ओरलँन्डो

Submitted by इनोची on 23 February, 2015 - 16:29

मी मार्च मध्ये ओरलँन्डेला माझ्या आई व ३.६ वर्षाच्या मुलीसोबत जात आहे . नेट वर माहिती शोधत आहेच पण कोणाकडुन कळाली तर बर होईल कुठल्या थिम पार्कस मुलीसाठि सुटेबल आहेत . तसेच चांगली हॉटेल्स रहाण्यासाठि व भारतीय जेवणासाठि कळाली तर बरे होईल . मी ईथे शोधले परंतु एकच पोस्ट सापड़ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती दिवस जाणार आहात ? आणि कुठून ? म्हणजे भारतातून ट्रीपसाठी येत आहात की अमेरिकेतल्या अमेरिकेत ?

छोट्या मुलीच्या दृष्टीने मी डिस्नी ची चारही पार्क्स रेकमेन्ड करेन.
जवळचे हॉटेल बघा. डिस्ने च्या रिसोर्ट मधे रहाता आलं तर बेस्ट! पार्क मधे फिरुन मुले दमतात. काही वेळा जरा वेळ नॅप काढून मग परत पार्क मधे गेले तर बरे पडते. रहायला भरपूर ऑप्शन्स आहेत.
खास करून मुलींसाठी हे नक्की बघा : https://disneyworld.disney.go.com/events-tours/magic-kingdom/bibbidi-bob... मुलींचा प्रिन्सेस मेक ओव्हर ! फार सुंदर करतात ते लोक. पण आत्ता अगदी आज कॉल केले तर अपॉइन्टमेन्ट मिळेलही कदाचित. या सलोन च्या अपॉइन्टमेन्ट्स आणि ब्रेकफास्ट विथ कॅरेक्टर्स हे फार आधी बुक होतात. मोस्टली २-३ महिने आधी बुक करतात लोक.
मॅजिक किंगडम मधे जास्त वेळ घालवावा लागतो कारण मुलींना त्या सगळ्या प्प्रिन्सेसेस ना, टिंकर फेरीज , एरियल वगैरे ना भेटायचे असते. प्रत्येक प्रिन्सेस साठी वेगळी लाइन असते! पण त्या भेटल्यावर मुलींचा आनंद प्राइसलेस असतो Happy बर्‍याच मुली ऑटोग्राफ बुक घेऊन जातात तिथे !
एकुणात खिश्याला मजबूत चाट असते छोट्या मुलींना घेऊन जाणे म्हणजे !! मजा येते पण.

सलोन च्या अपॉइन्टमेन्ट्स आणि ब्रेकफास्ट विथ कॅरेक्टर्स >>> या नक्की घ्या. आम्ही सलोनची नव्हती घेतली पण ब्रेफा विथ कॅरेक्टर्स फार आवडलं होतं मुलाला. तिथला ब्रेफा बफे खूप मस्त होता हा बोनस Happy

अतीअवांतर- तुमची आई आहे सोबत तर सी-सॉल्टची एक बॅग नक्की जवळ ठेवा. संध्याकाळी कोमट पाण्यात हे मीठ टाकून पाय शेकले तर तळपायदुखीचा त्रास होत नाही. खरं तर सगळ्यांनीच पाय शेकावेत कारण दिवसभर या ना त्या रांगेत उभं रहावं लागतं आणि चालावं लागतंच.

सगळ लिहुन ठेवत आहे Happy धन्यवाद भारतीय जेवणाचे काय जवळ आहेत का ? आईला पथ्य असल्याने डोसा वगैरे पदार्थच खाऊ शकते सिंडरेला माझी आई ७५ वर्षाची आहे त्यामुळे व्हिलचेअर हे एकच ओप्शन आहे मला

