गुंतवणूक आणि गुंतागुंत

Submitted by अज्ञ on 12 December, 2013 - 01:02

कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्या पैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंता गुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत. एवढ्या सगळ्याचे भान आपल्याला (मला तरी )रहात नाही आणि आपण शिकवणार्याला किंवा मार्केटला दोष देतो.
पण सुरुवात कशी करावी ? ह्या प्रश्नाला उत्तर खालीलप्रमाणे
प्रथम एक पक्के करा कि गुंतवणूक करायची आहे की ट्रेडिंग.
जर गुंतवणूक करायची असेल तर किती रुपयांची करायची हा दुसरा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. त्यासाठी स्वतःचे इन्कम सोर्स कोणते महिना / वार्षिक किती पैसे जमा होतात ते लक्षात घेणे आले. त्यानंतर जनरली जमा वजा खर्च = गुंतवणूक हे जे समीकरण आहे ते बदलायला हवे म्हणजे जमा वजा गुंतवणूक = खर्च (असे का ते पुढच्या लेखात सविस्तर)
आता जर गुंतवणूक करायचीच आहे तर बाजारात गुंतवणुकीची किती माध्यमे उपलब्ध आहेत (होय ...होय हे पण पुढच्या लेखात) त्याच्या अनुषंगाने येणारी जोखीम किती. त्याची सुरक्षितता, मिळणारा परतावा आणि गुंतवणुकीचा कालावधी इथे आणखी एक महत्वाचा उप विचार असा कि हा कालावधी आणि आपले उद्दिष्ट ह्याची सांगड घालता येते आहे का तेही पाहावे. म्हणजे किती काळ पैसे अडकून पडतील ह्याचा विचार करून किंवा माहिती काढून ती टिपून ठेवावी.
आपल्याकडे येणारे पैसे आणि बाजारात असलेली गुंतवणूक साधने ह्यांची सांगड घालून आपण जर पैसे गुंतवले तर जास्तीतजास्त परतावा कसा मिळू शकेल हे थोडे फार गणित करून आपला होम वर्क करून आधी आपण जाणून घ्यावे. मग एखाद्या गुंतवणूक तज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे. गुंतवणूक तज्ञ हा तुमचा वेल्थ सांभाळणारा डॉक्टर आहे तेव्हा त्याला सगळे उलगडून विचारावे आणि सांगावेही.
गुंतवणूक तज्ञ सी ए असण्याची गरज नाही कारण फार कमी सी ए गुंतवणूक मार्गदर्शन करू शकतात कारण बरेच जण कर सल्ला चांगला देतात पण गुंतवणूक विषयक सल्ला नाही असा अनुभव आहे... नियम नाही.

आता जर ट्रेडिंग करायचे आहे तर
प्रथम आपल्याकडे असणारे पैसे आणि आपण वर जाणून घेतलेली गुंतवणूक साधने ह्याचा विचार करून त्यात चालणारी ट्रेडिंग सायकल लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही सदनिका घेत असाल तर कुठल्या भागात किंमत न्यूनतम पातळीला आहे कुठे किंमत वाढीला वाव आहे हे पाहून आणि त्याला किती कालावधी लागेल ते पाहून ठरवावे. (आत्ता रत्नागिरी,सावंतवाडी, मुंबईजवळ उरण हि चांगली ठिकाणे आहेत.) जर सोन्यात ,शेअर्स मध्ये, antics किंवा इतर कुठल्याही साधनांची निवड करतानाचे निकष वेगवेगळे आहेत.ते पडताळून पाहणे आवश्यक आहे.
ट्रेडिंग करताना खरेदीची वेळ हा फार महत्वाचा भाग मी मानतो आणि गुंतवणूकीकरिता कालावधी आणि उद्दिष्ट फार महत्वाचे वाटते.
आपल्याला येणारे यश अपयश ह्याला आपणच जबाबदार असतो तेव्हा आपला अभ्यास आपणच करणे गरजेचे आहे. तज्ञांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही इष्टच पण मार्गदर्शन आणि आंधळेपणाने विश्वास ठेऊन घेतलेला निर्णय ह्यात गल्लत करून हात पोळून घेऊ नयेत. सचिन तेंडूलकरने गाजवलेले पराक्रम,क्रिकेटची सगळी टर्मिनोलोजी जर मला मुखोद्गत आहे, जुनी नाट्यपदे / शाळेतल्या कविता मला पाठ आहेत, सवाई गंधर्व मी न चुकता जातो आणि गेल्या काही वर्षात कोण काय सुंदर गायले ते सांगू शकतो, राजकारणाचे विश्लेषण,आडाखे पवार ठाकरे कोणाला निवडायचे ते मला समजते, उलट सुलट वाद मी घालू शकतो तर गुंतवणूक विषयक आकडेवारी, निवड, टर्मिनोलोजी मला समजत नाही हा अत्यंत दुर्दैवी विरोधाभास आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users