बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुदिना कधिही जमिनित लावु नका!>>> अगदी. इथे एका झू मधे ग्राऊंड कव्हर म्हणून पुदिना लावला होता. मुळापासून उपटून काढून टाकणे हाच उपाय. पूर्णपणे काढून टाकायला एक सिझन तरी लागतो.

पुदिना नेहमी कुंडीत लावून ती कुंडी वाटल्यास खालचा बेस कापून जमिनीत पुरावी.

पुदिन्यासाठी हजारो मोदक. आम्हाला एकदा कम्युनिटी गार्डनच्या वाफ्यात नेमका पुदिनावाला भाग आला होता. त्या वर्षी फक्त टॉमेटो लावल्यावर गिव अप मारला आम्ही. त्याच वेळी नेमकं शेजारच्या शेतकर्^याच्या पोरीला केलची अलर्जी झाली आणि त्याने आम्हाला त्याचा केल दत्तक दिला. लिटरली ऑक्टोबर पर्यंत घरगुती केल मिळत होता. यंदा केल लावून पाहणार आहे. माहिती काढावी लागेल. किंवा इथे कोणाला अनुभव असल्यास लिहून ठेवा.

पुदिन्याने एकंदरितच उत्साह वाढतो अमितव Light 1 माझा पोरगा तर आई सारखी पाणी पुरी करणार म्हणून जाम खूश असायचा तेव्हा Wink

पुदिना माझ्याकडेही जमिनीत आहे. सुदैवाने एक छोटा तुकडा सोडून इतरत्र पसरला वगैरे नाहीये. पाणीपुरी नेहमी होत नाही पण चटणी नेहमीच. शिवाय पुलाव बिर्याणी साठी, पराठ्यात वगैरे घालण्यासाठी. बर्फ पडला की डिसेंबर ते मार्च काही नसतं. स्प्रिंगमध्ये आपोआप पुन्हा उगवतो.
तर असं नो कटकट, हमखास येणारं दुसरं पीक कोणतं आहे का? मला फार निगुतीने वेळ देणं शक्य नाहीये आणि एखादया विकांताला नसलो आम्ही तर पाणीबिणी घातलं जात नाही.

सुदैवाने एक छोटा तुकडा सोडून इतरत्र पसरला वगैरे नाहीये.>> काढा आणी कुन्डित लावा! पुदिन्याचे मुळ फार खोल आणी लान्ब पसरत जातात ( ज्याचा वरुन अजिबात अन्दाज येत नाही) ... नन्तर त्याला आटओक्यात आणता येत नाही! आमचा आधिच लावलेला आणी खुप (च) पसरलेला होता/आहे.

वसंता आला ! उठा जागे व्हा...

होम डेपो वगैरे नर्सर्‍या भरून वाहात आहेत! परवा काही झाडं, माती, कुंड्या वगैरे आणलं.
कोणी डेलियाचे कंद लावले आहेत का कधी ? त्याला एक कोंब सदृष्य काहितरी आहे. ते मुळ आहे की कोंब ते कळत नाहीये आणि त्यामुळे ते मातीत घालायचं की वर ठेवायचं हे ही कळत नाहीये. आम्ही सध्या वर ठेवलय.
२,३ फुलझाडं, २,३ भाज्या वगैरे लावल्या आहेत..
फ्लॉवर कोणी कुंडीत लावायचा प्रयोग केला आहे का? दिसल्या म्हणून आम्ही बिया घेऊन आलो आहोत.

मी मागच्या वर्शि Lily, Dahlia चे कन्द तशेच जमिनिमध्ये ठेवले ते पुन्हा spring मध्ये येतिल का? मी Chicago मध्ये राहतो.

नमस्कार पराग

डेलियाचा कंद जमिनीत साधारण ६ इंच खोल लावायचा असतॊ. मागच्या समर मध्ये माझ्याकडे कॉस्टको मधून आणलेले कंद छान उगवले.

वसता ने येवुन चहा-पाणी,नास्ता करुन एक डुलकी काढ्ल्याशिवाय काही करता येणार नाही, व्हेजी पॅच वर यन्दा किमान ५ फुटाचा स्नो-डोन्गर आहे अजुन,...

>>मी मागच्या वर्शि Lily, Dahlia चे कन्द तशेच जमिनिमध्ये ठेवले ते पुन्हा spring मध्ये येतिल का? मी Chicago मध्ये राहतो.>>
Lily येतील पुन्हा.
Dahlia शिकागोच्या हिवाळ्यासाठी टेंडर पेरेनियल, त्यामुळे नाही येणार. फॉलमधे कंद काढून ठेवावे लागतात. स्प्रिंग मधे पुन्हा लावायचे.

कोणी डेलियाचे कंद लावले आहेत का कधी ? त्याला एक कोंब सदृष्य काहितरी आहे. ते मुळ आहे की कोंब ते कळत नाहीये आणि त्यामुळे ते मातीत घालायचं की वर ठेवायचं हे ही कळत नाहीये. >> जमिनीत ४-५ इंच गाड. वर येईल कोंब असला तरी.

माझा कडिपत्त्याच झाड वाढ्त नाहि. थन्डिमुले सध्या घरामध्ये आहे. मातिपन change केलि पन काहि फरक नाहि. ह्याला काहि उपाय आहे का?

