कॅलिफोर्नियाच्या तोंडचे पाणी पळते तेंव्हा…

Submitted by निकीत on 7 April, 2015 - 07:47

कॅलिफोर्नियात सध्या प्रचंड (ऐतिहासिक, न भूतो…, लय बेक्कार वगैरे वगैरे) दुष्काळ पडला आहे आणि त्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत हे प्रसारमाध्यमांतून आतापर्यंत आपल्याला समजले असेल; २०१२ साली सुरु झालेल्या दुष्काळाचे हे सलग चौथे वर्ष आहे. अमेरिकेची सुमारे १२% लोकसंख्या इथे राहते आणि एकून उत्पन्नापैकी २०% उत्पन्न इथून येते (सुमारे २ ट्रीलियन डॉलर). (अवांतर: कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे कि जर तिचा स्वतंत्रपणे विचार केला तर ती जगात ७व्या क्रमांकावर येते.) त्यामुळे इथल्या घडामोडी देशाच्याच दृष्टीने एक चिंतेचा विषय असतो. असो. तर, २०१३ पर्यंतचा दोन वर्षांचा दुष्काळ मी तरी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणून सोडून दिला होता. काय तर म्हणे दुष्काळामुळे लॉनला आठवड्यातून तीनच वेळा पाणी घाला पण सक्ती नाही कशाचीच वगैरे. २०१४ मध्ये त्याची तीव्रता लक्षात येऊ लागली. त्या वर्षी सेन्ट्रल व्हेली मधील काही छोटी शहरे वगळता इतर कुठे पाणीकपात करावी लागली नव्हती. पण दुष्काळाच्या सलग चौथ्या वर्षामुळे मात्र आता सगळ्यांनाच याच्या झळा बसणार आहेत याची जाणीव झाली. सर्वात मोठा परिणाम अर्थात शेतीवर झालेला आहे. शेतकी उत्पन्न २०१४ मध्ये ४% घटले होते (उत्पादन जास्तच घटले होते) आणि २०१५ मध्ये त्यात आणखी घट होणार हे निश्चित आहे. अमेरिकेत वापरला जाणारा ५०% पेक्षा अधिक फ्रेश प्रोड्यूस (भाजीपाला, फळे, दूध, मांस इ.) हा एकट्या कॅलिफोर्निया मध्ये उत्पादित होतो. त्यामुळे अमेरिकेतील अन्नपदार्थाच्या किमतीवर या दुष्काळाचा परिणाम येत्या वर्षात होणारच आहे.

गेली ३ वर्षे काही ठोस कारवाई करण्यास कचणारया राज्य सरकारला अखेरीस गेल्या आठवड्यात जाग आली आणि गवर्नर जेरी ब्राऊन यांनी तातडीने घरगुती (शहरी उद्योग आणि हॉटेल इ. सहित) पाणीपुरवठ्यामध्ये २५% कपातीचे आदेश दिले. ब्राऊनसाहेब शेतीच्या पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय काही आठवड्यांनी घेणार आहेत म्हणे. गंमत म्हणजे, राज्यातील एकून पाणी वापराच्या ८०% पाणी शेतीलाच वापरले जाते घरगुती वापरासाठी सुमारे २०% पाणी वापरले जाते. त्यामुळे, शेतीच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय खर्या अर्थाने महत्वाचा. आधीच गेल्या तीन वर्षात अनेक शेतकर्यांचे आणि शेतमजुरांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यात कॅलिफोर्निया मधील पाणी हक्क (water rights) हे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत जटील प्रकरण आहे. त्यातील अनेक लढाया अनेक वर्षांपासून अनेक कोर्टात (सुप्रीम कोर्टासकट) अव्याहतपणे चालू आहेत. त्याचबरोबर, लॉबिंग ग्रुप्समुळे शेतीसाठीचे पाणी हा एक चांगलाच राजकीय फोडणीचा विषय आहे. बघूया ब्राऊनसाहेब काय ठरवतायात ते. असो.

तर आता घरगुती वापराबद्दल. या २०% पैकी १४% पाणी हे एकट्या लॉस एंजिलीस शहर व उपनगरात वापरले जाते, ४% हे सॅन फ्रान्सिको बे एरियात तर उरलेल्या राज्यात फक्त २%च पाणी वापरले आते. गंमत अशी की लॉस एंजिलीस जवळ एकही मोठा पाणीपुरवठ्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे तिथे लागणारे पाणी हे राज्याचा उत्तर भागातून पंप करून सुमारे ४०० मैल वाहून नेले जाते ! याला अर्थातच प्रचंड प्रमाणात उर्जा लागते - कॅलिफोर्नियाच्या एकून वीज वापरापैकी सुमारे २०% वीज ही फक्त पाणी लॉस एंजिलीसला वाहून नेण्यासाठी वापरली जाते (दरवर्षी सुमारे १०,००० मिलिअन युनिट्स = महाराष्ट्रातील १ कोटी घरे मिळून दरवर्षी जेव्हढी वीज वापरतात).

