पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅन्टिबायोटीक्स मुळे उष्णता आणि अ‍ॅसिडीटी वाढलीये आणि वीकनेसही आहे. बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतेच आहे पण काहींनी गुळवेल सत्व सुचवलेय.
त्याच्याबद्दल काही माहीती मिळेल का?

शहाळ्याचे पाणी सकाळी प्यायल्याने पण मदत होते. दूधीचा सूप शरीरातील उष्णता कमी करतो (फोडी उकडून जराशी कोथींबीर व जीरे वाटून मस्त सूप होतो),urine साफ होते.
गव्हू रात्री जरासे धूवून रात्री एका कपात पिण्याच्या पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी 4 दिवस प्याल्याने ऊन्हात फिरून डोके गरम झाले असेल तर शांत होते. तेच गव्हू मग वाटून वेलची टाकून उकळवून त्याचे दूध प्याल्याने शक्ती येते.

दूधी = फक्त गोड हलवा हाच वापर, हेच डोक्यात मिश्रण असल्याने लहानपणी तापानंतर हा सूप मिळाल्यावर चिडचिड व्हायची नुसती.

दुध्याचा आणि आवळ्याचा रस रोज सकाळी घेतेच आहे मी. गुळवेल सत्वाच्या गोळ्या सजेस्ट केल्यात लोकांनी त्याची काही दुष्परीणाम नाहीत ना असं विचारायचंय.

पित्त वाड्ल्यावर काय करावे या पेक्षा पित्तटाळ्ण्या साटी
मुलात भरपुर पाणी पिणे
दिवसात कमित कमी ४ लिटर पाणी पिल्यास हा त्रास टाळता येईल
पुर्ण आराम, निद्रा, आणि चोथा असलेला आहार
योग्य व्यायाम
मग पित्ताच काय काम
ऊपाया पेक्षा काळ्जी बरी

राजन.. हे सगळं माहीतीये पण माझ्या कामाच्या आणि व्यवसायाच्या गरजा अश्या आहेत की ज्यात बाहेरचे खाणे आणि वेळीअवेळी खाणे आणि जाग्रण या गोष्टी अपरीहार्य होतात.
रात्री जागून काम करताना जागण्यासाठी चहा गरजेचा ठरतो.
व्यवसाय सोडला तरंच हे शक्य होईल पण मग पोटापाण्याचं काय..
व्यवसाय बदलणे हेही शक्य नाही कारण जे करते त्यापलिकडे मला काही येत नाही. Happy

मला तरी मुंबईत असताना दुपारच्या जेवणावर ताक प्यायल्यावर डचमळायला होतं. विशेषतः घराबाहेर असेन तर अजूनच.
असो.. मी गुळवेल सत्वाच्या उपाय-अपायांविषयी विचारतेय. कोणी उत्तर देईल का? अश्विनी?

ताक पित्त कमी करते असे एव्हढ्यातच दोन तिनदा वाचले. कुठे मिळते ही माहिती तुम्हाला?

ताक अग्निदीपन करते. भूक वाढवते. इ. इ. अनेक गुण आहेत पण पित्त झालेले असताना ताक पिऊ नये. त्याने उलट पित्त वाढते.

नीरजा, गुळवेल सत्व बिनधास्त घे. काही अपाय नाही. गुळवेल तिन्ही दोषांवर काम करते आणि शरीराचे बळही वाढवते. आजारातून उठल्यावर तर गुळवेलीसारखे दुसरे टॉनिक नाही.

अश्विनी, माझे वडिल ७० वर्षांचे आहेत. कोणताही मोठा आजार नाही. खूप कमी जेवतात. पित्त होईल या भितीने भाज्या खाणे संपूर्णपणे बंद केले आहे. मी डॉक्टर असूनही माझे काहीच ऐकत नाहीत (घरकी मुर्गी....) फक्त दूध आणि अर्धी एक भाकरी - चपाती किंवा थोडा भात. त्रास हा आहे की, महिन्यातून एखाद्या दिवशी अचानक चक्कर येऊन पडतात ,खूप पित्त होते. उलट्या होतात, ताप येतो, आणि पॅरॅसिटॅमॉल खाल्ली की खूप घाम येऊन ताप उतरतो. बरे वाटते.
सर्व तपासण्या केल्यात, एंडोस्कोपी वगैरे.पण काहीही निदान नाही झाले. सगळे म्हणतात मानसिक आहे, शारिरीक नाही.
भूक वाढीसाठी आणि पित्तासाठी काही उपाय?

चवळी च्या ऊसळी ने (Black-eyed beans) पीत्त होत का???
आधी मला तुरीची डाळ खाल्ली की अंगावर पीत्त उभरायच आता मुगाची, मसुरीची डाळ खाल्ली तरी हातावर लाल चट्टे होतात ह्या डाळीं नी पण पीत्त होत का???

