माझे बागकाम भाग - २

Submitted by सुभाषिणी on 27 January, 2015 - 05:44

अलीकडे मी सुकाकचरा[सुक्लेला पाला पाचोळा] व ओला कचरा दोन्ही साधारण सारख्या प्रमाणात घेऊन मोठ्या प्लॅस्टिकच्या ड्रममधे घेते. त्यामधेसाधरण एक किलोशेण [खरेतर शेणाचे प्रमाण कसे सांगावे/दाखवावे कळत नाहीये.आमचा दुधवाला छोटी पाटी भरुन आणुन देतो.ते सगळे घेते.] एक लीटर गोमुत्र व वीस लिटर पाणी मिसळुन तीन दिवस झाकुन ठेवते. रोज एकदा ढवळ्ते. तीन दिवसांनी हे पाणी ड्र्म मधील कच्रर्यावर ओतुन चांगले हलवुन मग हा कचरा पुन्हा तीन दिवस तसच झाकुन ठेवते. तीन दिवसांचा भिजलेला कचरा झाडांजवळची वरची कडेची माती हळुच उकरुन थोडा थोडा पसरुन घालते. पुन्हा मातीचा थर देते. थोडे वेळखाउ काम आहे पण याचा परिणाम फार फार छान आहे. झाडे तरारुन वाढतात. एका पुस्तकात मी हा प्रयोग वाचला त्यात त्याला झाडांची संजीवनी म्हटले होते ते अगदी सार्थ आहे.
सध्या गच्चीवर दोन अडीच ह्जार चौ. फुट जागेत वीस पंचवीस प्रकार्च्या भाज्या. २० ते२५ प्रकार्चे गुलाब, मोगर्याचे चार प्रकार ,जाई,जुई, चाफा, वेगवेगळे कॅक्ट्स्चे प्रकार,इतर बरीच शोभेच्या फुलांची झाडे आहेत.ओल्या कच्र्याच्या बाबतीत सोसायटीतील सर्वजण छान सह्कार्य करतात. कच्रा प्लॅस्टीक पिशवीत नको तर रद्दीपेपर मधे छान बांधुन आणुन ठेवतात. त्यांनाही सिझन प्रमाणे सेद्रीय भाज्या,फुले देते.
PicsArt_1422291612816.jpgPicsArt_1422292178650.jpgPicsArt_1422291870662.jpgPicsArt_1422292343327.jpgPicsArt_1422292343327.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, माझ्या मैत्रीणीचा स्नेहा दामले ती पण माबोकरीण आहे पण फारशी इथे येत नाही. आम्ही त्यांच्या शेतावर जाऊन आलोय.