गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र, गर्दीत राहून अरण्यरूदन म्हणजे काय ते तुम्हाला कळले असेलच.
अहो, तिकडे आफ्रिकेत वा न्युझिलण्ड/ऑस्ट्रेलियात वा अजुन कुठे सायबेरिया/अमेरिका/गल्फ कन्ट्रीज मधे उद्या जर नरमांस खाण्याची व्यापारी डिमांड होऊ लागली तर पैशे कमवायला या लोकांनी नरमांस निर्यात करण्याचेही योजले व तशी डिमांड/प्रॉफिट/अ‍ॅव्हेबिलिटीची आकडेवारी दिली, अन वर यामुळे भारतातील लोकसंख्याही काबूत राहिल अशी वर मल्लिनाथी केली तर मला तरी जराही नवल वाटणार नाही. Proud
अन तसेही मानवी अवयव निर्यात/अदलाबदल यांच्या रॅकेटस आत्ताच अस्तित्वात असल्याबद्दल न्युजपेपर/टीव्ही चॅनेल्सवर कधीमधी बघायला/ऐकायला मिळतेच आहे. तेव्हा गोमांस काय, नरमांस निर्यातीची स्वप्नेही बघु शकणार्‍यांचेही अस्तित्व आपल्याला मान्य करावे लागेल. काय? बरोबर ना?
याशिवाय, देशभरातिल सेक्सरॅकेटच्या जाळ्यात अडकणार्‍या फिमेलवर्गाला "फ्लेशमार्केट" म्हणुनच संबोधले जाते हे देखिल तुम्हाला विदीत असेलच.
आता इतकेच समजुन घ्या, की बुद्धिवादाच्या बुरख्या आड, वा बुद्धिवादाच्या गुंगीत मग्न, पण तरीही तद्दन ढोंगी लोकंच आपल्या समाजात संख्येने बहुसंख्य होऊ लागल्या आहेत. निदान, नेटविश्वात तरी तसे भासते आहे, वा तसे भासावे अशा प्रकारे वावर आहे.

लिंबूतिंबू, नेपाळमधल्या पशूंच्या हत्याकांडासाठी भारतातून जिवंत पशू निर्यात केले गेले होते. त्याविरुद्ध तुम्ही बोलल्याचे दिसलेले नाही.

>>> त्याविरुद्ध तुम्ही बोलल्याचे दिसलेले नाही. <<<
भरत, तुम्ही कधी आला होतात विचारायला?

लिंब्या , भारतातील सर्वात मोठे गोमांस निर्यातदार हिंदुच आहेत. उगाच इतरांच्या विरोधात बोंब कशाला ?

मुसलमान गाय खातात म्हणुन बोंबलताय.

तुमची लाडकी देवी तुळ * भवा* रोज एक शेळी खाते असे ऐकुन आहे. तिचं काय करणार आहात ?

मूळात गोहत्याबंदी कायदा महाराष्ट्रात १९७६ सालीच झाला होता. तेव्हा शंकरराव चव्हाण (काँग्रेस) हे मुख्यमंत्री होते!

त्या कायद्यात फक्त गायींचा समावेश होता.

सद्याच्या कायद्याने त्यात बैलांची भर पडली आहे, इतकेच. विशेष काहीही नाही!

थोडक्यात, ह्या कायद्याचा आणि धर्मा-बिर्माचा काहीही संबंध नाही.

बेगाने शादी में (दोन्ही बाजूंचे) अब्दुल्ले दिवाने!!!! Wink

नाचा, आम्ही पाहतोय!!! Happy

अब्दुल्लेच कां दिवाने ?? कुणी अप्पा का नाही?? मुसलमानांचे लांगुलचालन केल्याबद्दल सुनिल यांचा निषेध. Proud

थोडक्यात, ह्या कायद्याचा आणि धर्मा-बिर्माचा काहीही संबंध नाही.>> असं नका हो म्हणू, या धाग्याच्या मूळ गृहितकाला आणि या कायद्याने झालेल्या उन्मादालाच तुम्ही धक्का लावताय, नॉट फेअर.

आता काही दिवसानी कांदा लसूण च्या शेतीवर बंदी येइल. तामसी अन्न ना ते?>>>>

सोसायट्यांमध्ये Unofficially चालूच आहे आणि हे करणारेच कत्तलखाने उघडून बसलेत.

