स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम तमाम मायबोलीकरांच्या मानसिकतेवर काय घसरता? शोनाहो! Proud
आम्ही असं सगळ्या भारतीयांच्या मानसिकतेचं जनरलायझेशन केलं म्हणजे?::दिवा:

तंतोतंत मॅच होणारा मजकूर सापडला पण त्याचा अर्थ सगळीच कथा, संवाद उचललेले आहेत असं नाहीये ना? आता त्यांच्या स्पीडवर संशय घेतला जात आहे म्हणून म्हणतोय. शेवटी बुंदसे गयी वो हौद से नही आती हे जरी खरं असलं तरी ज्याचा पुरावा सापडला त्या विषयीच आपण ठामपणे काही म्हणू शकतो ना?

इथल्या बाळबोध बुद्धीच्या काही लोकांना निव्वळ लोकांचा अपमान करायला आवडतो आणि ते या धाग्यावरून त्या धाग्यावर एकमेव ह्याच कारणासाठी फिरतात हे सिद्ध झालंच आहे माझ्या धाग्यावर…तेव्हा बाळा विदुषी मानलेच आहेस तर दूरच राहावे तुमच्या बाळबोध बुद्धीला झेपणार नाहीच आमचे विचार

:D:

बुवा, तुम्ही स्क्रीनशॉट्स बघितले होतेत का? नुसते संदर्भ उचललेले नव्हते. लिटरली पानंच्या पानं वर्णनं, संवाद यांच्यासकट कॉपीपेस्ट केले होते. कथाबीज एकीकडचं, वर्णनं दुसरीकडची असला प्रकार. त्याचंही कुठे श्रेय दिलेलं नव्हतं.
बरं ते दाखवून दिल्यावर सपशेल माफी मागावी तर रुसून गेले ते.

मयी, कौतुकही अपार की काय तेच केलं होतं.

इथे जे एक दोन टाकले होते ते पाहिले, त्यापेक्षा अजून जास्त सापडलं आहे का? मला खरच माहित नाही म्हणून विचारतोय.

त्या बाळूंनी त्यांना विदुषी म्हटलंय.

लहानपणी लिंग बदला अशा प्रश्नांत विदुषी हे विदुषकाचं स्त्रीलिंगी रुप वाटणारी किती लोकं आहेत माबोवर?

हो, वैद्यबुवा.. इतक्या गुंतागुंतीच्या कादंबरीतील इतके भाग असताना इतक्या फास्ट लिहीता येणं शक्य आहे, कारण कथानक कुठेतरी रेडीमेड मिळाले त्यांना. संवादही ढापलेत. हे सगळं ओरिजिनली डोक्यातून येणार असेल तर त्या प्रोसिजरला ऑफकोर्स अजुन जास्त वेळ लागणार.

मयी, चूक ती चूक आहे. मायबोलीकर आधी कित्येक महिने कौतुकच करत होते त्यांचे. परंतू वांङ्मयचौर्याला पाठीशी घालणे ही देखील चूकच आहे. "असेना का कॉपी केलेले, पण आपल्याला वाचायला तर मिळाले" असा स्टँड घेऊ म्हणता? Uhoh

बरोबर इब्लिस तुम्ही बाळूच समर्थन करणारच बाळूच ते … तुमचं आणि त्यांच डोकं फार वेगळं नाही हे सिद्ध केलंत … बालपणीचेच किस्से आठवतंय तुम्हाला पण Lol

"असेना का कॉपी केलेले, पण आपल्याला वाचायला तर मिळाले" असा स्टँड घेऊ म्हणता?>>>>>>>>> अजिबात तसं म्हणत नाही … पण 'हे चूक आहे आणि नाही आवडले असे वागणे' एवढे बोलणे पुरे आहे … मग आता ह्यांनी माफीच मागावी आणि अमके करावे आणि तमके करावे… आणि काय काय बापरे बाप हे सल्ले आपण का देतोय? आपण त्यांचे लिखाण वाचले होते तेव्हा आपण त्यांच्यावर उपकार केले होते का ? ते त्या लेखकाचे गुन्हेगार ठरतात ना ते आपले गुन्हेगार ठरतात का ??

