स्मार्टफोन आणी डेटा युजेस

Submitted by धिरज काटकर.™ on 8 April, 2015 - 11:29

मी नूकताच एक स्मार्टफोन घेतला आहे.आधीच्या नोकिया फोनवरून नेट वापरताना 1 gb डेटा पॅक मला सहज पुरायचा.नविन अन्ड्रॉईड् फोन घेतल्यापासून मात्र तो भरपुर डेटा खात आहे.मायबोलीचे पेज ओपन केल्यास 200kb खर्च होत आहेत.ईतर साईट्स् ओपन केल्यासही असाच डेटा खर्च होत आहे.यावर सुचवले गेलेले ऊपाय करुन बघितले,तरिही प्रोब्लेम चालू आहे.यावर मी खालील उपाय करुन बघितले
1 setting मध्ये जाऊन background data restrict केला
2.noroot firewall हे ॲप डाऊनलोड करुन अनेक ॲप्सचा नेट ॲक्सेस बंद केला.
याने किंचीतसाच फायदा झाला.data usage मध्ये गेल्यावर android os ही background ला बराच डेटा खात आहे असे लक्षात आले.android os चा बॅगराउंड डेटा restrict करता येत नाहीए.खरा culprit तोच आहे.यावर माय्बोलीकरांनी कृपया ऊपाय सुचवावेत.
मायबोलीकरांना काही प्रश्न
1 तुमचा मंथली डेटा युज कीती आहे
2.1 gb डेटा पॅक तुम्हाला किती दिवस पुरतो
3.स्मार्टफोनची स्क्रीन साईज आनी resolution चा डेटा consumption शी काही संबंध आढळ्तो का?
4.डेटा युज कमी करण्यासाठी तुम्ही काय् करता.?
5.डेटा युज कमी व्हावा यासाठी कोणते चांगले ॲप आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, अड्डागँगमध्ये या विषयावर इतकी तज्ञ लोक असतांना :फिदी:, इतक्या फालतु विषयावर जिलेबी टाकलेली पाहुन आश्चर्य वाटले.

4.डेटा युज कमी करण्यासाठी तुम्ही काय्
करता.?<<>>>>> व्हॉट्स अप ऑटो डाउन लोड बंद करते . त्यामुळे सकाळचे गुड़ मॉर्निंग रात्रीचे गुड़ नाइट मेसेज बंद होतात व डेटा वाचतो थोड़ा

व्हॉट्स अ‍ॅपवर सेव्ह इन्कमींग मिडीया करु नये.
कोणतीही मेल अ‍ॅटॅचमेंट ऑटो डाऊनलोड ठेवू नये,
मेल टेक्स्ट मध्ये डाऊनलोड करावी, एचटीएमएल मध्ये केल्यास जास्तं डेटा पॅक जातो.
ऑनलाईन गाणी आणि गेम्स बंद करावेत.

बायदवे, माझा अनलिमीटेड डेटा, व्हॉईस, टेक्स्ट पॅक आहे.

धिका,

हे बघा एक याप : https://play.google.com/store/apps/details?id=com.mobidia.android.mdm&hl...

मी अँड्रॉईड कधी वापरली नाहीये. गूगल वर android data usage app टाकलं तर हे पाहिलं मिळालं. हे नाही जमलं तर असंच दुसरं याप वापरा.

आ.न.,
-गा.पै.

मला पुरायचा १ जीबी डेटा ऑलमोस्ट महिना भर, मुंबईत असतांना. घरी वायफाय होतं. रोज १०३० ते २०३० ऑफिस मध्ये. तिथे ३जी वर मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंज, याहू, गुगल, हॉटमेल, फेबु, ट्वीटर, वॉअ‍ॅ असं सगळंच सुरु असायचं. अधिक विकेन्डसना बाहेर असतांनाही डेटा सगळा ३जी वर वापरला जायचा १ जीबी वोडाफोनचं ३जी महिन्याभरात ७००एम्बी पर्यंत खर्च व्हायचं.