कॅलिफोर्नियाच्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे पाउस आणि वितळणारा बर्फ़ - दोन्ही पडतात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान. गेली ४ वर्ष पाउस कमी पडतोय आणि २ वर्ष बर्फ.गंमत म्हणजे अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये यंदा प्रचंड थंडी आणि बर्फ झाला (चुकीच्या किनाऱ्यावर अजूनही चालूच आहे :)) पण कॅलिफोर्निया मात्र कोरडाच राहिला. त्याची शेजारी राज्येदेखील (ओरेगन, नेवाडा - तसेही वाळवंटच आहे, Arizona इ.) थोडीफार कोरडी आहेत पण त्याची बरीच तीव्रता कमी आहे. ह्याला ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत की एल-निनो सिस्टीम याबाबत अजूनही संभ्रम आहे. ते काही असलं तरी ग्लोबल वॉर्मिंग मुळे या दुष्काळाची तीव्रता नक्कीच वाढली / वाढणार आहे. म्हणजे कसं हे थोडक्यात: जो स्नो फॉल (हिमवर्षाव) डोंगरांवर साठून राहतो त्याला स्नो पॅक म्हणतात. हा स्नो पॅकच उन्हाळ्यात वितळून नद्या आणि धरणामध्ये येतो. चांगला स्नो पॅक होण्यासाठी स्नो फॉल होण्यापूर्वी जमीन चांगली गोठून टणक होणे आवश्यक असते. म्हणजे बिलो फ्रीझिंग तापमान अनेक दिवस राहणे इ. जर जमीन टणक नसेल तर चांगला स्नो पॅक तयार होऊ शकत नाही. या वर्षी सरासरीच्या २५-३०% बर्फ पडूनही स्नो पॅक हा सरासरीच्या फक्त ८% च आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे २०१४-१५ चा हिवाळा हा कॅलिफोर्नियामधील सर्वात उष्ण हिवाळा होता (warmest winter so far). किंबहुना, गेल्या १० वर्षात तापमानाचे अनेक उच्चांक सातत्याने मोडले गेले आहेत. तसेच उन्हाळ्यातील तापमानही वाढतच आहे - म्हणजे पाण्याची मागणीही वाढणार (त्याच प्रमाणात नाही, पण वाढणार). तसेच हायड्रो पॉवर जनरेशन कमी पण विजेची (एसी इ.) मागणी जास्त.

एक गोष्ट आहेच की या दुष्काळाची आणि भारतातील दुष्काळाची तुलनाच होऊ शकत नाही. कॅलिफोर्नियाचा घरगुती पाणीवापर सुमारे ५००-६०० लिटर प्रति माणशी प्रति दिन आहे; भारतात हा आकडा १००-१५० आहे (अनेक भागात याहूनही प्रचंड कमी). त्यामुळे २५% कपातीने कॅलिफोर्नियात काही जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही हे निश्चित. तसेच कॅलिफोर्निया मध्ये ग्राउंड वॉटर मुबलक असल्याने लोक बोअर / विहिरी खणून पाण्याची गरज भागवू शकतात आणि भागवतही आहेत. पण त्यालाही मर्यादा आहेत. ग्राउंड वॉटर टेबल गेल्या काही वर्षात घसरत आहे आणि पाणी हे एक सामुदायिक संसाधन आहे; एका माणसाने जर ते जास्त उपसले तर दुसऱ्या माणसाला ते कमी मिळेल.

आता यावर अनेक उपाय सुचवले गेले आहेत - पाणीकपात, पाणीबचत, कार्यक्षमता सुधारणा, पाण्याची किंमत वाढविणे (माझ्या मते सर्वात योग्य) वगैरे. नजीकच्या काळासाठी याहून अधिक फारसे पर्यायही नाहीत. पण दूरगामी दृष्टीकोनातून "नैसर्गिक संसाधने अमर्यादित आहेत" या गृहितकावर आधारलेले limitless growth हे विकासाचे प्रतिमान तपासण्याची अमेरिकेला आणि भारतासारख्या विकसनशील देशांनाही संधी आहे. त्याचबरोबर, यापुढील काळात अशा संकटाना सामोरं जाण्यासाठी आपण तयारच रहायला हवं. किंबहुना, ग्लोबल वार्मिंगमुळे त्यांची तीव्रता वाढणारच आहे (भारतात तर प्रकर्षाने - उदा. अनियमित मॉन्सून, हिमालयन ग्लेशिअल मेल्ट ई.).

या बाबतीत आपली काय मते आहेत, अनुभव काय आहेत, आणि भारतासारख्या देशाला काही शिकण्याजोगे आहे काय याची चर्चा करण्याकरता हा धागा काढला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित ती ओळ त्यातल्या 'शिकण्यासारखे' या शब्दामुळे खटकते आहे. 'सापडलेल्या / वापरलेल्या उपाययोजनांपैकी कशाचा भारताला उपयोग होण्यासारखा आहे का?' असा अर्थ घेतला मी त्या वाक्याचा.

निकीत, लेख फार चांगला लिहिला आहे.

दुर्दैवानं या भीषण समस्येलादेखिल पोलिटिसाइझ केलं जातंय.

>>जगातला सगळ्यात मोठा desalination plat जो economically viable आहे असा इस्रायलमधे सुरू होत आहे. त्याच्या प्रगतीकडे सगळ्या दुष्काळप्रवीण क्षेत्रांचे लक्ष लागले आहे असे. त्यात कॅलिफोर्नियाचे पण नाव होते.

