आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के, तुम्ही जे छायाचित्र वापरले आहे ते पाहून खरंच हादरलोय. इतकी भयानक परिस्थिती भारतातच काय जगातल्या कोणत्याही देशात येऊ नये.

अवांतर :

केश्विनी,

कार्टरच्या प्रकाशचित्राबद्दल विकिवर एक पर्यायी कथन आहे : http://en.wikipedia.org/wiki/Kevin_Carter#Alternative_account_of_the_pho...

जर ते गिधाड त्या मुलाला खायला टपलं असेल तर सोबत इतर गिधाडं पण चित्रात हवी होती. असं माझं मत.

आ.न.,
-गा.पै.

युद्ध आणि राजकारणावरून थोडं लक्ष दुसरीकडे वळवतो. ऑइल जगतात "रॉयल डच शेल" "बीजी ग्रुप" ७० अब्ज (बिलिअन) डोलर्सला खरेदी करणार आहे. ह्यामुळे शेल चे तेल व वायु साठे २५% नी वाढतील आणि शेल जगातील सर्वात मोठी एल एन जी तयार करणारी कंपनी होईल. विलीनीकरणाचा परिणाम म्हणुन बीजी मधे कर्मचारी कपात होईल पण ह्या एकत्राकरणामुळे शेल ला ऑस्ट्रेलिया जवळ एल एन जी आणि ब्राझील जवळ तेल साठे शोधता येणार आहेत. एकूणच पडलेल्या भावांमुळे ऑइल आणि गॅस कंपन्यांमधे आलेली मंदीसारख्या परिस्थीतीमधे थोडा बदल होऊ शकतो.

चीनच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असलेल्या AIIB (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) मधे आता ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी नंतर इराणचा समावेश संस्थापक सदस्य म्हणून करण्यात आला आहे.. आतापर्यंत दूर राहणार्‍या जपाननेही सदस्यत्वासाठी हालचाली सुरु करुन १५० कोटी डॉलर्स इन्वेस्ट करण्याची तयारी दर्शवली आहे. इराणचा समावेश हा चीनने आंतरराष्ट्रिय समुदायाला धक्का आहे.

वर्ल्ड बँकेचे प्रमुख जिम याँग किम ह्यांनी AIIBला आंतरराष्ट्रिय विकास क्षेत्रातील नवा मोठा खेळाडू असे म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन ह्यांनी देशातील विविध वांशिक गटांचे सहकार्य घेऊन रशियन राष्ट्राची एकजूट मजबूत करण्यासाठी 'फेडरल एजन्सी फॉर एथनिक अफेअर्स' असा विभाग सुरु केला आहे. देशात वांशिक/धार्मिक विद्वेषाचे वातावरण रोखणे हा हेतू असेल. तसेच इतर देशांतील रशियन वंशाच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करे.

केश्विनी,

तुमच्या वरच्या दोन्ही बातम्या रोचक आहेत. इराणचा आपाविपे (आशियाई पायाभूत वित्तपेढी) त संभाव्य संस्थापक सदस्य म्हणून समावेश होणे जरासे आश्चर्यजनक आहे. एकंदरीत चीनने अमेरिकेचे पाणी जोखले आहे.

रशियाची बातमी वाचून जरासं नवल वाटलं. रशिया हे पहिल्यापासून बहुरूपी बहुवंशी राष्ट्र होते आणि आहे. त्यासाठी सरकारात वेगळा विभाग उघडणे हे पहिल्यांदा घडले आहे. पूर्व युक्रेनचा तुकडा पडून त्यातून नोव्होरशिया नावाचा नवा देश उत्पन्न करण्याच्या हालचाली तर सुरू नाहीयेत ना? भविष्यात नोव्होरशियाला मुख्य रशियात दाखल करून घेण्यासाठी या फेडेरल एजन्सीची मदत व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

चीन सुद्धा भारता प्रमाणे ईराण कडुन मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो. ईराण कडे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचे साठे आहेत.

लंडनमध्ये झाली तब्बल १८ अब्ज रुपयांची लूट
-------------------------------------------------
येथील हॅटन गार्डनमधील हिरे व रत्नांनी भरलेला भूमिगत सुरक्षा कक्ष (व्हॉल्ट) फोडून चोरट्यांनी २०० दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे १८ अब्ज रुपयांची लूट केली. ईस्टरनिमित्तच्या सुट्यांची संधी साधत चोरट्यांनी हा हात मारला.

