BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

Submitted by Mandar Katre on 30 April, 2015 - 07:47

आमचे गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही . मोबाईलसाठी 2G वोडाफोन GPRS वरुन नेट वापरतो . परंतु तिचा स्पीड 30-50 केबीपीएस पेक्षा जास्त नसतो. BSNL चे ५१२ केबीपीएस ब्रॉडब्रॅंड ५५०/- रूपयामध्ये अमर्यादित प्लान आहे. पण इथे ग्राहक कमी असल्याने स्पीड तरी मिळेल अशी आशा आहे.

त्यातच आता बीएसएनएल ने रात्री ९.०० ते सकाळी ७.०० वाजे पर्यन्त महाराष्ट्र व मुंबई साठी अमर्यादित फ्री कॉलिंग ची सुविधा दिल्याने बीएसएनएल कनेक्शन घ्यावे असे वाटत आहे .

आपला काय अनुभव आहे ? BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही.
<<
<<
मग तर, BSNL शिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच उपलब्ध नाही. घेऊन टाका, सरकारी आहे पण छान चालते नेट अश्या आडबाजुला.

BSNL ब्रॉडबँड पुर्वी वापरलं होतं (२००५-२००८). अनलिमिटेड प्लान घेतला होता. साधारण रात्री ७ ते १० स्पिड कमी मिळायचा. १० नंतर बर्‍यापैकी होता ५०-८० केबीपीएस. दिवसा कधी कधी १५० केबीपीएस पर्यंत जायचा पण ते खरोखर अनलिमिटेड होतं म्हणजे डाटा कितीही झाला तरी स्पीड लिमिट काहीही नसायचं. अर्थात ३G समोरे हा स्पीड म्हणजे गोगलगाय वाटेल पण तेंव्हा हा स्पीड पण चांगला वाटायचा.
BSNL जोपर्यंत चालु आहे तोपर्यंत छान आहे, एकदा का इश्यु सुरु झाले की मग वैताग येतो. केबल चोरीला जाने (हे कारण खुप वेळा ऐकलय) , रस्ता खोदुन काही काम चालु असेल (BSNL केबल तिथुन आली असेल) तर ते बंद असतं, काही वेळा १०-१५ दिवस बंद असायचं (एक चांगली गोष्ट ही की जर सर्विस बंद असेल तर बिल कमी करुन मिळत दुसरीकडच माहिती नाही पण आमच्या इथल्या BSNL कर्मचार्‍यांची वागणुक खुप चांगली होती, हे सरकारी कार्यालय आहे ह्यावर विश्वास बसणार नाही इतकी. ). ह्या सारखं बंद असण्याच्या त्रासाला वैतागुन ते काढुन टाकलं शेवटी.
असो तर तुमच्या भागात एखाद्याकडे असेल तर चौकशी करुन बघा.कधी कधी BSNL तुमचे पेशन्स लिमिट चेक करु शकत Proud

अमर्यादित प्लॅन घ्या पुण्यात तरी चांगला चालतो. स्पिड येत नसेल तर पासवर्ड बदल करा. स्पिड वाढेल.

आमचा अनुभव,

५ वर्षापुर्वी वडिल BSNL वापरत होते. एकदा प्रोब्लेम आल्याने (कदाचित कर्मचर्यानेच केला असेल), वडलानी कम्लेट केली. त्यावेळी कर्मचार्याने मॉडेम बदलला आणि नवीन मॉडेम मध्ये वडलानी तोच पासवर्ड ठेवला. त्या काळात लिमिटेड प्लेन असल्याने भरपुर बिल यायला लागले. नंतर नेट बंद केल्यावर पण बिल येत होते. मग कळले की कम्रचार्याने तो जुना मॉडेम दुसर्या कुणाला तरी दिला होता आणि तो ईटरनेट फुकट वापरत होता. मुख्य ऑफिस मध्ये तक्रार केल्यावर मिनिमम बिल लाउन अतिरिक्त बिलाचे पैसे परत केले.

अता अनलिमिटेड नेट असल्याने बिल येणार नाही पण कोणितरी तुमचे अकाउंट वापरत असेल तर स्पीड कमी होउ शकतो किंवा नेट मिळत नाही असे प्रकार होउ शकतात.

हा प्रोब्लेम सोडला तर मागचे १० वर्ष BSNL मस्त चालले आहे

बिएसएनएल हे पीपीपीओई प्रोटोकॉल वर चालतं (पॉईंट टू पॉईंट ओवर इथरनेट). त्यातही कॉपरवर.