आता पुण्यात आल्यापासून हेच सेल्यूलर डेटा युसेज ३०० एम्बीच्या ही खाली आहे, कारण आता ऑफिसात ही वायफाय आहेच.

मीही अलीकडेच नवीन स्मार्टफोन घेतलाय. मीही काय नवीन डेटा पॅक घ्यावा की आहे तोच ठेवावा ते आता १-२ महिन्याची बिले बघून ठरवणार.

तरी मी असं सांगेन-
- शक्यतो महत्वाची कामं घरी वाय-फाय असल्यास त्यावरच करा- जसं अ‍ॅप डाऊनलोड, अ‍ॅप अपडेट, लार्ज फाईल डाऊनलोड, ओएस अपडेट वगैरे.
- योकु यांनी सांगितलेली आयडिया- प्ले स्टोअरवर जाऊन सिलेक्ट 'अपडेट बाय वाय-फाय ओन्ली'
-व्हॉट्सअ‍ॅपवर फालतू इमेजेस वगैरे खूप येत असतील तर घराबाहेर व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग फक्त कामापुरता मर्यादित ठेवा
-गेम्स खेळताना डेटा बंद ठेवणे- बरेचसे गेम विथाऊट डेटा चालू शकतात

आता फोन कंपन्यांनी तुमने इंटरनेट बिल वाढेल असेच गेम्स आणि अॅप्स बनवली आहेत,ती ओफलाइन चालत नाहीत.
VGA (640X480)चा व्हिडिओ मिनिटास वीस एमबि डेटा खातोआणि 720p(1280x720)चा एका मिनिटात पासष्ट एमबि खाइल.
एखादे वीस एमबिचे अॅप auto update झाले आणि त्यात थोडाच बदल असला तरी परत वीस एमबि डेटा उडतो.

धिका,
एक काम करा बरं. तुमचं तेच सिमकार्ड दुसर्‍या स्मार्टफोन (अँड्रॉईड)मधे घालून पहा, किती डेटा खातंय ते.

मनमौजी भाषा जरा सभ्य वापरा,मदत करु शकत नसाल तर निदान ताषेरे तरी ओढू नका.

अहो ते स्वतः बद्दल बोलत आहे काटकर. >>> +१

धिरज, स्मार्टफोन मी पण वापरतो, अरे आपले model पण सेम आहे नाही का... सो जस्ट इग्नोर इट Happy

सेटिंग्जमध्ये जा 1)
load images =low /set bandwidth =low/keep data savings=high यापैकी एक केल्यावर तिन्हींचा परिणाम एकच होतो २००केबीचा डेटा ८० होतो.
२)अॅप्स डेटा फार आणि गुपचुप खातात ते कमी करण्याचे कोणाकडून शिकून घ्या सर्व लिहिता येणे शक्य नाही. (आता पदार्थ ऑर्डर केला की चमचा मिळत नाही त्याचे वेगळे अॅप असते.पेपर नैपकिन आणि बिल भरण्याचे वेगळे असते.)
३)आवडती पेजिज बुकमार्क करावी आणि थेट बुकमार्क उघडावा .मायबोलीचे मेनपेज नंतर नवीन लेखन आणि नंतर तुमचा धागा असे तीनवेळा टोचले की ८० गुणिले तीन २४०केबी जातात आणि प्रतिसादाचे १६०लागतात.

धिका,

हे याप बघा वापरून : https://play.google.com/store/apps/details?id=com.mobidia.android.mdm&hl...

यामुळे तुम्हाला कुठलं याप किती डेटा खातंय याचा रिपोर्ट मिळेल. ज्यादा डेटा खाणारी यापं उडवून लावा किंवा त्यांची सेटिंगं बदला.

आ.न.,
-गा.पै.

माझाही सेम प्राॅब्लेम. नोकिया होता तेव्हा १ gb डाटा पॅक सहज पुरुन उरायचा.

तुम्ही काय उपाय कराल तो इथेही सांगा प्लीज.