कॅलिफोर्नियात कधीतरी याच समस्येवर तोडगा म्हणून डीसॅलिनेशन प्लान्ट्सची योजना (आणि बांधणी?) सुरू झाली होती, पण अचानक भरपूर पाऊस पडला आणि ती बारगळली असं वाचल्याचं आठवतंय. ही योजना राबवायची म्हंटलं तरी अनेक शास्त्रज्ञांच्या मते कॅलिफोर्नियासाठी समुद्राच्या पाण्याचं डीसॅलिनेशन करण्यात भरपूर अडचणी आहेत आणि तोटेदेखिल. त्यावरचा लेख सापडला तर लिंक देते.

wired मधला लेख
http://www.wired.com/2015/03/californias-run-water-act-now/

माझी मॅगझिनच्या नावात गडबड झाली, इस्रायल मधील प्लँट वर आधारित लेख MIT Tech मॅगझिनमधे होता.
http://www.technologyreview.com/featuredstory/534996/megascale-desalinat... त्याच्यावर op-ed type columns होते ते online दिसत नाहित.

सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पाण्याची पाण्याची किंमत किंमत वाढविण्याबद्दल वाढविण्याबद्दल: माझ्या मते हा शॉर्ट टर्म उपायच आहे. आणि होय, जीवनावश्यक quantity साठीच्या पाण्याचे दर हे सर्वाना परवडतील असे कमीच हवेत आणि ते तसेच असतात. पण तेव्हढं पाणी वापरून झालं की श्रीमंत माणसांसाठी दर हे त्यांच्याही खिशाला चाट बसतील असेच हवेत म्हणजे नासाडी आपोआप कमी होइल (अशी अपेक्षा :)). अजून एक उपाय म्हणजे घराच्या स्क्वेअर फुटाच्या हिशोबात दर ठरवणे. एनीवे, मुद्दा हा की किमती adjust केल्या की monitoring ची गरज कमी होते (वॉटर युटीलिटीज् प्रामाणिक आहेत असे समजून :)).

भारताला शिकण्यासंदर्भात: सशल आणि र्म्द, यू गॉट इट राईट. नैसर्गिक संसाधने अमर्याद आहेत या गृहितकावर अमेरिकेचा विकास आधारला आहे. भारतही त्याच वाटेने चालला आहे. पण अजूनही आपल्याला ही चूक सुधारण्याची संधी आहे; २०३० सालाच्या गरजेपैकी अजून ६०-७०% इन्फ्रास्ट्रक्चर बांधून पूर्ण व्हायचे आहे. तसेच भारतातील अतिश्रीमंत लोकांची पाण्याची आणि इतर संसाधनांची नासाडी ही अमेरिकेपेक्षा फारशी वेगळी नाही. नद्या जोड प्रकल्प करून गुजरातमध्ये गोल्फ कोर्स फ़ुलवायचा अट्टहास लॉस एंजिलीसला ४०० मैल वाहून न्यायच्या पाण्यापेक्षा फारसा वेगळा नाही. त्याची सुरुवातही central आणि सदर्न कॅलिफोर्नियात शेती फुलवायची म्हणूनच झाली. पण त्या शेतीचा resource impact हा इतर भागापेक्षा प्रचंड म्हणजे प्रचंडच आहे. त्याचबरोबर, आपण सरफेस वॉटर अधिक चांगल्या आणि ecologically sensitive प्रकारे वापरू शकतो (अर्थात तो खूपच वेगळा विषय आहे). कॅलिफोर्निया मधील technological fixes उपयुक्त ठरतीलच पण लेखात म्हटल्याप्रमाणे त्याला मर्यादा आहेत. Desalination इंटरेस्टिंग आहे. पण इतर उप्पायांपेक्षा त्याची किंमत ५० पटीने जास्त असल्याने तो मुख्य प्रवाहात (pun intended :)) यायला वेळ लागेल.

मृण्ययी: PNAS (Probably Not Accepted in Science :)) च्या लेखाबद्दल धन्यवाद.

अजून भर थोड्याच वेळात.

पण इतर उप्पायांपेक्षा त्याची किंमत ५० पटीने जास्त असल्याने तो मुख्य प्रवाहात (pun intended स्मित) यायला वेळ लागेल. >>> हे कुठल्याही इतर टेक्नॉलॉजी प्रमाणेच आहे , जेवढं जास्त रिसर्च , प्रोडक्शन / मॅन्युफॅकचरिंग वाढेल तेवढी टेक्नॉलॉजी सोपी आणि स्वस्त होत जाईल.

श्री: बरोबर. प्रत्येक टेक्नोलॉजीला एक टाईम कॉन्स्टन्ट आणि लर्निंग रेट असतोच. म्हणून सध्या तरी Desalination एक मार्जिनल उपाय म्हणून ठीक वाटतो.

धनि: "सध्या तरी भारतात अमेरिकेतल्या फोल गेलेल्या मॉल आणि खूप पाणी वापरणार्‍या सबर्बन विकासाचे अंधानुकरण सुरू आहे." >> precisely the point. हेच पांढरे हत्ती टाळायला वाव भारतात आहे - अमेरिकेत नाही; अर्थात, त्यांच्याकडे रिसोर्सेस हि भारतापेक्षा अनेक पटीने जास्त आहेत.

भारतात मॉन्सूनमधील लहरीपणा आपण अनुभवायला लागलोच आहोत. त्याच्या जोडीला जर हिमालयातील नद्यांच्या पाणीप्रवाहात येत्या ५० वर्षात गडबड होण्याची शक्यता आहे. तापमान वाढतच जाणार आहे. Infrastruture चं आयुष्य ५०-१०० वर्षांचं. आणि त्यांनी निर्माण केलेल्या सिस्टीम आणि व्हल्यु चेनला तर जवळ जवळ मरणच नाही. त्यामुळे याबाबतीत काही सुधारणा करण्याची संधी आताच आहे. अजून १० वर्षानी मिळणार नाही.

