गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायला हे बरंय, म्हणजे शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा "हे आळशी असतात प्रगतिक नसतात धंदा धंद्यासारखा करात नाहीत ह्यांना प्रॉफिट काढता येत नाही पिंक स्लिप चे टेंशन नाही " इत्यादी बोलायचे तोंडसुख घ्यायचे अन अश्यावेळी आपला धर्म धर्म धर्म करत शेतकार्याना त्या नावावर असले शुद्ध आतबट्टा व्यवहार जबरदस्ती करायला लावयचे!!

डबल स्टैंडर्ड्स

काय हानणार!!! पुन्हा स्पष्ट करतो माझा विरोध गोहत्याबंदी ला नाही तर "आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी" च्या सरकारी खेळाला आहे !!! शेतकर्याला जनावरे का विकावी लागतात ह्या प्रश्नाचे आधी निराकरण करायला हवे होते!!! मग गाय म्हैस कोंबड़ा जिराफ लसुन कांदे काय कापायला बंदी करायची ती करा

हा गोवंश हत्याबंदी कायदा आहे की शेतकर्‍यावर लादलेली वेठबिगारी?

१. गोवंश हत्याबंदी असावा की असू नये, असा हा मुद्दाच नाही. गाईचे शेणमूत सावडता सावडता आम्ही लहानाचे मोठे झालो. गाईच्या पाठीमागून जाताना तिच्या लाथाही आम्ही आमच्या कंबरेच्या मागूनपुढून खाल्या, आईवर कसे प्रेम करावे हे कदाचित सर्वांना कळत असेल पण गाईवर प्रेम कसे करायचे, स्वत: अर्धपोटी राहुनही गाय चारायाला कसे रानात जायचे, तिला पोटभर कसे खाऊ घालायचे... हे फ़क्त शेतकर्‍यांनाच कळते, धर्ममार्तंडांना अजिबात नाही. आणि तरीही ही मंडळी शेतकर्‍याला फ़ुकाची अक्कल वाटत सुटतात एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच कायदा केला जातो, तेव्हा हाडाचा शेतकरी खवळून उठणारच.

२. शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन सरकारने हा कायदा केलेला नाही. ज्यांनी कायदा केला त्यांनीच गाईचे पालनपोषण करावे. कायदा करायचा त्यांनी आणि गाई राखायच्या आम्ही? वेठबिगारी अशीच असते. हा कायदा शेतकर्‍यांना वेठबिगार समजत आहे. आम्ही शेतकरी सरकारचे वेठबिगार नाहीत. आम्हाला गरज नसलेली जनावरे आम्ही विकणारच. गोवंश हत्याबंदीवाल्यांनी ती बाजारभावाने खरेदी करावी. गाईची सेवा करावी आणि मोक्षप्राप्ती करावी.

३. आम्हा शेतकर्‍यांना जीवंतपणी सन्मानाने जगायचे आहे, मुलाबाळांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. मुलाचं ढुंगण आणि बायकोची मांडी झाकणे, हे कुटूंबप्रमुख म्हणून आमचे पहिले आद्यकर्तव्य आहे. घरातल्या सख्या आईला वृद्धाश्रमात घालून "मातृप्रेमाचे ढोंग" करणे हे फ़क्त धर्ममार्तंडांनाच जमू शकते, शेतकर्‍याला कधीच जमले नाही. त्यामुळे आहे त्या अठराविश्व दारिद्र्यातून मार्ग काढताना आम्हाला पहिल्यांदा आमचा प्रपंच नीट सांभाळू द्या, परमार्थाचा व मेल्यावर मोक्ष की नरक मिळावा, याचा विचार त्यानंतर करू.

४. अनेक लोक आईच्या आणि गायीच्या दुधाची भावनीक तुलना करतात. पण; शेतकर्‍याच्या मुलाला लहानपणी फ़क्त आईचेच दूध मिळते. शेतकर्‍याचा संसाराचा रहाटगाडा चालण्यासाठी दूध तर बाजारात जात असते.

५. घरची गाय, घरचं दूध पण शेतकर्‍याच्या मुलाला आईचे दूध अपूरे पडले तर गाईचे दूध नव्हे तर पिठाचे पाणी करून पाजले जाते.

प्रसिद्ध कवी स्व. प्रा.स.ग.पाचपोळ एका कवितेत म्हणतात,

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

माझा मुद्दा स्पष्ट आहे, आमच्या मर्जिने आम्ही भाकड गायीच काय, रानडुकरे, रानहेले, कुत्री, मांजर, कोंबड्या, बकर्‍या, बेडूक, घारी, पाली, सरडे, साप, विंचू, वाघ, सिंह वगैरे पाळू... पण आमच्या मर्जिने...

कायद्याची वेठबिगारी आम्ही स्वत:वर लादून घेणार नाही. धर्ममार्तंडाची हौस पुर्ण करण्याची मक्तेदारी स्विकारण्यास आम्ही शेतकरी कोणत्याही स्थितीत राजी नाहीत व बांधील तर नाहीच नाही.

आम्ही शेतकरी या "गोवंश हत्याबंदी कायद्याला" सन्मानपूर्वक फेटाळून लावत आहोत.

६. सरकारी तिजोरीत खड्खडाट असेल बुद्धीमान समजल्या जाणार्‍या मनुष्यप्राण्याचे शासकिय तिजोरीतून होणारे सर्व खर्च बंद करा. माणसे आहेत ती; जनावरे नाहीत ना? भरतील आपापले पोट कसे तरी. त्याऐवजी सर्व तर्‍हेच्या प्राण्यांची हत्याबंदी कायदा करून प्राण्याच्या पालनपोषणावर तीच रक्कम खर्च करा.

