आयपीएल-८ (२०१५)

Submitted by स्वरुप on 1 April, 2015 - 11:55

आयपीएल चे आठवे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच स्मित

हा धागा आयपीएल-८ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष मित्रा..... कालचा तुझा चुकता चुकता वाचलेला अंदाज आज एकदाचा चुकला..... आणि तेही तुझ्या लाडक्या शारुखच्या टीमबद्दल Wink

काल राजस्थानने हातातली मॅच घालवली असे मला वाटतय!
वॉटसनपेक्षा स्मिथ मला तुलनेने जास्त चतुर कर्णधार वाटतोय..... तांबेची एक ओव्हर शिल्लक असताना हुडाला ओव्हर देण्याचा निर्णय काही झेपला नाही.... फॉल्कनरची बॉलींग यंदा फारशी चालत नाहीये.... त्याला शेवटी ठेवण्यात काही अर्थ नाहीये
द्रवीड कर्णधार असताना भारतीय खेळाडूंवर जितका विश्वास दाखवला जायचा तितका आता दिसत नाही.... सुपरओव्हरमध्ये हुडावर थोडा भरवसा दाखवायला हवा होता

पण एका पराभवाने लगेच रॉयल्स गळपटतील असे वाटत नाही.... पुढची मॅच द्रवीडच्याच बंगळुरुविरुद्ध आहे Happy

होना यार.. मागे पण मी म्हणालेलो की हैदराबाद फक्त एका बंबूवर उभारलीय, अन तो म्हणजे वार्नर.. पण नेमका त्यानेच आज बांबू मारला..
त्या गंभीरने सुर्यकुमार यादवच्या आधी युसुफ पठाणला पाठवायचा मुर्खपणा कसा केला समजत नाही.. तो तर मनीष पांडेच्याही आधी यायला हवा होता..
त्या पठाणला तर फुकट पोसत आहेत.. टीमचा मालक खान आहे म्हणून संघात पठाण आहे, बाकी काही नाही बस्स!

बाकी तो भुवनेश्वर आयपीएलमध्ये बरेचदा डेथ बॉलिंग मस्त टाकतो..

तसा तर तो नेहरा पण किती इम्प्रेस करतो.. आता पण पहिली विकेट काढलीय त्यानेच.. डेथ बॉलिंगही असतेच त्याची..

फेफ, तु म्हणालास तस राजस्थान ढेपाळतय बहुतेक मधेच Sad
कालच्या मॅचमध्ये त्यांची बॉडी लॅन्गवेज अजिबात सकारात्मक वाटली नाही.... अजुन एक्-दोन मॅच असेच चित्र दिसले तर खरच वॉटसनने आपणहुन कप्तानपद स्मिथकडे सोपवावे आणि बॅटींगवर पूर्ण लक्ष केंद्रीत करावं
फॉल्कनर पहीली मॅच सोडली तर एकही मॅच धड खेळला नाहीये आणि फारच महागडा ठरतोय..... त्याला एखाद्-दोन मॅच बसवायला हरकत नाही.... बेन कटींग किंवा रस्टी थॅरॉनला एखादी संधी आत्ताच देउन बघायला हरकत नाही
बिन्नी ऐवजी रजत भाटीया आणि संजू सॅमसन ऐवजी दिशांत याग्निकला सुद्धा खेळवून बघायला पाहिजेल
पुढच्या मॅचसाठी राजस्थानचा संघ असा असावा:
रहाणे, वॉटसन, स्मिथ, हूडा (पहीली विकेट फार लवकर गेली तर स्मिथ नाहीतर निव्वळ पिंच हिटर म्हणून हूडा), नायर, दिशांत याग्निक, रजत भाटीया, मॉरीस, रस्टी थॅरॉन, कुलकर्णी आणि तांबे

काल बंगळूरुने अप्रतिम गोलंदाजी केली
चहलमध्ये पहील्यांदाच मागच्या मोसमातल्या चहलची झलक दिसली..... स्टार्कच्या येण्याने बाकीच्यां बॉलर्सनाही फायदा होतोना दिसतोय..... इक्बाल अब्दुल्लाचीही बॉलींग काल चांगली पडली
१३० हा स्कोअर गेल, कोहली, अ‍ॅबीडीसाठी अजिबातच आव्हानात्मक नव्हता.... २००+ स्कोअरसमोरच त्यांचा खरा कस लागेल
फिल्डींग मात्र काल प्रचंड गंडलेली दिसली बंगळूरुची.... जवळपास सगळ्याच संघांच्या फिल्डींगचा दर्जा गेल्या काही सीझन्सच्या तुलनेत घसरलेला दिसतोय Sad
डेव्हीड विझा आणि दिनेश कार्तिकला बसवायला पाहिजेल पुढच्या मॅचमध्ये पण विनींग कॉम्बो कितपत बदलतील शंकाच आहे!