हॉटेल बुकिंग झाले आहे का? बरेचदा हॉटेलवाले पार्कपर्यंत जाण्याची सोय करतात (बस असते). हॉटेलचे बुकिंग करताना गुगल मॅप्समध्ये पत्ता टाकून आजूबाजूला indian restaurant आहे का ते बघा. जर suite असेल आणि मायक्रोवेव्ह असेल तर काही ready to eat meals नेऊ शकाल. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो (http://www.tripadvisor.com/Hotel_Review-g34515-d87774-Reviews-StaySky_Su...) त्याला kitchenette होतं (पण आम्ही बाहेरच हादडलं!).तिथून जवळ एक indian restaurant पण होतं.
ह्या पार्क्समध्ये पायाचे तुकडे पडतात हे मात्र खरं आहे! काही ठिकाणी वयस्कर व्यक्ती बरोबर असेल तर वेगळी रांग असते (जी छोटी असते) असे असेल तर बघा मग तुम्हाला खूप काळ रांगेत उभं राहावं लागणार नाही.

पार्क मध्ये दोन ठिकाणी व्हील चेअर मिळते. अगदी सुरूवातीला जेथे तिकिटे घेता तिथल्या जवळच्या दुकानातच मिळेल. ती घेऊनच मग बोटीतून मॅजिक किंगडमला जाता येते. सगळीकडे व्हीलचेअर साठी वेगळे रॅम्प आहेत त्यामुळे काही काळजी नाही. इतकी ढकलायची नसेल तर मोटराईज्ड पण मिळते. त्यांच्या वेबसाईट वर सगळी माहिती आहे आणि कुठे मिळेल त्याचा मॅप पण आहे. काही फार जास्ती रेंट पण नाही.

जर सेलेब्रेशन जवळ राहिलात तर तिथे एक दोन भारतीय रेस्टॉरंट आहेत. किसीमी जवळ बहुतेक जास्ती आहेत पण मग पार्क मध्ये येताना जरा ड्राईव्ह करावे लागेल. आम्ही ऑरबीट वन व्हेकेशन विला मध्ये ऑक्टोबर मध्ये राहिलो.
तिथे एक किंग साईज बेड रूम आणि एक चिल्ड्रन्स रूम अशा दोन रूम्स, किचन, हॉल असे सगळे होते. त्यामुळे पूर्ण फॅमिलीला एकत्र रहाता आले आणि मग ब्रेकफास्ट आणि डिनर तिथेच करता आले. ब्रेड दूध घेऊन आलो की जवळ भात मिळाला तरी जेवण पूर्ण होते.

त्यांची लिन्क देतो:
https://www.diamondresortsandhotels.com/Resorts/Orbit-One-Vacation-Villa...

तसेच जर तिकिटे आत्ता काढली तर काही राईड्स ना फस्ट पास घेता येईल.

इनोची, बरोबर लहान मूल आणि वृध्द व्यक्ती असल्यामुळे तुम्हाला खूप अँबिशिअस प्लॅन्स करता येणार नाहीत. ३ दिवसात फारतर २ पार्क्स करा असं सुचवेन. मुलीचं वय बघता मॅजिक किंगडम आणि अ‍ॅनिमल किंगडम बेस्ट आहेत.

तुम्ही कार रेंट करणार असाल तर किस्सिमी भागात २ बेडरूम्सचं घर मिळू शकेल. व्यवस्थीत खाणं-पिणं करता येईल असं सगळ्या सोयींसह किचन आहे. कपडे धुवायला वॉशर्-ड्रायर, स्वच्छ टॉवेल्स, उश्या-चादरी अशा हॉटेलसारख्या सोयी आहेत. इथली पब्लिक्स (Publix) ग्रोसरी चेन उत्तम आहे. भारतीय दुकानंपण जवळपास आहेत. रेडी मिक्स वापरून ब्रेकफास्ट, देशी हॉटेलातलं पॅक केलेलं लंच्-डिनर सोपं पडेल. पण या सगळ्यासाठी हाताशी कार आवश्यक आहे.

ती घ्यायची नसेलतरमात्र नक्कीच डिस्नेच्या रिसॉर्टमध्ये रहा. त्यांच्या बसेस, पार्कात सगळ्यांपेक्षा तासभर आधी प्रवेश सोयीचं पडतं. मल्टिपल एंट्री पासमुळे दुपारी बस घेऊन रिसॉर्टला आलं, आराम केला की पुन्हा रात्री फायरवर्क्स्पर्यंत थांबता येतं.