---------------

१८ अब्ज Uhoh

येमेनमधील बचावकार्य भारताने थांबवले. साना मधील दुतावासही थोड्याच दिवसात बंद करण्यात येईल .
एकूणच भारतीय सैन्य आणि एअर इंडिया ह्यांनी परस्पर सहकार्याने आणि सामंजस्याने ओपरेशन राहत यशस्वीपणे पार पाडले .
http://www.bbc.com/news/world-middle-east-32216712
इथली विडीओ क्लीप बघण्यासारखी आहे. परिस्थितीचा थोडासा अंदाज येतोय त्यामुळे .

लीलावती, जबरदस्त सक्सेसफुल झालंय येमेन मिशन :-). माझ्या अगदी जवळच्यातलं ते INS सुमित्रावर नौदल अधिकारी असलेलं पोरगं त्याच्या व्हॉटअ‍ॅप प्रोफाईलला येमेनच्या समुद्रावरला त्याचा फोटो लावून राहिलंय :हाहा:. आता सुट्टीवर जेव्हा येईल तेव्हा नेहमीपेक्षा जास्त कौतुक/अभिमान वाटेल त्याचा.
----------------

सायबर जिहाद - 'आयएस' ह्या संघटनेशी संबंधित 'द सायबर कलिफत'च्या हॅकर्सनी फ्रान्समधील 'टिव्ही५ मोन्दे' ह्या आघाडीच्या वृत्तवाहिनीवर सायबर हल्ला चढवला. काही दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेमुळे फ्रान्स दहशतवाद्यांविरोधात आक्रमक झाला आहे. ह्या सायबर हल्ल्यामुळे 'आयएस'ची ही क्षमताही जगासमोर आली. ह्या वृत्तवाहिनीची वेबसाईट, FB पेज वर आयएसविरोधी मोहिम्मेत सहभागी झालेल्या फ्रेंच सैनिकांच्या आप्तांचे फोटो तसेच आयकार्ड्स टाकण्यात आली.

'फ्रेंच सैनिकांनी आयएसपासून दूर रहा. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना वाचवायची एक संधी देत आहोत, त्याचा फायदा घ्या. द सायबर कॅलिफत आयएसच्या शत्रूंविरोधात सायबरजिहाद सुरुच ठेवेल' अशी धमकीही देण्यात आली.

Sad
एकूणच सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. कुठे खरोखरीचे युद्ध तर कुठे छुपे युद्ध !

माझ्या अगदी जवळच्यातलं ते INS सुमित्रावर नौदल अधिकारी असलेलं पोरगं त्याच्या व्हॉटअ‍ॅप प्रोफाईलला येमेनच्या समुद्रावरला त्याचा फोटो लावून राहिलंय हाहा. आता सुट्टीवर जेव्हा येईल तेव्हा नेहमीपेक्षा जास्त कौतुक/अभिमान वाटेल त्याचा. >> मस्तच ! त्याचे अनुभवही ऐकण्यासारखे असतील !

त्याचे अनुभवही ऐकण्यासारखे असतील !>>> हो ना! त्याची आई म्हणाली की INS सुमित्रा सोमालियाकडे चालली होती समुद्री चाच्यांच्या उचापत्यांविरोधात पॅट्रोलिंगसाठी. तेवढ्यात हा इमर्जन्सी कॉल आल्यावर येमेनकडे वळले आपले लोक.

लोकहो,

दक्षिण इंग्लंडमध्ये ग्याटविक विमानतळानजीक मोठे तेलसाठे सापडले असा अहवाल आला आहे. आम्ही राहतो तो हाच एरिया आहे. देव करो आणि सरकार तेलविहिरींसाठी आम्हाला हुसकून न लावो! Proud

तसं पाहायला गेलं तर इथे जमिनीखाली तेल आहे असं लोकं बऱ्याच दिवसांपासून म्हणंत होते. मग आत्ताच ही बातमी गाजावाजा करत बाहेर काढण्याचं कारण म्हणजे निवडणुका आल्या आहेत.

दीर्घकालीन परिणाम म्हणजे ब्रिटनला अमेरिकेपासून स्वतंत्र व्हायचं असेल तर या तेलाची बरीच मदत होईल. अमेरिकेने जसे अलास्कामध्ये राखीव तेलसाठे सांभाळून ठेवले आहेत तसे हे देशी तेलसाठे ब्रिटनला अडीअडचणीला कामास आणता येतील.

आ.न.,
-गा.पै.

