नेताजींचे काय झाले?

Submitted by षड्जपंचम on 21 August, 2012 - 02:21

नेताजी सुभाषचंद्र बोस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक ज्वलंत आणि तेजस्वी अध्याय म्हणता येईल. ते फक्त एक सच्चे देशभक्त नव्हते तर एक क्रांतिकारी, जनसामान्यांपर्यंत पोच असलेले आणि भविष्याचा विचार करणारे सुधारणावादी नेते होते. ते एक असे नेते होते की ज्यांना जाती, धर्म, भाषा इ. बंधने तोडून लोकांनी स्वीकारले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र सेना स्थापून मोठ्या स्तरावर ब्रिटीशांशी युद्ध पुकारणारा हा पहिलाच नेता!

नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले गेले आहेत. अर्थातच, नेताजींच्या तथाकथित मृत्यूनंतरही देशाचे अनेक वर्षे नेताजींवर तेवढेच प्रेम होते. परंतु नेताजींचं काय झालं याची पक्की माहिती कधीच जनतेला मिळाली नाही. ती मिळाली नाही का मिळू दिली गेली नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम मिशन नेताजी नावाची एक संस्था करत आहे . काही पत्रकार व ह्या विषयावर खरी माहिती मिळवण्याची इच्छा असणारे लोक ह्या संस्थेत आहेत. ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नेताजींच्या बाबतीत १८ ऑगस्ट १९४५ नंतर काय झालं ह्याची खरी माहिती भारत व इतर देशांच्या सरकारांकडून मिळवणे व ती जनतेसमोर आणणे.

कुतूहल म्हणून ह्या संस्थेच्या संकेतस्थळावर गेल्यावर बरीच काही माहिती मिळते. ह्या विषयावर थोडे वाचन केल्यावर जाणवते, की भारत सरकारला ह्या विषयावर जास्त चर्चा झालेली नकोच आहे. किंबहुना भारत सरकारने वेळोवेळी हा प्रश्न तापू न देण्याचाच प्रयत्न केलेला आहे.

नेताजींनी देशासाठी काय काय केलं ह्यावर बरेच ग्रंथ आणि लेख लिहिले गेले आहेत. नेताजींनी ब्रिटीश साम्राज्याविरोधी शक्तींची मदत घेऊन भारताला कायमच आणि संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचे स्वप्न पाहिलं. ते प्रथम जर्मनीला गेले. तिथे जर्मनीची मदत मिळवली. जर्मनीची युद्धात माघार सुरु होताच त्यांनी जपान ला प्रयाण केलं व जपान ची मदत मिळवली. ह्या दोन्ही देशांनी नेताजींना दिलेली मदत पाहता त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाची कल्पना येते. एकट्याच्या जिवावर दोन महाशक्तिशाली देशांची मदत मिळवणे आणि एक मोठी फौज तयार करणे, हे असामान्य प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याशिवाय जमूच शकत नाही. नेताजींच्या चाणाक्ष मनाने बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेतला होता. दुसऱ्या महायुद्धात जपानची अवस्था बिघडल्यावर जगाच्या पाठीवर असा एकाच देश उरला होता की जिथे इंग्लिश आणि अमेरिकन वर्चस्व सहजासहजी पोहोचू शकत नव्हते. सोविएत रशिया. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जपानमधून जास्त काळ सुरू ठेवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत नेताजींनी रशियास जायचे ठरवले असे म्हणतात. जपाननेही त्यांना ह्यासाठी मदत केली होती. प्रचलित समजानुसार विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

नेताजींच्या मृत्यूच्या चौकशी साठी सरकारने अनेक कमिट्या नेमल्या. पण मिशन नेताजी ह्या साईट प्रमाणे बऱ्याच नेताजी-प्रेमींनी हेच म्हणलंय की ह्या कमिट्यांनी कधीही पूर्ण समाधान करणारे पुरावे सादर केले नाहीत. किंवा त्यांना करू दिले गेले नसावेत.

परंतु बऱ्याच नेताजी प्रेमींनी हे कधीच मान्य केले नाही. पुराव्यांचा विचार करता हा अपघात आजच्या तैवान मध्ये झाला, पण तैवान ने म्हणले आहे की असा अपघात कधीच झाला नव्हता. नेताजींनी सुरक्षित पणे निसटावे म्हणून त्यांनी व जपानी अधिकार्यांनी हा बनाव रचला. तैवानच्या माहितीनुसार १८ ऑगस्ट ला तैवान मध्ये कुठलाही विमान अपघात झाला नव्हता. जपानी अधिकाऱ्यांनी इतकेच सांगितले की जो देह नेताजींचा म्हणून आणला होता त्याचा चेहरा इतका बिघडला होता की छातीठोकपणे हे कुणीच सांगू शकत नव्हते की हे नेताजी आहेत, वस्तुत: अपघात १८ ऑगस्ट ला झाला आणि जगाला ह्याची माहिती २३ ऑगस्ट ला मिळाली. ५ दिवस का लागले हा प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो. नेताजींच्या पत्नी एमिली बोस ह्यांनी सुद्धा हेच म्हणले आहे की नेताजी रशियाला पोचले होते. तिथे ते स्टॆलिन ची मदत मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आजपर्यंत रशियात त्यांचे काय झाले ह्याची पुराव्यानिशी माहिती कधीच मिळू शकली नाही.