थोड्याफार कोरड्या आणि इंडियन ग्रोसरीजसाठी टॅक्सी केलीत तर एकाच खेपेत सामान आणून ठेवता येईल.

सकाळी एकदा पार्कच्या आत गेलं की बाहेर येऊन भारतीय हॉटेल शोधुन खायचे हे जमणे अवघड. आत खायला मिळते पण ते कितपत चालेल याची शंका आहे. आदल्या दिवशी भारतीय हॉटेलातुन घेतलेले वेजी पराठे वगैरे गुंडाळुन नेलेत तर नेऊ देतील. जेष्ठांना special diet आहे हे सांगायचे, नाहीतर फार जास्त अन्न नेऊ देत नाहीत. फळे वगैरे (फार जड नको) चालतील नेलेली. बाहेर लॉकर असतात पण पुन्हा तिथवर चालत यायचे हे पण अवघड होउ शकते इतके आपण पार्कच्या आतवर पोचलेले असु शकतो. त्यापेक्षा फॉईलमधे गुंडाळून खुर्चीत पिशवी ठेऊन नेणे सोपे.
पार्क भयंकर मोठी, भरपुर राईड्स असतात, गर्दी असते.. त्यामुळे एका दिवसात पार्क पाहुन पुर्ण होत नसते तेव्हा जमल्यास आधीच लहान मुलांन योग्य अशा राईड्स शोधुन ठेवली तर बरे पडेल. चालायला फार लागते पण मजा येते.
वरची २च पार्क करावीत याला अनुमोदन.

ट्राय saratoga springs resort and spa

इथे राहिलो होतो.. प्राईस् इन्क्लुडेड रूम, ब्रेकफास्ट्,लंच, डिनर प्लस दोन स्नॅक्स @ टी टाईम.. ( या रिसॉर्ट च्या कूपन्स वर पार्क मधील कोणत्याही इतर रिसॉर्ट्स मधे कोणतेही मील्स फ्री घेता येत होते)

सर्व राईड्स फ्री, एंट्री टू पार्क ( कितीही वेळा) फ्री.. प्लस पाण्याच्या बाटल्या दिवसभर फ्री कुठेही या रिसॉर्ट्स ची कूपन्स दाखवून घेता येत होत्या..

आय थिंक सात दिवसाकरता २००० यूएस $ पर पर्सन भरले होते.. चार वर्षांपूर्वी.. बट वॉज वर्थ इट!!!

इथे जरा अडचण होऊ शकते . स्ट्रोलर घेतला तर तोही ढकलंणं आलं ! मग आईंना व्हीलचेअरला कोण हेल्प करेल!

२ पार्क करण्याला अनुमोदन. मॅजिक किंगडम आणि अ‍ॅनिमल किंगडम उत्तम आहेत. मुलगी आणि आजीही एंजॉय करतील. एपकॉट चांगले आहे (पण वेळ असेल तर). नाहीतर Downtown Disney ही फेरफटका मारण्याच्या उद्देशाने उत्तम! शक्यतो Disney Resorts मधेच राहा. मुलीसाठी स्ट्रोलर घ्याच कारण चालून चालून आणि रांगेत वाट पाहात बरेच दमायला होते. आईंसाठी व्हीलचेअर ऑटोमटिक मिळते का ते बघा, म्हणजे त्या स्वतः operate करू शकतील. भारतीय जेवण पार्कमधे कुठे मिळणार नाही त्यामुळे त्याला पर्याय काही आहेत का ते बघा.

मै, मी स्ट्रोलरची आयडीया आईची ऑटोव्हील गृहित धरुनच लिहीली. कारण दिवसभर आईची व्हीलचेअर ढकलणे, ३ वर्षाची मुलगी, आणि लागणारा सरंजाम कॅरी करणे --- बाप रे! बिग नो, नो.

तेव्हा ऑटोव्हील मस्ट आहे, माझ्या मते.

