स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण धागा वाचला की असेच दिसते आहे. सुरूवातीला लोक जेन्युईन चिडलेले होते प्लेजॅरिजम मुळे. पण नंतर पूर्वीचे उकरून काढून उगिच वैयक्तीक केले गेले. फेबु वगैरे गोष्टी चूकच आहेत.

राज.. तुम्ही स्वतःच ते अजून अधोरेखित करताय Happy

रच्याकानं ..मला शेपूट नाही आणि मी सापही नाही. शिवाय मी कोणाला असली विशेषणं देत नाही Happy

मनीष,

सरसकट आरोप करण्यापूर्वी तुमचे संदर्भ एकदा पुन्हा तपासून घेतलेत तर बरं होईल, कारण किमान गांधीजींबद्दलतरी मी कुठेही काही चुकीचं लिहील्याचं वाचलेलं नाही.

ज्या लोकांनी त्याबद्दलही तक्रार केली होती, ती हिअर आय से एव्हीडन्स सारखी होती. त्याला समर्थनार्थ कोणताही संदर्भ न देता तक्रार झाली होती.

मी स्पार्टाकस यांचं कोणतंही समर्थन करत नाही, परंतु माकडांच्या हातात कोलीत मिळाल्यागत जी झोडपाझोडपी सुरू आहे, आणि त्यांचं प्रत्येक लेखन ही उचलेगिरीच आहे हे सिद्ध करण्याचा जो चंग काही मंडळींनी बांधलेला आहे तो तितकाच तिरस्कारणीय आहे.

>>तुम्ही स्वतःच ते अधोरेखित करताय <<
अहो, पहिल्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे ती एक शंका होती; कारण माबोवरचे सगळे लेख (कथा-कादंबर्‍यातर मी वाचतच नाहि) वाचण्या एव्हढी बँड्विड्थ माझ्याकडे नाहि, ती शंका तुम्ही दुर केल्याबद्दल तुमचे आभार. अनवधनाने त्या वाक्प्रचारामुळे तुम्ही दुखावले गेले असाल तर क्षमस्व...

ठीक. मी काही इथे उलटतपासणी करणार्‍या वकीलाची भूमिका घेऊन आलेलो नाही. पण एकूण वाटचाल आणि 'स्वतःचच' आडनाव कुणी चुकीचं लिहू शकतो हे पाहून (सहस्त्रबुद्धे नव्हे हो, सहस्रबुद्धे!) शंकासूर जागा झाला, एवढंच.
असो, आता कंटाळा आला...

चिमीचांगा.

माझं स्वत:चं आडनाव मराठीत कसं लिहावं हे मला तुमच्याकडून शिकण्याची जरुर नसावी बहुधा! तो संपूर्णपणे माझा प्रश्न आहे.

-रत्ना सहस्त्रबुद्धे

चिमिचांगा आणि बाळू,

तुमच्याकडून दुसरी काहीही अपेक्षा नाही. कोणताही आयडी हा दुसर्‍या कोणाचा डुप्लीकेट आयडी आहे या मानसिकतेतून तुम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही. लाज वाटते तुमची.

माझा इथला शेवटचा प्रतिसाद -

चोरीची घटना आहे ज्यात चोर पकडला गेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कुणी काय समज करून घ्यावेत हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. त्यावरून विद्वत्ता पणाला लावणे हे हास्यास्पद आहे. कुणाला स्कोअर सेटलमेंटचे आरोप करायचे असतील तर विनाकारण कुणी स्कोअर सेटल करत नाही असं मानवी इतिहास सांगतो.( इच्छुकांनी अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यायचे असल्यास सिग्मंड फ्रॉईड, बाळू कोट्स वगैरे कोट करावेत. ). जर कुणाच्या शेपटीवर पाय पडला असेल तर ज्या वेळी पाय पडला त्या वेळी महात्मा गांधी बनणा-यांनी आता अण्णा हजारेंच्या थाटात मौनात गेलं तर जास्त बरं होईल. चोर तो चोर आणि वर शिरजोर असं नको व्हायला.

साहीत्यचोरी ही गंभीर आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत सहानुभूती दाखवायला नको. याउप्पर जो कुणी भावनाविवश होऊन लोकांना झोडपण्याचे काम करत आहे त्याच्याबद्दल लोक काय ते समजून घेतीलच. त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. ज्या त्या कथेवर जाऊन उर्वरीत चर्चा चालू ठेवता येईलच.

साहीत्यचोरी या विषयापासून फोकस हटवण्याचा काही लोकांचा हेतू दिसतो, तो तडीस जाऊ नये.

कोणत्याही पुराव्याविना दुसर्‍यावर डुप्लीकेट आयडीचा अश्लाघ्य आरोप करणार्‍यांचे मौलीक विचार ऐकून धन्यं वाटलं. असल्या गटारात दगड मारण्याची माझी इच्छा नाही. याच काय, इतर कोणत्याही लेखनावर यापुढे प्रतिक्रीया देण्याचा विचारही मी करणार नाही.

Pages