अकादमी 5 :- तिचा पहिला स्पर्श

Submitted by सोन्याबापू on 11 April, 2015 - 04:06

अकादमी ने पहिल्या एका आठवड्यात काही केले असेल, तर ते म्हणजे आम्हाला सॅंड पेपर ने घासल्यागत चकाचक केले!! एव्हाना 3 आठवडे झाले होते , खच्चुन फिजिकल करूनही आजकाल संध्याकाळी स्पोर्ट्स ला बाहेर काढले तरी काही वाटत नसे आम्ही खुशाल बास्केटबॉल वॉलीबॉल वगैरे खेळत असु.त्या तीन आठवड्यात आमची अंगदुखी बरीच आटोक्यात आली होती पण आता नवीन प्रॉब्लेम सुरु झाला होता, पहिल्या आठवड्या नंतर. बघायला अतिशय मनोरंजक पण शिकायला खुप जास्त डिमांडिंग तो म्हणजे "ड्रिल".

शाळेत ड्रिल म्हणजे पीटी वगैरे असे, पण फोर्सेज च्या भाषेत मार्चिंग ला म्हणतात ड्रिल. जनरल "लेफ्ट राईट लेफ्ट" इतकेच त्याचे स्वरुप नसते , त्यात अनेक बारकावे असतात. काही सांगायचे झाल्यास

1. चटख :- म्हणजे "तेजsssss चलssssss" किंवा इतर कोणती ही ऑर्डर मिळाल्यावर इंस्ट्रक्टर किंवा कमांडर ची ऑर्डर संपल्या संपल्या भयानक विद्युतवेगाने डावा पाय अन उजवा हात एकाचवेळी बाहेर काढणे किंवा सांगितली असेल ती करवाई करणे.

2. टर्नआउट :- ड्रिल च्या वेळी आम्हाला परफेक्ट ड्रेसिंग बाय सेन्स ऑफ़ ड्यूटी आले पाहिजे बैरेट कॅप घालायचा कोन, डोक्याच्या उजव्या भागावर टोपी चेपली म्हणजे तिचा डावा भाग अन त्यावर लावलेला लोगो किंवा यूनिट इंसिग्निआ हा डोक्यावर डाव्या बाजुला डाव्या डोळ्याच्यावर अर्धी वित वर असावा, टोपी घातल्यावरही ती कपाळ पुर्ण झाकता कामा नये, त्यात 4 बोटांची गॅप असावी, इत्यादी.

3.सिस्त (शिस्त) :- फाइल्स बनवणे, ब्लैंक फ़ाइल सोडणे, दाहिने देख च्या ऑर्डर ला फ़ाइल च्या गाइड ने सरळ पाहत राहणे इत्यादी

हे फ़क्त काही नमुन्यादाखल देतोय अश्या असंख्य गोष्टी असतात, बड़े उस्ताद ह्या बाबीत फार कड़क लक्ष्य घालत असे, सकाळी उठलो की रनिंग , मग कैनेडियन पीटी मग फिजिकल ट्रेनिंग अन मग ड्रिल असा एकंदरित कार्यक्रम असे, ह्यात फिजिकल अन ड्रिल हे कोर फोर्सेज चे ट्रेनिंग समजा, ह्या फिजिकल मधे दोर चढणे , वुडन लॉग पुलप्स , पुशप , फ्रंट रोल बॅक रोल (कोलंटउड्या सरळ अन रिवर्स), डिच क्रोलिंग वगैरे असे. सगळेच आधी तंत्रशुद्ध माहिती नव्हते तेव्हा ते हाहाकारी भासे, दोर चढ़ताना गुढघे फ़क्त सपोर्ट ला वापरून एंकल लॉकिंग ने वर चढायचे असते, दात ओठ चावत आम्ही वर चढत असु पण उतरताना ब्रेकिंग ला हमखास गुढघे घासत असु जाडजुड़ काथ्यासारख्या त्या दोराला घासल्यामुळे आतल्या बाजूंनी गुढघे अन मांड्यांवर अक्षरशः कट्स पडत, अन त्याची आगाग होत असे मग आम्ही कैंटीन मधुन nycil वगैरे पावडरी आणून तिथे लावायचो अन टंगड्या फासकटुन रात्री पंख्याखाली उताणे पसरायचो, मला त्या फिजिकल मधे खुप जास्त रगड़ा लागे. त्यात मी शर्मा उस्ताद चा लाडका होतो!!! पुलप्स मारतो पण फ्रंटरोल आवर असे व्हायचे, एक चुक झाली की पुर्या फिजिकल ग्राउंड ला फ्रंट रोल ने राउंड मारवा लागे.

