माती / टेराकोटा वस्तू आणि दागिने.

Submitted by वेल on 18 March, 2015 - 10:06

माझ्या साडेसहा वर्षाच्या मुलाने बनवलेला मातीचा पेन्स्टॅण्ड. व्हॅलेण्टाईन डे ह्या थीमनुसार एक कपल पेन्स्टॅण्ड्च्या बाजूला आहे.

terracotta pen stand.jpg

आपल्यात कोणी माती कलाकार (मातीच्या वस्तू बनवणे) असल्यास कृपया मला संपर्क करावा.

मी बनवलेले टेराकोटा (फायर केलेली माती) दागिने.

१, टेराकोटा दागिन्यांचा अगदी पहिलाच प्रयत्न. रंगवायचा ब्रश २६ वर्षांनंतर हातात घेतला. रंग काम मनासारखे नाहीच झाले.
clay jewellery.jpg

२.
पेण्डण्ट
clay pendant black n white.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाने बनवलेला पेनस्टँड भारी आहे.
मागे इथे माबोवर कुणीतरी टेराकोट्टा ज्वेलरी टाकल्या होत्या.
लिंक सापडली तर देते तुम्हाला.

http://www.maayboli.com/node/27018

http://www.maayboli.com/node/2423

हे दोन डॅफोडिल्स यांचे लेख.

इथे खूप लिंक्स आहेत मायबोलीवरच्या.
http://www.maayboli.com/search_results?as_q=मातीकाम

मी परवाच शोधून ठेवल्यात कारण मुलाच्या प्राचार्यबाईंना एकदम टेराकोट्टा ज्वेलरी करण्यात इंटरेस्ट निर्माण झाला म्हणून त्या ऑनलाईन शोधत होत्या.
त्यांना हे दाखविले.

छान

आपल्यात कोणी माती कलाकार (मातीच्या वस्तू बनवणे) असल्यास कृपया मला
संपर्क करावा.>>> रूनी पॉटर आहे की ! she is the right person to guide you.

साती जाई सायली dineshda धन्स.

mala mahit navhata रूनीच potter नाव हे पॉटरीशी रीलेटेड अहे.

डॅफो आणि रूनीला कॉण्टॅक्ट करते.

अश्विनी - काजरेकर. हे तुमचं माहेरचं खरं नाव आहे का? तुम्ही अंधेरीत राहाता का?.

तुमच्या ताईने केलेले दागिने छान आहेत.त्यांचे नाव काय? त्या कुठे राहतात आणि शिकवतात?

हो हे माझ माहेर च नाव आहे पण मी अन्धेरित राह्त नाहि अन्धेरीत राह्ते ती माझी चुलत बहीण नाव same आहे आमच. माझी ताई ठाण्यात रहाते आणि घरीच शिकवते माझ्या नवीन धाग्यावर अजुन काहि design आहेत त्या पहा.

हो हे माझ माहेर च नाव आहे पण मी अन्धेरित राह्त नाहि अन्धेरीत राह्ते ती माझी चुलत बहीण नाव same आहे आमच. माझी ताई ठाण्यात रहाते आणि घरीच शिकवते माझ्या नवीन धाग्यावर अजुन काहि design आहेत त्या पहा.

वेल मस्तच सगळ काही.. एक सुचवू का ?
वारली जमली तर भरीव करा .. जास्त छान वाटेल .. मला पण शिकवा न कुणीतरी हे अगदी बेसिक पासुन प्लीज Sad

टीना वारली भरीव करते. थँक्स फॉर्‍ सजेशन.

खूप कठीण नाहीये. पण असं ऑनलाईन नाही शिकवता येणार. तू येतेस का मुंबईत एक दिवस शिकवते तुला.

पेन्डण्ट छान झालेत. टेराकोटा मधे थ्री-डी आकार मस्त बनवता येतात. विशेषत: कानातले झुमके, वाट्या, किंवा नेकलेससाठी मणी, नळ्या, वगैरे. टेराकोटाचं पेन्डण्ट आणि वुडन्/ग्लास्/प्लास्टिक मणी असं फ्युजनपण चांगलं दिसतं. आम्ही बनवलेला एक दागिना बघा - terracotta_fusion_jewellery_1.jpg

आमचे एक मित्र पुण्यात टेराकोटामधे खूप काम करतात. त्यांचा तळेगावला टेराकोटा स्टुडिओ आहे, आणि 'इस्किलार' नावाची आर्ट गॅलरी आहे, जिथं टेराकोटाच्या खूप कलात्मक वस्तू मिळतात. आमचे मित्र, रुपक साने, टेराकोटा ज्वेलरी बनवण्याचं वर्कशॉप देखील घेतात. त्यांनी बनवलेले काही दागिने बघा - terracotta_workshop_15-nov-15_7.jpg

मस्त. हा धागा योग्य वेळी सापडला. वारली पेंच्डंट छान दिसतंय.
टेराकोटा क्ले विकत आणलीय. इबे वरुन मोल्ड पण ऑर्डर केलाय (आमची स्वतःलाच व्हॅलेंटाईन गिफ्ट!!आज सगळीकडे चांगल्या ऑफर्स आहेत. )
मला कोणीतरी सांगा की मायक्रोवेव्ह मधे टेराकोटा वस्तू बेक करताना त्या फुटू नयेत म्हणून काय काळजी घायची?
बेकिंग ओव्हन घरी नाही आणि आणायची ईच्छा नाही.

अनु एकाद्या कुंभाराकडून भाजून घे.

ओव्हन बेकिंग, कोळसे अथवा लाकडाचा भुसा वापरुन बेकिंग, कुकरमध्ये शिजवणे ह्या पद्धती योग्य नाहीत. टेराकोटा मातीच्या वस्तू ८०० डिग्री से. वर भाजल्या गेलं पाहिजे. तरच त्या पूर्ण पक्क्या होतात. स्टोन्वेअर मातीच्या वस्तू ११०० डीग्रीवर भाजल्या गेल्या पाहिजेत.

बाजारात टेराकोटा मातीचे दागिने विकत मिळतात ते बरेचदा ओव्हन बेकिंग, कोळसे अथवा लाकडाचा भुसा वापरुन बेकिंग, कुकरमध्ये शिजवणे ह्या पद्धतीने बनवलेले असतात. ते वरुन काळे दिसतात आणि आतून कच्चे असतात. त्यामुळे ते पटकन तुटतात. तेव्हा टेराकोटाचे दागिने विकत घेताना तुम्ही हे कसे बनवता (म्हणजे कसे भाजता) हा प्रश्न नम्रपणे आणि अति उत्सुकतेने नक्की विचारावा.