दहावीनंतरचे मार्गदर्शन

Submitted by varsha11 on 8 May, 2014 - 07:02

बर्‍याच मायबोलीकरांच्या मुलांनी यंदा दहावीची परिक्षा दिली असेल. माझ्या लेकीने पण दिली आहे. आता पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी काय निवडायचे, कोणते विषय घ्यायचे ह्याचे थोडेसे मार्गदर्शन मिळाले तर ह्या मुलांना व आपल्याला पण खुप उपयोगी पडेल. ह्याविषयी ईथे चर्चा करुयात.

* ह्या विषयावर जर ईथे आधीचा धागा उपलब्ध असेल तर तिकडे चर्चा करुयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२वी नंतर जर डिझाइनिंग शिकवणार्‍या कॉलेजला(उदा. एन आय डी, अहमदाबाद) अ‍ॅड्मिशन हवी असेल तर ११वी, १२ वीला सायन्सच घ्यावं लागेल का? की कॉमर्सनंतरही डिझाइनिंग ला अ‍ॅड्मिशन घेता येते? प्लीज गाइड करा......

कॉमर्सनंतरही डिझाइनिंग ला अ‍ॅड्मिशन घेता येते? - नाही
११ - १२ ला सायन्स किंवा आर्ट्स विथ maths असावे लागते.
Science असेल तर Physics च्या बेसिक concepts चा नंतर उपयोग होवू शकतो असे म्हणतात.
तरीही एकदा Eligibility Criteria बघून घ्या

Pages