वाईन्स, कॉकटेल्स फॅन क्लब.

Submitted by संपदा on 1 April, 2015 - 12:55

वाईन फूड पेअरिंग, वाईन चीज पेअरिंग, कॉकटेल्स, अल्कोहोलयुक्त डेझर्टस यासंबंधी चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा. आपल्या आवडत्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिकला गेलो होतो तेव्हा एक वाइनची बॉटल आणली. (एनडी रेड वाइन) (काहि माहिती नव्हतं पण वाइन चाखुन बघायची उत्सुकता जोरदार होती)
त्याच बुच (कॉर्क) उघडायला माझ्याकडे ओपनर वै काहीच नाही. मग जुगाडुन नेलकटरच्या मागच्या ओपनरने ट्राय केलं.
ते बुच खराब होतय हे लक्षात आल्यावर गप्प बसलो.
मग साधारण दोन महिन्यानी ओपनर मिळेल का ते शोधलं. कुठे मिळाल नाही म्हणुन शेवटी वाइन शॉप मध्ये चौकशी केली.
तो बोलला बॉटल घेउन या ओपन करुन देतो. मग त्याच्याकडे घेउन गेलो आणि ओपन केली.
मग सुरु केली चाखायला. टेस्ट म्हणजे अरारा वाटली आधी. पण रोज थोडी थोडी करुन संपवली बाटली. Lol
आता पहिल्या वेळसारखी टेस्ट अरारा वाटत नाही पण बाटली विकत पण आणलेली नाही.
क्वचित वर्षात एखाद्या वेळी एखाद्या पार्टीत रेड वाइन पिली आहे.
नंतर सो त्रिंचे लेख वाचुन कळाले माझा झालेला सर्व गाढवपणा.
अगदी कोणती घ्यायची, काय पहायच पासुन, पिताना कोणता ग्लास , सर्व्हीन्ग टेम्परेचर , एकदा बॉटल उघडल्यानंतर किती दिवसात संपवावी पर्यंत काहिहि माहिती नव्हतं.
शिवाय आता हे ही लक्षात आलय की बर्‍याच रेस्टॉरन्ट मध्ये उगीच असावी म्हणुन रेड वाइन, व्हाइट वाइन ठेवतात. उसमे मजा नही.
अशी ही वाइन चाखण्याच्या उत्सुकतेची फुस्स झालेली कहाणी.
Lol

लहानपणी शंखपुष्पी, द्राक्षासव वगैरे नेहेमी प्यावे लागायचे. म्हणून बहुतेक अजूनही वाइन प्यावीशी वाटत नाही Lol पण कॉकटेलमध्ये चांगली लागते.

झकोबा,

रेस्टॉरंटांतून मिळणार्‍या अन अशाही बहुतेक सगळ्या वायनी व्हिनेगारच्या जेमतेम एक पायरी खाली असतील इतपत आंबट असतात. त्या म्हणजे कोरडं चीज, उग्र ऑलिव्हज, नट्स वगैरे खाताना खाली ढकलायला वापरायच्या, इतपतच आपल्या 'इंडियन' चवीला सहन होतात. या चांगल्याच महागही असतात. चाखत माखत, तासभरात वाईनचा एक पेग पिणार्‍यांसाठी त्या चांगल्या. (वाईनचा छोटा पेग १०० एमएल असतो. ३० नव्हे.)

पोर्ट चांगलीच गोड असते अन बहुतेकांना आवडते. भलतीच स्वस्तही असते. १७० रुपयांत फुल बाटली. Wink सुला, गोवळकोंडा इ. कंपन्यांची मिळ्ते बहुतेक सगळ्या वाईनशॉप्समधे.

तुम्ही शँपेन पिऊन पहा. सुलाची 'सेको' (sec/seco) घ्या. ही बर्‍यापैकी मधुर चवीची असते. ब्रट घ्याल तर ती जास्त आंबट चवीची अन महाग. सेकोची बाटली महागही नाहिये फार. ५-६शे रुपयांत बसते. दुकानवालेच थंड करून ठेवतात. शँपेन ही 'बबली' वाईन असते.