पराग, माझ्या अंदाजाप्रमाणे फ्लॉवर बियां पासून लावायला वेळ झाला आहे. निदान आमच्या टाईम झोन मध्ये तरी. अगदीच लावायचेच आहेत तर तयार रोप आणुन पहा. फ्लॉवर वगैरे व्यवस्थित ग्रो व्हायला प्रॉपर कुलिंग टाईम लागते. जे झोन ७ नंतर मिळन कठिण.
कोबी, फ्लॉवर ,रॅडिश, गाजर वगैरे तत्सम भाज्या हमखास यशस्वी निदान टाईम झोन ७ नंतर नाहीत. सोप्या भाज्या झोन ७ नंतर लावायला म्हणजे झुकीनी , स्क्वाश, दुधी, दोडका, अंबाडी , मिरच्या, बेल पेपर्स.

आशिश , कडिपत्त्याला उष्ण हवामान पाहिजे. साधारन ८५ च्या वर तापमान गेलं कि कडीपत्ता जबरी येतो. मी गेल्यावर्षी कडीपत्ता कुंडीत खुप मोठा झाला म्हणुन जमीनीत लावला. गेला माझा कडीप्त्ता. तीन झाड गेली माझी कडीपत्त्याची . परत नाही लावनार आता.

कढीपत्ता जमिनीत लावला तर थंडीत गोलाकारात खुप मल्च टाकावं, कुंडीत असेल तर कुंडी आत घ्यावी किंवा पोतेर्‍याने झाकावं, आपली तांदळाची पिशवी मस्त काम करते.

मी मागच्या मार्च मिड मधे विन्टर सोइंग केलेल. स्वाती यांनी माहिती दिलेली मागच्या वर्षी. टोमॅटो, मिर्ची छान आली. लसून मरून गेला. बहुतेक शिकागो ची थंडी मानवली नसेल. या वर्षी कॅन अर्धे कापून सरळ कुंड्यांवर ठेवणार आहे. बघू काय होतय.

पराग, माझ्या अंदाजाप्रमाणे फ्लॉवर बियां पासून लावायला वेळ झाला आहे. >>>>>> ते बियांचं पाकीट आहे, त्यावर लिहिलेल्या टाईमलाईनप्रमाणे बरोबर वाटतं आहे.. त्यांनी मार्च, एप्रिल म्हटलं आहे आमच्या एरिया करता.
फ्लॉवर वगैरे व्यवस्थित ग्रो व्हायला प्रॉपर कुलिंग टाईम लागते. >>>> म्हणजे रात्रीच्या वेळी थंड हवं असं का ? तसं असेल तर सध्या आमच्याकडे आहे तसं..

असामी, हे बघ.. हे जे बाहेर आलेलं लाल आहे ते गाडू ना मातीत?

IMG_20150319_125852.jpg

बीयांपासून लावायला वेळ झाला आहे म्हणजे, वेळ निघून गेली आहे या अर्थाने.
आमच्याइथे झोन ८ (७/८ बॉर्डर) बीया जानेवारीमध्ये जमिनीत जायला हव्यात अस सांगण्यात आलं. कारण रोपं तयार व्हायला ६ ते ८ आठवडे लागतात. एप्रिल एंड ला फ्लॉवर जमीनीतून काढला पाहिजे कारण एप्रिल एंड नंतरचे हवामान फ्लॉवर साठी खूप हॉट होते.
फ्लॉवर कुल वेदर क्रॉप आहे. मार्च एप्रिल मध्ये कुल टेंपरेचर पाहिजे.
मी बराच प्रयत्न केलाय फ्लॉवर, कोबी,गाजर,बीट लावायचा. टेनीस बॉल हून मोठा फ्लॉवर कधीच झाला नाही. गाजर तुरे मोठेच्या मोठे पण गाजर बोटा एवढे पण नाही झाले कधी.
इथे लिहिल्यावर गुगल केल तर हे आर्टीकल सापडलं.

http://www.accessatlanta.com/news/entertainment/dining/cauliflower-hard-...

हे लिहून कुणाला डिसकरेज करायचा हेतु नाही. बिया पेरल्या तर वाया काहीच जाणार नाही. सो ट्राय करून बघा. जस्ट अनुभव जो आला तो लिहला एवढचं.

बीयांपासून लावायला वेळ झाला आहे म्हणजे, वेळ निघून गेली आहे या अर्थाने. >>>> मी पण तोच अर्थ घेतला होता. त्या पाकीटावर लिहिलेलं की नॉर्थ जॉर्जियासाठी मार्च / एप्रिल टाईमफ्रेममध्ये लावा म्हणून.

फ्लॉवर कुल वेदर क्रॉप आहे. >>>> हे माहीत नव्हतं.
लिंक वरचं आर्टीकल वाचून बघतो.

फुटलेला कोंब गाडू नका >>>> ओके.. पण तो नक्की कोंबच आहे ना असा प्रश्न पडलाय. Happy

हा धागा उघडला की बागकामाचा उत्साह आल्याचा पाव सेकंद भास होतो. पण बाहेरचं टेंपरेचर बघितलं की चार आयत्या कुंड्या ओळीत ठेवून काम संपवावं असं वाटतं.

>>हे जे बाहेर आलेलं लाल आहे ते गाडू ना मातीत? Lol
आता जे छान मातीबाहेर उगवलंय ते पुन्हा मातीत कशाला गाडायचं? Proud

अरे देवा !! Proud

कंद होम डेपोतून आणला.. त्या कंदातून ते लाल फुटलं होतं. आम्हांला कळेना की ते मुळ आहे की कोंब.. मुळ असेल तर ते गाडावं लागेल ना? कळलं का आता? Happy मृ..ते आपोआप बाहेर नाही आलय आम्हीच ते मातीबाहेर ठेवलय.. Happy

मग 'ठेवलाय' म्हणायचं नं, 'आलंय' म्हंटल्यावर काय समजायचं आम्ही? Proud

बाहेर राहू दे. ते शूट वाटतंय.

Pages