मि आज ऑफीसला येताना वाटेत दोन १५ वालि शहाळ्याच पाणी बॉटल मध्ये घालुन घेउन आले. मोठी बॉटल पुर्ण भरलि. आता दिवस भर पिणार आहे. (म्हणजे जोडिला साध पाणी सुध्धा). घरि जाताना पण घ्यायचा विचार आहे.
पण नारळपाण्याच्या अतिरेकाने काहि प्रॉब्लेम तर नाहि होणार ना?

रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या कळशीत भरून ठेवलेले पाणी मी एक ते दोन ग्लास पिते. रोजच्या रोज होणारा पित्ताचा त्रास कमी झालाय, तरीपण अरबट चरबट खाल्लं की डोकं जड होतं आणि अंगावर पित्त उठतं.

अश्विनी, कायम पर्समधे ठेवता येणार्‍या काही अयुर्वेदिक औषधं असेल तर सांगाल का प्लीज? कामामधे असताना पित्त झालं तर अजूनच त्रास होतो. डायजिनच्या गोळ्या वगैरे माझ्या वर काम करत नाहीत. Happy

नंदिनी तुम्हाला होमिओपाथिक औशधे सुट होत असतील तर अगोम ची सुवर्ण्सुत्शेखर ची पावडर मीळते...एकदम इफेक्टीव आहे ती...पण मुंबई मधे ती मला मिळाली नाही Sad अगोम चं मेन ऑफीस कोळथरे(दापोली) रत्नगिरी जिल्ह्यात आहे...तिथे आमचं कुलदैवत आहे म्हणुन जाणं व्हायचं....सध्या मी अमेरिकेत आहे त्यामुळे मलाही औशध मागवुन घ्याव लागलं.

नंदिनी, कॅल्सिप्राईटच्या (ह्या आयुर्वेदिकच आहेत) गोळ्या - २ गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर पाणी प्यायचं. किंवा, कामदुधा, सूतशेखर पण चालेल. ह्यांच्या पण गोळ्या असतात.

मला हि लिंक जरा उशीराच मिळाली.

माझ्या आईच्या एकाएकी पोटात खुप दुखायला लागले होते म्हणुन मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उपचारांती समजले की तिच्या पित्ताशयात खडे झले होते (खडे किती आकाराचे व इतर काहिच माहिती डॉक्टरांनी सांगीतले नाहि). नंतर एन्डोस्कोपी करुन खडे काढुन टाकण्यात आल्याचे सांगीतले. अचानक काहि दिवसात पर खडे झाल्याचे सांगीतले आणि पित्ताशय काढुन टाकायचे सांगण्यात आले. पण पित्ताशयाला सुज असल्याने काहि दिवस थांबावे लागले पण दरम्यान तिच्या स्वादुपिंड(pancrea)ला infection झाले आणि आजार Acute respiratory distress syndrome (ARDS) मध्ये convert झाला आणि २ दिवसातच आई (वय ५८ वर्षे) आम्हाला सोडुन गेली.

मला असे विचारायचे आहे कि:
१. ARDS साठी काहिच उपचार नाहि का?
२. एकदा एन्डोस्कोपी करुन काढलेले पित्ताचे खडे दोन दिवसात लगेच परत तयार होतात का?
३. पूर्वी कधीहि न झालेला हा त्रास अचानक लास्ट स्टेज पर्यंत जाऊ शकतो का?

योगेश मला जास्त काही माहित नाही, पण माझ्या नवर्‍याला पण पित्ताशयात खडे झाले आहेत. आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर कडे जात होतो त्यांनी सांगितली म्हणुन त्याची दोन वेळा सोनोग्राफी केली. डॉ.नी सांगितले की तुम्ही ऑलेपथी डॉ. ला दाखवा. तेव्हा मी बरीच माहिती गोळा केली होती. ती खरी की खोटी ते माहित नाही. इथेले माहितगार त्यावर सविस्तर सांगतीलच.

युरिनस्टोन सारखे पित्ताशयातले खडे पुर्णपणे डिझॉल्व होत नाहित. त्यासाठी ऑपरेशन हाच एक उपाय आहे. कारण ते काढले तरी परत परत होत राहतात आणि जर कधी पित्ताशयातुन ते बाहेर आले तर ते शरिरात कोठेही जातात आणि मग imergency निर्माण होवु शकते. हे सगळे मी माझ्या नवर्‍याला समजावले पण तो आजपर्यंत ऑपरेशनसाठी तयार नाहीच, तर तो कोणत्याही डॉक्टरकडे पण यायला तयार नाही. पण त्याने Accupressure treatment घेतली, खाण्याची खुप पथ्य पा़ळली touch wood आता त्याला काहिही त्रास नाही.

माझी पित्त प्रकृती नाहीय. पण गेली चार्-पाच वर्षे मला हा त्रास होतोय. पोटात दुखायला लागते. आणि तेही थांबुन थांबुन. असे दुखायला लागले की मला काहीतरी खायची इच्छा होते. खाल्ले की लगेच बरे वाटते. काही दिवसांनी दुखण्याबरोबर मळमळल्यासारखे वाटायला लागते. पण उलटीची पुर्ण भावना मात्र होत नाही.