तिथून परत आले की अंघोळ करुन वेगळा यूनिफार्म घालून मेस ला जायला 25 मिनट्स असत, डेली वेगळा ब्रेकफास्ट असे, शक्यतो अंडी अन स्प्राउट्स वगैरे हायप्रोटीन डाइट असायचा तेव्हा.

दहा ते दुपारी एक सिविलियन प्रोफेसर लोक्स लेक्चर घेत असत आम्ही ह्याच लेक्चर मधे जांभया कंट्रोल करायची कला अवगत केली होती विषय पण बोरिंग स्ट्रेटेजिक स्टडीज अन ऑल आमच्या फोर्स ला स्पेसिफिक असलेल्या पहाड़ी राज्यांबद्दल तिथल्या संस्कृति बद्दल वगैरे (अर्थात आज लोकल लोकांसोबत जेलिंगअप करताना त्या लेक्चर चे महत्त्व ही जाणवते)

त्यानंतर मॅप रीडिंग (ह्यात कन्वेंशनल मॅप, जीपीएस वगैरे सगळे असे) मग वेपन चा क्लास असे, वेपन ला मजा असायची , ते झाले की स्पोर्ट्स तेव्हा इंचार्ज प्रभजोत सर स्वतः आमच्या बरोबर खेळत असत विविध गेम्स, ज्यांना गेम्स खेळायचे नाही त्यांस जिम ला जाणे कंपल्सरी असे, सहज फिरताना कोणीही दिसला की खैर नाही. 6.00(1800) वाजता ते संपले की 6.30 (1830) ते परत 8.00 (2000)पर्यंत स्टडी टाइम असे लेक्चर चा अभ्यास करायला, अर्थात त्यावेळी आम्ही पण अभ्यास उरकुन टाकत असु,8.15 (2015) ला मेस ला डिनर असे, डिनर शक्यतो लाइट असे पण प्रोटीन्स चा मारा असे ह्या ही वेळी. सगळ्यांना सगळ्या टेबल्स वर सर्व करण्यात श्रीवास्तवजी अन मेस स्टाफ चे प्रोफेशनलिज्म डोळ्यात भरण्यालायक असे.साधारण 9 पर्यंत डिनर आटपे कुजबुजत गप्पा मारत.परत 9 (2100) ते 9.44 (2145) स्टडी देत , ह्या वेळात आम्ही उद्याचे लेक्चर पाहून ती पुस्तके बॅग मधे घालुन ठेवणे, सकाळ च्या पीटी चा यूनिफार्म खुर्चीवर जय्यत तयार ठेवणे इत्यादी उद्योग करत असु अन मग हॉस्टल च्या मधल्या चबुतर्यावर एकमेकांची टांग ओढ़त बुट पट्टे वगैरे हाती येतील त्या चमकवण्यालायक गोष्टी घासत बसत असु, त्या चबुतर्याला आम्ही "बेइज्जती मंडप" असे नाव दिले होते . ह्याचवेळी अन्ना ला हिंदी चे धड़े द्यायचे ही कार्य करावे लागे, कारण ऑर्डर येऊन ती समजून करवाई करण्यात अन्ना ढीला पड़े व् जवळपास रोज आम्हाला रगड़ा लागे. मग सगळे आवरून 9.45(2145) ला लाइट्स ऑफ़ होत असत!.

