कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!

Submitted by निमिष_सोनार on 27 March, 2015 - 00:55

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.

जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

मुळात एखाद्याने कुणाचेही वैचारिक परावलंबित्व किंवा गुलामगिरी पत्करली तर तो निर्णयासाठी कुणावर तरी अवलंबून राहणारच आहे! त्यापेक्षा स्वतंत्र विचारशक्ती असणे केव्हाही चांगले!

पण स्वतंत्र विचारसरणीवाला मुलगा सुद्धा दांभिक विचारांचा बळी होण्यापासून सुटू शकलेला नाही. जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट आई वडिलांना न पटणारी केली तर हे दांभिक जग त्यात त्याच्या बायकोला बळीचा बकरा बनवते. याने नक्की बायकोचे ऐकून असे केले असे म्हटले जाते, भले त्याने त्या वेळेस बायकोचे ऐकले नसेल तरीही!

पण मुलाने जर आई वडिलांना योग्य वाटेल असा निर्णय घेतला तर त्या बाबत मात्र बायकोला जबाबदार धरत नाहीत. तेव्हा त्याने हा निर्णय स्वतः घेतला असे मानले जाते, मग त्याने त्या वेळेस बायकोचा सल्ला ऐकला असला तरी.

सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात.

मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते.

एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!!

"मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!

आहे ना विरोधाभास?

तुम्ही या लिस्ट मध्ये आणखी भर घालू शकता, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशाच प्रकारचे विचार आपल्या

http://www.maayboli.com/node/51847 या लेखातही वाचले होते. आपले इतरही काही लेखन वाचून जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाची आठवण होते.

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी!

>>>>

एवढे निराश होऊ नका सर,
आजही जगात माझ्यासारखे लोक आहेत Happy

जोक्स अपार्ट,
आपल्या बाबतीत जे वाईट वा अनुकूल घडते त्याबाबत कोणालाही दोष न देणे हे मी नेहमी आचरणात आणायचा प्रयत्न करतो.

कारण कोणालाही दोष देताना अल्टीमेटली आपण स्वत:लाच मनस्ताप करून घेत असतो. याउपर आपल्याशी जे वाईट घडले असते त्याचा विचारही अनासायेच जास्त केला जातो. बरे असे दोष दिल्याने खरेखोटे समाधान मिळाले तरी मूळ प्रॉब्लेम किंवा जे काही घडलेय ते जैसे थेच असते.

उदाहरणार्थ, ट्रेन लेट झाली आहे, कुठेतरी ओवरहेड वायर तुटली आहे, याबाबत चार शिव्या हासडल्या की मनाचे समाधान होते अशी स्वताची समजूत काढण्यापेक्षा ठिक आहे, झाला उशीर, काय ते उशीरा पोहोचू आज एखादा दिवस, असे म्हणत उगाच चरफडत बसण्यापेक्षा आपण त्या त्रासलेल्या गावचे नाहीच म्हणत इतर खोळंबलेल्या, वैतागलेल्या जनसागराचे तटस्थपणे निरीक्षण करायचे, धम्माल टाईमपास होतो..

असो, पोस्ट जर मूळ मुद्द्यापासून भरकटली असेल तर क्षमस्व! Happy

या अशा गोष्टी जगात कायम असणारच आहेत. त्यासाठी निराश होण्यापेक्षा वेळ येईल आणि गरज असेल तेव्हा स्पष्ट सडेतोड बोलून on the spot विरोधाभास दाखवून द्यावा अस मला वाटत. यातून पुढे विचारांची देवाण घेवाण positive दिशेने पुढे नेऊन, मग पुढे healthy relations निर्माण होऊ शकतात.
एकच आयुष्य आहे. त्यात एवढ निराश राहील तर काय उपयोग ? नाही का?

भलतच काहीतरी बोल्लो मी कदाचित. क्षमस्व !

प्रतिक कुलकर्णी यांचा उपाय अगदी पटतो.
पण दुर्दैवाने एखाद्याला विचार मांडण्याची (on the spot विरोधाभास दाखवून देण्याची) सुद्धा बंदी असेल तर तो काय करेल?

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे.>>> +१११११
१ नंबर लेख

>>>>>>>>>>> पण दुर्दैवाने एखाद्याला विचार मांडण्याची (on the spot विरोधाभास दाखवून देण्याची) सुद्धा बंदी असेल तर तो काय करेल? <<<<<<<<<<<<<

मला कल्पना आहे हे मी जे बोलणार ए ते बोलायलाच नुस्त सोप पण करायला औघड असत. पण एकच आयुष्य आहे ते वाया जाणार असेल तर काहीच उपयोग नाही अस मला वाटत. म्हणून बोलतोय..

बंदी म्हणजे काय ? आपण मानली तर ती बंदी. एकदा झुगारून तर पहायला हवी. समोरच्याला तुमची किंमत आणि हिंमत दोन्ही कळू द्यायला हवी. तुम्ही निघून जाऊ शकता हे कळू द्यायला हवं.(जरी तुमचे काही विक points असतील, तुम्ही जाऊ शकणार नसाल तरीही फक्त अस भासवा तुम्ही जाऊ शकता. तेवढ्यानेच लोक ताळ्यावर येतील) तुम्ही लाचार आहात, काही करू शकत नाही , अस समोरच्याला दिसलं तर तो सत्ता गाजवू लागतो.

भलेची सोडू कासेची लंगोटी ,
नाठाळाचे माथी , हाणू काठी ||
(चु भू दे घे)

हे फार उपयोगी पडत काही लोकांच्या बाबतीत, आणि साक्षात समर्थांनी सांगितलंय, so पुनर्विचार करायची पण गरज पडत नाही.

भलतच काहीतरी बोल्लो असेल तर माफ करा ...