स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्निपंख,

१. कल्पना किंवा हुबेहुब कलाकृती चोरणे व ते पकडले जाईपर्यंत लपवणे व पकडले गेल्यानंतर कबूल करून माफी मागणे हा एक भाग

२. प्रेरणा घेणे व ती स्वतंत्ररीत्या विकसित करणे हा दुसरा भाग आहे

३. दोन कलाकृतींंअध्ये योगायोगाने साम्य आढळणे हा तिसरा भाग आहे

४. मयेकर व कवठीचाफांनी पुराव्यासकट वाड्मयचौर्य पकडले तसे पुरावे दिले गेल्यानंतरही ते अमान्य करणे हा चौथा भाग आहे.

हा चौथा भाग सर्वाधिक धक्कादायक व विश्वासघात स्वरुपाचा असून येथे स्पार्टाकस ह्यांनी नेमका तोच केलेला दिसत आहे.

हे माझे मत आहे. Happy

अग्निपंख : याचं उत्तर माझ्यापुरतं देते - ही कादंबरी 'ट्रॅप' नसती आणि लेखक 'स्पार्टाकस' नसता तर कदाचित हा 'एवढा' गदारोळ झाला नसता.
याचं कारण इतकंच की माझ्यासारख्या अनेकांनी 'ट्रॅप' वर मनापासून प्रेम केलेलं. आतुरतेने वाट पाहिलेली. दिवस रात्रीत कित्येकदा लॉगिन करून पुढचा भाग आला का पाहिलेलं. पुर्णपणे गुंतून गेलो होतो आम्ही या कादंबरीत.
सहाजिकच स्पार्टाकस बद्दल मनात आपार आदर आणी अभिमान निर्माण झाला होता. एक स्पेशल जागा दिली गेली होती.

आणि आता अचानकपणे आम्हाला हे कळतंय की आम्ही फसवलो गेले आहोत!
स्पार्टाकसवर जितका राग आहे त्याहीपेक्षा जास्त स्वतःचा राग येतोय.
या सगळ्याच प्रतिक्रिया अति सहाजिक नाहीत का?

याचं कारण इतकंच की माझ्यासारख्या अनेकांनी 'ट्रॅप' वर मनापासून प्रेम केलेलं. आतुरतेने वाट पाहिलेली. दिवस रात्रीत कित्येकदा लॉगिन करून पुढचा भाग आला का पाहिलेलं. पुर्णपणे गुंतून गेलो होतो आम्ही या कादंबरीत.
सहाजिकच स्पार्टाकस बद्दल मनात आपार आदर आणी अभिमान निर्माण झाला होता. एक स्पेशल जागा दिली गेली होती.

आणि आता अचानकपणे आम्हाला हे कळतंय की आम्ही फसवलो गेले आहोत!
स्पार्टाकसवर जितका राग आहे त्याहीपेक्षा जास्त स्वतःचा राग येतोय.
या सगळ्याच प्रतिक्रिया अति सहाजिक नाहीत का?
>>>>>>>>>>> +१

अगदी बरोबर. दुसर्‍या ठिकाणी फेसबुक पेज वर ट्रॅप कथा विनापरवानगी दिसल्यावर मी त्यांना आवर्जुन सुचित केले होते. आणि त्या पेज वर देखील मायबोलीची लिंक देउन तिथे त्यापेजवाल्याला सुनावले होते.

trap चे सगळे भाग आल्यावर वाचायची म्हणून राहून गेली हे एका अर्थाने बरच झालं. मायबोलीवर एव्हढी पकड़ घेणारी कादंबरी आपण वाचत नाही याची बोच होतीच पण लेखक स्वत: एव्हढा बिझी असुन (कौटुंबिक जबाबदारया आणि travel चा जॉब - त्यांच्या गप्पापानावरील पोस्टवरुन) एव्हढी जबरदस्त गोष्ट लिहीतो आणि आपण वाचतही नाही अशी रुखरुख मनाला लागली होती.... ती नाहीशी झाली! या लेखकाचे इतर कोणतेही लेखन वाचले नाही हेही बरेच झाले!

एक आयडिया

एक नविन सेक्शन तयार करता येइल का....या प्रकार् च्या लिखाणासाठी

उदाहर्णर्थ :

१. 'वाद्ग्रस्त साहित्य'
२. ऊचले की दुनिया
३. वाचावे आणि वाचवावे
४. वाचा...जशेच्या तशे..

किवा

५. सन्पादीत (हे जास्त छान वाट्तय नाही...)