मिशन नेताजी मधील पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे रशिया कडे नेताजींच्या बाबतीत काही classified फायली आहेत व त्या रशियाने कधी जगासमोर आणल्या नाहीत. भारताकडेही नेताजींच्या बाबतीत बऱ्याच फायली असून त्या ' सुरक्षेच्या दृष्टीने अति-महत्वाच्या' ह्या कारणास्तव भारत सरकार ने त्या कधीही समोर आणल्या नाहीत. ह्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारत सरकारने ताबडतोब थांबवले. सी आय ए च्या अहवालांनुसार १९५० मध्ये बोस जिवंत होते व ते भारतात येण्याचा प्रयत्न करत होते. याबद्दलची सी आय ए ची कागदपत्रे मिशन नेताजी वाल्यांनी मिळवली व ती साईट वर आत्ता उपलब्ध आहेत. सी आय ए ने नंतरही एकदा बोस जिवंत असल्याचे म्हणले होते असे वाचनात आले आहे. ही साईट असेही म्हणते की भारताच्या इंटेलिजन्स ब्युरो चाही हे प्रकरण दडपण्यात मोठा सहभाग होता. मिशन नेताजी संकेतस्थळावरील माहितीचा विचर केला तर, सध्याच्या राष्ट्रपतीं सकट भारताच्या बऱ्याच राजकारण्यांना ह्या प्रकरणाची माहिती होती.

दुसरे महायुद्ध संपल्यावर सुभाषबाबू युद्ध-गुन्हेगारांच्या यादीत गेले. भारतानेही ह्याला मान्यता दिली आणि कधीही त्यांचे नाव त्या यादीतून काढण्याचे प्रयत्न केले नाहीत ! गांधींशी वाद झाल्याने सुभाषबाबूंना निवडून येऊन सुद्धा राष्ट्रीय सभेचा चा राजीनामा द्यावा लागला होता हे सर्वज्ञात आहे. सुभाषबाबू जहाल मतवादी होते, आणि शांततेची कबुतरे उडवून राष्ट्र सुरक्षित राहत नाही हे मानणार्यातले होते. त्यामुळे भारत सरकारचा उदासीन दृष्टीकोन फारसे अप्रूप वाटण्यासारखा नाही. हेही वाचले आहे, की भारतात येण्याबाबातीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नेहरूंना नेताजींनी एक पत्र लिहिले होते. ते पत्र खरेच गेले होते का, ते काय होते व त्या पत्राचे काय झाले कुणास ठावे? नेताजींच्या बाबतीत ब्रिटन कडेही काही कागदपत्रे असून 'परराष्ट्र संबंधाच्या दृष्टीने महत्वाची' ह्या कारणास्तव त्यांनी ती कधीही समोर आणलेली नाहीत.

रशिया नंतर नेताजींचे काय झाले ह्याबाबत पक्की माहिती नाही. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. कारण ते ठरले युद्ध-गुन्हेगार, तेही भारताने राजमान्य केलेले! साहजिकच गुप्तहेर संस्था त्यांच्या पाळतीवर ! त्यामुळे असे मानले जाते की त्यांचा रशियातच मृत्यू झाला असावा. ह्याबाबतीत केजीबी ला माहिती असल्याचे सांगितले जाते. एक मात्र खरं की त्यांच्या येण्याने बर्‍याच लोकांची अढळपदे ढळायची शक्यता होती.