हा माझा प्रतिसाद खूप मोठा, एकांगी आणि पूर्णपणे विषयाला धरून असणार नाहीये! पण हे माझं गेल्या सात वर्षांचं खुपणं आहे आणि ते मांडल्याशिवाय मला राहवत नाहीये!
जावे त्यांच्या देशा मधे पु.लं.नी एक पत्ता हरवलेला देश असं अमेरिकेचं वर्णन केलं आहे! मला वाटते त्यापेक्षा तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी असे वर्णन ह्या देशाला जास्ती लागू पडेल! हेवा वाटावा अशी प्रचंड नैसर्गिक संपत्ती असलेला देश आहे हा!विस्तीर्ण किनारपट्टी - एकीकडे Atlantic तर दुसरीकडे Pacific असे दोन महासागर, arctic ते subtropical अशी हवामानाची टोके असणारी राज्ये, आकाराने अरबी समुद्राएवढी प्रचंड गोड्या पाण्याची तळी, मिसिसिपी, कोलोरॅडो सारख्या प्रचंड नद्या! पण ह्या साऱ्या निसर्गाशी इथल्या समाजाचे काही नाते आहे असं वाटतंच नाही Sad अस्सल मुंबईकराचं वर्णन करताना पुलंनी लिहिलंय ना की मुंबईकराला वाटते की कापूस हा गादीतच तयार होतो आणि वाढत जाऊन एक दिवस गादी फाडून बाहेर येतो! तशी काहीशी अपर्यावरणस्नेही जीवनशैली आहे इथली! कॉफीचे झाड न दिसता इथे डायरेक्ट कॉफी मिळते, नैसर्गिक स्वरुपात फारशा गोष्टी वापरल्या जात नाहीत! सगळं processed/readymade किंवा frozen! ऋतू असो वा नसो कोणतेही फळ तुम्हाला तिन्हीत्रिकाळ मिळते. पाऊस पडला की हे ड्राईव करायला त्रास होणार म्हणून वैतागणार! कारण त्या पावसाचा आपल्या पानात पडणाऱ्या पोळीशी काही संबंध आहे ह्याची जाणीवच नाही! कचरा तर इतका निर्माण होत असतो की विचारता सोय नाही! सगळ्या गोष्टींचा सुकाळ आणि सगळ्या गोष्टींची नासाडी! जणू कागद, पाणी, वीज अन्न ह्या गोष्टी तर द्रौपदीच्या अमर्याद थाळीतून येतात असा विश्वास! माझा एक मित्र university dormच्या mess मध्ये on campus काम करत होता. त्याला जेव्हा सलग तिसऱ्या दिवशी उरलेले अन्न dustbin मधे फेकायचे काम दिले तेव्हा त्याने न राहवून त्याच्या manager ला सांगितले की मला हे काम प्लीज देऊ नका it's against my religion! त्याची लगेच दुसऱ्या कामावर बदली झाली! कारण इथे human rights खूप जपले जातात! पण निसर्गाला कोणतेही rights नाहीत ह्या देशात! कारण निसर्गाशी tuned अशी जीवनशैलीच नाही! घरापासून ऑफिस २०-३० मैल लांब! रोज ४/६ सीटर गाडीतून एकट्याने गाडी हाकत जायचे - गाडीत एसी, घरात एसी, ऑफिसात एसी! बाहेरची हवा अंगाला लागूच नये अशी सगळी सोय! सगळीकडे सुरेख रस्ते पण ह्या देशात रेल्वेचा पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध नाहीच! फार कमी शहरात/गावांत चांगली सार्वजनिक वाहतुकीची सोय! मी एक सुंदर वाक्य वाचलं होतं मध्यंतरी की A developed nation is not the one where poor have cars, it is the nation where rich use public transport! conservation च्या कितीही बाता केल्या तरी असल्या जीवनशैलीपुढे ते उपाय म्हणजे Penny wise and pound (sorry dollar) foolish! न्यूयॉर्क असो वा फ्लोरिडा सगळीकडे तीच एक स्टारबक्सची कॉफी मिळते, तेच अजस्त्र walmart आणि Macy's मधला त्याच रंगाचा टीशर्ट! हे भयानक सपाटीकरण पाहून पोटात गोळा येतो! पण हे कोणालाच खटकत नाही! कारण हीच ह्या भांडवलशाही देशाची विकासाची व्याख्या आहे! घोडा घांस से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? सर्व प्रकारची diversity नष्ट करून टाकणारा असा हा melting pot आहे! इथे गवत देखिल housing authority च्या मर्जीने वाढतं!
दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हे विनाशकारी विकासाचं मॉडेल राबवणारा देश हा आज जगाचं नेतृत्व करतो! Pied piper ला आंधळेपणाने follow करणाऱ्या मुलांसारखे बाकीचे देश ह्या विकासाच्या मागे चालले आहेत! And this is extremely scary! एक भारतीय म्हणून मला भारतात हा असा विकास मुळीच व्हायला नको आहे! आणि एक माणूस म्हणून तर मला इथेही बदल व्हायला हवा आहे! आणि इथे ह्या देशात माणसांनी आपल्या बुद्धीच्या, मेहनतीच्या जोरावर इतर इतक्या चांगल्या गोष्टी घडवून आणल्या आहेत तर ही गोष्ट का शक्य नाही! I am hopeful though the picture is too bleak Sad