अश्याच रोजच्या रूटीन मधे काही काही दिवस विलक्षण गमतीदार म्हणुन लक्षात राहत. उदा वेपन सुरु झाले तो दिवस. आमची सुरुवात ऑर्डनेन्स फैक्ट्री बोर्ड (OFB) च्या 9 mm pistol ने झाली होती. वेपन्स स्वतः बड़े उस्तादजी शिकवत असत. पहिल्या दिवशी कोत मधुन(शस्त्रागार) DM pistols (डमी हत्यारे) आणायची जबाबदारी किश्या अन अल्फा कंपनी च्या तेज प्रताप गुरुंग ला दिली होती! एका हातात 2 ह्या प्रकारे 8 pistols घेऊन दोघे आले. वेपन्स म्हणजे नुसते वेपन्स नसते तर सोबत वेपन्स च्या माहिती चे चार्ट्स, ती वेपन्स खोलुन ठेवल्यावर मातीत ठेवावी लागु नये म्हणुन ती ठेवायला काही ताड़पत्री च्या मॅट्स वगैरे पण जामानिमा असे. हत्यारे न बघितलेल्या पोरांना एकदम लाइव ammo ला एक्सपोज़र नको म्हणुन बैरल जैम केलेल्या किंवा फायरिंग पिन्स काढून टाकलेल्या अश्या राइफल किंवा पिस्टल्स असत. त्याला म्हणायचे डीएम पिस्टल. त्या पिस्टल घेऊन जेव्हा किश्या अन तेजु आले तेव्हा सगळी पोरे कौतुहलाने फ़ाइल तोडायला येतील असे वाटले पण पोरे औत्सुक्य दाबून चुळबुळत जागेवर उभी होती! उस्तादजी ने मला अन समीर ला फॉलआउट करायला सांगितले अन आदेश दिला

"दोनों आदमी, मैट्स बिछाओ, हर मैट पर एक एक पिस्टल, बैरल टारगेट की तरफ होगी, मगज़ीन निकली होगी, उसके बाद टारगेट पेपर सेट करो"

आम्ही इमानेएतबारे आधी मैट्स अंथरल्या मग टारगेट्स लावली अन पिस्टल्स ना हात लावला, आयुष्यात पहिल्यांदा एक आधुनिक शस्त्र अन त्याचे शास्त्र डोळ्यासमोर होते , उगाच आपण लै भारी टाइप फील होता. अन मी तो मूर्खपणा केला! सहज गंमत म्हणुन मी त्या वांझोटया पिस्टल चा बैरल समीर कड़े केला अन त्याला डोळा मारला!. मागे वळलेल्या उस्तादजी ने एक सेकंड मधे आमची करवाई पाहिली अन मला अन समीर ला फरमान सुटले.

"दौड़ के इधर आओ"

सम्या चरफडत होता अन मी ओशाळलेलो होतो.

"कभी भी बैरल किसी अपने की तरफ नहीं मोड़ा करते, सिखलाई कैसे भुल गया ओसी बापुसहब??"

"......"

"ओसी पुनीत, ओसी दिवाकर फॉलआउट, जो करवाई इन दो मकरो से छुटी है पुरी करो"

अन्ना ने डबल गाढवपणा केला!

"क्या करना सर???"

"जब इंस्ट्रक्शन दिया इनको तब तु सोया था या इंस्ट्रक्शन सिर्फ इनके लिए था रे xxxx, ओसी पुनीत इन्हें करवाई सिखाओ"

"......"

"मजाक बना रखा है क्या पुरे ट्रेनिंग का??, पूरा कंटिंजेंट प्लांक पोजीशन"

बड़े उस्तादजी बरसला!!!
अल्फा,ब्रावो,चार्ली,डेल्टा,एको साऱ्या कंपनी पुशप पोजीशन ला आल्या तसे मी अन समीर ही साळसुदपणे प्लांक होऊ लागलो!

"आप दोनों नहीं जी, आप तो जान हो इस पनिशमेंट की..."

आता मी अन समीर हादरलो पुढे ऑर्डर आली

".... पुरी कंटिंजेंट 10 पुशप करके तबतक प्लांक रहेगी जबतक ओसी बापुसहेब ओसी सांगवान को कंधे पर फायरमैन लिफ्ट देकर पुरे परेड मैदान की एक राउंड नहीं लगता..."

"....मजाक बना रखा है ट्रेनिंग का!!, मैंने पहले ही दिन कहा था एक गलती करेगा ट्रूप को सजा होगी , टीमवर्क इसीको कहते है, अगर ओसी बापुसहब गिरा तो ट्रूप की सजा दोगुनी और ट्रूप में से किसीने प्लांक पोज़ छोड़ा तो बापुसहब की पनिशमेंट दोगुनी, ओसी बपुसहब ओसी सांगवान पीछे मुड़ तेज चल"

समीर ला माझ्या खांद्यावर आडवे उचलले होते मी, सहा फूटी होता हरामखोर आजकाल फिजिकल शिक्षेचे काहीच वाटत नसे , अगदी वाढत्या शारीरिक ताकदी सोबत ती ही चढत्या भाजणीत असली तरी.