क्रुपया अजुन नावे सुच्वावीत....

या डिटेक्टिव्हगिरीचे सर्व श्रेय कवठीचाफा यांचे आहे.लेखकाने(!)मूल पुस्तकच वाचल्याचे नाकारले तेव्हा त्या एका परिच्छेदाचे दोन्हीकडचे स्क्रीनशॉट एकत्र करून टाकण्यापलीकडे मी काहीही केलेले नाही.बुकगंगावर ते पान उपलब्ध होते म्हणूनच जमले.अनेक प्रतिसादांत फक्त माझा किंवा प्रथम माझा उल्लेख आहे म्हणून हा खुलासा.व्हिलन म्हणून कोणाकोणाची नावे येतात यापलीकडे मला या कादंबरीत काही रस नव्हता. Wink

लेखकाने(!)मूल पुस्तकच वाचल्याचे नाकारले तेव्हा >>> अ‍ॅक्चुअली हे करायला नको हवे होते त्यांनी. जर तंतोतंत वाक्ये शब्दे जुळत आहेत तर वाचलीच नाही हे ढळढळीत असत्य झाले. म्हणजे त्यांनी वाचकांची / माबोकरांची सहानुभुती मिळवायलाही कोणता मार्ग शिल्लक ठेवला नाही. एकवेळ वाचलेले आणि इन्स्पायर झालो वा काही भाग उचलला इतपत तरी कबूल करायचे होते. अर्थात हा देखील प्रामाणिकपणा नसता झाला ती गोष्ट वेगळी..

सहज विचार आला,

लेखकाने पहिल्यांदाच जाहीर केले असते, कि या कादंबरीचा काही भाग, दुसर्‍या कादंबरीचा काही भाग ( अर्थात दोघांची परवानगी घेऊन ) माझी काही भर घालून एक कादंबरी सादर करतोय, तरीही लोकांनी वाचलीच असती.

असे प्रयत्न पुर्वी झाले आहेत. उदा. गगनभेदी हे नाटक ( यात चार नाटकांचे एकत्रीकरण होते. ) मुसाफीर हा चित्रपट ( यात एका नाटकातील नायकाला पार्श्वभूमी म्हणून एक कथानक जोडले होते. )

आयडी गोठवण्यापेक्षा हा प्रताधिकाराचा भंग होता की नाही ते स्प्ष्ट करून जर प्रताधिकाराचा भंग असेल तर हे लेखन अप्रकाशित करावे. जर नियमाप्रमाणे प्रताधिकाराचा भंग होत नसेल तर लेखन आणि आयडी दोन्ही मायबोलीवर रहायला हवे. >>>> + १

>> प्रताधिकाराचा भंग होता की नाही ते स्प्ष्ट करून जर प्रताधिकाराचा भंग असेल तर हे लेखन अप्रकाशित करावे.

मलाही असंच वाटतं.

आयडी गोठवला आणि नाही तरी स्पार्टाकस राम राम ठोकून गेले आहेतच.

स्वस्ति | 10 March, 2015 - 13:38

दुर्दैवी प्रकार अरेरे

एक शन्का आहे .
समजा जर बेफिना आम्ही गुमॉमॅ आणि ट्रॅपच्या साधर्म्याबद्दल वेळीच कळवले असते आणि त्यावर त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असती , तर प्रशासनाने काय भूमिका घेतली असती?

गुमॉमॅ मधली वाक्य चोरली नसतिल पण सर्वाना आठवण यावीत इतके साधर्म्य होते .

आज बेफि आहेत , उद्या त्यान्च्या जागी कोणी दुसरे असतिल .

प्रशासन नियम स्पष्ट करणार का ?

>>>>>

प्रशासन उत्तर देणार का ? यापुढे असा प्रकार घडला तर काही नियम हाताशी असावेत म्हणून .

Sarvat aadhi marathi typing jamat nai tyasathi sorry.......bt ajunahi ya saglyavar vishwas basat naiye ....Sparta chya babtit ase vhyala nko hote....pan tyani apli chuk manya karayla havi hoti....Befi yanshi sahmat ki sagle eka mansala bolyla lagle ki jara vait vatate ...
so ha topic ithech stop vhava evdich echha ...

@ भग्यश्रि,

कुठल्यातरी धाग्यावर चोराने कान चावलेल्या आईची गोष्ट आली होती परवाच.

