मायबोली टीशर्टस्- २००९

Submitted by टीशर्ट_समिती on 11 June, 2009 - 05:06

आले! आले!! आले!!!

'मायबोली' टीशर्ट आले! सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

यावर्षी एक अभिनव प्रयोग म्हणून आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत. त्यांचं सुलेखन केलं आहे 'श्री. कल्पेश गोसावी' या प्रख्यात सुलेखनकाराने.

टीशर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत- पांढरा आणि मरून. यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
T-Shirt__white.jpgmaroon_tsh.jpg

टीशर्टाची किंमत आहे २००/- रूपये मात्र.
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.) टीशर्टांचे पैसे 'वर्षाविहारा'च्या पैशांबरोबर द्यायचे आहेत. त्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण २३ जून, २००९ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

ऑर्डर कशी नोंदवाल?-
tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.

ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टीशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टीशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकामार्फत
८. किती टीशर्ट?
९. रंग कोणता?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
XS - 34
S - 36
M - 38
L - 40
XL - 42
XXL -44

महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. टीशर्ट देशाबाहेर (गेल्या वर्षीसारखे) पाठवले जाणार नाहीत यावर्षी. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुण्या-मुंबईतल्या मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? Happy तर, झटपट ऑर्डर नोंदवा.

    दि.२६-६-०९ विशेष सूचना:-

    टी शर्टची ऑर्डर घेणे आता बंद झाले आहे तेव्हा कोणीही आता टी शर्टची ऑर्डर पाठवू नये...

    टी शर्टसचे पैसे प्रत्यक्ष भरण्याचे आणि टी शर्टस मिळण्याचे ठिकाण व वेळः-

    पुणेकर मायबोलीकरांसाठी:

    तारीख: ११जुलै (शनिवार) आणि १२ जुलै,२००९ (रविवार)

    स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा

    वेळ: सं. ५.३० ते ८.००

    मुंबईकर मायबोलीकरांसाठी:

    तारीख: १२ जुलै,२००९ (रविवार)

    स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात

    वेळ: सं. ५.३० ते ८.००

    पैसे टी शर्ट समिती सदस्यांकडे भरून टी शर्टस घेऊन जावेत... ज्यांनी ऑनलाईन पैसे भरले आहेत त्यांनीही आपले टी शर्ट याचवेळी घेऊन जावेत.

      धन्यवाद,
      टी-शर्ट समिती

      विषय: 

      संयोजकांनो, सुलेखन चितारलेले टीशर्ट काढण्याबद्दल अभिनंदन! कल्पेश गोसाव्यांनी चितारलेले सुलेखन मला आवडले. सुलेखनाबद्दल मतमतांतरे असली, तरीही दृक्कलेच्या दृष्टीने पाहता हा प्रयोग नेटका आणि अभिनंदनीय निश्चितच वाटतो.

      जाता जाता 'मयबेली' वगैरे मतांबद्दल (अंक्याच्या बारकाईने नोंदवलेल्या निरीक्षणासारख्या मोजक्या अपवादांव्यतिरिक्त) : "पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना"! पिकासो-हेन्री मूरादी कलावंतांपासून संकल्प द्रविडासारख्या जगद्विख्यात कलाकारांच्या चित्रा-शिल्पांवर नमुनेदार व अद्भुत रसग्रहणे (पक्षी टीका, टिप्पण्या, टोमणे) नोंदवली गेली आहेत, तर गोसाव्यांच्या या सुलेखनाची काय बिशाद?!! ~D Proud
      -------------------------------------------
      हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

      जे टीशर्ट प्रत्यक्ष भेटून घेणार आहेत, त्या सर्वांना भेटण्याच्या वेळा आणि स्थान ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे. तसेच या बाफवर हेडरमध्येही सर्व माहिती आहे. तेव्हा, भेटूया, टीशर्ट घ्यायला..

      आणि हो, ज्यांना टीशर्ट ऑर्डर करायचाय, त्यांना शेवटची संधी, या वर्षातली- उद्यापर्यंत वरच्या डीटेल्ससहित मेल करा, तुमचे टीशर्ट वविला मिळतील.

      शनिवार नंतर मात्र टीशर्टच्या ऑर्डर्स नाही घेता येणार.. तेव्हा, वेळ घालवू नका, पटापट ऑर्डर्स येऊद्या..

      धन्यवाद,
      टी-शर्ट समिती

      चहा सदरे खुप छान आहेत. Happy

      धन्यवाद टी-शर्ट समिती Happy

      टी शर्ट्स मस्तच आहेत Happy

      मी काल फोनवरुन अजुन २ टी शर्ट्स ची ऑर्डर दिली आहे, कृपया ऑर्डर पोचली असेल तर पोचपावती द्याल का??
      ************
      To get something you never had, you have to do something you never did.

      माझ्या घरी, अन मित्रांत प्रचंड कौतूक झाले टी-शर्ट्सचे.
      प्रचंड सही झालेत. Happy
      (अरे वा! मायबोलीचे शर्ट्स!!.. असेच सर्वांनी पाहिल्या पाहिल्या म्हटले. Happy )

      ---
      असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

      नमस्कार.

      या वर्षी टीशर्ट विक्रीमधून जमा झालेली चॅरिटीची रक्कम ठाणे जिल्ह्यातील 'डॉ. हेडगेवार जनजागृती प्रतिष्ठान, खर्डी, ता. शहापूर'ला दिली जाणार आहे. वनवासी समाजाच्या उन्नतीसाठी, त्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी हे प्रतिष्ठान वनवासी पाड्यांवर बालवाड्या सुरू करण्याचे काम करते. या संस्थेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, tshirt@maayboli.com वर संपर्क साधू शकता.

      टीशर्ट समितीमधले काही सदस्य लवकरच या प्रतिष्ठानाला समक्ष भेट देऊन चॅरिटीच्या रकमेचा धनादेश संस्थेच्या संचालकांना सुपूर्त करतील.

      पुन्हा एकदा, टीशर्ट घेणार्‍या सर्व मायबोलीकरांना या वर्षीच्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

      आपली,
      टीशर्ट समिती, २००९.

      अरे वा ! छानच.......तुम्हाला शुभेच्छा Happy
      बाकी टीशर्ट डीझाईन मस्त होतं......सगळ्यांना आवडलं!

      टि शर्ट्स मला काल मिळाले. घरातील सगळ्यांना खुप आवडले.

      चेन्नई सारख्या अवघड ठिकाणी बराच द्राविडी प्राणायाम करुन टि शर्ट्स पोचवले याबद्दल टी शर्ट समितीच्या सगळ्या सदस्यांचे मनापासुन आभार.

      निलेश वेदक यांचे विशेष आभार.

      धन्यवाद!

      -मुग्धा

      Pages