दुसरा तर्क म्हणजे ते भारतात लपून छपून नेपाळमार्गे आले असावेत आणि गुप्त स्वरुपात राहिले असावेत. गुप्तपणे नजरेतून निसटणे हे त्यांना नवीन नव्हते. इंग्रजांच्या तावडीतून निसटून ते अनेक देश फिरले होतेच. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. यामुळे त्यांना एक तर भारतात लपून ओळख बदलून येणे हा एकाच पर्याय असावा. हा समज विश्वसनीय मानणाऱ्या लोकांचा पुरावा म्हणजे म्हणजे गुमनामी बाबा. उत्तर प्रदेशात फैझाबाद येथे गुमनामी बाबा नावाचे साधू अचानक प्रकटले. ते कुठून आले ह्याची कुणालाही कल्पना नाही. ते एकटे एकटे राहणारे होते व लोकांमध्ये मिसळत नसत. ते बंगाली होते. त्यांना मोजक्याच व्यक्ती भेटण्यास येत असत व ते त्यांच्याशी पडद्याआडून बोलत असत. ह्या बाबांबद्दल लोकांना संशय होता की हे नेताजी आहेत. त्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील सामानात नेताजींचे अनेक खासगी फोटो, पत्रे आणि पुस्तके सापडली. एका मान्यताप्राप्त त्रयस्थ हस्ताक्षर तज्ञाने त्यांचे हस्ताक्षर नेताजींशी जुळत असल्याचे सांगितले. भारत सरकार ने लगेच दुसरा हस्ताक्षर तज्ञ नेमला आणि त्याचे हे विधान खोटे ठरवले. एका साधू कडे नेताजींचे खासगी दुर्मिळ फोटो आणि विविध जागतिक विषयांवरची इंग्रजी पुस्तके असण्याचा काय संबंध असावा हेही गुलदस्त्यात आहे. १९९९-२००५ मध्ये नेमलेल्या मुखर्जी कमिशन ने हे मान्य केले की विमान अपघात झालाच नव्हता. कारण, त्या काळाच्या लोकांना तसेच तत्कालीन तैवानी वृत्तपत्रांना अपघाताची काहीही खबर असल्याचे दिसले नाही. [मुखर्जी कमिशन चा अहवालच शेवटी सरकारने अमान्य केला! ] परंतु गुमनामी बाबा हे नेताजी असल्याचे मुखर्जींनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये अमान्य केले. त्या साधूंची DNA टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. ह्याच मुखर्जींनी नंतर एका व्हिडिओ मध्ये मान्य केले आहे की त्यांना गुमनामी बाबा हे नेताजीच असल्याचे वाटत होते.

नेताजी जिवंत असतील तर समोर का आले नाहीत हा प्रश्न काही लोक विचारतात. पण हाही विचार केला पाहिजे की ते जरी जिवंत असतील आणि बऱ्याच काळानंतर भारतात परतण्यात यशस्वी झाले असतील, तरीही समोर येणे इतके सहज शक्य नव्हते. एक म्हणजे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते, त्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी ते लढले ते महायुद्ध् आणि आझाद हिंद फौजेच्या प्रभावामुळे का होईना साध्य झाले होते. तसेच त्यांना भारत सरकारने स्वत:च युद्धगुन्हेगार ठरवले असल्याने गुप्तचर यंत्रणा त्यांच्या पाळतीवर असणार. त्यांचे ताबडतोब हस्तांतरण होण्याची शक्यता असणार. स्वातंत्र्यानंतर २० - २५ वर्षांनी प्रकट होऊन देश हातात घेणे सुद्धा इतके सरळ नव्हतेच. त्यामुळे फक्त खळबळ माजली असती. स्वत:च्याच देशवासियांमध्ये गोंधळ निर्माण करायची त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसेल. मंत्रालयात असणारे पण स्वत:चेच कधी काळाचे साथी त्यांच्या सोबतीला उभे ना राहिल्याने वेळ खूप बदललेली होती. आझाद हिंद फौजेचा विरोध करणाऱ्या लोकांनी, नंतर देशभर गाजलेल्या त्या खटल्याच्या जिवावर प्रतिष्ठा मिळवून घेतली. नेताजी एक सच्चे देशभक्त होते. मी हे मिळवून दिलं, हे ओरडून ओरडून सांगण्यापेक्षा देशाला हे मिळालं ह्याचे समाधान मानणारयातले ते होते.

ही गोष्ट स्पष्ट आहे की नेताजी फक्त भारताच्याच नाही तर जागतिक राजकारणातील एक असामान्य व्यक्ती होते. जर्मनी, जपान इ. देशांनी त्यांची खास बडदास्त ठेवण्याचे कारण काय? भारताव्यतिरिक्त ब्रिटन, जपान, रशिया, अमेरिका ह्या सर्व सरकारांकडे त्यांच्याबाबतीत इतक्या साऱ्या गुप्त फाईल्स असण्याचे कारण काय?

नेताजींच्या अचानक पडद्यामागे जाण्यावर अनेक पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. ह्या विषयावर माहितीची इच्छा असलेल्यांनी missionnetaji.org ला भेट द्यायला हरकत नाही. तेथे बरीच माहिती, दस्तऐवज आणि पत्रे सविस्तर स्वरूपात आहेत. शेवटी हा जुने-पाने उकरून काढायचा नाही, तर आपल्या आवडत्या नेत्याचे काय झाले ह्या बाबतीत माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. खरे खोटे शोधून खाढणे अतिशय अवघड असले, तरी कुणीतरी ह्यावर काम करतंय ह्याची जाणीव असणे आवश्यक !