हे माझे मत स्विकारायला 'त्यांच्यापैकी' कोणीही राजी होणार नाहीत..... कारण त्यांच्या नजरेत आम्ही वेठबिगार आहोत!

- गंगाधर मुटे
-------------------------------

मुटेसर, जळजळीत शब्दांत वास्तव मांडलंत.पण सवंग आणि लोकप्रिय घोषणा करणार्‍या सरकारच्या कानावर हे नाही जाणार. Sad

आमच्या मर्जिने आम्ही भाकड गायीच काय, रानडुकरे, रानहेले, कुत्री, मांजर, कोंबड्या, बकर्‍या, बेडूक, घारी, पाली, सरडे, साप, विंचू, वाघ, सिंह वगैरे पाळू... पण आमच्या मर्जिने..

अगदी सहमत !

हायला , बीफ मार्केटातुन कार्बन डायऑक्साइड बाहेर पडते.

आणि इतर उद्योगधंद्यातुन अत्तराचा घमघमाट आणि अमृताच्या नद्या बाहेर पडतात का ?

काउ,

सदासर्वकाळ कोणाकोणाचे कसलेकसले उद्योग चाललेले असतात त्यांचा आढावा घ्या. कुठल्या अत्तरांचा घमघमाट आणि कोणत्या अमृताच्या नद्या वाहतात ते तुमचं तुम्हालाच कळून येईल. हे दिव्यज्ञान आम्हाला माहीत करून देण्याची तसदी घेऊ नयेत, अशी नम्र विनंती.

आ.न.,
-गा.पै.

घमघमाट शब्दाने त्यांचा गोंधळ उडालेला दिसतोय !

Proud

कारखान्यातुन जे दुषीत वायु बाहेर पडतात , ते त्याला उद्देशुन आहे पैलवान.

कबीर.,

अगदी योग्य सल्ला आहे. काउ आता गाढवासमोर आख्खं महाभारत वाचायला बसतील. त्यांनीच कबूल केलंय की :

>> माझ्या एकट्याचेच सगळे आयडी वापरुन महाभारत निघेल

jamopya_mahabharat.jpg

आ.न.,
-गा.पै.

दुखद घटना 48 घंटे मे 105 गौवंश की मौत

goshala1.jpg
घटना के पाछे साजिश की संभावना
बरोड़ा ( गुजरात ) के पांजरपोल में जहरीली घास खाने से 60 गऊवों की मौत हो गयी 2 दिन पहले भी इसी गौशाला की ब्रांच मे 45 गौवंश की मौत हुई थी !

मृत गोवंश को चमड़े उतारने वाले को दे दिया गया ! गौशाला के ट्रस्टी राजीव ने बताया की गुजरात मे सभी गौशाला वाले ऐसा ही करते है गोवंश कि मृत्यु हो जाने पर चमडे उतारने वाले को दे देते है !

पूर्व घटना से गौशाला वालो का सावधान ने होना, 48 घन्टे मे लगातार यह दूसरी घटना घटित होना और गोवंश को चमडे उतारने वाले को देना, गौरछकों को घटना स्थल पर जाने से रोकना संदेह पैदा कर रही है कि घटना के पीछे कोई साजिश तो नही है हम प्रसाशन से मॉग करते है कि इसकी जॉच होनी चाहिए और सच सामने आना चाहिए!

विस्तृत व पूर्ण समाचार के लिए डाउनलोड़ करे गौमाता न्यूज़ चैंनल एप्प - वंदे गौ मातरम्

गौमाता न्यूज़ चेंनल
Whatsapp- 9247555500
gausevaorg@gmail.com

Posted Date: 09 Mar 2015

Download Jay Gomata-Cow News application from https://play.google.com/store/apps/detailsgoshala2.jpggoshala3.jpg

जर हा कायदा मांसाहारींसाठी काही समस्या निर्माण करणार असेल, तर तो मुसलमानांपेक्षा मांसाहारी हिंदूंसाठी जास्त समस्या निर्माण करेल; कारण दलित, आदिवासींमध्ये दारिद्रय़रेषेखालील लोकांच्या आहारातील प्रथिनाचे (प्रोटीन) विपुल भांडार असलेला आणि स्वस्तात मिळणारा जर कोणता घटक असेल, तर तो फक्त बीफ हाच आहे. सर्वच जाणतात की, आदिवासींमध्ये कुपोषितांची संख्या काळजी करण्याएवढी आहे. त्यांच्या आहारातून बीफ काढून घेतल्यास ही संख्या अधिक वाढू शकते; परंतु तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे त्यांच्याशी काही देणेघेणे असण्याचे कारण नाही.
मुसलमान जसजसा आर्थिकदृष्टय़ा संपन्न होत जातो, तसतसा त्याचा कल बीफ खाण्याकडे कमी आणि मटण खाण्याकडे जास्त वाढत जातो, कारण मटण खाणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते आणि आमच्याकडे बडय़ाचे मांस (बीफ) चालत नाही, असे फुशारकीने पाहुणेरावळ्यांसमोर म्हटले जाते.

http://m.loksatta.com/vishesh-news/welcomes-cow-slaughter-ban-1081404/

काउ ,तुमची 15 March, 2015 - 10:03 चीपोस्ट, बशारत अहमद यांच्या सौजन्याने असे तरी टंकायचे ना.

गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी यांनी लिहिलेला व २१ ऑगस्ट १९९५ ला शेतकरी संघटक मध्ये प्रकाशीत झालेला लेख येथे वाचता येईल.

Pages