गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेरफटका,

>> विनोद आवडला. (नथिंग अगेन्स्ट गा.पै.)

हाहाहा, माझ्या आत्ता लक्षात आला विनोद! आगोदर कळलाच नाही. तसाही मी बैलबुद्धीचाच आहे. मग गोवंशहत्याबंदी झाल्याने मला आनंदच होणार, नाहीका? Proud

माझं पैलवान नाव बदलून बैलवान ठेवतो. तोवर कुणीतरी मायबोलीची गायबोली करून ठेवा. मग जो क्रीडाविलास निर्माण होईल त्यातून मनोरंजन उत्पन्न करण्याची जबाबदारी माझी! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

या निमीत्ताने काही लिंक मिळाल्या. ज्यांना शेणखताविषयी वाचावेसे वाटते त्यांच्या साठी.

ह्या सर्व बातम्या इसकाळ वरच्या आहेत.

१) http://www.esakal.com/esakal/20111128/5575268901213121909.htm
शेणखत, गोमूत्राच्या फवारणीने बहरली पपई!

२) http://www.esakal.com/esakal/20100604/5361302605096250140.htm
वसमतमध्ये खत वाटपावरून दगडफेक

३) http://www.esakal.com/esakal/20110418/5718465749403040409.htm

रासायनिक खताचे भाव आता कंपन्या ठरविणार

४) http://www.esakal.com/esakal/20110326/5071068122246444617.htm
परभणी जिल्ह्याला 1.18 लाख टन खत मंजूर

५) http://www.esakal.com/esakal/20100423/4714955809225556316.htm
जिल्ह्यात डीएपी खताची चोवीस हजार पोती आवक

६) http://www.lokmat.com/storypage.php?catid=256&newsid=779904

लोकमत ची बातमी आणि माझा लेख यात फारसे अंतर नाही असे मला वाटते.

लोकमतवाले "शाकाहार मानविय आहार" वाले बिनडोक आहेत. यात कुणाचेही दुमत नाहिये.
चंद्रूभौ, ते गायी दत्तक घ्यायचं काय झालं? लै पैकं हायेत तुम्हापाशी. ४ गायी काहीच महाग नाहीत बघा तुम्हाला. घेऊन टाका चट्कन.

इब्लिस जी,

शाकाहाराचा आणि वरील लेखाचा काही संबंध नाही. मांसाहार करणारा प्रत्येक जण गोवंश खातोच असे नाही.

गा. पै., माझी पोस्ट खिलाडूवृत्तीने स्विकारल्याबद्दल धन्यवाद.

.

नितीनभौ ,

शेतकर्‍याला भाकड गायीच्या शेणाचे खत करण्याचा सल्ला देताय... त्याआधी तुमच्या स्वतःच्या विष्ठेपासुन सोनखत करुन त्यातुन तुमच्या बाल्कनीतील चार झाडे तरी जगवुन दाखवाल का ?

गायीच्या शेणापासुन खत करणे हा जर प्रॉफिटेबल पर्याय असता तर भाकड गायी कुणी विकल्याच नसत्या नै का ?

सातीजी, माझ्यामते 'हा निर्णय चांगला की वाईट ' असा नसून हा निर्णय म्हणजे शेतकर्‍यांवर आलेली साडेसाती आहे. Sad

गंगाधरजी धन्यवाद!
आमचे पण हेच मत आहे.
फक्तं घरची शेती असली तरी आमच्याकडे सध्या पशुधन नाही त्यामुळे आपण या विषयावर ऑथॉरिटीने डिस्कस करू शकत नाही याची जाणीव आहे.
उलट तुमच्यासारख्या शेतकर्‍यांनी, गोधन बाळगणार्‍यांनी यावर आपली मते इथे लिहावी अशी अपेक्षा आहे.

काउ
माबोवर तुमचं स्लाटर झालंच तर तिकडं आम्रविकेत बसलेलं वेमा करतील. त्यांना हा कायदा लागू नाहिये Wink

आँ ! कायदा लागू नसला तरीही हिंदुधर्मावरील जाज्वल्य प्रेमापोटी त्यान्नी मला मारायला नको नै का ?