टीप: वरील सर्व माहिती इंटरनेट वरून घेतली आहे. अधिक माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे. ह्या विषयावर पुस्तके सुद्धा विक्रीसाठी इंटरनेट वर उपलब्ध आहेत. अनुज धार ह्या लेखकाची पुस्तके शोधावीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र,
महानायक वाचले आहे.. आपली पूर्ण पोस्ट १००% पटली..

महानायक वाचल्यानंतर कित्येक दिवस माझे पण असेच मत होते, परंतु त्यांच्याबद्दलच्या काही गोपनीय फाईल्स आपल्या तसेच इतर देशांकडे आहेत म्हणे..
अशा फाईल्सचे अस्तित्व आहे हे सुद्धा वेळोवेळी विविध नेत्यांच्या वक्तव्यांमुळे प्रकाशात आले आले. हि गोष्ट माझ्या मनात शंका निर्माण करते.
तसेच नेताजींच्या अस्तित्वाचे सर्व पुरावे तथ्यहीन असतील असे वाटत नाही (हे एक वाक्य माझे अभ्यासावर आधारलेले नाही! केवळ एक शक्यता म्हणून पोस्टत आहे).

आपले यावरचे मत जाणून घ्यायला आवडेल..:)

धन्यवाद...

महानायक वाचले आहे..

पण लेखक सरकारे सेवेत आहे, त्याचे नियम पाळूनच असली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी सरकार परवानगी देते. लेखकाला भलेही सत्य माहिती असेल पण प्रसिध्द करण्याला सरकारी सेवा आड येत असेलही

पिकेश,

धन्यवाद,

कोणीतरी भ्रम निर्माण करण्याकरता नेताजी हयात होते असा दावा केला असेल. त्यातली तथ्ये शोधण्याच्या प्रक्रियेच्या त्या फाईल्स असतील. हा तपासही अर्धवट असेल त्यामुळे पुर्ण निष्कर्षाप्रत न पोहोचल्यामुळे सुध्दा त्या फाईल्स गोपनीय राहिल्या असतील.

प्रफुल्ल शिंपीजी,

सरकारी दबावामुळे विश्वास पाटील यांनी त्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला असे ठासुन लिहले असेल अशी शक्यता वाटत नाही.

काही लोकांच्या मते नेताजी हुकुमशहा प्रवृत्तीचे होते म्हणुन तात्कालीन सरकार त्यांच्या परत येण्याच्या मार्गात काटे ठेऊन होते.

नेताजी जर हुकुमशहा प्रवृत्तीचे असते तर त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपादाची निवडणुक जिंकल्यानंतर पक्षाला मी म्हणतो हेच बरोबर असे धोरण आखुन पक्ष काबीज केला असता. एकुणच महानायक चे वाचन केल्यानंतर हा आक्षेप चुकीचा वाटतो.

नितीनचंद्र ,
आपण म्हणता तसे असू शकेल कदाचित.
परंतु शंका घेण्यास इतरहि अनेक जागा आहेत तशा.
उदा. त्यांचा मृत्यू हा ५ दिवसांच्या नंतर घोषित करण्यात आला..

या वरील लेखामध्ये दिलेली लिंक एकदा आभ्यासायला हवी. वेळ मिळाला कि करतो ते काम आणि अधिक शंका टाकतो. वरील लेखामध्ये सुद्धा काही समाविष्ठ आहेतच त्याही आभ्यासतो.

नितीनचंद्र आणि प्रफुल्ल,
आपल्या सावंदामध्ये मला प्रफुल्ल यांचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा वाटत नाही.
तसे असू शकते याचे कारण विश्वास पाटील यांची मुळ लेखनामागची भावना (कळकळ) अशी असू शकेल कि नेतांजीनचा जीवनपट आणि त्यांनी केलेला अचाट संघर्ष लोकांसमोर मांडावा.
यामध्ये केवळ त्यांच्या मृत्यूच्या वादामुळे पुस्तक अप्रकाशित राहणे, लोकांना काहीच वाचायला न मिळणे, हे त्यांना योग्य वाटले नसावे.

दुसरे म्हणजे हा मुद्दा उकरून काढून त्यातून काही निष्पन्न होणार नाही व त्यांच्या मूळ जीवनपटावरून लक्ष विचलित होईल अशा मतावर ते पोहोचले असतील व त्यांनी त्या गोष्टीचा बाऊ न करता पुस्तक प्रकाशित केले असेल...

दोघांचेही आभार Happy __/\__

दरम्यान,
नेताजींच्या मृत्यू बाबद शंका निर्माण करणारे मुद्दे कोणते हे आभ्यास केलेल्यांनी येथे नोंदवण्याची कृपया तसदी घ्यावी..

धन्यवाद .. Happy

त्यांचा मृत्यू हा ५ दिवसांच्या नंतर घोषित करण्यात आला.