ह्या बाबतीत काही लोक नको इतके भावनाविवश होत आहेत असे वाटते. भाकड गाईंचे काय करायचे असे विचारले तर म्हणतात आईबाप म्हातारे झाले तर खाटकाला विकाल का? अशा प्रकारे एका पशुला माणसाच्या बरोबरीचा ठरवण्याचा प्रयत्न दयनीय आहे.
सावरकरांचे एक वाक्य आहे. गाईला देव मानणारे हे विसरत आहेत की आपण तसे केल्याने देवाला पशु म्हणजे माणसाच्याही खालचा बनवत आहोत.

१. गाय बाजारात विकत मिळते आणि विकता येते. आईबाप वगैरे नातेवाईक असे बाजारात विकत घेतात का? विकता येतात का?

२. गाईला मलमूत्र विसर्जन कुठे करावे ह्याचे भान नसते. नि:संकोच कुठेही उभ्या उभ्या ते विधी ते उरकतात. माणसे असे करतात का?

कितीही उपयुक्त असला तरी तो एक पशु आहे. ज्याला त्या पशुवर प्रेम करायचे आहे, तो भाकड झाल्यावरही आजन्म त्याची सेवा करायची आहे त्याला ती मुभा रहाणारच आहे. त्याकरता गोहत्याबंदीचा कायदा आवश्यक नाही. समजा गोहत्याबंदी नसती तर सरकारी अधिकारी येऊन जबरदस्ती करून भाकड गाय कत्तलखान्यात नेणार होते काय? आजिबात नाही. पण सर्व लोकांवर असा निर्बंध घालणे चूक आहे.
सावरकरांचा पराभव हा सावरकरांचे अनुयायीच करतात हा आजवरचा अनुभव पुन्हा एकदा येत आहे.

गा.पै. तुमचे पाय द्या. डोक्यावर ठेवतो.

अहो तुम्हाला भाकड, म्हातारी जनावरे एखादी वेत न होणारी गाय - म्हैस यातला फरक कळतो की नाही. का मायबोली फुकट आहे, साहेबाच्या देशात नेट जोरात आहे म्हणुन काहीपण लिहायचं? उद्या बैलाला वेतं होतात असली एखादी बातमीची लिंक द्याल मग शेतकर्‍यांनी काय बैल गर्भार राहयची वाट बघायची का?

टण्या,

>> अहो तुम्हाला भाकड, म्हातारी जनावरे एखादी वेत न होणारी गाय - म्हैस यातला फरक कळतो की नाही.

नाही कळंत. पण गाय वाचवावी या मताचे माझ्यापेक्षा जास्त माहीतगार लोकं आहेत.

आ.न.,
-गा.पै.

अवधूत,
गोवंशहत्याबंदी हे विधान घटनेच्या मसुद्यात घुसविण्याचा प्रयत्न करणार्या लोकांचे असे म्हणणे होते की भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकर्‍याचे हित हे देशाचे हित. (त्यावेळी लोकांच्या आजीविकेचा मुख्य मार्ग शेती हा होता)
शेतकर्याच्या उत्पन्नाचे दोन मार्ग म्हणजे शेतजमीन आणि गोधन (गाई, बैल, म्हशी इ.)
त्यामुळे शेतकर्‍याची जमीन विकली जाऊ नये/ शेती उद्वस्त होऊ नये याकरिता वेगवेगळे कायदे करण्यात आले. उदा. जमीन नॉनअ‍ॅग्रिकल्चरल करण्याचे कायदे, शेतकरी नसलेल्यांनी शेती करण्याचे कायदे, कमाल भूधारण कायदे इ.
आता जसे शेती वाचविण्याचे कायदे झाले तसे गोधन वाचविण्याचे कायदेही झाले.
पारंपारिकरित्या शेळ्या, मेंढ्या, बकर्‍या यांना सांभाळणारे लोक हे शेतकरी नसून भटके आणि विमुक्त असे धनगर इ. लोक होते.
त्यांचा विकास हा शेळ्या मेंढ्या मरण्यापासून्/खाण्यापासून वाचविण्यापेक्षा शेळ्यामेंढ्यांची पैदास कशी जास्त होईल आणि मांसासाठी ते विकणे कसे जास्त होईल यात होता. म्हणून शेळ्यामेंढ्यना विकू नये, मारू नये असा कायदा केला नाही.
आता त्यावेळच्या घटनासमितीतल्या लोकांना हे कायदे बनविण्याचा आग्रह करणारे लोक काही केवळ इतक्याच कारणासाठी हे कायदे करायला सांगत नव्हते. मुख्य कारण 'गोमाता आणि तिच्या पोटातले देव' हेच होते. मात्र एकदा हे केवळ 'हिंदुराष्ट्र' नाही असे ठरल्यावर केवळ धर्माच्या आधाराने कुठल्या प्राण्याच्या हत्येला बंदी घालणे शक्य झाले नसते.
हे लक्षात आल्याने विधेयकाचा आग्रह धरणार्यांनीही 'पॉलिटिकली करेक्ट' रहाण्याकरिता या विधेयकात कटाक्षाने धार्मिकता, पोटातले देव' असा शब्दप्रयोग न करता 'शेतकरी, दूग्धौत्पादन, गोधन' असे शब्दं वापरले.
त्यामुळे 'गोवंशरक्षा' हा शब्दं 'सार्वभौम, प्रजासत्ताक...' या मंत्राच्या ओळींत न येता देशाच्या दूरदृष्टीच्या यादीत (डिरेक्टिवज ऑफ कॉस्टिट्यूशन' मध्ये )गेले. ती जबाबदारी केंद्राने न घेता प्रत्येक राज्याने आपल्या भागातील लोकांचा मूड आणि धार्मिक कल पाहून 'गोहत्या/गोवंशहत्याबंदी' साठी प्रयत्न करावे असे ठरले.
बर्‍याच राज्यात या कायद्याच्या कक्षेत 'गाय, बैल, म्हैस, रेडे, '' असे सगळे येते. उदा. कर्नाटक.
तर काही राज्यात 'गायी' काहींत 'दूध देण्यास लायक नसलेल्या गायी' हे येते.
महाराष्ट्रात 'गायी' असा एकच क्लॉज होता जो बदलून आता 'गोवंश- बैल, वळू, गायी, वासरे' असा समावेशक करण्यात आलाय.