तीन दिवस असतिल तर दोनच पार्क करा. शक्यतो disney मध्येच रहा. सकाळी ९-१० पर्यन्त राईड ला गर्दी कमी असते आणि रात्री १०ला फायर वर्क असते. त्यामुळे जवळच राहिल्यास दुपारी २ तास विश्रांती घेता येईल.

तिकिटे लवकर काढुन fastpass काढणे. ( disney चा apple/anrdoid app download करावा लागेल. ) शेवटच्या घटकेला गर्दीच्या राईडचा fastpass मिळत नाही.

.

धन्यवाद सगळ्यांना . आई व मुलगी असल्याने आम्हि फत्त मँजिक किंगडमच करणार आहोत वेळ उरला तर बघु फ्लोरिडा रेसिडंट असल्याने परत जाता येईलच .. कुठल्या स्पेसिफिक राईडस आठवत आहेततका कुणाला छोट्या मुलांसाठि ?

एप्रिलमध्ये जाण्याचा प्लॅन आहे. माझा मुलगा वय पाच वर्षे, भाचा वय अकरा वर्षे. तिन रात्री, चार दिवस. दोघांना आवडतील असे कोणते पार्क्स निवडु? प्लीज मार्गदर्शन करा.

इनोची - लहान मुलगी आणि वृद्ध आई - या दोघींना घेऊन तुम्ही एकट्याच येणार आहात का? साडेतीन वर्षांच्या मुलीला तिथे stroller हवाच, आई चालू शकत नसतील व त्यांना auto wheel नसेल तर जमण्यासारखे नाही.

नुसते magic kingdom फिरण्यातच २ दिवस जातील. मार्च १३ - २८ च्या मध्ये येत असाल तर spring break मुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी पण असेल. magic च्या बहुतेक सगळ्या ride मुलीला आवडतील.

खाण्यासाठी - indian अगदी जवळपास नाही पण जरा drive केले तर i -drive आणि १०-१५ मैलात बरेच options आहेत. नाहीतर सगळ्यात जवळ
Disney Downtown ला Earl of Sandwiches आहे तिथे tomato soup आणि sandwich सर्व देशी लोकांना पण आवडते असा माझा अनुभव आहे.
तसेच आजकाल indian quick जेवण समोसा वगैरेचा फूड truck असतो downtown disney ला. तसेच Ghirardelli च्या एका ice-cream मध्ये पण लोक गार होतात.
AAA discounted tickets घेऊ शकता. शक्यतो hotel पासून shuttle घ्या drive करण्यापेक्षा, जास्त सोयीचे होईल, parking पण $१५ वगैरे असतेच आणि जास्त चालावे लागते.

राया - Epcot आणि Universal चे एक पार्क \ seaworld करू शकता. ५ वर्षाच्या मुलाला universal च्या काही rides ला उंची कमी पडू शकेल पण ११ च्या मुलाला ते फारच आवडेल. Epcot साधारण सगळ्याना आवडेल. KSC किंवा seaworld - busch gardens combo पण करू शकता.

राया :- magic kingdom is must. बाकी तुम्ही कुठलेही पार्क निवडु शकता. ( seaworld \ universal \ lego) . लेगो ५० मैल लांब आहे आणि थोडे आभाळ आले तरी पार्क सुरक्षेकरिता बंद करतात. बाकी दुसर्या पार्क साठी काहीच problem नाही.

magic kingdom सकाळी ९ ते रात्री ११ पर्यन्त उघडे असते. सकाळी राईड ला गर्दी कमी असते म्हणुन आणि रात्री फटाक्याची आति शबाजी म्हणुन पुर्ण दिवस पार्क मध्ये जातो . सकाळी ८.४५ ते १० पर्यन्त ५-१० मिनिटे रांग असते. नंतर रांग वाढत जाउन, दुपारी २ नंतर प्रत्येक राईड्ला तासभर रांगेत थांबावे लागते. (average time. सिझन ला popular ride साठी ४ ते ५ तास थांबाव लागु शकते.) नंतर रात्री ९.३० ला परेड आणि १०.३० ला आतिश्बाजी हे दोन्ही कार्यक्रम are must . जर सकाळ ते रात्री पर्यन्त पार्क मध्ये राहिलो तर दुसर्या दिवशी पार्क करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही दोनच पार्क करु शकता.
अर्धा दिवस downtown disney, orlando town मध्ये फिरु शकता.

