समान वेतन दिनानिमीत्ताने

Submitted by रैना on 15 April, 2015 - 02:11

आज अमेरिकेत 'समान वेतन दिवस' आहे असे शेरिल सँडबर्ग यांच्या फेसबुक पानावर वाचले. तेथील अहवाल चाळला. त्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि तसा तो दरवर्षी यावा अशी आशा आहे.

http://www.pewresearch.org/fact-tank/2015/04/14/on-equal-pay-day-everyth...

http://www.nationalpartnership.org/issues/fairness/2014-wage-gap-map.html

- समान कामासाठी स्त्रीपुरुषांना मिळणार्‍या वेतनात तफावत असते. (आणि पर्यायाने इतर वेतनातही. कारण पेन्शन/मेडिकल/इतर हे सर्व सहसा पगारावर कॅल्क्युलेट होते).

- हा फरक सहसा कुठल्याही व्यवसायात आढळून येतो असे अहवाल सुचवतो. म्हणजे शिक्षक/शिक्षिकेपासून ते प्रोग्रामर्स पर्यंत कुठेही. जिथे सहसा स्त्रियांचे प्रमाण जास्त अशा व्यवसायातही, आणि अर्थातच पुरुषांचे प्रमाण जास्त असणार्‍या व्यवसायातही.

- ही तफावत वयागणिक वाढत जाते, (आणि स्त्रियांचे प्रमाणही त्या त्या व्यवसायात कमी होत जाते ते वेगळेच.)

- शिक्षणाने ही तफावत कमी होत नाही. म्हणजे एकाच व्यवसायात उच्चशिक्षित स्त्रियांना आणि पुरुषांना मिळणार्‍या वेतनात (आणि संधींमध्ये) तफावत आढळतेच.

- वर्ण/रंग 'वुमेन ऑफ कलर' यांचे बाबतीत जास्त तफावत आढळून येते असे अहवाल म्हणतो

- ही तफावत मुलं नसणार्‍या स्त्रियांबाबतही आढळून येते

- (अवांतर माहिती 'जेंडर पे गॅप' सर्व देशात असते पण तरीही कोरिया आणि जपानात बरीच जास्त आहे असे वाचल्याचे स्मरते.)

जागतिक जेंडर तफावत अहवाल इथे वाचता येईल
http://reports.weforum.org/global-gender-gap-report-2014/

आरोग्य आणि सर्व्हायवल (जगण्याचा हक्क?), शैक्षणिक पात्रता, अर्थकारणात सहभाग आणि संधी, राजकीय सबलीकरण हे घटक विचारात घेतले जातात.
यातील रँकिगनुसार चीन -८७, भारत -११४, अमेरिका -२०, जपान- १०४

जागतिक बँकेच्या स्त्रियांच्या जागतिक व्यावसायिक सह्भाग इंडेक्सनुसार
चीन : ६४% महिला
भारत : २७% महिला
अमेरिका- ५६% महिला
जपान - ४९% महिला

http://data.worldbank.org/indicator/SL.TLF.CACT.FE.ZS

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I am not referring to report it is my personal experience. I am working for last 23 years and this is my observation that their is no difference in salaries based on Gender (at least the companies I worked for). There may be chances that these surveys are not conducted properly.

दिलेले संदर्भ नीट वाचायला सध्या वेळ नाही. एका पदाला समान पगार हे असं चित्र संपूर्ण खासगीकरण होण्यापूर्वी (५-६ वर्षांपूर्वीपर्यंत) आमच्या संस्थेत होतं. (क्षेत्र म्युच्यल फंड). आता प्रत्येक व्यक्तीचाच पगार वेगवेगळ्या पद्धतीने ठरत असल्याने व एकाचा दुसर्‍याला कळत नसल्याने सध्याच्या परिस्थितीची कल्पना नाही.

संदर्भात दिलेला एक ग्राफ पाहिला. त्यात सेवाकालाची वेतनाशी तुलना केली आहे. बहुतेक सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचे प्रमोशन घेण्याचे/होण्याचे प्रमाण कमी असल्याने ही तफावत होत असावी. अगदी शिक्षणक्षेत्रातही.

