Submitted by जयदीप. on 1 April, 2015 - 10:21
उघडला मी अडगळीचा एक खण
त्यात दिसले.... हरवलेले बालपण
काळ जखमांना भरत गेला तुझ्या
राहिला आहे तरी प्रत्येक व्रण
चार चाैघांसारखा दिसतोस तू
चार चाैघांसारखा नाहीस पण
सजवले आहे शहर कोणीतरी
आज कोणाचा तरी असणार सण
लक्ष दे आता तुझ्या शेताकडे
अन्यथा उगवायचे नुसतेच तण
देव, राक्षस, माणसा मधलाच तू!
सांगतो कुठला तुझा असणार गण!
माहिती आहे मला मी कोण ते
चांगला म्हण वा मला वाईट म्हण
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान आहे गझल खूप आवडली
खूप छान आहे गझल खूप आवडली
सुंदर आवडली ---धन्यवाद
सुंदर
आवडली
---धन्यवाद
सुर्रेखच आहे .... गण आणि
सुर्रेखच आहे ....
गण आणि शेवटचा भारीचे ....
पहिले दोन शेर आवडले नाहीत.
पहिले दोन शेर आवडले नाहीत.
बाकीचे सगळेच शेर..... वाहवा...
डॉ.कैलास गायकवाड | 1 April,
डॉ.कैलास गायकवाड | 1 April, 2015 - 23:57 नवीन
पहिले दोन शेर आवडले नाहीत. बाकीचे सगळेच शेर..... वाहवा... >>> +१
सुंदर.. !!
सुंदर.. !!
वाह जयदीप.....जबरदस्त
वाह जयदीप.....जबरदस्त अगदी...... खुप आवडली गजल
पण, सण व म्हण हे तीन फार
पण, सण व म्हण हे तीन फार आवडले.