत खेळणारे काही इतर सवगंडीही कधी कधी असायचे. लंच टाईम पर्यंत एक पूर्ण राऊंड खेळता येत असे. मधेच त्याचा फोन वाजला. फोनवर सेक्रेटरी होती.
'Kate, why are you disturbing me? You know I don't like to be interrupted', तो वैतागून म्हणाला.
'सर, हेडऑफिस मधून Urgent Call होता, तुम्हाला interrupt केल्याबद्दल sorry, But they want you on the next flight to India'.
'India, f**king India? Why? काय चाललंय काय तिकडे? जरा tv लाऊन बघ.'
'मला वाटतं Earth Quake सर,' ती तिच्या गोड आवाजात म्हणाली.
'सकाळी सकाळी मीच मिळालो का यांना? एक गेम नीट खेळू देत नाहीत'
'सर It's your turn. मागच्या वेळी मायकेल जाऊन आला आफ्रिकेला'.
'That's okay. माझी बायको कुठेय बघ आणि तिला सांग मी संध्याकाळी भेटू शकत नाही'
'त्या spa ला गेल्यात सर, आणि मी असा निरोप दिला तर माझ्यावर चिडतील'.
'तिला सांग , ज्या Merc मधून फिरतेस त्याचे पैसे भरायला कधी कधी कामावरही जावं लागतं. बघावं तेव्हा spa मध्ये पडलेली असते,'
'Okay सर, पण तुमची फ्लाईट दुपारी दोनला आहे, लवकरच निघावं लागेल सर'.
'आता पुढचे चार होल पण नको खेळू का? माझी बॅग तयार आहे, मी लगेच निघेन', फोन ठेवत तो म्हणाला. बरोबर खेळणारा मित्र वाटच बघत होता. त्याच्या डोक्यावर पडलेल्या आठ्या बघून पीटर सहज म्हणाला.
'I will make it up to you. तू Bottled-Water विकतोस Right?'
'What about it?'
'तुझी आशिया मध्ये कुठे branch वगैरे काही आहे का?'
'आहे ना? चायना नाहीतर कोरिया'
'मग काळजी नाही. पुढच्या वेळी तू मला १० वेळा फुकट खेळायला बोलावशील, आता हा गेम पूर्ण करूया.’
---------------
सांगितल्या वेळेवर टॅक्सीवाला आलाच नाही. शेवटी आपल्या बॅगा ओढत प्रवीण गाडीत, आणि तिथून ट्रेनमध्ये बसून विमानतळावर पोहोचला. विमान सुटायला अजून तीन तास होते. पण Immigration, Security check, check-in पुन्हा security-check आणि passport validation इत्यादी सोपस्कार करायला भरपूर वेळ गेला असता. त्यात भारतात जाणारी विमानं नेहमीच भरलेली. त्यामुळे boarding ला पण भली मोठ्ठी लाईन आणि गर्दी असणार होती. रांगेत उभं रहायला पर्याय नव्हता.
------------
पीटर विमानतळावर आला तेव्हा विमान सुटायला तासभर अवकाश होता. त्याच्याकडे फक्त एक handbag होती, त्यामुळे check-in वगैरे भानगड नव्हती. First-Class चं तिकीट असल्याने त्याला security , passport check वगैरे साठी फारसा वेळ लागला नाही. १० मिनिटात सगळं उरकून तो आरामात Lounge मध्ये जाऊन बसला. स्कॉचचे दोन घोट पोटात उतरेपर्यंत हवाईसुंदरी त्याला बोलवायला आली. त्याची handbag अदबीने हातात घेऊन तिने त्याला विमानात नेऊन सोडलं.
विमानात जाताच त्याचं राजेशाही स्वागत झालं. उश्या, चादर, झोपायला मस्तपैकी बेड सगळी व्यवस्था उत्तम होती.
'How can we make your flight more enjoyable?' Just let us know,' हवाईसुंदरी त्याला म्हणाली.
'Get me the whole bottle of Jack please'
'We cannot serve you the whole bottle. but I will keep refilling your glass, just call me. My name is Kathy' हवाईसुंदरी त्याच्या उश्या चादरी नीट करत म्हणाली. Take - off व्हायच्या आधीच पीटर शांतपणे झोपुन गेला होता.
------
'Non-veg meal for you sir,' प्रवीणला कुणीतरी ढकलत होतं.
'पण मी Veg पाहिजे असं लिहिल होतं.'
'Sir, आमच्याकडे आता Veg meal संपल्या आहेत, तुम्ही खाणार असाल तर चिकन हे एकाच option आहे'.
'पण मी शाकाहारी आहे, म्हणून मुद्दाम Veg लिहिलं होतं. '
'You can take it up with the ground-staff after we land, right now तुम्हाला हे meal हवं की नाही ते बोला.' त्याच्यासमोर हातातलं ताट टेकवत ती निघून गेली.
-----------
विमान दिल्लीला उतरलं तसे सगळेच प्रवासी घाई घाई करून बाहेर पडले. पीटरच्या फोनवर बायकोचा Text होता. 'Buy me an Indian Carpet for our living room Darling, love you'.
'आता हिला Carpet चे डोहाळे लागलेत,' तो स्वतःशी पुटपुटला.
विमानतळाच्या आत साहेबांच्या स्वागताला स्थानिक branch ची मंडळी हजर होती. सामान उचलायला दोन पोर्टरही तैनात होते. साहेबांकडे सामान नाही म्हटल्यावर स्थानिक कार्यकर्त्यानी साहेबांची Handbag हातातून जवळपास खेचून घेतली.
'Sir, we have your booking at Airport Hilton. Would you like to meet the Reporters there?'
'How far is this place? I mean epicenter of the quake?
'Sir, its' about 2 hours away from here. Would you like to visit the place?'
'Do we have an Airport near there?'
'No Airport Sir, the closest Airport is about 3 hours by road from the place'
'Then no. Let's just go to the hotel. I will talk to the reporters there'.
पीटर त्याला घ्यायला आलेल्या लोकांबरोबर गाडीत बसला. पाच मिनिटांवर असलेल्या Hilton वर पोहोचेपर्यंत त्याने भूकंपाची व्यवस्थीत माहिती करून घेतली.

