निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर एक सांगा, हा आपटा च ना/? >>>>>>> हो, हा आपटाच आहे ......

Common name: Bidi Leaf Tree • Hindi: कठमूली katmauli, झिंझेरी jhinjheri • Marathi: अपटा apta, Sanskrit: यमलपत्रक yamalapatrakah, युग्मपत्र yugmapatra
Botanical name: Bauhinia racemosa Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)

(साभार - http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bidi%20Leaf%20Tree.html )

मोगरा प्रेमीं साठी....:)
आ ज सकाळी उ म ल ले...:)
एक फुलं जरी वाहीले त री दिवस भर देव घरात दरवळ असते....
Photo3381.jpgPhoto3380.jpg

सायली, परवा कंबोडीया मधली एक फिल्म बघत होतो. तिथे मोगर्‍याची फुले एका हिराच्या काडीत ( नारळाच्या झावळीच्या पानाच्या मधली शीर, झाडू साठी वापरतात ती ) मोगर्‍याची फुले अलगद ओवून देवासमोर उदबत्तीसारखी ठेवली होती.

मोगरा फुलला, मोगरा फुलला.

आज गेलो होतो एम आय डी सी परिसरात. मळभ होतं त्यामुळे सोनमोहोराचे फोटो निट नाही आले.

बहावा पण दिसला. काही ठिकाणी चाफ्याची पण विविधरंगी झाडे लावली आहेत. नेत्रसुख.

अमेझींग दा .. Happy कल्पना छान आहे... देवा समोर त र अशी खरी खुरी मोग र्‍याची उ द ब त्ती ठेवायचीच आणि कोणाला मेहुण म्हणुन बोलवल तर ताटा भोवती रांगोळी आणि अशी खरीखु री मोग र्‍याची उ द ब त्ती ठेवली त र .. जेवणारा कीत्ती प्रसन्न चीत्ता नी जेवेल नाही!:)

मागे गुलमोहर पण आहे पण just फुले यायला सुरुवात झालीय.

तो सोनमोहोर टाकलाय त्याच्याशेजारीच गुलमोहर आहे.

एक प्रश्न मोहोर म्हणायचं की मोहर. मी confused आहे. >>>>> हे पहा .....

(http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=395&table=moleswo...
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/ )
मोहर [ mōhara ] f ( P) A gold coin, a mohur. 2 A seal or stamp. 3 The impression upon a coin.

मोहर [ mōhara ] m Blossomed state; the blossom or florification (of the Mango and some other trees).

मोहरणें [ mōharaṇēṃ ] v i (मोहर Flowering.) To flower or blossom--the mango and similar trees. 2 (मोहर Front or fore part.) To be full-ripe and be on the turn;--used of a crop: also to be mature, ripe, full-prepared and on the turn;--used of butter or sugar under process of clarification. 3 To get ahead, forward, in advance: also to begin to go forward on their way;--used of pasturing herds to the water or on return to their evening-home. 4 To be rising or getting up--the moon. 5 (with the word मोहरी or पोवा) To play the मोहरी or fife. Ex. गाई चारी मोहरी पोवा गायीपाठी ॥ धन्य जाली काठी कांवळी ते ॥.

मोगर्‍याची फुले अलगद ओवून देवासमोर उदबत्तीसारखी ठेवली होती.>>>> झकास कल्पना!

मोहर : वर पुरंदरे यांनी सांगितल्याप्रमाणे.
मोहोरः शिक्का

घरचा चाफा :

chafa.JPG

जास्वंद :

Jaswand (1).JPGJaswand (2).JPG

एप्रिल मधे फुलणारं मे फ्लॉवर .. एप्रिल फुल Wink मे फुल Lol :

may flower.JPG

अ न्जु ताई म स्तय सोन मोहर .....
Shashank ji Chaan ulgada kelat...
Raavi Happy
Tina chaapha Chaanch. Jyala tu may flower mhantes te lily family tala ahe....

Gulmohar.....

आणि तो नील मोहर का?

सध्या अख्ख नागपूर या जांभळ्या फुलांनी ब ह र ल य....

तामण म्हणजेच Lagerstroemia - (फोटो विकीवरुन साभार)

lagerstromia.JPG

आणि हा झकरान्दा किंवा जॅकरांदा Jacaranda - (फोटो विकीवरुन साभार)

Jacaranda1212.jpg

पुण्यात सध्या सगळ्या रस्त्यांवर जॅकरान्दा फुलला आहे. धूर ओकणार्‍या गाड्या, धूळ, कळकळणारं ऊन या सगळ्यातून जाताजाता याचे निळसर जांभळे शिडकावे किती सुखद वाटतात!
वसंत बापटांनी याच्यावर एक मस्त कविता केली आहे:

जॅकरांदा जॅकरांदा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांदा!
उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांदा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांदा !
कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांदा ..
पक्के शिक्के जॅकरांदा
डोळेभर जॅकरांदा
डोकेभर जॅकरांदा !
हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांदा!
इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांदा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांदा !
जॅकरांदा जॅकरांदा जॅकरांदा जॅकरांदा !

शशांक जी.. ताम्हण म्हणतात होय त्याला.. आभार...
आदिजो... मस्त कविता शेयर केली.. आणि प्र.ची देखील..
अन्जु ताई फोटो टाकत चला, जमतात की तुम्हाला...:)

मस्त कविता ...

मी गावी जाताना साता-यात बघितला जॅकरांदा. अगदी भरभरुन फुलला असे म्हणता येणार नाही पण तरी ब-यापैकी फुललेला. सातारा आणि त्याच्या पुढे तुरळक झाडे आहेत हायवेवर. पण त्याच्या आधी कुठेही दिसला नाही, मुंबईत तर मी अजुन शोधतेय त्याला. बहुतेक नसावाच.

ऑन सेकंड थॉट्स, मी पाहते तो जॅकरांदा की दुसरा कोणी असा प्रश्न पडलाय नेटवरचे त्याचे फोटो पाहुन. नेटवरचे फोटो पाहिल्यावर त्याची फुलाची रचना टॅबेबुयासारखी आहे असे दिसतेय. म्हणजेच फांदीच्या टोकाला किंवा आजुबाजुला खुप मोठ्ठॅ झुबके असावेत असे दिसतेय. मी जे झाड पाहिलेय त्याला टॅबेबुयासारखी बारिक गोल संयुक्त पाने आहेत (जशी रेन ट्री किंवा शिरीषची अस्तात तशी) पण त्याची फुलरचना खुप वेगळी आहे. सागाच्या झाडाला जसा फुलांचा गोलाकार तुरा असतो तसा ह्या झाडांच्या फांद्यांछ्या टोकांना जॅकरांदाच्या फुलांच्या रंगाचा तुरा आहे. कुठलेल्ही फुल झुबक्यात नाही तर शिस्तीत ह्या तु-यात बसलेले आहे. गाडी चालवत असताना मध्ये थाबुन फोटो काढणे शक्य होत नाही, नाहीतर नक्कीच फोटो टाकले असते इथे. पुढच्या वेळेस प्रयत्न करते.

Jacaranda
Family: Bignoniaceae -

Jacaranda_mimosifolia_flowers.JPG

आणि
Tabebuia
Family: Bignoniaceae Happy

tabebuia1.JPGtabebuia.JPG

Pages