Submitted by जयदीप. on 29 April, 2015 - 14:02
जर तुला विनिमय हवा
तर तसा संचय हवा
सारखी चर्चा नको
जर तुला निर्णय हवा
जग भरवसा ठेवते
चांगला अभिनय हवा
शेर लिहितो चांगला
पण तसा आशय हवा
मागणे भलते तुझे !
रागही सविनय हवा ????
आंधळा नाहीस तू..
पण तुला संजय हवा !
मीच माझ्यासारखा
सांग ना, जर जय हवा
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंधळा नाहीस तू.. पण तुला संजय
आंधळा नाहीस तू..
पण तुला संजय हवा ! >>>> क्या बात !
बाकी पण बहुतेक शेर आवडले .
जग भरवसा ठेवते चांगला अभिनय
जग भरवसा ठेवते
चांगला अभिनय हवा
छान.
जग भरवसा ठेवते चांगला अभिनय
जग भरवसा ठेवते
चांगला अभिनय हवा..............क्या बात है..
निर्णय, अभिनय, संजय ...मस्त .
निर्णय, अभिनय, संजय ...मस्त .
अभिनय ,संजय हे शेर सुंदर
अभिनय ,संजय हे शेर सुंदर
धन्यवाद सर्वांचे __/\__
धन्यवाद सर्वांचे __/\__
अभिनय शेर छान आहे. इतर शेर
अभिनय शेर छान आहे.
इतर शेर एक तर संदिग्ध किंवा सपक वाटले. क्षमस्व! चु भु द्या घ्या