त्याला फायरमैन लिफ्ट दिल्यावर त्याचे मुंडके माझ्या डाव्या कानाशी आले होते अन त्याने अखंड लाखोली गजरनाम सुरु केले होते, फुसफुसत्या शिव्या ऐकून मला अजुनच हसु येत होते.

"भोसडीके काक्के, बड़े शौक तेरे शूटर बननेके कमीने कुत्ते भाग वरना रात तक ऐसेही रहेंगे"

तिकडे अन्ना किश्या सांगे सहित सारे माझ्याकडे आशेने पाहत होते त्यांचे प्रेमळ संवाद काय असतील हे क्लियर समजत होते!! एव्हाना 5 पुशप झालेल्या त्यांच्या

मी समीर चे धूड़ घेऊन दुडक्या चालीत मजेत होतो! जास्त थकवा नव्हता डोळ्याच्या कोपर्यातून मागे चाललेला आमच्या नावचा शिमगा समीर मला लाइव सांगत होता! अन त्याला ही कळले नाही सांगे ला शिक्षेतुन मुक्ति का मिळाली. नंतर माझ्या ढुंगणानेच त्याचे उत्तर दिले!!

मी हळू चलतोय म्हणल्यावर उस्ताद ने सांगे ला मुक्त केले! त्याच्या हाती स्वतःची केन दिली अन आमच्या मागे धावत गरज पडेल तिथे आमच्या बोच्यावर वळ उमटवायची जबाबदारी दिली.

धावत आलेल्या सांगे ने चप्पकन एक केन आमच्या कुल्ल्यावर ओढली तसे मी दबक्या आवाजात ओरडलो

"साले सांगे कमीने इकलौती गांड है मेरी आराम से केन मार"

"सॉरी यार बापु ,उस्तादजी तो तु जानता ही है" असे म्हणत तो हळूच केन पिछाड़ी ला टच मात्र केल्यासारखे करु लागला तशी त्या पिनाकदृष्टि उस्ताद चा आवाज कडाडला

"ओसी सांगे मकरे की गांड पे मार रहा है की घरवाली के!! जोर से मार वरना तेरी खाट खड़ी करूँगाsssss"

पर्यवसान आमच्या टिरी वर एक अजुन सज्जड़ फटका बसण्यावर झाले!!मी हाय हुई करत होतो अन स्पीड कमी झाली की सांगे वळ काढत होता!

समीर खांद्यावर मजेत होता असे ही नाही त्याच्या बरगड़ी ला अन "सेण्टर फ्रेश" ला माझे खांदे टोचत होते तो ही मेटाकुटीला येऊन शिव्या घालत होता!!

तसाच परेड ग्राउंड ला एक चक्कर मारून आम्ही जागेवर आलो, तरी मी त्याला उतरवला नाही म्हणले परत त्या मिठाच्या पोत्यागत व्हायचे!! पण तोच म्हणाला

"निचे उतारो उसको और तीनो ओसी मिल जाओ, बाकी लोग भी आराम से"

आम्ही घामाघुम होऊन खाली बसलो तसे उस्तादजी बोलु लागले

"ये हथियार है ओसीज, इससे कभी मजाक मत करना! उसको अपना खुद का दिमाग नहीं होता इसकी नली सिर्फ दुश्मनो की तरफ होनी चाहिए,ये एक खतरनाक हथियार है जिसे हम लोग "लीथल वेपन" कहते है", निशाने पर इसकी गोली हो तो जान बचना मुश्किल होती है, इसी कारण यह वेपन Indian arms act,1959 के तहत PB अर्थात PROHIBITED BORE वेपन होता है,कोई भी सिविलियन इसे अपने पास नहीं रख सकता है, ये पहली बात, आजसे यह हथियार तुम्हारा हिस्सा होनेवाला है! जैसे पाउडर क्रीम लगाके चेहरा खूबसूरत रखते हो उसे खरब नहीं होने देते वैसेही हथियार होगा,यह हुई दूसरी बात और तिसरी बात ट्रेनिंग की सिस्त बरकरार रखो! बॉर्डर पे रहना है आपको , खेतो में चिड़िया नहीं हांकनी है, हर हफ्ते तुम्हे खिलाने पर लाखो में पैसा खर्च कर रही है सरकार,दाना दाना कर्ज है तुमपर, मकरा बंद करो"