यात संशयास्पद काय आहे ? अपघाती मृयुत्युनंतर पोस्ट मॉर्टेम करावे लागते. त्याचा पहिला रिपोर्ट जरी लगेच दिला जात असला तरे मुख्य रिपोर्ट लिहुन पाठवायला दोन तीन दिवसही लागतात... मी तरी असे करत होतो.. सगळे डॉ. असेच करतात. इतर तपासणीसाठी विसेरा प्रिजर्व करुन ल्याबला पाठवला तर अजुन दोन चार महिनेही लागतात.

हे भारतातले बोललो. रशियात काय कर्तात माहीत नाहे.

नेताजी प्रकरण आत्ता उकरणे ही राजकीय खेळॅए आहे.

आमचे नेते व आमचे पक्ष यावर गांधीहत्येचा धब्बा आहे म्हणुन तुमचे नेते व तुमचे पक्ष यावर आम्ही नेताजी प्रकरणाचे काळे फासणार.

इतका क्षूद्र विचार आहे.

नाहीतर मध्ये वाजपेयी सर्कार होते , मोदी येउनही वर्ष झाले ... फाइली कधीच ओपन झाल्या असत्या.

नेताजींवरून सद्ध्या जे काही वाद चालले आहेत त्याबद्दल वाचताना फेसबुक वर खालील दुवा वाचायला मिळाला. मला व्यक्तिशः नेताजींच्या योगदानाबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेला मार्ग व त्यावर चालताना केलेले त्याग, कष्ट, लढा आणि त्यांना आलेले यश ह्यांचे भारताच्या इतिहासात विशेष स्थान आहे. जगातील इतर नेत्यांनी त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत करावी, ह्यात त्यांचा मुत्सद्दीपणा व नेत्रुत्वगुण्दिसून येतात. व्यक्तिशः माझे इतिहासाचे ज्ञान फारसे सखोल नाही त्यामुळे गांधीजी / नेहरू विरुद्ध नेताजी / सावरकर वगैरे विषयांवर मी भाष्य करू शकत नाही.

परंतु टाईम्स ऑफ इंडिया जेव्हा असं काहितरी छापतात तेव्हा अनेक लोकांना नेताजींबद्दल (भलतेच) काहीतरी सनसनाटी वाचायला मिळते व टोकाची मते निर्माण होऊ शकतात असे वाटते. आता टाईम्स ऑफ इंडिया सारखी संस्था असं काही लिखाण प्रसिद्ध करताना त्यातील सत्यासत्यतेचा काहितरी विचार करत असेल अशी (भाबडी) आशा मला आहे. म्हणुन हा दुवा देतोय. लेखात लिहिलेले सत्य असल्यास, म्हणजे नेताजींच्या महान कार्याला अशी काही दुसरी बाजू असल्यास, ती लोकांसमोर येऊन त्यांचीच प्रतिमा मलीन होऊ नये म्हणुन आधीच्या सरकारांनी काळजी घेतली असेल का अशी एक शक्यता मनात येते.

http://timesofindia.indiatimes.com/india/Netaji-Subhas-Chandra-Bose-want...

परत एकदा सांगतो, कि मला नवीन वाद निर्माण करायचे नाहित किंवा नेताजींबद्दल अनुद्गारही काढायचे नाहित. आणि वरील दुव्यातील घटना / मते मला पटतात असेही नाही. परंतु असेही झाले असू शकेल काय? हा प्रश्न फक्त मनात येतो.

काऊ,
ते पोस्टमार्टेमचे मला माहित नव्हते. सांगितल्याबद्दल धन्यवाद .. Happy
मला असा प्रश्न पडला कि तुम्ही जो वेळ सांगितला तो रिपोर्ट साठी लागत असेल ना.?
मृत्यूची बातमी ते रिपोर्ट येईपर्य्रंत राखून ठेवायची असते काय.?

(खालील पोस्ट उपहासात्मक नाही)
आमचे नेते व आमचे पक्ष यावर गांधीहत्येचा धब्बा आहे >>> हे पण मला नवीन कळाले.
गांधीहत्येला भाजप जबाबदार आहे असे मानणारा समुदाय (भाजप च्या आत बाहेर दोन्हीकडे) देखील आहे काय.?
सावरकरांना (दुर्दैवाने) गांधीहत्येसाठी जबाबदार मानणारा समुदाय आहे, असे लोक मी पाहिलेत.
पण भाजपच्या बाबतीत हे नवीन कळाले..
असे असल्यास तुम्ही सांगितलेल्या मध्ये तथ्य असू शकेल नक्कीच.
पण माझ्यामते भाजपमध्ये असा समुदाय नाही जो गांधीहत्येचा दोष आपल्यावर आहे असे मानतो.