-------------
तासभर वाट बघून प्रवीणच्या बॅगा आल्या. आता कस्टम वगैरे करून बाहेर टॅक्सी गाठणे महत्वाचे होते. विमानतळावर pre-paid-Taxi चे सोपस्कार करून तो टॅक्सीत बसला. पोलीस नोंदणी वगैरे झाल्यावर टॅक्सी महामार्गावर येण्यापूर्वी बाजूला थांबली.
'अरे ,भाई क्या हो गया?'
'साहब आप यहीं उतरं, हम आगे नही जायेंगे' ड्रायव्हर म्हणाला.
'लेकीन मैने पूरे पैसे देकर Taxi ली है. आप ऐसे कैसे कर सकते हो?'
'देखो साहब , आप पांच सौ और दो तब Taxi चलेगी. आधी रातको हम गाडी नाही चलाते.'
'ह्या दिल्लीच्या Taxi वाल्यांचे हेच नखरे आहेत,' तो मनातल्या मनात म्हणाला.
'आता मध्येच taxi सोडून मी जाणार कुठे? म्हणून नाडतोय हा'. शेवटी तीनशे रुपयात सौदा पटवून तो घरी पोहोचला तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते.
---------------
प्रवीण सकाळी उठला तेव्हा आईने चहा तयार ठेवला होता. शेजारी वर्तमानपत्र पण ठेवलं होतं. सकाळच्या वर्तमानपत्रात एकच ठळक बातमी होती.
'ग्रीन-प्लस तर्फे सर्व भुकंपग्रास्ताना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप. त्यासाठी कोरियाहून विशेष विमानाची व्यवस्था,' ग्रीन-प्लसच्या पीटर स्मिथ यानी केली घोषणा.

----- * * * * * -----

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षमस्वः खरं तर ही कथा मा. बो. दिवाळी अंकासाठी लिहिली होती. त्यात निवड न झाल्याने माबोवर टाकू नये असे ठरवले होते. पण सद्य परिस्थितीला खरोखरच अनुरूप वाटली म्हणून टाकत आहे.....

'पण मी शाकाहारी आहे, म्हणून मुद्दाम Veg लिहिलं होतं. '
'You can take it up with the ground-staff after we land, right now तुम्हाला हे meal हवं की नाही ते बोला.' >>> हे असं होतं? एवढी ईनसेन्सिटिव ऑन फ्लाईट सर्विस असते? Uhoh

बाकी ते फर्स्ट वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड प्रॉब्लेम दुनियेच्या अंतापर्यंत असणार आहेत...

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
अम्हावरी संसाराची ऊडे धूळ माती...