त्यांचं हिंदू धर्मावर जाज्वल्य वगैरे प्रेम आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं? 10.gif

नितीनभौ ,

शेतकर्‍याला भाकड गायीच्या शेणाचे खत करण्याचा सल्ला देताय... त्याआधी तुमच्या स्वतःच्या विष्ठेपासुन सोनखत करुन त्यातुन तुमच्या बाल्कनीतील चार झाडे तरी जगवुन दाखवाल का ?

असला प्रश्न विचारणे म्हणजे मुद्दा संपल्याची लक्षणे आहेत. मुद्दा सोनखताचा नाही. शेणखताचा आहे. शेतकरी गुरे भाकड गुरे संभाळु शकत नाही म्हणुन विकतो. फुलझाडांना सोनखत घालत नाहीत. फुलझाडांना माशांपासुन बनवलेले खत घातले तर उत्तम वाढ होते.

तुमची मुद्दा न मिळाल्यामुळे जळफळ होत आहे. काळजी घ्या.

महत्वाचे म्हणजे तुमच्या सारख्या प्रतिक्रियेवर मी चिडत नाही. मुद्दा सोडु नका.

वरील लि़ंक तुम्हीच काय , इब्लीस काय किंवा गंगाधर मुटे काय यांनी वाचणे सोईस्कर टाळले आहे हे समजले. भाजप सेना शासनाला / मोदींना त्यांच्या निर्णयाला विरोध करणे आपले परम कर्तव्य आहे असे समजुन करत रहा.

माझ्या द्र्ष्टीने वरील लि़ंकवर आपली किंवा शेतकर्‍यांची काय मते आहेत हे समजल्याशिवाय मी आता प्रतिक्रिया देणे योग्य समजत नाही.

माणसाचे उदाहरण तुमच्या डोक्यात उजेड पडावा यासाठी दिले होते.

भाकड गायीपासुन शेणखत करुन त्यचा वापर करुन गायीची उपजिविका होइल इतपत चारा उगवु शकत नाही , हे तुम्हाला समजावे म्हणुन ते उदाहरण दिले होते.

पण हींदुत्वाच्या घाणीने तुमचे डोके भाकड झाले आहे. त्यामुळे तुमच्या ते लक्षात आले नाही.

निरुत्तर तुम्ही आ।हात , आम्ही नाही.

मुळात , गायीचे मांस खाणे हे जर धर्माविरुद्ध आहे. तर वासरासाठी निर्मिलेले दूध पिणे हाही गुन्हाच नाही का ?

भूतदया ही फक्त गायीलाच का ?

गाय ज्याना पूज्य आहे , ते भाकड गाय्रे घरी नेऊन पाळत का नाहीत ?

गायी सोडा , इतर प्राणी आनंदाने खा , असे तुमचा धर्म सांगतो का ?

८० % लोक म्हशीचे दुध पीत असताना म्हैस कापली तर हिंदुंना चालते , ती मात्र माय किंवा मावशी नाही आणि जिचं दुध फार कमी लोक पितात ती गाय मात्र सर्व हिंदुंची म्हणे माता ! हे काय गौड्बंगाल आहे ?

हे व इतर अनेक प्रश्न तुमच्याकडुन मुक्ती मिळवायला तडफडत आहेत.

गोवंश हत्त्या

* * *

गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यावरची ’साडेसाती’

केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारांनी एकापाठोपाठ एक शेतकरीविरोधी धोरणांची अंमलबजावणी सुरू केली. कांदा आणि बटाट्याला जीवनावश्यक वस्तू यादीत घातले, शेतकर्‍यांना आयुष्यातून उठवून देशोधडीस लावण्याची विकृत क्षमता असलेला भुसंपादन व अधिग्रहण कायदा दुरुस्ती केली आणि त्याच सोबत तब्बल १९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी लागू करून शेतकर्‍याला पूर्णत: नागडे करण्याचा चंगच बांधलेला दिसत असल्याने मोदी सरकार म्हणजे शेतकर्‍यांसाठी ’साडेसाती’ ठरू पाहत आहे.