***********

चौकट राजा,
आपण दिलेला दुवा पाहिला .. या माहितीपूर्ण दुव्याबद्दल धन्यवाद. Happy
तो लेख नेहरूंवर होणारी चिखलफेक कशी चुकीची आहे यावर आहे असे मला वाटले.
बोसांच्या मृत्यूमागील गुप्तता उकलणे हा त्या लेखाचा विषय नाही त्यामुळे या धाग्यावर त्याबाबाद मतप्रदर्श करणे टाळतो. Happy

दुसरे महायुद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनी आणि जपानी अधिकार्‍यांवर अनेक खटले भरले. या खटल्यांपैकी न्यूरेंबर्ग ट्रायल्स आणि मिलीटरी ट्रायब्यूनल फार ईस्ट या प्रसिद्धच आहेत. या दोन्ही ट्रायल्समध्ये अनेक उच्चपदस्थ नाझी आणि जपानी अधिकार्‍यांना देहांताची शिक्षा फर्मावण्यात आली. यात युद्धगुन्हेगार आणि मानवतेचे गुन्हेगार अशा दोघांचाही समावेश होता. यापैकी एक असलेल्या रुडॉल्फ हेसची शिक्षा कमी करण्यास रशियाने व्हेटो वापरुन नकार दिला होता. या युद्धगुन्हेगारांच्या फरारी यादीच सुभाषचंद्र बोसांचे नाव होते. सुभाषबाबू उघडपणे भारतात परतले असते तर महायुद्धानंतर ब्रिटीश सरकारने त्यांनाही गोअरींग, रिबेन्ट्रॉप, टोजो प्रभृतींसह खटल्यात आरोपी केले असते. याच कारणामुळे सुभाषबाबूंनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता आहे.

पुढे भारत स्वतंत्र झाल्यावरही तो ब्रिटीश कॉमनवेल्थचाच सदस्य राहिल्याने सुभाषबाबू परतले असते तर ब्रिटीश सरकारने नक्कीच भारतावर त्यांना अटक करण्यासाठी दबाब आणला असता. या शक्यतेतूनच बहुधा सुभाषबाबूंच्या नातेवाईकांवर पाळत ठेवण्याचं प्रकरण घडलं असावं.

+++++++ब्रिटीश कॉमनवेल्थचाच सदस्य राहिल्याने सुभाषबाबू परतले असते तर ब्रिटीश सरकारने नक्कीच भारतावर त्यांना अटक करण्यासाठी दबाब आणला असता.++++++++++

स्वातंत्र्यानंतरही ब्रिटीशाम्च्या दबावाला बळी पडलेले नेहरु, आणी त्याच बरोबर,

१. हजारो लोक जालियनवाला बाग येथे मारलेला जनरल डायर ईंग्लंड मध्ये आरामात जगला !
२. काळा पाणी ईथला जेलर ज्यांनी हजारो लोकांचे जिव घेतले तो ही ईंग्लंड मध्ये आरामात राहीला !

पण ह्याच का़ळात (१९४५ नंतर) जर्मन नाझीच्या काळात अतिरेक केलेल्या नाझी अधिकार्यां वर आंतरराष्ट्रीय कोर्टात खटले चालवले गेले आणी त्यांना शिक्षा ही करण्यात आली. बर्याच देशांनी ब्रिटीश राजवटीतील ब्रिटीशांनी लुटलेला ऐवज परत मिळवला , पण भारत सरकारला ते कधी लक्षातच आल नाही.

जर ब्रिटीश गांधींच्या सत्याग्रहाला नमुन देश सोडुन गेले मग भारताला कॉमनवेल्थ मध्ये रहाण्याची सक्ती सहन करायची गरज काय होती. ब्रिटीशांनी स्वातत्र देताना बर्याच अटी ठेवलेल्या होत्या आणी त्या मान्य करुनच देशाला स्वातंत्र्याची भिक मिळालेली आहे. त्या अटी कोणी मान्य केल्या होत्या हे सांगण्याची गरज नाही,

त्या अटी मध्ये नेताजींवर लक्ष, आणी INA ला भारतीय सैन्यात सहभागी करु नये अश्या अटी होत्या आणी
त्या अटींची पुरेपुर पुर्तता करण्यात काँग्रेसने धन्यता मानलेली आहे.

१. हजारो लोक जालियनवाला बाग येथे मारलेला जनरल डायर ईंग्लंड मध्ये आरामात जगला !
२. काळा पाणी ईथला जेलर ज्यांनी हजारो लोकांचे जिव घेतले तो ही ईंग्लंड मध्ये आरामात राहीला !

>>>>

आफ्रीकेतील युद्धात अनेक अत्याचार केलेला चर्चील स्वतः जिथे पंतप्रधान झाला तिथे हे झालं त्यात काय आश्चर्य?

लोकसत्ता मधे एक लेख आला होता, त्या मधे लाल बहादुर शास्र्तीं ताश्कंदला गेले असता, ते नेताजींना भेटले होते,
असे वाचल्याचे आठवत आहे. त्या लेखामधे नेताजी स्वातंत्रानंतर बराच काळ रशीयामधे राहिले होते असे लिहीले होते.