टिन एजर मुलांसाठी कोणते पार्क्स निवडु? प्लीज मार्गदर्शन करा. दोन पार्क्स करायची आहेत. त्यात Kennedy Space Center नक्कीच करणार Typhoon Lagoon वा Blizzard Beach यातले कोणते तरी एक करावे का? धन्यवाद.

मी येत्या स्प्रिनंग ब्रेकमध्ये डिस्नीवारी करणार आहे. रिसॉर्ट मध्येच राहणार आहे. बुकिंग झालं आहे त्यात आम्हाला ३ दिवसांची पार्क तिकिटं इंक्लूडेड आहेत. सध्या तरी मॅजिक किंगडम, एपकॉट & अ‍ॅनिमल किंगडम करावं असं म्हणते आहे. हीच ३ महत्वाची आहेत ना?

आम्हाला मॅजिक बँड घ्यायचे आहेत. फास्ट पास पण म्हणे फक्त ३ राइड्स साठी वापरता येतात दर पार्क्मध्ये. कोणत्या राइड्स साठी घेउ मग फास्ट्पासेस?
MyDisneyExperience.com वर जाउन सर्व करायचे आहे .

युनिवर्सल ची सिस्टिम त्यामानाने सोपी वाटते आहे. रिसॉर्ट्मध्ये बुकिंग झालं की बाकी काही कट्कट नाही रूम कीच फास्ट्पास म्हणून वापरायची.

माझ्या असं लक्षात आलं की डिस्नी & युनिवर्सल इथे काही डील्/कूपन्स वैगेरे पॉसिबल नाही. मी त्यांच्याच वेब्साइट वरून बुकिंग्स केली.

रिसॉर्ट्मध्ये राहाणं सोयीचं आहे. एक तास आधी पर्क्स ओपन होतात शिवाय हॉटेल्स टू/फ्रॉम पार्क राइड्स असतात, त्यामुळे कार रेंट करावे लागत नाही. एयरपोर्ट पिकप्/ड्रॉपऑफ पण असतं.

माझ्या असं लक्षात आलं की डिस्नी & युनिवर्सल इथे काही डील्/कूपन्स वैगेरे पॉसिबल नाही. >> +१.

फास्ट पास पण म्हणे फक्त ३ राइड्स साठी वापरता येतात >> एका वेळी एकाच राईड साठी नि एकाच शोव साठी वापरता येतात. दर वेळी एकदा वापरला कि परत कधी वापरता येतो ह्याची वेळ कळते. फास्ट पासेस च्या काही ट्रिक्स आहेत, GTG ह्या वेळेस सांगेन. आठवण कर.

सध्या तरी मॅजिक किंगडम, एपकॉट & अ‍ॅनिमल किंगडम करावं असं म्हणते आहे. हीच ३ महत्वाची आहेत ना? >> मह्त्वाची कुठली हे तुझ्या बरोबरच्यांच्या वयावर अवलंबून आहे. लगे हाथ चारी कर असे मी सुचवेन.

डायनिंग प्लॅन्स घ्यावे की नाहीत? >> एकदा घेतलेले नि एकदा नाही. दोन्ही मधे पश्चात्ताप झाला नाही. पार्कमधेही भरपूर प्रकारचे options असतात.

ओक्के असामी. एनिवे, कार रेंट करणार नाही त्यामुळे जे काय जेवायखायचे आहे ते पार्क्स आणि रिसॉर्ट मध्येच, डायनिंग प्लॅन जर पैसे सिग्निफिकंट्ली वाचणार असतील तर्च घेण्यात काही अर्थ आहे.

तसही डिस्नी/युनिवर्सल ही ट्रीप हे एक मेजर फिनानशियल अंडरटेकिंग असल्याने ४०-५० डॉलर वाचवण्याला काही अर्थ नाही हे पण आहेच.