जरा टेक्निकल झालं पण साध्या भाषेत, फिजिकल लाईन अ‍ॅब्सोल्यूटली क्लिअर हवी. त्यात कमीतकमी जॉईंट्स हवेत. नॉईजही कमी हवा.
वरच्या पॉईंट्सपैकी नॉईज आपल्या हातात नाही. जॉईंटसही आपल्या बिल्डिंगच्या आवारात लाईन आल्यावर आपण चेक करू शकतो/ बदलू शकतो. कनेक्शन घेतांना हे लाईनमन कडून चेक करून घ्या.

तुमचं घर बिएसएनेल एक्चेंज पासून जर अंदाजे २ किमी डायमिटर मध्ये असेल तर शक्यतो फिजिबिलिटी चांगली असते; अर्थात कनेक्टीविटी अन स्पीडही चांगला मिळतो. Happy

बाकी या सर्वीसचा प्रॉब्लेम असा काही नाही. बेसिक कनेक्टिविटी चांगली असते. अन्लिमिटेड कनेक्शन + वायफाय मॉडेम घेतलंत तर २४x७ इंटरनेट मिळतं. सगळ्याच डिवायसेसवर. बराच सेल्यूलर डेटा वाचतो.

me bsnl 1-2 varsha purvi vaparat hoto pan nantar cable internet with wifi modem ghetla swasta padata...
bsnl chya unlimited plan madhe kahi GB internet use (upload/download) jhala ki kami speed ne chalta by default so tevadha baghun ghya
baki dusara paryay nasel tar BSNL best option aahe

योकु,

आजकाल बीएसेनेल 'अनलिमिटेड' फारच लिमिटेड झालंय. बहुतेक ३ जीबीनंतर एक नोटीस येते, की यापुढे महिनाअखेरपर्यंत तुम्हाला 'हळू' नेट मिळेल. मग ते मुंगीच्या पावलाने चालतं. बिल ५५० नव्हे, ७५० प्रति महिना आहे. होम अनलिमिटेडचं. वर्षाचे पैसे अगाऊ भरले तर १० महिन्यांच्या बिलात १ वर्ष मिळते.

अदरवाईज विचार केला, तर ६८ रुपयांत १ जीबी ३जी डेटा १० दिवसांकरता बीएसेनेलच देते. असाही आपला वापर ३ जीबीपुढे जात नाही. महिना २१० रुपये पडतात. जास्त काही करायचेच असेल, तर ६८ रुपये घालायचे त्यात. ७५० रुपयांत १०+ जीबी डेटा ३ जी स्पीडने (१००-११० केबीपीएस) मिळतो, असा माझा ताजा अनुभव आहे.

नेक्स्ट रिन्युअलच्यावेळी लँडलाईनचे नेट व लँडलाईनच बंद करायचा विचार आहे. कारण लँडलाईनचे महिना फिक्स बिल ४०० रुपये प्लस साडेसातशे असे बेसिकली फक्त नेटपायी खर्च होताहेत..

इब्लिस, बरं झालं गणित दिलंत ते. मला माझं कॅल्यूलेशन बसवावं लागेल; इतकं जर ते स्वस्त असेल तर. Happy

मी सध्या बिएसएनएलच वापरतोय. गेले ७/८ महिने. ९९९/- मध्ये ४०० कॉल्स फ्री + ८ जिबी (४ एमबीपीएस नी); त्यानंतर ५१२ वर अनलिमिटेड.

माझे ८ जिबी महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत उडतात. नंतर ५१२ वर असूनही महिन्याचं जिबी यूसेज २५ जिबी/ २६ जिबी आहे. घरी, २ स्मार्टफोन्स, एक पीसी अन एक लॅपटॉप आहे. टिव्ही नाही. त्यामुळे सगळं काही तुनळीवर.

बरं झालं इथे हा विषय चालू आहे. आमच्या घरी बीएसएनएल बदलून आय-ऑन (D-VoiS broadband) चे इंटरनेट घ्यायचं चाललं आहे. कोणी ह्या कंपनीचे इंटरनेट वापरलं आहे का? कसा अनुभव आहे?

आमचा बीऐसएनेल कोम्बो प्लॅन आहे ६५०/- प.म. अनलिमीटेड, नो फ्री कॉल्स वर्षाचे पेसे भरल्यास १ म. फ्री.