डोक्टरला दाखवले. ती म्हणाली अ‍ॅसिडीटी आहे. पहिल्यांदा गोळ्या दिल्यावर बरे वाटले. परत सहा महिन्यांनी तोच त्रास. परत गोळ्या. परत सगळे बरे झाले. परत सात-आठ महिन्यांनी त्रास. मग फुल अ‍ॅबडोमेन सोनोग्राफी करायला लावली. त्यात सगळॅ काही ठणठणीत आहे असाच निष्कर्ष निघाला. पण तरीही मला दर ७-८ महिन्यांनी हा त्रास होतोच होतो.

चार पाच दिवसांपुर्वी दुपारी अगदी किंचीत असे मळमळायला लागले. थोडे थांबुन थांबुन असे दोन तिनदा मळमळले. मग दुस-या दिवसापासुन पोटात दुखायला लागले. ५-७ मिनिटे दुखते आणि मग आपोआप थांबते. मग परत ३-४ तासाने दुखेल. esoz- d 20 ही गोळी दिलीय डोक्टरने. काल रात्री एक घेतली. आता एक घेतली. सकाळपासुन दुखले नाहीय, पण एकदा वाटले दुखेल म्हणुन, जरासे मळमळले..... रात्री मात्र झोपेत दोनदा उठले दुखतेय म्हणुन. आता अजुन एक गोळी घेतली की मग बस्स.. थांबेल दुखायचे एकदम.

हा त्रास का होतो तेच कळत नाही. मी तेलकट वगैरे खुप कमी खाते. तिखट तर मला खाववतच नाही.
रात्रीचे जेवण सहसा कमीच असते. कधीकधी फक्त फळे खाऊन राहते. दिवसाचे भरपुर खाते पण ते सगळॅ एकदम नाही तर थोडे थोडे चरते. सकाळी ९, मग ११.३० मग १ मग ४-४.३० असे.....पाणी कधी कधी कमी पिते..पण तरीही लक्ष ठेऊन एक बाटली तरी पोटात जाईल इतके पाहते.

रात्री झोपते लवकर. कधीकधी १२ होतात. गेले दोन दिवस होताहेत.

असे असताना अ‍ॅसिडीटी का व्हावी ते कळत नाही. पोटात गॅस होतो आणि मधुन्मधुन ढेकर येतात अगदी रिकाम्यापोटीही.... कधी भिती वाटते की असिडीटी म्हणुन मी दुर्लक्ष करेन आणी प्रत्यक्षात काहीतरी भलतेच झालेले असेल.....

गॅसेसचंच आहे गं हे. म्हणजे तज्ञ सांगतीलच पण रिकाम्या पोटी पोट दुखणं म्हणजे गॅसेस शक्यतो.
रोज रात्री झोपताना एक ग्लास गरम पाण्याबरोबर एक छोटा चमचा साजूक तूप खा. खूप फरक पडेल. साजूक तुपाला वजनापायी घाबरू नये आणि तूप त्यासाठी टाळू नये. आपण वजन कमी करण्यापायी इतक्या गोष्टी टाळतो आहारातून की शरीरात रूक्षता वाढते म्हणजेच वात वाढतो. परिणामी केस रखरखीत होणे, त्वचेचं टेक्श्चर जाणे इत्यादी...
मुळात वयाबरोबर रूक्षता वाढतच असते शरीरातली.
असो यापेक्षा जास्त अश्विनी सांगू शकेल.

कुणाला माहित आहे का कि पित्ताच्या गाठी म्हणजेच Gallstone का?
नुसत्या गोळ्या ने ते बर होता का?
कुणाला अधिक माहिती असेल तर कृपया द्या !

हाय
मला ईथे विचारायचे आहे कि, मला दोन वर्षाचा मुलगा आहे त्याच्या शरिरावर पित्त येत, म्हणजे लाल चट्टे येतात . त्याला सर्दि, कफचा त्रास आहे. खाण्यापिण्याचे नखरे असतात . आता कुठे तो थोडाफार मनापासुन खायला लागला , पण डाक्टरानि सागितले आहे त्याला नोन व्हेज , बेसनाचे पदार्थे खायायला नाहि सागितले आहे, कसलितरि अ‍ॅल़रजि असेल .
मला योग्य सल्ला द्या.

आये माझ्या पाठीला खाज सुटलीये.
कुठे मसणात गेला व्हतास मरायला रं.
आये हाताला पायाला बी लई खाज येतय. मुंग्या चावल्यावानी वाटतय.
आर मेल्या खाजवु नगस. बग कस लाल लाल झालय सगळ आंग. चट्टे पडलेत सगळ्या आंगाला.
आये खुप गरम होवुन र्‍हायलय..
मेल्या तुला पिताम आलीय. थांब जरा कोकम घालुन पानी बनवते. ते लाव सगळ्या आंगाला. आनि हा लोटा घे तांब्याचा आणी फिरव सगळ्या आंगावर.
आये आता जरा बरं वाटतय..

Pages