आता प्रत्येक व्यक्तीचाच पगार वेगवेगळ्या पद्धतीने ठरत असल्याने >> This is also a factor. for example I my field is Engineering HSE for Oil & Gas this is special filed and it is very difficult to find good engineers. So if a male engineer with 5 yr experience wil get a pacckage of 10 lacs at the same time a female engineer (say civil where the engineers available easily) may get a package of 8 lacs. This is not gender bias but a case of demand vs supply.

पगारात तफावत अज्जिबात नाही. असा काही कन्सेप्टच नाही. > खरंच केश्विनी?>>>> हो Happy आमच्या क्षेत्रात पगारात तफावत नाही. एका लेव्हलच्या सर्व स्त्री पुरुषांना सारखाच पगार असतो. सिनिअरिटीमुळे जो काही फरक पडत असेल तो स्त्री पुरुषांना सारखाच असतो. शिक्षण क्षेत्रातही (सरकारी) असंच असेल असं वाटलं म्हणून शिक्षण क्षेत्रात तफावत आहे हे ऐकून आश्चर्य वाटलं.

इतर क्षेत्रांमधील माहित नाही. पण अशी असमानता असेल तर चूक आहे.

तेल

I have a question. Does TCS, Infosys etc.(IT companies) pay different salaries for male and female employees?

मंदारडी

http://trak.in/tags/business/2014/07/24/indian-it-industry-gender-pay-gap/

त्यांचे म्हणजे आयटी मध्ये स्त्रियांचे प्रमाण ३०% फक्त आणि त्यातही २९ टक्के तफावत आढळते. पण त्यांनी लेव्हलींग कसे/किती केले हे नमुद केलेले नाही आणि तसेही मॉन्सटर बाबतीत माझे मत फारसे बरे नाही.
त्यामुळे हा काय फार चांगल्या प्रतीचा स्टडी आहे/ प्रातिनिधिक आहे असे म्हणता येणार नाही, पण इंडिकेटीव्ह आहे तरी कदाचित म्हणता येईल ?

http://www.deccanherald.com/content/435560/nadella-gaffe-research-shows-...
मध्यंतरी श्री सत्या नाडेला यांनी पायावर धोंडा मारुन घेतला होता त्या संदर्भाने
____________________________________

तुम्हाला जी हवी त्या इंडस्ट्रीचे नाव आणि देश घ्या.
उदाहरणार्थः
gender wage gap IT India किंवा
gender wage gap academia UK

फारतर pay गॅप असे कीवर्डस बदलून पहा.

http://economix.blogs.nytimes.com/2011/02/17/the-gender-pay-gap-by-indus...

उदाहरणार्थ- देश न देता मी नुसता gender pay gap Oil & Gas Industry असा सर्च मारला तर वरील चार्ट मिळाला. अमेरिकेतला का असेना.

पगारात तफावत अज्जिबात नाही. असा काही कन्सेप्टच नाही. >>

हे अगदी बरोबर आहे शैलजा. पण पगाराबाबतीत ही भिन्नता स्त्रि पुरुष ह्यामुळे नसते तर १) तुमचे काम २) तुमचा मॅनेजर हे दोन घटक मुख्य असतात.

<< बहुतेक सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचे प्रमोशन घेण्याचे/होण्याचे प्रमाण कमी असल्याने ही तफावत होत असावी. अगदी शिक्षणक्षेत्रातही.>>
प्रमोशन्स कमी घेतली वगैरेची कारणं काहीही असली तरी ऑन पेपर तुम्ही ज्या पदावर आहात त्याच पदाची आणि ज्येष्ठतेची वेतनश्रेणी लागू होणार. शिक्षणक्षेत्रात तिथे स्त्रीपुरुषभेद होत नाही. त्यामुळे त्या तफावतीला असमान वेतन म्हणू शकत नाही.
स्त्रीविरोधी बायसेस आणि डिस्क्रिमिनेशन्सशी लढाया या अधिकृत कागदपत्रातील तरतुदींबाबत नसतात सहसा.