>>दीर्घकालीन परिणाम म्हणजे ब्रिटनला अमेरिकेपासून स्वतंत्र व्हायचं असेल तर >> तीच अमेरिका जी ३ दशकांपुर्वी इंग्रज व इतर वसाहतींपासुन "स्वतंत्र" झाली. कालाय तस्मै नमः!!

आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजानी एडनलाच तुरुंगात ठेवल होत. आज भारताच्या नौसेने नी, विदेश विभाग, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व जन. व्ही के सिंग सर्वांनीच समन्वय साधत ४००० भारतीय व अन्य देशांच्या अनेक नागरीकांना युध्दग्रस्त प्रदेशातून सुखरूप मायदेशी आणल. वासुदेव बळवंतांचा आत्मा नक्कीच सुखावला असेल.

आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजानी एडनलाच तुरुंगात ठेवल होत. आज भारताच्या नौसेने नी, विदेश विभाग, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व जन. व्ही के सिंग सर्वांनीच समन्वय साधत ४००० भारतीय व अन्य देशांच्या अनेक नागरीकांना युध्दग्रस्त प्रदेशातून सुखरूप मायदेशी आणल. वासुदेव बळवंतांचा आत्मा नक्कीच सुखावला असेल. >>>> +१०००

वासुदेव बळवंत माझे पूर्वज ( आमचे नाते आहे ) त्यामुळे मला येमेनच्या घडामोडींबद्दल विशेष कुतूहल होते Happy

एव्हरेस्ट पोखरून चीन रेल्वे काढणार!!! >>>> हे चिंताजनक आहे. एकतर चीन सीमेभोवती प्रचंड बांधकाम करत आहे, जे आपल्याला करता येत नाही. कारण आपल्याबाजूला हिमालयाचा दुर्गम भाग आहे. आणि दुसरं म्हणजे हिमालयाची वाट लावणार ! ह्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी काही आक्षेप घेतले नाहीत का? दुसरं म्हणजे, नेपाळने परवानगी कशी काय दिली ? कारण एव्हरेस्ट नेपाळच्या हद्दीत येतं ना?

येमेनमध्ये हौथी बंडखोरांच्या विरोधात सैन्य न पाठवण्याचा निर्णय पाकिस्तानला महाग पडेल असा UAE ने सज्जड इशारा दिला आहे. काही आठवड्यांपुर्वीच सौदीकडून पाकिस्तानला अंदाजे दीट अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य जाहिर झाले होते. अरब देशांची गुंतवणूक व इतर सहाय्य घेणार्‍या पाकिस्तान व तुर्कीला आता इराण जवळचा वाटतो आहे आणि यापुढे अरब देशांना स्वतःच आपले संरक्षण करावे लागेल, त्यांच्या सहाय्यासाठी कुणी येणार नाही असे संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री डॉ. अन्वर मोहम्मद गरगाश यांनी म्हटले आहे. अरब देशांनी पाकिस्तानला सहाय्य नाकारले तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. सौदीमध्ये जवळ जवळ ३० लाख पाकिस्तानी कामगार कार्यरत आहेत. इतर अरब देशांतही भरपूर आहेत. ह्या देशांनी पाकिस्तानी कामगारांची हकालपट्टी केली तर इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणारे परकिय चलन बंद होईल.

पाकिस्तानची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होणार आहे ह्या बाबतीत.

अंतराळातून गूढ संदेश - गेली काही वर्षं अंतराळातून गूढ पण विशिष्ट पॅटर्न असलेले रेडिओ सिग्नल्स पृथ्वीवर येत असून हे संदेश परग्रहवासियांकडून येत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. जर्मन संशोधक मायकल हिप्क ह्यांनी २००७ पासून हे सिग्नल्स पकडण्यात येत असल्याची माहिती दिलीय. भौतिकशास्त्राला अज्ञात असलेला हा प्रकार असावा. कदाचित 'पल्सर' प्राकारातील तारा असू शकतो किंवा इतर शक्यता वगळल्या तर परग्रहवासियांचा संदेश असू शकतो. हिप्क आणि सहकार्‍यांनी आतापर्यंत एकंदर ११ गूढ सिग्नल्स पकडले. ह्या सिग्नल्सच्या लहरींमधील वेळ एका विशिष्ट संख्येशी जोडला गेल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेतील सेंटर फॉर सेटी रिसर्च ह्या संस्थेतील संशोधक डॉ शोस्टेक ह्यांनी हे सिग्नल्स म्हणजे परग्रहावरील समाजाकडून पाठवण्यात येणारे 'वेकअप कॉल्स' असल्याचे म्हटले आहे. बुद्धिमान जीवसृष्टीकडून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो असाही दावा केला.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी पार्क्स रेडिओ टेलिस्कोपमध्येही हे सिग्नल्स पकडल्याचा दावा केला असून मे २०१४ मधला हा सिग्नल असल्याचं म्हटलं आहे.