प्रश्न आपल्या नेत्यांचा आहे ना ?

दादाभाई नौरोजींनी १८७० मध्ये लिहुन ठेवलेल्या अंदाजा नुसार ब्रिटीशांनी भारतातुन वर्षा मागे ४ मिलियन पाँऊंडस
लुटले होते, कोहिनुर सारखा हिरा तर त्यांच्या म्युझियम मध्ये तेंव्हाही होताच,
पण स्वातंत्रच इतक्या सहजा सहजी मिळाल की ते घेणार्याचे डोळेच दिपलेले होते, त्यावर पंतप्रधान होण्याची स्वप्नेही पडु लागलेली होतीच. तेंव्हा अश्या छोट्या गोष्टीम्ना त्यांच्या मते थारा नव्हता, जर अश्या गोष्टी महत्वाच्या असत्या तर हे नेते पुस्तक लिहीत बसले असते का ?

जर तुलना करायचीच असेल तर तुलना आपल्या नेत्याची ली क्वॉन यु शी करा

ली क्वॉन यु हा सिंगापुरचा पहिला पंत प्रधान होता, १९६५ ला सिंगापुर मलेशियापासुन वेगळा झाला, त्यावे ळी तिथे फक्त जंगल होत, पण १९६५ ते १९९० पर्यंत सिंगापुर जगातल सर्वात समृद्ध शहर बनल. त्या साठी ली ने आपल्या आयुष्याची ३५ वर्षे वेचली,

तो आता २३ मार्च ला मरण पावला, त्यावेळी त्याच्या मरणाच्या धक्याने सिंगापुर मधली ८-१० वर्षांची मुले ही रडत होती.

स्वातंत्र्य मिळणं आणि मुख्य म्हण़जे आपण सत्तास्थानी येणं या हव्यासापोटी एक अत्यंत महत्वाची गोष्टं दुर्लक्षली गेली आणि ज्याचे परिणाम हजारो-लाखो लोकांना भोगावे लागले ते म्हणजे फाळणीच्या वेळचे दंगे आणि अमानुष कत्तली! पुढे या सगळ्याचा दोष मुस्लीम लीगवर ढकलला गेला तरी या पापात मुस्लीम लीगबरोबर तत्कालीन काँग्रेसही तितकीच वाटेकरी आहे!

असो, नेताजींच्या धाग्यावर हा विषय नको!

सातारकर बुवा ! डायर. आरामात जगला. काला पाणीवाला जेलर आरामात. जगला .

Proud

त्या मुसलमानाच् पोस्तीत मेही हेच लिहिले होते. सगळे मुसलमान मजेत जगले , तर तुम्ही वस्सकन माझ्या अंगावर आलात !

क्रिस्चन मजेत जगले. मुसलमान मजेत जगले.

हिं* भिकार्डे जीवन जगले आणि भिकार्डे मरण मेले.

हिं* भिकार्डे जीवन जगले आणि भिकार्डे मरण मेले.>>>>>> मग काय आम्ही धर्म बदलायचा का?:अओ::फिदी:

काउ काही वेळेस मला प्रश्न पडतो की वरील लिखाण तुम्ही उपहासाने लिहीता की खरेच तुमची अशी मते असावी?

काउ अजून एक प्रश्न आहे. मग ओसामा बीन लादेन, कसाब, शाहजहान हे कोणत्या प्रकारचे मरण जगले? की पूर्ण जगुन वृद्धापकाळात मेले. आताही हजारो लोक लिबीया मध्ये इसिस च्या माध्यमातुन मरतायत ह्याचे कारण काय? इराण-इराकमध्ये मेले ते कोणत्या कारणाने? सदाम हुसैन गेला ते कशामुळे?

काउ,

किती तो नाकर्तेपणा !!

सरळ सरळ "हिंदु" लिहायचीही हिंम्मत नाही !! का माहितीय ?

तुमच्या त दम नाहीय, सरळ सरळ लिहायला !!

कृपया कोणीतरी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इच्छा असल्यास धार्मिक तेढ वाढवणारे लिखाण केल्याबद्दल प्रशासकांकडे किंवा इतर योग्य ठिकाणी तक्रार करा.

अजिंक्य आणि म.वि.देशमुख ,
दोघांच्याही पोस्टी पटल्या. या काही बाबतीत आपला देश (आपण) दुदैवी आहोत ..
बाकी काय ! Sad

***********

>>>>>>>सरळ सरळ "हिंदु" लिहायचीही हिंम्मत नाही !! का माहितीय ?
तुमच्या त दम नाहीय, सरळ सरळ लिहायला !! <<<<<<<<<<

अरे असे नाही अजिंक्य,, वर त्यांनी सावरकर च्या ऐवजी **** , कोणाच्यातरी नावाच्या जागी लिंबूभक्त असे शब्द योजले होते.. तेव्हा खरेतर काउ याच्या समजदारपणाचे मला अतिशय कौतुक वाटले..