ऋन्मेष,
तुझ्या प्रश्नावर तूर्तास रुमाल. नंतर कधीतरी सविस्तर लिहावे लागेल. पण ढोबळमानाने उत्तर द्यायचे झाल्यास , अशा मुलींचे पुढे काय होते, त्या जातात कुठे या प्रश्नाचे उत्तर ' त्यांचे लग्न होते', 'त्यांना मुलं होतात' असे द्यावे लागेल. Wink

बी, मी असहमत आहे. इतके सरळसोट नसते. केवळ काम हा क्रायटेरिया पाहून पगार मिळत असते तर काय हवे होते? Happy किंवा कोणत्या प्रकारचे काम आहे हे जरी लक्षात घेतले तरीही.. असो.

मंदार हो, मोठ्या कंपनींमधूनही पगारात तफावत असू शकते. ऑफिशियली ते कोणी मान्य करणार नाहीत कदाचित.

मयेकर,
तुम्ही म्हणताय ते बर्‍याच बाबतीत लागू होते. त्याच्या पुष्ट्यर्थ खालील लेख.

http://chronicle.com/blogs/data/2014/04/11/there-is-a-gender-pay-gap-in-...

वरदा, मयेकर
मुक्त अर्थव्यवस्थेचा एक परिणाम 'वेतनात लिंग(वंश)सापेक्ष तफावत' असाही होतो असाही सूर आढळून येतो बर्‍याच लेखांमध्ये, म्हणजेच मयेकर म्हणतायेत त्यानुसार "प्रत्येक व्यक्तीचाच पगार वेगवेगळ्या पद्धतीने ठरत असल्याने '

लक्षात घेण्याजोग्या बाबी
- अशी तफावत नाहीच/ नसतेच असे बर्‍याच लोकांना प्रामाणिकपणे वाटत असते, त्यांचे किमान आता तरी
मतपरिवर्तन होईल, निदान त्या दृष्टीने विचारांचा प्रवास होईल
- जगाच्या पाठीवर कुठेही हाच अजब न्याय अजूनही लागू होतो

डेटाच/ सर्व्हेच चुकीचा असेल, असे काही नाहीच्/नसतेच, मी पाहिले नाही, असे किती सहजी धरुन चालतो आपण, आणि तरी संघटित क्षेत्रात सर्व आलबेल असतेच हे गृहितक तपासण्याजोगे आहे.

मला सँडबर्ग यांच्या पोस्टीतली वाक्यरचना आवडली. "Mothers" who work full time, year round in the US are paid just 71 cents for every dollar paid to fathers who work full time, year round. अशी त्याची सुरवात आहे. 'मदर्स' हे महत्त्वाचे आहे. (वंशलिंगसापेक्ष वेतनात तफावतही महत्त्वाची आहेच.)

रैना, मी फक्त आणि फक्त माझ्या क्षेत्रातील भारतीय सरकारी-निमसरकारी नोकर्‍यांविषयीची निरिक्षणे मांडली आहेत. इतर क्षेत्रात काय परिस्थिती आहे/नाही यावर काहीच भाष्य करत नाही कारण मला अजिबात माहित नाही. तू दिलेल्या मतांचे लेख अधूनमधून वाचनात येत असतात पण त्याचा माझ्या व्यवसायाशी संबंध नाही. मला अगदी खाजगी संघटनेकडून व्याख्याती म्हणून बोलावणार असतील तरीही त्या मानधनात लिंगसापेक्ष तफावत नसते.

या धाग्याचा उद्देश ज्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ही तफावत नाही हे दिसतेय (वाटतेय नव्हे) त्यांनी त्यांनी तफावत आहेच्च असं मान्य करावे हा आहे का?

१० वर्ष काम केलेली स्त्री आणि १० वर्ष काम केलेला पुरूष (एकाच स्तराला असलेले) यांच्या पेमेंटमधे फरक असला तर तो केवळ जेंडर रिलेटेडच आहे हे फार जास्त सुलभीकरण झाले नाही का?