गेले ७-८ वर्षापासून bsnl च आहे. पहिले २५०/- (१ GB ) असा प्लॅन होता व त्यावेळी landline 120/- pm आणि ५० लोकल फ्री कॉल्स असा प्लॅन होता. अनुभव चांगला आहे आणि जेव्हा काही प्रोब्लेम आला, तेव्हा सेवा पण तत्पर मिळालीये. Happy

खुद्द रत्नागिरी शहरातच बीएसएनएलचा मोबाईलच्या रेंजचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. इंटरनेटसाठी रिलायन्स नेट कनेक्ट चालते व्यवस्थित. बीएसएनएल रत्नागिरीत नीट चालत नाही- ही फर्स्ट हॅन्ड इन्फर्मेशन आहे. त्यामुळे रत्नागिरीच्याही आत, ग्रामीण भागात रेंजचे वगैरे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. एकदम अमलिमिटेड प्लॅन घेण्यापेक्षा, बेसिक मिनिमम प्लॅन घेऊन बघा. काय स्पीड मिळतो ते बघा आणि मगच अनलिमिटेडला जा.

जर शहरी भागात जिकडे specranet आहे किवा असेच काही नवीन सेवा देणारे आहेत त्याचेpackage चेक करा
स्पेक्रानेत चे माझे package @२० MBPS ( होय!) unlimited प्लान आहे रु ..१२५० + कर

जर महिन्याला १५० - २०० GB होत असतील तर फान्तास्तिक plan !

http://spectranet.in/fox.php

[URL=http://www.speedtest.net/my-result/4329440348][IMG]http://www.speedtest....

http://www.speedtest.net/result/4329440348.png

स्पेक्ट्रानेट बकवास आहे. अनेकदा बंद पडत. कस्टमर केअरचा अनुभव फारसा चांगला नाही.
त्या ऐवजी BSNL घ्यायचा विचार आहे.

कालच ब्रॉडब्रॅंड चालू झाले . वायफाय राऊटर लावून बर्‍यापैकी स्पीड आहे . अनलिमिटेड 545 प्लान मध्ये 64 kBps म्हणजे 512 kbps स्पीड आहे . अर्ज केल्यापासून नेट सुरू व्हायला दोन महीने लागले. मोडेम आता बीएसएनएल देत नाही ,स्वत:च घ्यावा लागतो

मन्डळी ...आणखी एक गुड न्यूज ...

आता सर्व ग्राहकाना बी एस एन एल देणार २ एमबीपीएस च्या स्पीड ने इन्टरनेट सेवा ....

http://economictimes.indiatimes.com/tech/internet/bsnl-to-offer-minimum-...

DVOIS च नेत चान्गल आहे मी वापरतोय. फक्त सर्विस प्रोवायदर चान्गला पहिजे.
नवीन बातमी bsnl broadband चा minimum speed 2mbps करनार आहे.

मंडळी नमस्कार
बी एस एन एल ब्रॉडब्रॅंड घेवून 3 महीने झाले. या कालावधीत 90 जीबी डाटा वापरला ,
एकदा वीज पडून exchange मधील साधन-सामुग्री जळाली ,तेव्हा 20 दिवस बंद होते नेट व फोन
त्यानंतर मधून मधून सर्व्हर बिघडणे व अन्य बारीक सारीक अडचणी चालूच असतात.
सरासरी आठवड्यातून १ ते २ दिवस ४ ते ६ तास नेट बंद असते .
नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी २ एमबीपीएस पर्यन्त वेग असतो, नंतर ५१२ केबीपीएस .
बीएसएनएल ने मोबाइल इंटरनेट च्या दरात सुमारे २० ते ३० % वाढ केली आहे .

एकूण अनुभव पाहता , ना नफा ना तोटा ... ५४५ /- रुपयात अमर्यादित इंटरनेट ... ठीक आहे

साधारण महिन्यातून २० दिवस नेट व्यवस्थित चालायचे . सारखा बी एस एन एल ला फोन करून त्याना आणि मला ही वैताग आला . १२ जून ला वीज पडल्याने एक्स्चेन्ज जळाले . १५ दिवसानी फोन चालू झाला पण नेट नाही . शेवटी २ वर्षे वापरून २६ जुलै ला ब्रॉडबॅन्ड बन्द केले . बन्द करायला पण एक महिना घेतला , आणि दोन महिन्याचे बिल भरायला लावले. आता रिफन्ड कधी मिळेल ते बघूया ... लॅन्डलाइन सुरु आहे .