काही चांगले initiatives घेतले जात आहेत. उदा. ऑस्टिन शहरामध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर बंदी घातली आहे! मी तर भारतात असल्यापासून त्या पिशव्या वापरत नाही! I keep trying in my own little way to conserve! नेहमी साठी public transport वापरते. शक्य तेव्हा कारपूल करते. use and throw cutlery वापरत नाही. कमीत कमी पाणी वाया घालवते. गरज नसेल तिथले दिवे (lab, restroom lights during the day) बंद करते. हॉटेलमधे उगीच भसाभस paper napkins उचलत नाही. ग्लासमधे आवश्यक तेवढे पाणी घेते, हात पुसायला पेपर टॉवेल नेमकाच घेते (मी बऱ्याच लोकांना हजार फूट टॉवेलने हात पुसताना पाहिले आहे! ह्यावर एक TED talk आहे). बाकीच्यांनी देखिल आपले उपाय लिहावेत (असा धागा नसेल तर काढू शकतो). We have to act and we must act! माझे आवडते गांधीजींचे वाक्य लक्षात ठेवले आणि आचरणात आणले तर अजूनही वेळ गेलेली नाही! There is always enough for everybody's need but not for everybody's greed! - Mahatma Gandhi
Phew! End of my rant!

पण निसर्गाला कोणतेही rights नाहीत ह्या देशात! कारण निसर्गाशी tuned अशी जीवनशैलीच नाही! >> शहरीकरण झालेला भाग सोडला तर किती जंगले आहेत ह्याचा अंदाज घ्या. त्याची काळजी घेतली जाते हे बघा.
http://www.google.com/url?sa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&cad=rja...
कदाचित भारतीयांना अपेक्षित अशी निसर्गाशी एकरुपतता इथे दिसत नाही हा तुमचा आक्षेप असावा असे वाटते.

निकित, बरोबर आहे.

जिज्ञासा, तुझा त्रागा थोडा बरोबर आहे. पण आता मी तरी याबद्दल नविन पिढी मध्ये जागरूकता पाहिली आहे. मिलेनियल्स आहेत ते बरेचसे तुझीच जिवनशैली फॉलो करताना दिसत आहेत. सध्या आमच्या तलसामध्येच एका रस्त्यावर साईड वॉक असावेत म्हणून तरूणांनी प्रयत्न करून निर्णय बदलायला लावला. त्याचबरोबरीने गावात असलेली टेकडी वाचवण्यासाठीही तरूणांचा पुढाकार आहे. हळूहळू यांना काही चुका कळायला लागल्या आहेत आणि त्यानुसार बदल होत आहेत. यांच्या चुका आहेत त्या आपण भारतात अनुकरण नको करायला असेच माझे म्हणणे आहे.

बाहेरची हवा अंगाला लागूच नये अशी सगळी सोय! >> जि, अन्नाची नासाडी हा व्हॅलिड मुद्दा सोडला तर जरा विचारात पाडणारी पोस्ट आहे.

बाहेरची हवा अंगाला लावायची असेल तर ए.सी बंद करावा. बाहेरची हवा जीवघेणी असू शकते म्हणून इतका ए.सी चा वापर होतो. कॉफी साठी लहान (नॉन-चेन ) कॅफेज गावागावात असतातच. वॉलमार्ट हे कर्मचार्‍यांना वाईट वागवते इ इ अनेक आक्षेप खरे ही असले तरी आज वॉलमार्ट मुळेच अनेक गरीब-मध्यमवर्गीय लोक टी-शर्ट विकत घेऊ शकतात.

असामी, लोकसंख्या आणि उपलब्ध जमिनीचे गुणोत्तर बघा! अमेरिकेत जंगलं किती हा प्रश्न नाहीये. निसर्गाचे conservation होत नाही असंही नाही लिहिलंय कुठे पण at what cost? and who pays that cost?(YouTube वर Story of stuff नावाचा व्हिडिओ आहे. त्यात हे खूप नीट मांडलं आहे link: https://www.youtube.com/watch?v=9GorqroigqM)
अमेरिकेतली जीवनशैली eco-friendly आहे का? Everything here is treated just a resource to be used rather abused by human beings. That's what is the central idea of American life-style. Doesn't that bother you at all?

सी, मुद्दा हा नाहीये! मे बी मी मांडायला चुकले असेन पण माझा जीव कायम घुसमटतो! I don't like it inside and whenever I get a chance I run out for fresh air! Yes, weather is harsh and AC is a blessing but I feel it is always overused.
I think everyone should see the story of stuff documentary (https://www.youtube.com/watch?v=9GorqroigqM). It puts forth all the points I want to raise in much better way!
धनी, असं व्हायला हवंच आहे! आणि इथे जागरुकता वाढली पाहिजे कारण अमेरिकेत जे घडतं ते सारं जग follow करतं! And I am really glad that someone's making the noise and people are listening!

लोकसंख्या आणि उपलब्ध जमिनीचे गुणोत्तर बघा! >> त्याचा इथे काय संबंध नेमका ? तुमच्या मूळ पोस्टमधे एकंदर अमेरिकन consumerist behavior वर जी टीका आहे त्यातल्या फक्त nature conservation ह्या एव्हढ्याच भागाचे मी उत्तर दिले आहे.