सरकारी नोकर्‍या, शाळा-महाविद्यालये-विद्यापिठे यामधे ठरवून दिलेले पे स्केल जेंडर रिलेटेड असते का? माझ्या माहितीप्रमाणे तरी शासकीय अध्यादेशात असे काही नाहीये.

विद्यापिठातले मानद व्याख्यात्यांचे स्केलही युजीसीने ठरवून दिलेले आहे आणि ते विद्यार्थी संख्या, विषयातला एक्स्पर्टीज अशी अनेक व्हेरिएबल्स विचारात घेते. मी २००१ पासून सा फु पु वि च्या ललित कला केंद्रात आणि २००४ पासून मुं वि च्या अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्टसमधे व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. हे विभाग अजून लहान आहेत आणि त्यामुळे प्रत्येक विषयांसाठी पूर्ण वेळ अध्यापक असणे परवडण्यासारखे नाहीये त्यामुळे आम्ही अनेक व्हिजिटींग फॅकल्टीजच इधे प्रामुख्याने शिकवतो. इथे मला कधीही जेण्डर सोडाच इतर कशावरूनही स्केलमधली तफावत आढळलेली नाहीये. ज्येष्ठतेवर सुरूवातीला होती. पण त्यात काही चुकीचे नाही. आता एवढ्या वर्षांच्या नंतर मलाही एक्स्पर्ट म्हणूनच पैसे मिळतात.
हे मला वाटत नाही. ही फॅक्ट आहे.

पगारातली/ मानधनातली तफावत ही कामाची एफिशियन्सी, स्किल लेव्हल यावरही अवलंबून असते. १० वर्ष काम केलेल्या, एकाच वयाच्या दोन व्यक्तींच्या कामाच्या रिझल्टमधे प्रचंड फरक असू शकतो. तो फरक मोजला जावा आणि आर्थिक बाबीत रिफ्लेक्ट व्हावा यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही.

मी फक्त आणि फक्त माझ्या क्षेत्रातील भारतीय सरकारी-निमसरकारी नोकर्‍यांविषयीची निरिक्षणे मांडली आहेत >>> मी देखिल Happy तिथे खरंच पगाराच्या बाबतीत जेंडर बायस नसतो.

कायद्याने असा फरक होत नसेलही.
पण ही लिन्क बघा, http://www.paycheck.in/main/salary/minimumwages/maharashtra/minimum-wage... त्यात स्कील्ड व सेमी स्कील्ड व अनस्कील्ड असा फरक केलेला आहे जेव्हा कि सर्रास पुरुष नोकरांना स्कील्ड वा सेमी स्कील्ड ठरवले जाते तर स्त्रीयांना अनस्कील्ड. अन इथे तो फरक पडतोच पडतो.
खाजगी उद्योगांचे बाबतीत बोलायलाच नको.

सरकारी नोकर्‍यांमधे अगदी चतुर्शेश्रेनी कर्मचार्‍यांमधेही हा फरक नाही. किंबहुना तो होउच शकत नाही कारण appraisal system अस्तित्व्वात नाही.
वेतन आयोगाने थर्‍अविल्याप्रम्मने पगार होतात.seniority wise बदलतात.
नियमांनुसार साहेब wholesale मधे सह्या करतात,कारकुन मंदळी ते blindly implement करतात , भेदभाव करायला कुठेही scope नसतो.

ह्या लेखाच सुर स्त्री म्हणुन पगार मुद्दाम कमी दिला जातो असा दिस्तोय जो मला तरी पटत नाहिये. सुदैवाने प्रतिक्रिया वेगळ्या आहेत.

private sector मधे कदाचित फरक पडत असेल पण तितेही performance विचारत घेतला जात असेल ना? एखादी स्त्री चांगले काम करत असेल तर खासगी कार्यालय मुद्दाम का तीला कमी पगार देइल? मुलांना घराला priority देण्यासाठी स्त्रीयांनी promotions नाकारली तर त्यात कार्यलयाचे चुक काय?