वत्सला काकू काळजी करू नका फार मला कळलंय बर … फक्त काये न कि मी लगेच तुटून पडून फाडून बिडून टाकत नाही पुढच्याला आणि दुसरा तसे करत असेल तर त्याचा विकृत आनंदही होत नाही मला … चूक ती चूकच आहे हे मान्य आहे मला पण ती सांगायची पद्धत इथे कुठेतरी चुकतेय अस जाणवलं म्हणून तुम्ही पण चुकताय आणि चूक ती चूकच हे सांगत होते …. एवढंच

असो चालू द्या तुमचे … मी झोपते आता

आमचे ठरतात. आम्ही विश्वास ठेवला म्हणून आणि मनापासून भरभरून कौतुक केलं म्हणून.
तेव्हा कुठे तुम्ही 'नुसतं चांगलं आहे म्हणा - इतकं कौतुक कशाला' असं नाही म्हणायला आलात ते?

मयी वाचकांचा फार मोठा विश्वासघात केलाय लेखक म्होद्यांनी असे नाही का वाटत आपल्याला?

मला पण फास्ट टाकण्याचं काही झेपत नाही. असेल एखाद्याला पॅशन लिहिण्याची आणि छान लिंक लागून भराभर लिहिणं होत असेल्..इथे मेजॉरिटी लोकं क्रमशः लिखाणात सातत्य राखत नाहीत म्हणजे तेच नॉर्मल(?) वाटायला लागलय का आपल्याला?
नविन ओरिजिनल काही वेगात लिहून होणार नाहीच असं नाही..

स्पार्टाकसांचा जो काय अपुरा खुलासा होता त्यात फक्त त्यांनी कथा फुलवताना त्यासाठी केलेल्या रिसर्च्बद्दल होता..सहीसही नक्कल केलेले पॅरेग्राफ बद्दल त्यांनी काहीच भाष्य/स्पष्टीकरण दिलेलं नाही..
दिलगिरी देखील व्यक्त केलेली नाही. शिवाय हे फक्त ट्रॅपबाबत झालेलं नसून त्या भुताळी जहाज की काय तिथे पण तीच केस.. हा पॅटर्न बनत होता असं दिसतं.

एकदम अल्पावधीत आवडीच्या झालेल्या लेखकाबद्दल असा भ्रमनिरास झाल्यने इथे सगळ्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक वाटते आहे.

वाचक हा लेखकावर उपकार करायला वाचत असतो काय ?? त्यांनी आग्रह केला होता काय आपल्याला त्यांच लेखन वाचायला?
आणि मी अजूनही म्हणतेय ते चुकले आहेच … पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच तेवढ्या हक्काने मी त्यांना सांगू शकते कि 'तुम्ही चुकलात आणि हे 'मला' आवडलेले नाही' बस माझा अधिकार एवढाच … पण मी तुमचे लिखाण वाचले आहे म्हणजे तुम्ही माझे गुन्हेगार ठरलात आणि आता मी तुम्हाला वाटेल ते बोलायला मोकळी आहे आणि तुम्ही मी म्हणेन तसे आता वागावे असा त्याचा अर्थ होत नाही. एखाद्या लेखकाचे लिखाण वाचणे किंवा त्याचे पुस्तक विकत घेणे म्हणजे त्या लेखकालाच आपण विकत घेतलंय असे होत नाही मित्रांनो.… हा फार फार तर यापुढे त्याचे लिखाण वाचायचेच नाही हा आपण स्वतःशी स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू शकतो.

>> वाचक हा लेखकावर उपकार करायला वाचत असतो काय ?? त्यांनी आग्रह केला होता काय आपल्याला त्यांच लेखन वाचायला?