आजही भुवीने पुन्हा डेथ बॉलिंगला इम्प्रेस केले ..
पण नेमके आमच्या मुंबईच्या विरुद्ध Sad

CSK has not been offering fair chance to their bench strength. No wonder they are so consistent.

हॉ ना रॉ! राजस्थान परत मागच्या वेळचं स्क्रिप्ट लिहायला घेतात की काय, अशी शंका यायला लागलीये. एक तर त्यांचा बॉलिंग अ‍ॅटॅक कंटेनिंग आहे, विकेट टेकिंग नाही. अशात जर बॅटींग गळपटली तर अवघड आहे.

बिन्नी मागच्या आयपीएल ला पण खूप आऊट ऑफ फॉर्म होता. बिन्नी, सॅमसन, नायर आणी हूडा नीड टू पुल देअर वेट नाऊ.

कोलकत्त्याने कालची मॅच फार भारी जिंकली..... नरीन नसल्यामुळे हॉगला संधी मिळाली आणि पठ्ठ्याने काय बॉलींग केलीय.... जबरा..... कोलकत्त्याचे पीच त्याच्या बॉलींगसाठी एकदम आयडीयल आहे
रसेलने फार सेन्सीबल बॅटींग केली काल.... गडी फॉर्मात आहे एकदम!
गंभीर भारताचा कॅप्टन का होऊ शकला नाही हे त्याचे उतावळे एक्स्प्रेशन बघून लगेच कळून येते.... जरा परिस्थिती हातबाहेर जातीय असे वाटायला लागताच गंभीर अति रेस्टलेस होतो..... काल पण शेवटच्या ओव्हर्स्मध्ये एक्-दोन डॉट बॉल पडल्यावर याच्या चेहर्‍यावर पार मॅच हरल्याचे भाव.... एकदम खराब बॉडी-लॅन्ग्वेज!

आज दिल्ली विरुद्ध पंजाब सामना!
दिल्ली बॉटम फोरमध्ये आहे यात फारसे काही नवल नाही पण मागच्या मोसमातला टॉपचा पंजाब संघ पार अगदी तळाशी जाउन बसलाय.... सेहवाग, मिलर, मॅक्सवेल, जॉन्सन वगैरे असणार्‍या संघाकडून हे अगदीच अनपेक्षीत
आज बेली आणि शॉन मार्श दोघेही दुखापतग्रस्त आहेत अशी न्यूज आहे.... त्यामुळे मॅक्सीला नक्की चान्स मिळेल आणि आज तो लै भारी खेळेल असे स्ट्राँग इंट्युशन्स आहेत Wink
झहीर ९५% फीट असल्याचे संकेत काही दिवसापुर्वी ड्युमिनीने दिले होते.... खुप दिवसांनी झहीरला परत मैदानावर बघायला आवडेल

फेफ.... राजस्थान खरच गळपटलाय
त्यांच्या मोराल बूस्टींगसाठी आज मुंबईविरुद्ध विजय अगदीच आवश्यक!

गेल्या काही मॅचेसमध्ये शेवटच्या पाच षटकात त्यांनी सरासरी ११ पेक्षा अधिक धावा दिल्यात.... त्या आटोक्यात आणण्यासाठी मॉरीसला परत घेतलेच पाहिजे..... फॉल्कनरला एकदोन मॅचेस बाहेर बसवणे त्याचा आणि संघाच्याही हिताचे आहे पण ऑसी कॅप्टन असताना ते कितपत होईल शंकाच आहे!
साउदी आणि धवल कुलकर्णीने सुरुवातीच्या ओव्हर्स कराव्यात, तांबे, बिन्नी आणि हूडाने मधल्या ओव्हर्स मॅक्झिमम टाइट कराव्यात आणि शेवटी मॉरीसच्या जोडीला रजत भाटीया किंवा रस्टी थॅरॉनला वापरुन बघावे
वॉटसनकडून पाटा खेळपट्टीवर बॉलींगची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही

All the best Royals for a much needed win Happy

त्यांच्या मोराल बूस्टींगसाठी आज मुंबईविरुद्ध विजय अगदीच आवश्यक! >> त्यांच्यापेक्षा मोराल बूस्ट ची गरज मुंबई ला अधिक आहे Wink तसेही रॉयल्स पुढे जाऊन नेहमीसारखे गळपटणार आहेतच. स्मिथ असताना वॉटसन कप्तान का ?