त्यांना बरोबर ठाऊक आहे, कोणते शब्द उच्चारायची त्यांची लायकी आहे आणि कोणते नाही ते. Happy
म्हणून ते असे शब्द गाळून टाकतात ..

हिं* भिकार्डे जीवन जगले आणि भिकार्डे मरण मेले. >>>> आवर घाला बरका काऊ स्वतःला.

'विचार पटणे' आणि 'आदर वाटणे' या गोष्टीतला फरक , मागच्याच पोस्टीत सांगितले होते काऊ, हा फरक समजून घ्या.. स्वतःच्या धर्माचा अभिमान जरूर बाळगा पण आमच्या धर्माला नावे ठेवायचा आपल्याला आजीबात अधिकार नाही !
हिंदू बद्दल अर्थात आपल्याला काही माहित असेल अशी अपेक्षाच नाही.. परंतु नुसते हिंदू धर्माचे अस्तित्व किती काळपासून आहे जरी आपल्याला माहित असते तरी आपण असे बिनडोक विधान केले नसते.
................

यांना हाकलून लावण्या करता काही प्रोसीजर असेल तर चालू करावी असे माझे मत आहे, माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत ...

पिकेश साहेब आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण असा सेन्सिबल विचार करतो की यांची कायदेशीर तक्रार केली तर मधे मायबोलीचे नाव येणार. तेव्हा मायबोलीला कशाला मधे आणा? आपण असाही विचार करतो की आपले कामधंदे सोडून या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात का वेळ घालवायचा आणि तेवढा वेळ नसतो ही आपल्याकडे आणि असा विचार योग्यही आहे. मग या लोकांचे फावते. तेव्हा तक्रार करावी किंवा जातीयवादी/हिंदूद्वेषी लिखाण सहन करावे हे दोनच पर्याय आपल्यापुढे उरतात.

सुभाष चंद्र बोस हे द्वितीय महायुद्धातील आरोपी होते आणि फरार युद्धगुन्हेगाराच्या यादीत त्यांचे नाव होते ह्याला कोणताही पुरावा नाही. किंवा अफवा मुद्दाम पसरवण्यात आली असू शकते.
न्युरेम्बर्ग किंवा टोकियो ट्रीब्युनलमध्ये त्यांचे नाव नाही. ह्या आर्कीव्स नेटवर असल्यास नक्की माहिती मिळू शकेल.

नेताजींच्या नातलगांवर पाळत ठेवण्याचे असेही एक कारण असू शकेल की जर नेताजी यदाकदाचित हयात होतेच असतील तर नातलगांच्या हालचालींवरून त्यांचा ठावठिकाणा लागू शकेल.
पण युद्धगुन्हेगार असणे हे अज्ञातवासात राहाण्याचे सबळ कारण असू शकते. युद्ध संपल्यावर युद्धगुन्हेगारांना कोणतीही दयामाया न दाखवता अतिशय कठोर शिक्षा देण्यात आल्या होत्या. नात्सी अत्याचारांच्या गोष्टी जसजश्या जगापुढे म्हणजे आम जनतेपुढे येत गेल्या तेव्हा प्रथम सारे जग सुन्न आणि बधिर झाले आणि नंतर प्रचंड प्रक्षुब्ध झाले. दोस्त राष्ट्रांना आणि आम जनतेला न्याय हवा होता. या गुन्हेगारांतून कुणीही सुटू शकले नसते.

हीरा,
+++++ नात्सी अत्याचारांच्या गोष्टी जसजश्या जगापुढे म्हणजे आम जनतेपुढे येत गेल्या तेव्हा प्रथम सारे जग सुन्न आणि बधिर झाले आणि नंतर प्रचंड प्रक्षुब्ध झाले. दोस्त राष्ट्रांना आणि आम जनतेला न्याय हवा होता. या गुन्हेगारांतून कुणीही सुटू शकले नसते. +++++++

अगदी अशीच अवस्था भारतातील स्वातंत्र सैनानींचीही झाली होती, त्यांना असंख्य यातनातुन जाव लागल !!
आप ल्या लोकाम्ची अशी पिळवणु क क रणार्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती !१

अशी कित्येक उदाहरण आहेत, पण एकदा स्वातंत्र मिळाल्यावर ते मुळ स्वातंत्र सैनिक गेले पडद्याआड आणी ईतर लोकांनीच स्वातंत्र आणी राज्य उपभोगील.

महाराष्ट्रातला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर आज कोणालाही चार ओळी सुद्धा सांगता यायच्या नाहीत,

Pages