सुपरगर्ल सोलापुरची साक्षी मोरे ? व आणखी एक मुलगा ( ५/१२/२०१४ )

Submitted by नितीनचंद्र on 14 November, 2014 - 09:49

१४ नोव्हेंबर २०१४ रात्रीचे ८ वाजले आहेत. समोर मराठी टी व्ही ९ चॅनल सुरु आहे. मी पहात आहे सोलापुरच्या साक्षी मोरे हिची तिच्या वडीलासमवेत आणि मानसओपचार तज्ञ डॉ राजेद्र बर्वे यांच्या समोर टेस्ट चालु आहे.

साक्षी मोरे दोन्ही डोळे बांधुन पुस्तक वाचु शकते. रंग ओळखु शकते. ५२ पत्यातला एक समोरचा पत्ता अचुक ओळखु शकते.

टि व्ही ९ या चॅनलच्या टेस्ट हिने पार केल्या.

ही शक्ती जन्मजात नव्हती. तिच्या वडीलांनी १२ हजार फी देऊन काही महिन्यांपुर्वी मीड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन नावाचा कोर्स केल्यानंतर ही कला अवगत झाली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

त्या वर्गात कोर्स केलेल्यापैकी सर्वांनाच ही कला पुढे साक्षी इतकी प्रगत करता आली आहे का ?

यामुळे साक्षीच्या शरीरावर मनावर काही वाईट परिणाम होतील का ?

या अभ्यासाची पुढची पायरी काय आहे?

सर्वांनाच हा अभ्यास करणे शक्य आहे कोर्स देणारे लहान ( वय ६ ते १२-१४ ) यांनाच हा कोर्स देतात ?

हे वाचल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न येतील.

पुढील काही दिवसात यु ट्युब वर हे सर्व येईल. आपण पहा आणि हे शक्य कसे होते यावर शास्त्रीय चर्चा करु या.

आज ५ डिसेंबर २०१४ रोजी आणखी एक मुलगा तेज चॅनलवर दाखवला गेला ज्याने वरील सर्व टेस्ट पार केल्या.

यात नविन माहिती पुढे आली की मिड ब्रेन वयाच्या १२ वर्षांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याची पॉवर ट्रेनींगद्वारे वापरता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा वापर सुरु केला म्हणजे मुलांची एकाग्रता आणि आकलन शक्ती कमालिची वाढुन त्याचा फायदा शैक्षणीक विषयात नक्कीच होतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जादूच्या प्रयोगाचा आनंद आपल्याला सगळ्यांनाच घ्यायला आवडतो. ते फक्त मनोरंजन असतं. प्रयोगाहून परत आल्यावर जादुगारानी ते कसं केलं असेल यावर परिसंवाद घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही.

खणखणीत प्रतिसाद देऊन नितिनचंद्रांना कशाला दुखवताय? थोडे दिवसात ते देखील विसरून जातील मिड ब्रेन नावाचं काही होतं म्हणून.

नितिनचंद्र, काळ हाच सर्वोत्तम परीक्षक असतो. Knee jerk reaction मुळे आपण तोंडघाशी पडतो.

अर्थात अशी सुधा शक्यता आहे की वीस वर्षांनी मला माझे शब्द मागे घ्यावे लागतील कारण या मिड ब्रेनच्या शोधामुळे सारी मानवजात सुपर ह्यूमन झालेली असेल. शक्यता आहेच, पण नगण्य.

हा प्रकार मी माझ्या डोळ्यासमोर होताना बघितला आहे .

आईच्या ईमारतीत एक मुलगी रहाते ,१०-११ वर्शाची असेल. ती घरी आलेली तेन्व्हा तिने हे करून दाखवलं होतं.
विजिटींग कार्ड , नोट , ५२ पत्यातला कुठलाही पत्ता , हातातल्या वस्तून्चा रंग तिने अचूक ओळखून दाखवला.

ती ही अशाच कुठल्यातरी शिबिरात शिकली.

याचा फायदा काय ? यात हातचलाखी किती ? वगैरे प्रश्नाची उत्तरे मला माहीत नाही .

इथे टीवीवरून कार्यक्रम बघून इतका गदारोळ उठला तो वाचून फक्त माझा अनुभव सांगितला.

आम्हालाही या शिबिराबद्दल कुणीतरी सांगितलं होतं,पण प्रत्यक्षात या साईट वर ना कुणाचे नंबर दिलेत ना वॅलिड पत्ते .. हे मी मुंबई बद्दल सांगतेय..

Midbrain activation is a scam. Please do not fall prey to the hype.

अरे बापरे !

माझी धर्मपत्नी सुद्धा अशाच एका कोर्सला गेली आहे. रेडीओ अ‍ॅक्टीव्ह मटेरिअल पासून प्रोटेकप्रोसाठी विशिष्ट मटेरियलचा विशिष्ट जाडीचा थर वापरतात तसं अशा डोळ्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावं लागेल ?

मेंदूतले विचार दिसतात का ?

परवा एका कार्यक्रमात पण हा डेमो झाला. डोळे झाकून वाचन आणि रंग ओळखणे. पूर्ण अवैज्ञानिक प्रकार.
नेटवर बघितले तर ह्याचे स्पष्टीकरण पण दिले आहे. म्हणे मेंदूची शक्ती वाढवली जाते. अरे पण त्यामुळे बोटे कशी काय फोटो सेन्सिटिव्ह होतात? विज्ञान एकवेळ नसू द्या पण लॉजिक तरी हवे? Lol Lol

विशेष म्हणजे गुगलून पाहिले तर पुण्यात midbrain activation center नावाची बरीच केंद्रे पाहायला मिळतात.
आणि त्याहून विशेष म्हणजे इतके असूनही जगात अंधांची संख्या सर्वात जास्त भारतात आहे: Sad

Pages