एकदा कायदा बनवून झाला की तो 'वेगळाच प्राणी' Wink होतो.
त्याबद्दल मग काही व्यावहारिक अर्ग्यूमेंट करण्यापेक्षा त्याच्या कलमा पोटकलमांचा कीस पाडत अर्ग्यूमेंट करावे लागते.
त्यामुळे शेळ्या मेंढ्या कोंबड्या काही या कायद्यात बसणार नाहीत.
Happy

बाकी , पोटासाठी देशही सोडलेल्या लब्बाड पैलवानाला इथल्या भाकड गायी कशा जगतील याची काळ्जी लागलीहे हे पाहुन माझा हिंदु आत्मा गलबलला

गोवंश हत्याबंदीचा सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आहे.दूरगामी विचार करता शेवटी ह्या निर्णयाचा फायदा न होता तोटाच दिसून येईल.
सरकार्नुसार हा कायदा कृषीशी संबंधित आहे त्यामुळे रासायनिक खातांना आळा बसून शेणखत वापरात येवू शकेल.त्यामुळे उत्पादनातही वाढ होईल.....परंतु सरकारचे हे म्हणणे चूक आहे गाय बैल नि शेतजमीन ह्यांचे प्रमाण व्यस्त आहे एवढ्या जमिनीला खात पुरवठा होणे कदापि शक्य नाही. शेतकरी हा आपली चांगली जनावरे कधीच विकत नाही फक्त भाकड जनावरेच विकतो . ज्यावेळी दुष्काळ पडतो जनावरांच्या चारा पाण्यासाठी काहीही आसरा नसतो अशावेळी तो जनावरे नाईलाजाने विकतो . भाकड जनावरे पोसणे हे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. सरकार कायदा करून मोकळे झालेय पण ह्या भाकड जनावरांना पोसणार कोण/? सरकारने ह्या कायद्याबरोबरच ह्या जनावरांची व्यवस्था लावावी ज्या संघटनांनी हि मागणी केली होती त्यांच्यावर ह्या भाकड गायी पोसण्याची जबाबदारी देण्यात यावी अथवा समर्थक जनतेच्या पगारातून वा व्यवसायातून ठराविक रक्कम दरमहा कापून घेण्यात यावी.शेतकऱ्यांवर फुकाचा भार कशाला.भाकड जनावरांची जी कत्तल केली जाते त्यांचे मास विकले जाते त्यावर कित्येन्कांचे जीवन अवलंबून असते. त्याचप्रमाणे अनेकांच्या मासाहारावर कुर्हाड कोसळणार आहे .कोंबडी, बकरे ह्यांच्या मासापेक्षा गाय बैलाचे मास स्वस्त असल्याने ते गरिबांचे अन्न झाले आहे. परंतु त्यावर बंदी आल्याने इतर मासांचे भाव आता वाढतील . त्याबरोबरच भाकड जनावरांची संख्याही भरमसाठ वाढणार आहे . त्यामुळे ते शेतातली पिके खावून किंवा त्यांची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान करतील ते वेगळेच .