लहान आहे, जाऊ द्या, चुकतं एकाद्याचं, कितीवेळ टोचून बोलणार?, वगैरे गोष्टी ठीक आहेत. पण या लेव्हलच्या 'चुका' 'या' वयात करणे योग्य नाही. असल्या चुकांचे खिळे होऊन तुम्हाला, अन तुमच्यासोबत इतरांनाही क्रुसिफाय करायला पुरेसे असतात.

आपल्याच घरातल्या कुणी केलेली चूक झाकून ठेवावी अशी उर्मी प्रत्येकाला येतेच. इथे बरंच काहीसं आभासी असल्याने 'स्पार्टाकस' अशा कुणा बिनचेहर्‍याच्या जालीय 'आयडी'ने केलेला बाष्कळपणा इतक्यापुरतं ते इथेतरी आवरलेलंही आहे. हे सगळे करणार्‍या या आयडीपाठच्या महोदयांना व्यक्तीशः काही झळ रियल लाईफमधे पोहोचेल असे वाटतही नाही.

कचा यांनीही हे प्रकरण माबोपुरतं मर्यादित ठेवायची इच्छा व्यक्त केली आहे.

पण, 'स्पार्टाकस' या 'आयडी'ने मात्र त्यांच्या बाजूने 'जाऊ द्या', 'सोडून द्या', करणार्‍यांनाही तोंड दाखवायची सोय उरणार नाही अशी वागणूक केलेली आहे. अर्थात, माझं चुकलं वगैरे म्हणणे सोडाच, 'विच हंटिंग' वगैरे बोलत मी किती सालस, अन मला कसे लोक त्रास देताहेत असा आव आणलाय. हे इथेच नाही तर मिसळपाववरही. त्यांचे जालिय मित्र म्हणवणारे इकडे खासगीत त्यांनी चोरी केली म्हणत, तिकडे त्यांना समर्थनही देऊन आलेत.

(पुराव्यासकट शाबीत करीन Wink यात सगळ्यात मोठी गोची बेफिंची केलिये त्यांचा 'मित्र' म्हणवणार्‍या या माणसाने. ती वेगळीच आहे.)

या परिस्थितीत, जसा ललित लिखाणाच्या 'ओरिजिनॅलिटीवरचा' लोकांचा विश्वास उडालाय, तसाच तुमच्यासारख्या (जेन्युइन असल्यात तरीही) 'जाऊदे'वाल्या थो-थो-थापडी पोस्टींवरचाही.

अशीही इथे अजून काही काळ च्यावच्याव चालेल अन मग २-३ दिवसांत लोक विसरतील असं दिसतंय. तेव्हा जास्त सारवासारवी करू नका. ज्या लोकांना वाईट वाटतेय त्यांना मन मोकळे तरी करू द्या.

*

रच्याकने, अनाहुत सल्ला. तुमचे सदस्यनाम भग्यश्रि दिसतेय, ते 'भाग्यश्री' असे शुद्ध करण्याची सोय माबोवर आहे, कृपया ते करा. धन्यवाद!

टीपः नेहेमीच्या सवयीने शेवटल्या प्रतिसाददात्याला उद्देशून लिहिला गेला असला, तरी प्रतिसाद 'रहेने दो, छोडो भी, जाने दो यार' वाल्या सगळ्यांनाच उद्देशून आहे.

मित्रहो, पुरे झाला काथ्याकूट !!
'why so serious...?' (हे वाक्य माझे नाही...ब्याटम्यान चित्रपटातून उचलले आहे हे आत्ताच नमूद करतो. :D)
हे सर्व निदर्शनास आणून दिल्याबद्दल कवठीचाफा यांचे खूप खूप आभार!! निदान अश्यामुळे पुढे चौर्याकर्मांना आळा नक्कीच बसेल!
त्याचबरोबर स्पार्ताकस यांचेही काही अंशी आभार...कदाचित विषकन्या बर्याच वाचकांनी वाचली नसती...
पण शेवटच्या भागात का होईना अगदी छोट्या अक्षरात संदर्भ दिला असता (ते * करून शेवटी बारीकसे लिहितात ना तसे) तरी पुरले असते हो..
जाऊदे...पण यामुळे बाकी genuine कथाकरांनी त्यांच्या कथा थांबवू नयेत हि विनंती..

शेवटी काय,गीता सार: जो हुआ अच्छा हुआ....!!

पण शेवटच्या भागात का होईना अगदी छोट्या अक्षरात संदर्भ दिला असता (ते * करून शेवटी बारीकसे लिहितात ना तसे) तरी पुरले असते हो..