नुसत्या मोराल बूस्टींगने मुंबईचे काही होणार नाही..... ते आणि पंजाब आता बहुतेक स्पॉइलस्पॉर्ट म्हणूनच खेळतील उरलेली स्पर्धा!

रॉयल्स पुढे जाउन गळपटू नयेत असे मनापासून वाटतेय पण गेल्या काही सामन्यातला (रादर गेल्या काही सीझनमधला) त्यांचा खेळ पाहता असे होणारच नाही असेही म्हणू शकत नाही

वॉटसन हा अगदी पहील्या सीझनपासून रॉयल्सबरोबर असल्यामुळे द्रवीडनंतर ऑटोमॅटीक चॉइस म्हणून तो कप्तान बनलाय...... बाकी तो अज्जिबात कॅप्टन मटेरीयल नाहीये.... मलातर वाटतय की पुढच्या सीझनमध्ये सरळ रहाणेला कॅप्टन बनवावे!

थेरॉन ला खेळवलय आज राजस्थान ने. फॉकनर ला ब्रेक हवाच होता (टु सॉर्ट द ईश्यूस आऊट). बघू आज कसं खेळतात ते.

मुंबई मला नेहेमीच खालसा झालेल्या संस्थानातल्या उरलेल्या शेवटच्या राजाच्या काप गेला आणी भोकं उरली ह्या उक्तीची आठवण करून देतात.

काल परत एकदा राजस्थानने मुंबईसमोर नांगी टाकली
तांबेचा योग्य षटकात उपयोग करुन घेण्याऐवजी त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय, मॉरीस सारख्या एकमेव डेथ बॉलरला बाहेर बसवण्याचा निर्णय, वॉटसनने स्वता शेवटच्या काही षटकात गोलंदाजी करण्याचा निर्णय, फॉर्मात असलेल्या हूडाच्या आधी बिन्नी आणि करुण नायरला पाठवण्याचा निर्णय असे बरेच निर्णय काल गंडले वॉटसनचे
काल परत एकदा शेवटच्या ५ षटकात उधळलेल्या रन्स महागात पडल्या राजस्थानला!
I think its time to get back smith as a captain

राजस्थानची अजुन एक चूक म्हणजे एखाद-दोन मॅच सोडल्या तर त्यांनी प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या षटकापर्यंत नेलीय.... यंदा त्यांच्याकडे हॉजी नाहीये आणि फॉल्कनर चालत नाहीये हे लक्षात घेउन त्यांनी मधल्या षटकात थोडी घाई करायला हवी!

पहिल्या ४ हरलेली, ५ वी जिंकून पुन्हा ६ वी हरलेली.
त्यानंतर गेल्या ९ पैकी ८ जिंकलीय.
यात चेन्नईला २ वेळा मात दिलीय.
१ हरली ती सुद्धा अबड्याचा दिवस होता.

जबरी फायनलमध्ये मुंबई जिंकली !!!
लय भारी बॅटींग आणि टिच्चुन बॉलींग केली. रोहीत आणि सिमन्सने फटकेबाजी मस्त केली एकदम.
कलकत्त्याला महत्वाच्या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम बॉलींग करायचा आत्मघातकी निर्णय घ्यायची परंपरा आहे का?

कलकत्त्याला महत्वाच्या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम बॉलींग करायचा आत्मघातकी निर्णय घ्यायची परंपरा आहे का? >>> पराग, १९९६ च्या सेमी बद्दल का? Happy

पग्या, काल पावसाची शक्यता होती.. त्यामुळे धोनीने बॉलिंग घेतली असावी.. पण पाऊस पडलाच नाही... आणि रोहिट आणि सिमन्सनी धावांच पाऊस पाडला.

टॉस खेळपट्टी फॅक्टर बाजूला ठेवले तरी २०० धावा रोज रोज होत नाहीत.
मुंबईने ते मारले हिच कमाल, टॉसचा बाऊ करून त्यांचे हे श्रेय नाकारले तर जात नाही ना हे ही बघायला हवे.
खास करून रोहीत शर्मा हॅटस ऑफ.
१-१-१ अश्या परिस्थितीत येऊन त्याने जी आक्रमक भुमिका घेतली तिथेच चेन्नईला त्याने खोपच्यात घेतला.

Pages