Doesn't that bother you at all? >> Since you are asking personal question, I look at other aspect of it. Unless I'm mistaken, everything is really a resource. जेव्हढा abuse होतो तेव्हढाच conserve करण्यासाठी प्रयत्न होतो, तसा होउ नये म्हणून कोणी तरी शिस्तशीर प्रयत्न करतो, करु शकतो नि त्याचि सामूदायिक movement होउ शकते हे मह्त्वाचे नाही का ? कमीत कमी मी जेव्हढि जागरुकता इथे पाहिली आहे त्यावरून सगळे चित्र तुम्हाला वाटते तसे निराशादायी नाहि असे मला जाणवले.

असामी +१

शेवटी अमेरिकेची जीवनशैली जशी आहे ती तशी असण्याला कारणं ही आहेत आणि त्यातले जे अवगुण आहेत ते दुरूस्त करण्याकरता कोणी ना कोणी कुठे ना कुठे प्रयत्न करतच आहे ..

भारतात तर किती गोष्टी आहेत ज्या अगदी commune with the nature स्वरूपाच्या आहेत आणि ते बघून घुसमटायला होतं ..

असामी, मी लोकसंख्येचा मुद्दा अशा दृष्टीने मांडला होता की अमेरिकेत पुष्कळ जमीन आहे आणि त्या मानाने लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे इथल्या जंगलांवर अतिक्रमण करण्याची वेळ अजून आलेली नाही. पण ह्याचा अर्थ अमेरिकन अर्थव्यवस्थेत निसर्गाचे अधिकार जपले जातात असं नाही. कोणत्यातरी गरीब देशात निसर्गाचे अधिकार डावलून इथल्या कंपन्या तिथल्या निसर्गाची वाट लावत असतात. So much for the conservation!

About everything being resource may be we think different on this! Because I don't think of everything as a resource! निसर्गात बनणारी प्रत्येक गोष्ट ही माणसाने वापरावी/खावी/प्यावी म्हणून बनत नसते. माणूस हा ह्या निसर्गाचा एक भाग आहे फक्त. एक असा प्राणी ज्याने आपल्या बुद्धीने आपले जीवन अधिक सुकर केले आहे. पण ह्याचा अर्थ ही पृथ्वी माणसाची जहागीर आहे असा होत नाही.

Yes, there is increasing awareness about the environment and its conservation and it is welcome too. But still it hasn't penetrated enough and the kind of capitalist economy this country runs with, it is extremely hard unless there is a stronger and better stand by the government. We as common people can keep up the efforts of conservation but that's all! The real change will be the change in the psychology of the society and it will be very slow process. I just hope that we can make it in time Sad I am an optimistic person but the picture is really bleak and we can't fool ourselves by thinking it is not!
And this last statement is not specific to the US, it's for the entire world! कारण जे काही होणार आहे ते आपण सगळे भोगणार आहोत! आपल्याला हे कळत नाहीये की आपण पृथ्वी वाचावी किंवा निसर्ग वाचवा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत! कारण ते तसं आजिबात नाहीये..पृथ्वीवर माणूस आत्ता आत्ता आला आहे! त्या पूर्वी पृथ्वी होती आणि नंतर ही राहील! फक्त तिच्यावर आपण उरणार नाही! It is our own ass that we need to save and not the planet Earth!

असामी +१
जिज्ञासाच्या पोस्टमधले काही काही मुद्दे पटले. स्पेशली नासाडी बाबत. पण मला वाटतं इतर गोष्टी सुधारण्यासाठी इथे प्रयत्न चालू झालेत. जसं कॅलिमधेही पातळ प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आली आहे. जागरूकता नाहीच आहे असं सरसकट विधान नाही करणार मी तरी.

जिज्ञासा: बरीचशी सहमती आणि तितकीच असहमती.

संसाधनांची नासाडी हि उपलब्धतेवर आणि अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात त्यांच्या किंमतीवर अवलंबून आहे. पाण्याच्या (आणि इतर संसाधनाच्या) किमती त्यांच्या प्रचंड उपलब्धतेमुळे अगदीच नगण्य आहेत कारण त्यांच्या वापराचा निसर्गावर होणारा परिणाम विचारात घेतलेला नसतो. आणि जगातल्या इतर कोणत्याच देशात तो घेतलेला नाही (काही अपवाद वगळता). भांडवली व्यवस्थेत किमती वाढल्या की आपोआपच conservation वगैरे सुचू लागतं. उदा. १९७९ च्या ओईल क्रायसीस नंतर आपोआप गाड्या छोट्या झाल्या. कॅलिफोर्नियामध्ये एनर्जी एफ्फिशियंसी वर उपाय रचले गेले ई.

निसर्गाला राईट्स नाही म्हणता. शहरांच्या बाबतीत काही अंशी ते बरोबर आहे (उदा: अमेरिकेतील ~६०% जंगले खाजगी मालकीची आहेत आणि त्यावर काय लावावं आणि काय नष्ट करावं हे त्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून; बरेचसे मालक याचा लंबर हार्वेस्टिंग साठीच वापर करतात - म्हणजे ती खरी जंगले नव्हेतच). पण अमेरिकेतील National Parks बघा. State / Regional preserves बघा. त्या त्या पॉकेटस मध्ये आहेतच ना राईट्स.

