पात-टोमॅटो

Submitted by हर्ट on 15 December, 2014 - 23:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटे टोमॅटो
कांद्याची पात,
गहू, ज्वारी आणि चण्याच्या डाळीचे पिठ
जिरे पावडर, मोहरी, मीठ, तेल, हळद, लिंबू, साखर, तिखटजाळ मिरच्या मस्ट आहेत.

क्रमवार पाककृती: 

१) पोळ्या करुन झाल्यात की तोच तवा वापरायचा. तव्यावर २ ते ३ चमचे तेल ओतायचे. तवा गरम असतो म्हणून लगेच पंचपुरण टाकायचे. मोहरी उडायला लागली की मग मिरच्या आणि मग टोमॅटो तव्यावर नीट पसरवायचे. आच एकदम मंद करावी किंवा बंद करुन टाकवी. आच जास्त लागली की टोमॅटो फुटु शकतील. म्हणून टोमॅटो च्या सर्व भागाला तेल लागायला हवे. काही टोमॅटो लगेच आकसतील. वरचा पापुद्रा/साल बाहेर निघेल. पण टोमॅटो फुटणार नाही. कालथा वापरायचा. पळी नाही.

पोळ्या करुन झाले की उरलेले पिठ घ्यायचे. त्यातच बेसन, ज्वारीचे पिठ घालायचे.

पात तव्याभर पसरवायची.

२) पात थोडी आकसली की मग त्यात मीठ, जिरे पावडर, लिंबू, साखर हे सर्व घालून हळुवार एकजीव करत रहायचे.. मग तिन्ही पिठे घालायची.

खूप चवदार होते ही भाजी. टोमॅटो आतून इतके गरम होतात की थंडीच्या दिवसात असा गरम घास फार हवाहवासा वाटातो.

अधिक टिपा: 

खूप सोपी आहे ही कृती. मी सिंक मधले भांडी घासताना हा प्रकार बाजूला सुरु असतो. अगदी ह्याच पद्धतीन कुठलाही इतरही भाज्या सवतळता येईल. उदा हा अजून एकः

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तव्यावरच्या कांद्याच्या पातीची रेसिपी.. काय अभिनव कल्पना आहे आणि दिसतेयपण अगदी तोंपासु. नक्की बनवणार... काश मेरे पास अभी कांदेकी पात होती!!! Happy

बी, आत्ताच करून झाली ही भाजी... एक्सलंट चव..

घरी ज्वारी चं पीठ नव्हतं, म्हणून थालीपिठाची भाजणी टाकली थोडीशी... अप्रतिम

थँक्स बी Happy

मस्तच पाककृती आहे ही. भाजणीचा पर्याय चांगला वाटतोय. नक्की करून बघणार.

अवांतर, कालथ्याला आमच्या घरी काविलता आणि पलेता असे दोन्हीही म्हणतात. आणि बी फोटो मस्तच आहेत पण पुर्ण स्क्रीन व्यापुन राहतात.

तवा गरम असतो म्हणून लगेच पंचपुरण टाकायचे म्हणजे नक्की काय करायचे बी.
बाकी भाजी दीसतेय तरी मस्त आणि लागेल ही मस्त बहुतेक करुन बघितल्यावर कळेल .

अका (अश्विनि-काजरेकर)), तवा गरम असताना त्यावर फोडणीला हवे तेवढे तेल घालायचे आणि पंचपुरण म्हणजे मोहरी, जिरे, मेथी, कलोंजी, बडी शेफ ह्यांचे रेडीमेड मिश्रण. इथे तू पंचपुरणाचे चित्र पाहू शकतेसः http://www.maxsupermart.com/index.php?route=product/product&product_id=1739

Thanks बी

Pages