वाईन्स, कॉकटेल्स फॅन क्लब.

Submitted by संपदा on 1 April, 2015 - 12:55

वाईन फूड पेअरिंग, वाईन चीज पेअरिंग, कॉकटेल्स, अल्कोहोलयुक्त डेझर्टस यासंबंधी चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा. आपल्या आवडत्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, इकडे दर्दी दोस्त मंडळीपण नाहीत आणि एकट्यासाठी पटकन काही जाऊन आणावं तरी इथं मिळत नाही. टास्मॅक नावाचे गव्हर्नमेंटचे बार आणि लिकर शॉप्स आहेत तिथे ठराविक ब्रॅण्ड मिळतात. Sad

तरी बरं नवरा बर्‍याचदा कामानिमित्त कोराईकलला जात असतो. आमचा स्टॉक तिकडूनच येतो.

गार शॅम्पेन किंवा गार व्हाइट वाइनमधे गार ऑरेंज ज्यूस समप्रमाणात, एखादाच बर्फाचा खडा आणि वरून पुदिना गार्निश = मिमोसा
हे एक सोप्पे, पहिलटकरांसाठी(बनवणार्‍या आणि पिणार्‍या) उत्तम असे कॉकटेल.

आज हे सर्व वाचून एक आवडते कॉकटेल करायची इच्छा झाली.

Orange County

ऑरेंज व्होडका : ९० मिली, ऑरेंज ज्यूस :१८० मिली, ट्रिपल सेक : ४५ मिली, ताज्या लिंबाचा रस : ३० मिली
ग्रेनेडिन : चार पाच थेंब , आले : साल काढून आणि ठेचून घेतलेले साधारण अर्धा इंच

(मार्टिनी ग्लास मध्ये दोन कॉकटेल्स होतील)

ग्रेनेडिन वगळता बाकी सर्व घटक बर्फासोबत शेक करून घेऊन चिल्ड ग्लास मध्ये बर्फाच्या खड्यांवर ओता. वरून दोन थेंब ग्रेनेडिन घाला. लिंबू किंवा संत्र्याची चकती लावून पेश करा. (होत्या म्हणून मी दोन तुतीपण ढकलल्या)

Ginger vodka.jpg

ओक्के

Orange County
(In memory of fantastic time spent at that place few years back Happy )

मस्त कॉकटेल रेसिपिज. करुन बघण्यात येतील एकेक.

माझं एक आवडतं सोपं रम कॉकटेल.

स्पाइस्ड रम्+ब्लॅकबेरी लिक्युर +संत्र्याचा रस+ ग्रेनेडिन + क्रश्ड आईस. ब्लेन्डरमधून काढणे.

माझं आवडतं पेय व्होडका. ते कशातही मस्त ब्लेन्ड होतं. शहाळ्याच्या पाण्यापासून आइस्ड टीपर्यंत कशातही.

खास समर स्पेशल व्होडका कॉकटेल रेसिपी. पार्टी करता बेस्ट

पाइनॅपल मिन्ट व्होडका

काचेच्या जारमधे 750 ml व्होडका त्यात थोडी पुदिना पाने चुरमडून घालून आणि अननसाचे मोठे तुकडे घालून ८ तास ठेवून देणे. मस्त मुरते त्या चवीत व्होडका. मग सोबत भरपूर क्रश्ड आईस घेऊन प्यायला देणे आणि पिणे.

आमच्या वाईन व पिझा, ब्रुशेटा बेताचा पंचरंगी पोपट झाला. महावीर जयंती निमित्त रेस्टॉरंट मध्ये ड्रायडे घोषित झाला. ( त्यांच्याकडे लिकर लायसन नव्हते का काय तरी फंडा) फिर कभी.

सग्ळा चिव्डा होउन बसेल. >>>>> चांगलय ना.. चकण्याची सोय होईल.. Proud

चांगलं लिहित आहे सगळे.. आरभाटाचा माहेरच्या अन्नपुर्णा विशेषांकाताला कॉकटेलवरचा लेख मायबोलीवर आणायचं बघा. लय भारी लेख आहे तो !

सगळे प्रतिसाद वाचले नव्हते म्हणुन विचारले,

माझी चॉइस , रिजर्व्ड डार्क रम एंड कोला सोबत टंगड़ी किंवा मटन चाप

बाकी सिंगल मॉल्ट बद्दल सावकाश लिहितो

>>>> वाइन पित, म्यूझिक ऐकत केलेला स्वैपाक जास्त चविष्ट होतो. <<<<<<
मी या वाक्याला "अन्निसवाल्यांच्या" हवाली करणार होतो... Proud पण...

>>>> (किंवा जेवताना आपल्याला चव कळत नाही आणि टीका ऐकू येत नाही असंही असेल. ) <<<<

पण हे पुढचे वाक्य वाचले, अन बेत रहित केला.... (कारण अन्निसवाले त्या वाईनचाही तुकडा पाडतील किन्वा वाईनच्या बाटलीचे बुच न उघडताही तिला फेसही आणवतील! Lol अर्थात धुंदीकरता त्यांना वाईन वगैरे कशाचीच गरज पडत नसावी म्हणा..... तसेही विज्ञानावरील (अति)अंधश्रद्धेच्या मस्तीतच ते जगत असतातच. असो. बिचारी वाईन वाचली त्यांच्यापासून असे म्हणायचे अन सोडून द्यायचे!)

>>>> हार्ड ड्रिंक्स बद्दल लिहिल्यास चालेल काय? <<<<<
....
>>>> सगळ्या पोस्टी वाचूनही हा प्रश्न पडतो म्हणजे एक पेग मारायची गरज दिसते.. <<<< Lol नक्की कुणाला?

बऱ्याचदा कॉकटेल रेसिपीमध्ये Dry Vermouth नावाचा प्रकार असतो. तो नेमका काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे पुण्यात कुठे मिळतो?

Vermouth ही ही एक प्रकारची वाईनच आहे. तिचा फ्लेवर चांगला असल्याने जिन किंवा व्होडका सारख्या स्ट्रॉन्ग अल्कोहोलचा उग्रपणा कमी करायला कॉकटेल्समध्ये वापरतात.
शुगर कन्टेन्टवर स्वीट किंवा ड्राय असे वर्गीकरण करतात.

Vermouth असलेले सगळ्यात प्रसिद्ध कॉकटेल अर्थातच जेम्स बॉन्डची मार्टिनी..Shaken not stirred Happy

दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र माहीत नाही.

प्रॉव्हिडोर हे औन्ध मधे असलेल दुकान आहे. - इथे साउथ आफ्रिकन वाइन्स काही युरोपियन वायनरीज मधल्या वाइन्स छान असतात.
ग्रेप्स इन अ ग्लास हे भोसले नगर मधे आहे. तिथे इंडियन वाइन्स आहेत बर्‍याच. पण ड्राय आणि स्वीट दोन्ही आहेत.
दोराबजी मधे ही असाव्यात . कोरेगाव पार्कात नकी असतील अजून ऑप्शन्स

मी एकदा बुचभर वाईन टेस्ट केली होती, नाव काय होते काय की, अगदी आयुर्वेद रसशाळेच्या "कुमारी आसव" सारखी लागली चवीला.. ! Proud

Pages