अले वा, अले वा
अता मि पन मोट्टा लेखक होनाल. पहिलि कथा कनवालु लेखकाचि चोलनाल.

<<पण, 'स्पार्टाकस' या 'आयडी'ने मात्र त्यांच्या बाजूने 'जाऊ द्या', 'सोडून द्या', करणार्‍यांनाही तोंड दाखवायची सोय उरणार नाही अशी वागणूक केलेली आहे. अर्थात, माझं चुकलं वगैरे म्हणणे सोडाच, 'विच हंटिंग' वगैरे बोलत मी किती सालस, अन मला कसे लोक त्रास देताहेत असा आव आणलाय. हे इथेच नाही तर मिसळपाववरही>>
------ माझे चुकले, प्रसिद्धीच्या हव्यासामुळे, मला चौर्यकर्म करण्याचा मोह झाला... असे लिहीणे जास्त योग्य ठरले असते. सर्व पुराव्यासकट दाखवल्यावरही स्वतःचे काहीच चुकले नाही असा अविर्भाव असेल तर माझी (एक सामान्य वाचक) सहानुभूति अजिबात मिळणार नाही.

या चुका अजाणतेपणी होत नसतात. जाणतेपणी केलेली चुक मान्य करायलाही मोठे धाडस लागते...

कवठीचाफा म्हणताहेत हे कुणी ताडून पाहिलंय काय ?? म्हणजे त्यांना तसं वाटतंय पण ते खरंच तसं आहे का हे ताडून न पाहता स्पार्टाकस वर तुटून का पडलीयेत लोकं …. कवठीचाफा यांचाही गैरसमज होऊ शकत नाही का ??

म्हणजे दोन लोकं आहेत त्या पैकी एकाने काहीतरी सांगितले आणि दुसर्याने त्याचे स्पष्टीकरण देऊनही एकावर अति विश्वास आणि एकाला एकदम खाली पाडणे असे का करतो आपण. आणि एक वाईट बोलू लागला कि मागोमाग सगळेच्या सगळे री ओढतात … हा फार विचित्र प्रकार आहे माबो वर …. आणि खरच वाटावा तेवढा मोठा गुन्हा खरच त्यांनी केला नसेल तर एका चांगल्या लेखकाचा अपमान करतोय आपण आणि त्याने त्यांचे नाही आपलेच नुकसान होईल एका चांगल्या लेखकाच्या लिखाणाला मुकले जाऊ आपण

अहो मयी, आता काय म्हणू तुम्हाला! Proud

इथली चर्चा न वाचता म्हणताहात म्हणावं तर री ओढलेली दिसते आहे म्हणता, वाचली म्हणावं तर पानंच्या पानं मॅच होणं, स्क्रीनशॉट्स प्रताधिकाराच्या जपणुकीसाठी उडवले जाणं यातलं काहीतरी दिसलं असतं तुम्हाला.

मयी उशीरा आलात तुम्ही. कवठीचाफा यांनी स्क्रिनशॉट्स टाकले होते (जे उडाले प्रताधिकारभंग होतो म्हणून :अओ:)

स्पार्टाकस , मी ट्रॅप पूर्ण वाचली नव्हती. ४ भाग वाचले मात्र माझा वाचनाचा वेग, तुमच्या लिखाणाशी जुळत नसल्याने शेवटी नंतरच वाचू म्हणून थांबले. वेगाचे कारण समजले. अतिशय चुकीचे वागलात तुम्ही! चोरी पकडली गेल्यावर तरी प्रांजळपणे मान्य केले असतेत तर फार बरे झाले असते. Sad

स्क्रीनशॉट मला दिसले नाही … आणि चूक आहे असे मानले तसा पुरावा मिळाला तरी स्पार्टाकस तुम्ही चुकलात आणि हे आवडले नाही असे म्हणणे पुरेसे असते हो …. असे एकदम तुटून पडणे नको नको ते सल्ले देणे खालच्या स्तराला उतरून अपमान करणे वगैरे बघवत नाही. एवढे सीमेपलीकडे बोलण्याचा खरच अधिकार असतो का आपल्याला ?? आणि इतका काळ एखादा माणूस सोबत आहे आपल्या ...आपल्या लिखाणाला कधीतरी त्याने दाद दिलीय त्याच्या लिखाणाने काही काळ का होईना आपण सुखी झालो होतो हे सर्व सर्व एका धाग्यात विसरून जावे काय ??

Pages