Submitted by dr.sunil_ahirrao on 4 March, 2015 - 23:46
खोल मी आहे किती पाहून घेतो
मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो
सावल्यांनी पोळलो आहे इथे मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो
बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो
मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो
तू किती भिनलीस माझ्या आत राणी-
ते तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो
डॉ.सुनील अहिरराव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
बेगडी आहे तुझी दुनियाच
बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो <<< छान
@नवाच एक कुणीतरी @बेफिकीर ,
@नवाच एक कुणीतरी @बेफिकीर , धन्यवाद सरजी !
सावल्यांनी पोळलो आहे इथे
सावल्यांनी पोळलो आहे इथे मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो>>>>> कोवळेसे ऊनहि फुंकून घेतो असे लिहिले तर जास्त अर्थपुर्ण वाटेल बहुतेक.
मधुराजी , आपली सुचवलेला बदल
मधुराजी , आपली सुचवलेला बदल नक्कीच छान आहे. खूप खूप आभार.
सावल्यांनी पोळलो आहे इथे मी
सावल्यांनी पोळलो आहे इथे मी >>>>>
सुरेख !!