अय्या! मग त्यांनी चौर्यकर्म करून आमच्यावर उपकार केले काय? आग्रह नव्हता तर प्रकाशित करायचीही आवश्यकता नव्हती. घरी ठेवायचे की आवडलेले उतारे कॉपी करून.

मयी यांच्याशी सहमत. स्पार्टाकस यांनी वाचकांचा फायदाही केलाच आहे हे डोळ्याआड करून चालणार नाही.

माझे ईंग्लिश कच्चे आहे. मी ना ईंग्लिश पिक्चर बघत ना ईंग्लिश गाणी ऐकत. कारण चाल आवडली तरी गुणगुणता येत नाहीत. त्यामुळे कोणी हिंदी दिगर्शकाने ईंग्लिश चित्रपटाची कथा चोरली वा कोणत्या संगीतकाराने एखाद्या परकीय भाषेतील चाल उचलली तर मला आनंदच होतो कारण ते मला समजेल अश्या भाषेत आले असते.

त्याच धर्तीवर कोणी ईंग्रजी कथा अनुवाद करत उचलत असेल तर एखादे चांगले साहित्य मी माझ्या भाषेत आल्यामुळे वाचू शकलो याचा मला आनंदच होतो.

फक्त स्पार्टाकस यांनी ते कबूल करायला हवे होते आणि मराठीच साहित्य उचलण्याऐवजी परकीय भाषेवर डल्ला मारायला हवा होता. Happy

<<मराठीच साहित्य उचलण्याऐवजी परकीय भाषेवर डल्ला मारायला हवा होता.>>
----- अत्यन्त बेजबाबदार विधान... साहित्य चोरणे चुकच मग ते कुठल्याही भाषेतले (किव्वा लेखकाचे) चोरले हे महत्वाचे नाही आहे.
कल्पना किव्वा आधार घेतला असेल तर त्या ठिकाणी रेफरन्स देणे योग्य.

स्पार्टाकस यांचं समर्थन करायला येणा-यांचं लॉजिक पाहून एक विनोद आठवला.

तोच तो , एक सरदारजी वेगवेगळ्या वेषात दुकानात जाऊन टीव्ही कितीला विचारत असतो, पण दुकानदार प्रत्येक वेळी "फिर आये ? बोला ना, सर मत खाओ" असं म्हणायचा. शेवटी सरदार म्हणतो, " अच्छा, टीव्ही नही बेचना है तो ना सही, लेकीन ये तो बताओ की तुमने मुझे हर बार कैसे पहचाना "

दुकानदार म्हणतो " क्युं की वो टीव्ही नही, मायक्रिवेव्ह है "

-----------------------------------
नि.घा. आपली कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बेफिकीर याच्याबरोबर कोलॅबरेशन करून स्पार्टाकस या नावाने असं काही करण्याची शक्यता ....पण नकोच ते.
मार पडेल इथं.

शूम्पी अ‍ॅग्री.. एखाद्याला फास्ट कथा लिहीताही येईल. पण इतक्या गुंतागुंती असलेली कथा, १६-१७ भाग असलेली कथा ? ह्यासाठी फारच जास्त टॅलेंटेड माणूस हवा. (आणि स्पार्टाकस असे एक्स्ट्राऑर्दीनरी टॅलेंटेड आहेत हे गृहीत धरून चालले होते मी.. )
म्हणून वेगाचे लिहीले आहे. इतकं सातत्याने, फास्ट, व कथानक पूर्ण डोक्यात ठेऊन लिहीणे जोक नाहीये. ते त्यांना कसं जमत असेल ब्वॉ अशा आदरानेच मी बघत होते. तो धुळीला मिळाला ना हे असं कॉपी पेस्ट करून..? स्पष्टीकरण तर काय म्हणे पाणबुडी किती जोरात जाते अन काय रशियाची पाणबुडी अजुन आहे तिकडे असा अभ्यास विषकन्येत आहे का? Uhoh स्पष्टीकरणामुळे अ‍ॅक्चुअली जास्त तिडीक गेली!

.....

झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे हे जितकं खरं आहे, तितक्याच अनेकांच्या प्रतिक्रीयाही दुर्दैवीच आहेत.

मायबोली प्रशासनाने स्पार्टाकसना खुलासा विचारला, त्यांनी केलेला खुलासा पटला नाही म्हणून प्रशासनाने त्यांचा आयडी गोठवला. परंतु या सर्व प्रकरणात या धाग्यावर जे कॅरेक्टर अ‍ॅसॅसिनेशन मायबोलीकरांनी चालवलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. फेसबुकसारख्या ठिकाणी स्पार्टाकसचं असलेलं प्रोफाईल हे फेक असू शकेल अशी शंका ज्या ज्येष्ठ सदस्यांनी व्यक्तं केली आहे त्यांच्याबद्दल मला सखेद आश्चर्य वाटतं. एव्हरेस्ट, के२, दक्षिण धृव, नॉर्थवेस्ट पॅसेज, छावणी आणि इतर मालिकांमधील त्यांचं लिखाण हे चोरलेलं आहे असं ज्यांना वाटू शकतं त्यांची केवळ धन्यं होय! केवळ काही अंशी साम्य आढळलं म्हणून त्यांचं इतरही प्रत्येक लेखन हे उचलेगिरीच आहे हे अनुमान ज्यांनी काढलं आहे आणि ते सिद्ध करण्याचा ज्यांचा आटापिटा चालला आहे, त्यांना कोपरापासून नमस्कार!

वैयक्तीक रित्या माझा स्पार्टाकस यांच्याशी काहीही संबंध नाही, किंवा मी त्यांना ओळखतही नाही. प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर हा विषय इथेच थांबवावा असं माझं मत आहे.

(वाङ्मय)चोर, उचले लोक आवडीचे हीरो ज्या समाजात ठरू शकतात व त्यांचे समर्थनही केले जाते, त्या समाजाचा सदस्य असल्याची मला तरी लाज वाटते.

ऋन्म्एश, इंग्रजी येत नाही तर शिका. नाहीतर ऑफिशिअल अनुवाद वाचा. त्यातलं चोरून ढापून आपल्या नावावर खपवलेलं लेखन वाचायची गरज नाही. नुसतं मराठी वाचाय्चं ठरवलं तरी आयुष्य पुरेल इतकं ओरिजिनल लिखाण उपलब्ध आहे की जगात. तुमच्याकडून असल्या समर्थनाची अपेक्षा नव्हती.

मयी यांच्याशी सहमत. स्पार्टाकस यांनी वाचकांचा फायदाही केलाच आहे हे डोळ्याआड करून चालणार नाही.

मी ना ईंग्लिश पिक्चर बघत ना ईंग्लिश गाणी ऐकत. कारण चाल आवडली तरी गुणगुणता येत नाहीत. त्यामुळे कोणी हिंदी दिगर्शकाने ईंग्लिश चित्रपटाची कथा चोरली वा कोणत्या संगीतकाराने एखाद्या परकीय भाषेतील चाल उचलली तर मला आनंदच होतो कारण ते मला समजेल अश्या भाषेत आले असते

>> ऋन्मेऽऽष ह्यांचा वरचा प्रतिसाद अगदी OMG आहे. तसे त्यांना काय आवडावे ही त्यांची वैयक्तिक बाब असली तरी इथे लिहून जणू त्यात वाईट काहीच नाही, तुमचा फायदा करून तुमच्यावर लेखकाने उपकारच केले, असे म्हणून ते त्यांची वृत्ती दाखवतात . जी चुकीची आहे.

सहसा त्यांच्याबद्दल मी काही लिहित नाही, पण ही वरची पोस्ट जरा, 'अति झालं अन हसू' आलं कॅटेगिरी मध्ये येते.

मला वाटतंय अजून ह्या धाग्यात पेट्रोल टाकले आहे आणि त्याला इब्लिस आणि मी बळी पडलो आहोत. पण तरी हे टू मच आहे.

Pages