अनेक प्राचीन संस्कृतीन्प्रमाणे, अमेरिकेत एकून जीवनशैली मध्ये निसर्गाला एक "spiritual" स्थान नाही हे मान्य. It is always an afterthought. पण याचं कारण हा देशच मुळी २५०-३०० वर्ष जुना (नेटिव अमेरिकनाच्या कत्तलीच केल्या गेल्या त्यामुळे त्यांचा इतिहास आणि संस्कृतीही पुसली गेली). यात वसाहत झाली तीच मुळी इथले अमर्याद रिसोर्सेस वापरता यावेत म्हणून (newfoundland). ब्रिटिशांना भारतातल्या निसर्गाबद्दल कितपत कनेक्शन वाटले असते ? असो. यात आता बदल होतच आहेत. पण दुर्दौवाने अशा infrastructure heavy value systems चा टाईम कॉन्स्तंत बराच मोठा असणारच. भारतासारख्या प्राचीन संस्कृती मध्ये रिसोर्सेस चे प्रायसिंग (not necessarily economic. cultural at times) इक्विलीब्रीयमला पोचलेले असते.

जोपर्यंत हा पर्यावरण ऱ्हासाची किंमत अमेरीकन लोकच भरत आहेत तोवर इतर देशांना काही फरक पडत नाही. पण ग्लोबल वार्मिंग मुळे या सगळ्या गोष्टीनी देशाच्या वगैरे सीमा कधीच ओलांडल्या आहेत.

जिज्ञासा, मला आश्चर्य वाटलं तुझा प्रतिसाद पाहून. भांडवलशाही आहे हे मान्य. व वर कोणीतरी लिहीले तसे वॉलमार्ट वगैरे ठिकाणी स्वस्त मिळणार्‍या कपड्यांमुळे, मॅक्डॉनाल्ड्सच्या १ डॉलर बर्गरमुळॅ निदान कोणी उपाशी/कपड्यांशिवाय नसतात इतके. भारतात दिसतात तसे अर्धपोटी राहणारे, चिंध्या घातलेले असे भिकारी-तितपत संख्येने पाहीलेस का तू अमेरिकेत? मी २००८ च्या रिसेशननंतर आधी बर्‍या स्थितीत असलेली पण अचानक रिसेशनमुळे होमलेस झालेली खूप लोकं बघितली. इथे एलए डाउनटाऊन/ हॉलिवुड अशा ठिकाणी भरपूर भिकारी आहेत. पण मला भारतातल्यांसारखी तेव्हढी जास्त दयनीय अवस्था नाही दिसत त्यांची. माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या समोर एक भिकारी बसस्टॉपपाशी राहतो. तो मी जिथे ग्रोसरी करायला जाते तिथेच येतो. हे भांडवलशाही/कमी स्वस्त दर यामुळेच शक्य आहे ना?

आणि निसर्गाशी अगदी रोजच्या दिवसाला संपर्कात नसतील. पण हायकिंग, कॅम्पिंग, नॅशनल पार्क्सला जाणे, तिथे जाऊन स्वच्छता राखणे असं करणारे कोणीच अमेरिकन्स दिसले नाहीत तुला? तसे असेल तर आश्चर्य आहे!
कारण ही एक गोष्ट मला अमेरिकेतली प्रचंड आवडते, त्यांच्याकडे जे आहे त्याची जपणूक.

Bsk, भारतातल्या गरिबीची आणि अमेरिकेतल्या गरिबीची तुलना करता येणार नाही! अमेरिकेतले प्रॉब्लेम्स मांडले तर त्यांचा प्रतिवाद करायला भारतातले प्रॉब्लेम्स मांडणे ह्यातून एक unending loop निर्माण होईल! प्रश्न भारत वि. अमेरिका असा नाही! प्रश्न अमेरिकन विचारसरणीचा आहे. आणि ती भारतात राबवली तरी ती चूकच आहे!

आणि निसर्गाशी अगदी रोजच्या दिवसाला संपर्कात नसतील. पण हायकिंग, कॅम्पिंग, नॅशनल पार्क्सला जाणे, तिथे जाऊन स्वच्छता राखणे असं करणारे कोणीच अमेरिकन्स दिसले नाहीत तुला? तसे असेल तर आश्चर्य आहे!>> all that is penny wise and pound foolish! The american lifestyle is not eco-friendly! I live that way too and I am a culprit as well! But what is wrong is wrong!
परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत जाणार आहे! We have to act and we have to act now!! पृथ्वीवर माणूस राहू शकेल अशी परिस्थिती यायला लाखो वर्षे लागली! आणि आपण काही हजार वर्षांत त्या वातावरणाची वाट लावतो आहोत! ह्याचे परिणाम किती गंभीर आहेत ह्याची आपल्याला जाणीव नाही आणि यही रोना है!

अमेरिकेत एकून जीवनशैली मध्ये निसर्गाला एक "spiritual" स्थान नाही हे मान्य. >> ख्रिसमसला नवर्‍याच्या नावाने झाडाला दोरे कुणी नाही बांधत म्हणून हे वाक्य का??

अनेक अमेरिकन हॉलिडेज ह्या सेक्युलर आहेत जसे लेबर डे, प्रेसिडेंट्स डे आणि नव्याने आलेल्या आहेत त्यामुळे फार निसर्गाशी निगडीत नाहीत. अन्यथा ज्या धार्मिक गोष्टी आहेत - ईस्टर (ससा), नाताळ (पाईन ट्री) इ इ त्यात काही ना काही निसर्ग नाते आढळते.

