Submitted by बेफ़िकीर on 2 March, 2015 - 10:32
गझल - बोलण्यासारखे खूप आहे तसे
बोलण्यासारखे खूप आहे तसे
पण जिथे पाहतो त्यातिथे आरसे
एकही वाट चोखाळलेली नसे
आणि प्रत्येक वाटेत माझे ठसे
सत्य इतिहास ऐकायला ये कधी
तूर्त बसलेत सार्या पिढ्यांचे घसे
अस्मिता फक्त ही बाळगावीस तू
की तुझेही पुढे व्हायचे कोळसे
पिंजरे पाहुनी काय हसतोस तू
वाघ होते कधी आजचे हे ससे
जन्म ही मी तुझा व्हायची प्रक्रिया
ही तुझी साहसे, ही तुझी धाडसे
तू झगडलास ह्या जीवनी एकटा
मात्र गाजून गेले तुझे वारसे
मायबापांमुळे नांव मिळते कुठे
जीव गेल्यावरी जग करे बारसे
जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे
याचसाठी तखल्लूस हे घेतले
भेटली सर्वदा 'बेफिकिर' माणसे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गझल सुंदर आणि सहज आहे. काही
गझल सुंदर आणि सहज आहे.
काही शेर झटकन समजले नाहीत.
>>मायबापांमुळे नांव मिळते कुठे
जीव गेल्यावरी जग करे बारसे >> हा आणि शेवटचा शेर सॉलिड आवडले.
अत्यंत आवडली... अफाट आवडली...
अत्यंत आवडली... अफाट आवडली... अख्खी आवडलीये
सुंदर! प्रत्येक द्वीपदी चपखल!
सुंदर! प्रत्येक द्वीपदी चपखल!
अस्मिता फक्त ही बाळगावीस
अस्मिता फक्त ही बाळगावीस तू
की तुझेही पुढे व्हायचे कोळसे
व्वा व्वा.
एक-दोन ठिकाणी शब्द पुढे-मागे झाले असते तर शेर सुलभ झाले असते, असे वाटले.
एकूणच गझल आवडली.
प्रत्येक द्वीपदी अप्रतिम..!
प्रत्येक द्वीपदी अप्रतिम..!
अनेक शेर खूप आवडले जन्म ही
अनेक शेर खूप आवडले
जन्म ही मी तुझा व्हायची प्रक्रिया
ही तुझी साहसे, ही तुझी धाडसे<<<सर्वात वेगळा वाटला पण नीट समजला नाही
कोळसे--वाह वा आवडली गझल
कोळसे--वाह वा
आवडली गझल
वा वा.. मायबापांमुळे नांव
वा वा..
मायबापांमुळे नांव मिळते कुठे
जीव गेल्यावरी जग करे बारसे.. व्वाह..
जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे........ क्या ब्बात है !!
जन्मलेली नसूदेत ती आजवर नीट
जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे
व्वाह!!!!!
बारसे आणि वारसे खुपच
बारसे आणि वारसे खुपच आवडले..... बाकि रचना अप्रतिम आहे यात शंकाच नाही...
जन्मलेली नसूदेत ती आजवर नीट
जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे (Y)
फार सुरेख आवडली
फार सुरेख
आवडली
एकही वाट चोखाळलेली नसे आणि
एकही वाट चोखाळलेली नसे
आणि प्रत्येक वाटेत माझे ठसे << वा वा ..
जन्मलेली नसूदेत ती आजवर
नीट सांभाळ माझी तुझी पाडसे
याचसाठी तखल्लूस हे घेतले
भेटली सर्वदा 'बेफिकिर' माणसे
शेर आवडले.
मस्त गझल.
आवडली गझल ..
आवडली गझल ..