लिंब्या, ते सरकारी नोकरी बद्दल नाहीये. किमान श्रमवेतनाबद्दल आहे. शिक्षणक्षेत्रात स्किल्ड आणि अनस्किल्ड/सेमिस्किल्ड वगैरे तफावत लिंगसापेक्ष करून त्यानुसार पगार कमीजास्त होत नाहीत. अगदी शिक्षणसेवकांचे सुद्धा. आणि मी फक्त पुणंच नाही तर खेडोपाड्यातल्या लोकांनी सांगितलेल्या माहितीवर बोलतेय.

एकाच लेव्लला काम करणार्‍या स्त्री पुरुषांच्या पगारात तफावत पाहिली आहे.>>
पुरुष पुरुषांच्यात पण असते. अनेकदा २-३ वर्षाने ज्युनीयर लोक आपल्यानंतर येऊन प्रमोशन घेतात व पगारही जास्ती मिळतो. काही वेळा एकाच लेव्हलला सारख्या वर्षांच्या अनुभव असणार्‍यांना एकाच कंपनी मधे वेगळा वेगळा पगार असतो. त्यात स्त्री पुरुष असा भेदभाव नसुन त्याचा संबध मागणी व पुरवठ्याशी जास्त वाटतो मला.

रैना म्हणते ते काही क्षेत्रात होतही असेल. मुखतः प्रायव्हेट सेक्टर्समधे. वेतनात जशी तफावत आहे तशी टॅक्स रीबेटमधे स्त्रीयांना फायदा जास्त होतो. त्यांच्या स्लॅब व सुट जास्ती असतात.

त्यामुळे सरसकटपणे असे म्हणने चुकीचे वाटत आहे. केस बाय केस फरक आहे.

जर्बेराच्या पोस्टवरून निष्कर्ष काढायचा झाला तर मुळ प्रश्न स्टेममध्ये (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरींग आणि मॅथ्स) करीयर करणार्‍या स्त्रियांची कमी असा आहे!!

>>>> एखादी स्त्री चांगले काम करत असेल तर खासगी कार्यालय मुद्दाम का तीला कमी पगार देइल? मुलांना घराला priority देण्यासाठी स्त्रीयांनी promotions नाकारली तर त्यात कार्यलयाचे चुक काय? <<<

माझ्या पहाण्यात तरी अशा केसेस आल्यात की,
१) जिथे मुलीचे लग्नही व्हायचे होते, काम उत्कृष्ट होते, प्रमोशन नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, मात्र उद्या(परवा, तेरवा) कधीतरी ही लग्न करेल, अन मग हिला मुलेबाळे होतिल, अन मग कायद्याने हिला बाळंतपणाच्या भारंभार रजा द्याव्या लागतील, मग आतापासूनच कशाला हिला उगाचच वरची प्रमोशन देऊन जबाबदारी(?)च्या जागेवर पाठवायचे?
२) एखादी स्त्री कितीही चांगले काम करित असली तरी तिला संधीच नाकारण्यात येते यास वरीलप्रमाणे कारणे असतातच. पण किमान आत्ता या क्षणी जे काम करते, त्याचा तरी पुरेपुर मोबदला (अन्य पुरुष सहकार्‍यांच्या तुलनेत) द्यावा, तर ते ही होताना दिसत नाही.
३) माझ्याच ऑफिसमधिल उत्कृष्ट काम करणारी स्त्रीसहकारी, पण वर्षानुवर्षे तोन्डाला पाने पुसल्यागत किरकोळ पगारवाढ झाल्याने शेवटी सासरकडच्यांनी देखिल तोन्डे वेडगवल्यावर त्या बिचारीला असलेली नोकरी सोडून दुसरी बघावी लागली, अर्थात सगळीकडेच तीच रड असल्याने तिची स्कील्स वापरुन घेऊन तिला पुरेपुर मोबदला मिळतोय असा अनुभव आलाच नाही. मी वर्षानुवर्षे काम करुनही दहा/बारा, जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये ग्रॉस पगार असलेल्या स्त्रीयांची गोष्ट करतोय, जेव्हा त्याच कामाकरता पुरुष ठेवल्यावर तो किमान वीस हजारापासूनच पुढे सुरु होतो. तुमचे शिक्षण व त्या अनुसार कामधंद्याचे/पोझिशनचे विश्वच वेगळे असेल तर तुम्हाला अशी जमिनीवरील उदाहरणे दिसणे शक्य नाही हे देखिल मला मान्य आहे.