जिज्ञासा: शेवटच्या पोस्ट्ला + १.
ह्याला एक उपाय म्हणजे पर्यावरणीय बाह्यतेची किंमत वस्तूंच्या किंमतीत लावणे.
ईन एनी केस, when it comes to climate change, I am extremely pessimistic.

अरे बापरे जिज्ञासा, तू तर पेटलीच आहेस. शांत हो जरा. Happy भारतात अशी अमेरिके सारखी डेव्हलपमेंट नको व्हायला असे तू म्हणत होतीस त्या वरून मला वाटले आपण भारत अन अमेरिकेची तुलना करत आहोत.

माझा एव्हढा पर्यावरणावर अभ्यास नाही. पण मला इन जनरलच तू ज्याला पेनी वाइज म्हणत आहेस ते बरेच वाईज वाटते. सो जाऊदे.

पण ह्याचा अर्थ अमेरिकन अर्थव्यवस्थेत निसर्गाचे अधिकार जपले जातात असं नाही. कोणत्यातरी गरीब देशात निसर्गाचे अधिकार डावलून इथल्या कंपन्या तिथल्या निसर्गाची वाट लावत असतात. So much for the conservation! > > खरे आहे, पण एक पॉज घ्या नि विचारा कि हे त्या त्यांच्या देशात का करू शकत नाही ? हा देश जेव्हढा जागरुक झाला आहे तेव्हढे इतर देश नाहित असा त्याचा अर्थ होतो का ? जगातल्या कुठल्याच प्रचलित अर्थव्यवस्थेत निसर्गाचे अधिकार जपले जात नाहित. अर्थव्यवस्थेसाठी प्रत्येक गोष्ट हि रिसोर्स आहे. त्यातले काहि sustainable आहेत तर काही नाही.

एक असा प्राणी ज्याने आपल्या बुद्धीने आपले जीवन अधिक सुकर केले आहे. पण ह्याचा अर्थ ही पृथ्वी माणसाची जहागीर आहे असा होत नाही. >> It is pretty much that's all. Nature does not really care weather you use it's offerings or not, For that matter it is not offering anything to anyone. It is just there. It is up to consumer to decide what to take and how much really. हळू हळू sustainability कशी वाढवायची ह्याबद्दल लोक जाग्रुत होत आहेत. वर्षानुवर्षांच्या सवयी बदलायला वेळ लागणार हे ग्रुहित धरले पाहिजे. तू ज्याला पेनी वाइज म्हणत आहेस तीच सुरुवात आहे लक्षात घे. एकदम घाउक बदल होणे शक्य नाही.

अनेक अमेरिकन हॉलिडेज ह्या सेक्युलर आहेत जसे लेबर डे, प्रेसिडेंट्स डे आणि नव्याने आलेल्या आहेत त्यामुळे फार निसर्गाशी निगडीत नाहीत. अन्यथा ज्या धार्मिक गोष्टी आहेत - ईस्टर (ससा), नाताळ (पाईन ट्री) इ इ त्यात काही ना काही निसर्ग नाते आढळते. >> exactly the point.
हा देशच नवीन आहे. Economic system नवीन आहे. त्यामूळे रिसोर्सेस बरोबरचे नाते (economic and cultural) इक्विलीब्रीयमला पोचायला वेळ लागणारच. दुर्दैवाने, क्लायमेट चेंज मुळे जगातल्या इतर देशांना याची किमत चुकवावी लागते. माणसाने निर्माण केलेल्या सीमा किती फोल असतात याचा अशा वेळी प्रत्यय येतो.

Bsk, haha this is something I am very serious about and won't take lightly ever! You must see the story of stuff! You will know what I am mean!

असामी, we are running late, terribly terribly late!

ह्याला एक उपाय म्हणजे पर्यावरणीय बाह्यतेची किंमत वस्तूंच्या किंमतीत लावणे.>> निकित +१ पण हे शक्य आहे का? The wheel that we humans set rolling several thousand years ago has gone out of control!
ईन एनी केस, when it comes to climate change, I am extremely pessimistic.>>pessimistic about the efforts?

"इतर देशांना याची किंमत " म्हणजे नक्की कशाची किंमत??? अमेरिकेत ससा - पाईनट्री पुजल्याची ?? >> बरोबर. इतर देशात सशाची आवक कमी होते म्हणून Light 1
अमेरिका जितके रिसोर्सेस वापरेल (कोळसा, पेट्रोल, natural gas, पाणी - कारण याला वाहून न्यायला प्र-चं-ड उर्जा लागते जी कोळसा/natural gas वापरून तयार होते), तितके greenhouse gases वातावरणात सोडेल. पक्षी क्लायमेट चेंज आणि इतर देशांवर परिणाम. समजलं का आता ?

ईन एनी केस, when it comes to climate change, I am extremely pessimistic.>>pessimistic about the efforts?>> हो.

we are running late, terribly terribly late! >> Sorry this is this a statement without any context really. you need to add reference that 'we are running late, terribly terribly late to sustain existing lifestyle'. But there is no necessity for maintaining existing lifestyle. If things change, lifestyle will surely change.

If things change, lifestyle will surely change. >> किंचित असहमती. That's not the first best solution and surely not desirable.

Pages