ज्यांना मासाहार वर्ज्य असेल त्यांनी खावू नये परंतु जे खातात त्यांच्यावर बंधन कशाला. केवळ कायदा करून भागणार नाही तर त्याच्या परीणामाचाही विचार केला पाहिजे.

सचिनजी,

सरकार्नुसार हा कायदा कृषीशी संबंधित आहे त्यामुळे रासायनिक खातांना आळा बसून शेणखत वापरात येवू शकेल.त्यामुळे उत्पादनातही वाढ होईल.....परंतु सरकारचे हे म्हणणे चूक आहे गाय बैल नि शेतजमीन ह्यांचे प्रमाण व्यस्त आहे एवढ्या जमिनीला खात पुरवठा होणे कदापि शक्य नाही.

ज्याच्या कडे १-२ एकर जमीन आहे आणि जो जिरायती शेती करतो. ज्याच्या घरात/शेतीत कडबा तयार होतो जो वर्षभर दुभत्या जनावरांना पुरतो तसेच भाकड जनावरांना पुरतो. ज्याच्या कडे गोबर गॅस सयंत्र आहे तसेच गोबर गॅस मधुन निघालेल्या कचर्‍याचे खत कसे करायचे याचे तंत्र त्याला ठाऊक आहे. अश्या शेतकर्‍याच्या संदर्भातली ही विधाने आहेत.

ज्याच्या कडे भरपुर शेती आणि सिंचन आहे. ज्याच्या कडे घास/ ओला चारा जनावरांसाठी कायमच पिकवला जातो अश्या शेतकर्‍यांना २-४ भाकड जनावरे सांभाळणे आणि त्यांच्या शेणाचा उपयोग करुन घेणे बिलकुल अशक्य नसावे.

४ किलो शेण ९६ किलो माती याच्या सहायाने उत्तम दाणेदार शेणखत बनविण्याचा प्रयोग मी पाहिला आहे. हे शेण शेतीत वापरुन रासायनिक खताने नापि़क झालेल्या जमिनीचा स्तर सुधारल्याचे सुध्दा पाहिले आहे.

मला वाटते मायबोलीवर चर्चा करणारे आपण श्री गंगाधर मुटे व इतर २-४ लोक सोडता कोणी शेतकरी नाही ( मी सुध्दा ) यावर त्याचे नेमके मत अपेक्षीत आहे.

ओके

नितीनचंदजी, सध्या संमेलनाच्या आवराआवरीत व्यस्त आणि त्रस्त आहे.
आठवडाभरानंतर अवश्य चर्चा करू.

सध्या एक कविता :

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!

- गंगाधर मुटे ‘अभय’
---------------------------------------------------------

आमच्या गावात हौशीने गोवंशपालन करू पहाणार्‍या काही मारवाड्यांची गम्मत आठवली.

चंद्रूभौ, तुम्ही घेऊनच टाका चार-दोन भाकड गाई दत्तक.

<तुम्ही घेऊनच टाका चार-दोन भाकड गाई दत्तक.>
काय राव काहीही बोलताय... शिवाजी महाराज आमच्या घरात नको ज्ञ्मायला , ते तिकड पलिकडे.
घर पण नाहीतर २-४ गाव सोडुन पलिकडच्या गावात जन्मु देत.

<ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.>

ही अमुल्य माहीती दिल्याबद्दल हा ऐक अति श्रीमंत / नालायक शेतकरी आपले आभार मानतो.

अवकाळीन परत सगळ भुईसपाट झालय. सलग तिसर्‍या हंगामात शेतातुन काहीही मिळाल नाहीये. पण खर्च तर झालाय. कोणी आहे का भुमी अधिग्रहण करायला तयार. देईन म्हण्तोय आता शेती.

अहो गंगाधरजी,
चर्चा सविस्तर करू, पण तुमच्यामते 'हा निर्णय चांगला की वाईट '
एवढंच ओपिनियन लिहून जा की पटकन.
मायबोलीवर जे काही शेतकर्‍यांचे प्रतिनिधी आहेत त्यात तुम्ही एक आहात.

Pages