आम्ही ही सीरियस होतोच पण परिस्थिती, वय , रगड़ा ह्या सगळ्यामुळे कधी कधी मस्ती ही करायचो! ते तसेच राहणार हे उस्ताद ला ही माहिती होतेच फ़क्त दरवेळी चांस आला की तो आम्हाला तांब्याच्या भांड्यागत ठोकुन सरळ करत असे इतकेच.

"तो अब सुनो, इसे कहते है क्लोज क्वार्टर बैटल वेपन या फिर सीक्युबी वेपन , इसे ऑफिसर्स पर्सनल वेपन भी कहा जाता है. रेंज 50 मीटर्स. इसमें कुल 54 कलपुर्जे होते है, तो आओ हम पहले इसके बाहरी रूप को जाने, यह है मैगज़ीन इसमें चौदह गोलिया या राउंड्स आ सकते है लेकिन जाम न हो इसलिए एक बैरल में और 13 मैगज़ीन में रखे जाते है, हर राउंड में 0.450 ग्रॅम बारूद होता है ...."

आमच्या आधुनिक द्रोणाचार्याने मुक्तहस्ताने आम्हाला आधुनिक विद्या वाटायला सुरवात केली होती अन आता लेक्चर संपत आले तसे ऑर्डर आली

"ओसी बापुसाहब फॉलआउट" माझ्या सकट सात पोरे आम्ही एकेक मॅट समोर उभे होतो"

"अपने अपने वेपन उठाओ, जो हात से लिखते हो उस हात से हथियार पे मजबुत ग्रीप बनाओ, बाया हाथ पीछे पीठ पर मुठ्ठी बांधके रखो,टारगेट का बुल्स आय, फ्रंट साइड टिप, बॅकसाइड यु और तुम्हारी ऐमिंग आँख सबकुछ एक लाइन में अलाइन करो, सांसे काबू करो , सांसो की तरह हात पैर की तरह हथियार को अपने शरीर का हिस्सा बनाओ"

अन , घराबाहेर पडलेल्या, अकादमी मधे नवे मित्र जोडून कक्षा रुन्दावणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या कक्षा अजुन रुंद झाल्या, आपण इथे का आहोत ह्याची जाणीव देणारा तो क्षण होता, बुल्सऑय, फ्रंटसाइड टिप, बॅकसाइड यु अन माझा डोळा एका लाइन मधे होते! जणू प्रत्येक श्वासा बरोबर मी त्या 9 mm ला सुद्धा रक्त पुरवठा करत होतो , पोसत होतो!. शेवटी "ती" मला जाणावली , एकरूप झालो मी तिच्याशी,

अन खऱ्या अर्थाने तो आयुष्यातला पहिला असा एक विलक्षण "तिचा स्पर्श" होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिड लिहिलय बापूसाहेब तुम्ही
तुमच ट्रेनिंगच वर्णन वाचून लक्ष्य , प्रहार सिनेमे आठवले . अर्थात तुम्ही लिहिलेल सिनेमापेक्षा प्रत्ययकारी आहे

अप्रतिम !
<<अन , घराबाहेर पडलेल्या, अकादमी मधे नवे मित्र जोडून कक्षा रुन्दावणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या कक्षा अजुन रुंद झाल्या, आपण इथे का आहोत ह्याची जाणीव देणारा तो क्षण होता >>
खूप भारी वाटतंय तुमचे लेख वाचताना. Happy
तुमची लेखनशैली एकदम खुसखुशीत आहे. खूप लिहा.

जबरदस्त!
शेवटचा परिच्छेद वाचून तेव्हा तुमच्या मनात काय चालू असेल याची पुरेपूर कल्पना आली. फार सुंदर आहेत ती वाक्यं!!

जणू प्रत्येक श्वासा बरोबर मी त्या 9 mm ला सुद्धा रक्त पुरवठा करत होतो , पोसत होतो!. शेवटी "ती" मला जाणावली , एकरूप झालो मी तिच्याशी,
>>

काय लिहीलंय! __/\__

Pages