प्रतिसाद दिलेल्या आणि मत मांडलेल्या सर्वांचे आभार. वाचते आहे. Happy

वरदा- नोटेड विथ थँन्क्स. ते खाजगी व्याख्यात्यांचे वाचूनही बरं वाटलं.

धन्यवाद जर्बेरा.
जेंडर पे गॅप फक्त 'स्टेम' पुरती मर्यादित आहे असे डेटा म्हणत नाही, पण तिकडे ती जास्त उल्लेखनिय आहे, असे दाखले निश्चित आहेत.

धन्यवाद नीधप आणि आर्क- सरकारी वेतनात कसलीही तफावत नसते हे नमुद केल्याबद्दल.
UGC पे स्केलस बाबतही वाचले आहे.

धन्यवाद लिंबुटिंबु- बरोबर आहे. स्कील्ड/अनस्कील्ड लेबर बाबतही आणि तुम्ही लिहीली तशी इतर काही उदाहरणेही. देशात आणि परदेशातही पाहिली आहेत. रिगार्डलेस ऑफ इंडस्ट्री ही पाहिली आहेत.

तुमचे शिक्षण व त्या अनुसार कामधंद्याचे/पोझिशनचे विश्वच वेगळे असेल तर तुम्हाला अशी जमिनीवरील उदाहरणे दिसणे शक्य नाही हे देखिल मला मान्य आहे>> हेही पटले.

आर्क- कसल्याही प्रकारचे पे आणि ऑपॉर्च्युनिटी डिस्क्रीमीनेशन कुठेही होत नसते तर असे रिपोर्ट देशोदेशी का आले असते? ती आकडेवारी काही मला 'वाटते' म्हणून नाहीये. ती वस्तुस्थिती अजूनही आहे बर्‍याच अंशी. नामांकित आंतरराष्ट्रीय संस्था त्यावर काम करतात.
की तुम्ही म्हणताय- तफावत असली म्हणून कुठे बिघडले- ती असणारच ?

माझ्यामते बदल होत आहे, पण अजूनही सर्वच क्षेत्रात स्त्रीपुरुषांच्या वेतनात समानता असेलच असे नाही. ती असतेच असे गृहित धरता येत नाही. समान स्किल्स / अनुभव / शिक्षण / आउटपुट/ डिमांड/ सप्लाय हे सर्व फॅक्टर धरुनही, unexplainable असा एक फॅक्टर 'जेंडर बायस' हा असतो.

केपी बरोबर आहे. पण all other things being equal, systemic तफावत असायला नको खरंतर. पण ती गॅप असते, आढळून येते आणि वरिष्ठ पदांवर (सहसा) जास्त आढळून येते. तिथे तर संधी आणि वेतन दोन्ही असमान असते.

त्या दिवशी ते स्टेटस वाचून मला एकंदरित बरं वाटलं. हा मुद्दा हळूहळू का होईना पुन्हा पोलिटिकल/ सोशल अजेंड्यावरही येतो आहे. त्याने थोडा तरी अवेअरनेस/ दबाव निर्माण होतो (तात्पुरता का होईना). तोही महत्त्वाचा आहे.
जपानसारख्या देशातही थोडाफार बदल होऊ लागला आहे.

कुठल्याही समस्येचे निराकरण व्हायला आधी ती 'समस्या' आहे हे मान्य करावे लागते. त्यादृष्टीने कोणी का असेना प्रयत्न करतेय मला तरी आश्वासक वाटते.
मग ते ऑस्कर सोहळ्यात पॅट्रिशियाने दिलेले भाषण का असेना. Happy

Pages