गाय, बैल वा या प्रजातीतील गुरे आजारी किंवा वृद्ध झाल्याचे कारण करून कत्तल करण्यासाठी विकणाऱ्यांना व विकत घेणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय गोवंश हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे त्यामुळे आधीच आर्थिकस्थितीने घायकुतीस आलेल्या शेतकर्‍यांनी लेकराला चड्डी घेतली नाहीतरी चालेल पण भाकड जनावरांना पोसण्याचे व सांभाळण्याचे काम करावेच लागणार आहे. शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकर्‍याने घ्यायचे अशी व्यवस्था निर्माण होणार आहे.

गोवंश हत्या बंदी कायदा चांगला कि वाईट यापेक्षा शेतकर्‍यावर आणखी फ़ालतू खर्चाचा बोझा वाढणार आहे, हेच शेतकर्‍यांचे मुख्य दुखणे ठरणार आहे.

भाकड जनावरे पोसण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडू नये म्हणून सरकारने खालीलप्रमाणे तातडीने निर्णय घ्यावे;

१) सर्व भाकड जनावरे शेतकर्‍याकडून बाजारभावाने खरेदी करण्याची व्यवस्था करून गोप्रेमींकडे पालन-पोषण करण्यासाठी सुपूर्द करावीत.

२) भाकड जनावरांची शिरगीनती करून भाकड जनावरांना ’पेन्शन’ योजना सुरू करावी. तसे केल्यास भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडणार नाही.

सरकारने काहीही उपाययोजना न केल्यास शेतकरी भाकड जनावरे मोकाट सोडून देतील. या मोकाट जनावरांचा उपद्रव शेतशिवारासोबतच नागरी वस्तींनाही होईल. अशा मोकाट जनावरांची चारापाण्याची व्यवस्था न झाल्यास या जनावरांचे अन्नावाचून कुपोषण होऊन ते अल्पावधीच मृत्यूमुखी पडतील. किंवा अशी मोकाट जनावरे चोरूनलपून कत्तलखाण्यात पोचतील व कसाबांचा धंदा आणखी तेजीत येईल.

योग्य उपाययोजना न झाल्यास हा गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यासाठी आणि गोवंशासाठी ’साडेसाती’ ठरणार आहे, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

- गंगाधर मुटे
-----------------------------------------------

धन्यवाद मुटेजी.
म्हणजे या सरकारचे धोरण शेतकर्‍यांनाही शेतकरी विरोधी वाटते तर!
तुम्ही सूचविलेल्या दोन्ही उपाययोजना छान आहेत.
पण मूळात दूध देऊ न शकणार्या जनावरांचा मांस आणि कातड्यासाठी वापर करावा ही सोप्पी पद्धत असताना हा द्रविडी प्राणायाम करून करदात्यांच्या खिशावर भार का?
उद्या 'काऊ प्रोटेक्शन सेस' लागू झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.

गंगा स्वच्छ करणार
एका मिटींगचा खर्च म्हणे ४५ लाखावर होता. मग अश्या मिटींग साठी पैसे नको का? मग लावला सेस Wink भक्तांना काय श्रीमंती आहे. सर्विस टॅक्स १४% झाला आणि नंतर सेस लावल्यावर १६% काय फरक पडतोय. मोदीने केले ना मग बरोबरच असणार Rofl

हो हो
अतिरेक्यांना सोडले त्यांच्या पक्षाच्या काश्मिर सरकारने आणि इथे लोकसभेत विरोधकांना बोलत आहे मला राष्ट्रहित शिकवु नका म्हणुन. जावा त्या मुफ्तीला बोलुन दाखवा हे वाक्य.
फुकाची डायलॉगबाजी शिवाय काहीच येत नाही यांना

gohatya.jpg

जे घडतय ते अगदी योग्य घडतय.

लोकशाहीमधे निवडुन आलेल्या सरकारल आप्ल्या कल्पना आणता आल्याच पाहिजे. निवडुन देणार्यांना हेच तर अपेक्शित होते ना.

ishrat.jpg

Pages