सुला ची 'लेट हार्वेस्ट शेनेन ब्लांक (Chenin Blanc)' अशीच एक मस्त चवीची डेझर्ट वाईन आहे. मला आवडते.

मधुलोक नावाचे एक ऑणलाईन वाइनशॉप सापडले.

वैद्य, पुण्यातल्या हायपरसिटीमधे विचारा.
नॉर्मल वाइन शॉप्समधे vermouth मिळणे अवघड आहे.
मी मुंबईत बरीच शोधलीये. पण हल्लीच हायपरसिटीमधे मिळू शकेल असे कळलेय.

Dry Vermouth जिथे विविध वाइन्स मिळतील तिथेही असण्याची शक्यता कमी. ती वाइन असली तरी जास्त करून कोंबडशेपट्यांच्यातच वापरली जाते.
पुण्यातले ते युनिव्हर्सिटी रोडला असलेले सेन्ट्रलच्या बाजूचे इटालियन रेस्टॉरंट कुठले?
तिथे ड्राय मार्टिनी मस्त मिळते. तिथल्या बार टेण्डरला विचारा.
मी आता शेवटी हेच करणारे कारण कुठेच मिळत नाहीये आणि मलाही ड्राय मार्टिनी खूप आवडते.

इब्लिस, मधुलोक साईटच्या लिंकेबद्दल धन्यवाद. Happy यावरून ऑर्डर करून बघायला हवे.

नीरजा, तिथे आहे ड्राय व्हर्मूथ अव्हेलेबल.

कोणी बाहेरून येणार असेल तर duty free ऑप्शन आहेच पण त्याशिवाय मुंबई domestic arrival मध्येही एक बऱ्यापैकी wine shop आहे, तिथे असावी Vermouth. दिल्लीत बघितलेली नक्की आठवतेय.

इब्लिस

मधुलोक (साईट) दाखवल्याबद्दल धन्यवाद! बहुतेक बंगलोरी साईट आहे. इतरत्र डिलिवरी देतील की नाही ते माहिती नाही.

नीधप,

हायपरसिटीपण टाकतो लिस्ट मध्ये प्रोविडोर, दोराबजी आणि ग्रेप्स इन अ ग्लास सोबत!

गुगला. मला अजून दोन सायटी मिळाल्या होत्या थोड्यावेळापूर्वी. लिंक इथे चिकटवल्या पण होत्या पण प्रतिसाद सेव्ह करायला विसरले. असो. तर गुगला. Happy

माझे ही २ पैसे!

The short answer to the question “what is the difference between Champagne and sparkling wine” is that sparkling wine can only be called Champagne if it is produced in the Champagne region of France

कॉकटेल्स हल्लीच प्यायले. भन्नाट वाटले.
तर यावर्षीच्या ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी कॉकटेल्स बनवणार आहे. तर लोकहो, साध्या, सोप्या आणि भारतात सहज सापडेल अश्या साहित्यातुन बनवता येणार्‍या कॉकटेल्सच्या रेसिपी शेयर कराल का?

आपण सुलाची 'सेको' चेक इन लगेजमधे घेउन जाउ शकतो का? Mumbai to Kochi by air?
कोणी सान्गु शकेल का प्लीज..

नीत्सुश, तुमच्या एअरलाइनला विचारा. ते एकदम खात्रीशीर उत्तर देतील.

मी किंग फिशर किंवा जेट च्या डोमेस्टिक फ्लाइट मधून चेक इन बॅगेज मधून इतर अल्कोहॉल नेलेले आहे. मला तरी काही त्रास झाला नाही.

आखाती देशातल्या एअर लाइन्स, चेक इन मधे सुद्धा अल्कॉहॉल नेऊ देत नाहीत असे ऐकले आहे. मला अनुभव नाही.

Pages