हे भाग्य कुठे ना कुठे, कुणा ना कुण्याच्या वाट्याला कायमच असते...

>> एवढी ईनसेन्सिटिव ऑन फ्लाईट सर्विस असते?

हे तर एमिरेट्स च्या फ्लाईट वर पण झाल्याचं ऐकलं हल्ली .. भारतीय जनता फार जास्त असते त्यामुळे व्हेज जेवण लवकर संपतं असं लॉजिकल रीझन दिलं सांगणार्‍याने .. फक्त "ग्राउंड स्टाफ शी संपर्क साधा" असं तुसडं उत्तर नव्हतं बहुतेक एमिरेट्स वर ..

>> तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
अम्हावरी संसाराची ऊडे धूळ माती...

हे भाग्य कुठे ना कुठे, कुणा ना कुण्याच्या वाट्याला कायमच असते...

Happy

'You can take it up with the ground-staff after we land'... हे बर्‍यास समस्यांचे उत्तर असते. जेवण संपले सारखी समस्या, TV चालत नाही सारखी समस्या हवेत सोडवता येतच नाही. मग बर्‍याच वेळा हे उत्तर दिले जाते.
(आणि हे सगळ्याच क्षेत्रात चालते... )
..
स्टँप.. हिकडं नाही तिकडं.. ते 'चौकशी' लिहिलंय ना? तिकडे विचारा... Happy

खरंच चांगलं लिहिलंय.
बाकी व्हेज लिहूनही नॉनव्हेज जेवण मिळायचा अनुभव मलाही दोनदा आलाय.
पण मस्तं चिकन बिरयाणी होती त्यामुळे लँड झाल्यावर ग्राऊंड स्टाफबरोबर टेक अप करायला लागलं नाही. Wink
भारतातल्या भारतात तर काय विनानातल्या काकवांनी पाणी फ्री दिलं तरी नशीब.

एन जी ओंचे अवांतर खर्चं हा खरंच मोठ्ठा इश्यू आहे.
सर्वसामान्यांच्या मनातील गिल्ट काँप्लेक्सवर हे लोक ट्रेड करतात असं वाटतं.

कटू सत्य Sad
विमानात व्हेज जेवण न मिळण्याचा अनुभव मलाही आला आहे! तेव्हापासून मी स्वतःसाठी काहीतरी तहानलाडू -भूकलाडू घेऊनच फ्लाईटमध्ये बसते!

गोगा, कटू वास्तव नेमकं मांडल आहे तुम्ही ह्या कथेत. विनोदी लेखनात पाहून पहिल्यांदा गोंधळ झाला पण नंतर लक्षात आले परिस्थितीनुरूप विनोदाची झालर आहेच कथेला.:)

छान लेख!

कविता महाजनचे एक पुस्तकपण आहे NGO वर. ते वाच्ल्यानंतर NGO ला Donate करणं बंद केलं. फक्त PM Fund आणि Tata Fund ला Donate करतो.

तुमचं खरं नावं काय आहे?

मला खूप दिवसांपासून तुमच्या कथा वाचायच्या होत्या. आज ही पहिली वाचली आणि फार आवडली. इतकी छान कथा माबो दिवाळी अंकासाठी घेऊ नये ह्याची जरा खंत वाटली. आणि तुम्हाला हे लेखन विनोदी प्रकारात वाटल ह्याचीही!!! Sad

जेवणाचा वाईट अनुभव मला एअर फ्रान्स आणि जपानची ए. एन. ए. ह्या दोन फ्लाईटचा आलेला आहे.

बी... मी विनय देसाई... अमेरिकेत तू आलेला असताना न्यूजर्सीहून सपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.
'गोष्टी गावाचे' आणि 'परदेसाई' ही माझी स्वतः लिहीलेली पुस्तकं आहेत. त्या व्यतिरिक्त कधीतरी काहीतरी लिहितो ते ८/१० माबोकर वाचतात... Proud

वरती प्रतिसाद दिलेल्या २८ जणांपैकी तुमच्या मते नेमके कुठले ८-१० आयडी मायबोलीकर (रीड - कंपूतले) आहेत आणि कुठले नाहीत ते स्पष्टं करावे Wink

रीड - कंपूतले नाहीत.. एकदा त्यानी माझा लेख वाचला की परत तेच लोक वाचायला येत नाही. नवीन ८/१० लोकांना मी माहीत नसल्याने वाचतात एवढंच.. Happy

Pages