दोन महिन्यांपुर्वी 'सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजन्स' (सेटी) या संस्थेने परग्रहवासियांसाठी पृथ्वीवरुन सिग्नल्स पाठवण्याची संकल्पना मांडली होती. नासातील दोन वरिष्ठ शास्त्रज्ञांनी १०-२० वर्षांत आपण पृथ्वीपलिकडील जीवसृष्टीचा पुरावा मिळेल व परग्रहवासियांशी संपर्क साधता येईल असा दावा केला आहे.

जाम इंटरेस्टिंग वाटतंय....

लोकहो,

कृपया कालची बातमी पहा :

>> 'इतर देशांपुढं हात पसरण्याचे आणि याचना करण्याचे भारताचे दिवस गेले. आता आम्ही सन्मानाने आमचे हक्क
>> मागणार आहोत. दुसऱ्या कुणापेक्षाही आम्हाला तो नैतिक अधिकार जास्त आहे,' असं सांगतानाच,
>> 'संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) सुरक्षा परिषदेवर कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याचा आमचा हक्कच आहे,'
>> असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ठणकावून सांगितले.

मोदींची भाषा बदललेली वाटतेय, नाहीका? अमेरिका-इराण (छुपा) संघर्ष, अमेरिका-येमेन (उघड) संघर्ष, अमेरिका-सीरिया/इराक (उघड) संघर्ष, अमेरिका-अफगाण (उघड) संघर्ष आणि सर्वात भयकारी असा अमेरिका-रशिया (प्रतिपात्री = प्रॉक्सी) संघर्ष यांमुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती कमालीची अस्थिर झालेली आहे. भरीस भर म्हणून चीन आशियाई पायाभूत सुबिधा पतपेढी उभारायच्या खटपटीस लागला आहे. हेच मोदींच्या आक्रमक भाषेचं रहस्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

<<<< जाम इंटरेस्टिंग वाटतंय.... >>>>>

इंटरेस्टिंग तर आहेच, पण त्यात धोकासुद्धा आहे.
जर बाहेर खरच परग्रहवासी असतील तर त्यांच्याशी संपर्क करून पृथ्वीवासीयांचे भले होईल का हि एक शंका आहे. म्हणजे ते आपल्यापेक्षा अति-प्रगत असतील तर आपल्याला धोका असू शकतो. त्यांच्याशी संपर्क केल्यावर ते आपले मित्रच बनतील याची काय खात्री??

राजेश, कदाचित धोकादायक आणि मित्र असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. असे जे कुणी असतील तर ते अती-प्रगतच असतील कारण त्याशिवाय वसुंधरा पृथ्वीवर सिग्नल पाठवण्याइतपत प्रगती कशी असेल?

असे जे कुणी असतील तर ते अती-प्रगतच असतील कारण त्याशिवाय वसुंधरा पृथ्वीवर सिग्नल पाठवण्याइतपत प्रगती कशी असेल?> भारत पण मंगळयान पाठवतो. मग भारताला पण अतिप्रगत समजायचे का? Happy

मग भारताला पण अतिप्रगत समजायचे का?>>> नाहिये का? Wink इथे भारत किंवा इतर देश अशी विभागणी नाहिये. वसुंधरावासीय आणि परग्रहवासीय अशी विभागणी आहे :-). आणि वसुंधरेवरील माणूस हा देखिल विज्ञानात प्रगती करत करत एक एक टप्पे गाठतोच आहे. अर्थात, ह्या ज्ञानाला अंत नाही.

बरोबर,
पण मी अति-प्रगत शब्द वापरला तो या अर्थाने कि जर त्यांचे तंत्रज्ञान इतके उच्च असेल कि आपण पाठवलेल्या संदेशाने त्यांनी आपला माग काढला आणि त्यांची शस्त्रे इतकी ताकदवान असतील कि जेणेकरून आपण प्रतिकार सुद्धा करू शकणार नाही??? Happy

सध्यातरी ते फार-फेच्ड वाटते आहे.

Pages