मॅजिक किंगडम तुझ्या लेकींना बोअर होइल.

डायनिंग प्लॅन्स >>> आम्ही नव्हते घेतले आणि ते बरंच झालं. पार्कमध्ये भरपूर पर्याय होते. सकाळी पोटभर ब्रेफा करून निघा मात्र.

डिस्नी राइड्ससाठी एक धागा पग्यानं काढला होता तो बघ.

http://www.maayboli.com/node/53702 तुम भी क्या याद करोगे Wink

डायनिंग प्लॅन जर पैसे सिग्निफिकंट्ली वाचणार असतील >> आता ते तुम्ही किती खाऊ शकता ह्यावर अवलंबून आहे Lol

अरे तो धागा वाचला मी इथे पोस्ट करण्यापूर्वी सिंडे पण मै ची पोस्ट वाचून भ्या वाटतय Wink

असामी Happy नाही घेणार मी डायनिंग प्लॅन्स.

मी आत्ता जाऊन बघितले मी कोणते स्केअरी पोस्ट लिहिले होते ते Happy तसल्या भीषण रोलर कोस्टर राइड्स नाहीयेत पण डिस्नेत. (किंवा आम्ही केल्या नसाव्यात ) हॉलिवुड स्टुडिओज मधली ती एलेवेटर वाली राइड आवडली होती मला. फार स्केअरी आणि एक्सट्रीम नाहीये.

डिस्नी रिसॉर्ट मध्ये रहाणे best. हॉटेल्स टू/फ्रॉम पार्क राइड्स सारख्या असतात.
Dining plan आम्ही घेतला नव्हता. काही अडचण आली नाही.

फास्ट पासेस ३च book करता येतात. ते संपले की पार्कमधून पुन्हा एक एक book करता येतात.

मला Hollywood Studios पण खूप आवडले होते. ते तुझ्या list मध्ये दिसत नाही. तिथला रात्रीचा show फारच सुरेख होता.

मॅजिक किंगडम लहान मुलांसाठी असले तरी तिथल्या वातावरणाची वेगळीच मज्जा आहे. Frozen live show best.

प्रत्येक पार्क मध्ये (Disney or Universal) रात्री special shows असतात ते चुकवायचे नाहीत.

Rides wise मला Universal जास्त आवडले. Harry Potter Rides are one of my most favourites. बाकी mummy ride, jurassic park, Ripsaw Falls आवडलेल्या.

Disney मध्ये Animal Planet मध्ये Everest, Kali River Rapids छान होत्या.

Epcot मध्ये 'World Showcase' छान आहे.

अजून बरच काही आवडलेलं पण आत्ता आठवत नाही.

मला Hollywood Studios पण खूप आवडले होते. ते तुझ्या list मध्ये दिसत नाही. तिथला रात्रीचा show फारच सुरेख होता.>> युनिवर्सल ३ दिवस होणार आहे म्हणून मग त्याच थीमचं असणार्म्हणून हे स्किप करायचा प्लॅन आहे, कदाचित अ‍ॅनिमल किंगडम स्कोप करेन मग हे फार्च छान आणि चुकवू नये असम असेल तर.

फार फार पूर्वीची कोणे एके काळची एक गंमत आठवली. मुलं होण्याआधी नवरा एक कॉन्फरंससाठी जाणार होता म्हणून मे पण २ दिवस ओरलँडोला गेले. १ दिवस आम्ही दोघे अ‍ॅनिमल किंगडमला गेलो, तेव्हा तिथे फेस्टिवल ऑफ लायन किंग नावाचा शो असायचा तो पाहून झाल्यावर गर्दीतून नवर्‍याच्या हातात हात घालून बाहेर पडले आणि शो किते मस्त होता अशी बडबड करत होते पण त्याचा काही रिस्पंन्सच नाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर मी कोणा भलत्याच मानसाच्या हातात हात घालून चालत होते आणि बाजून माझा नवरा आणि ह्या माणसाची गर्लफ्रेंड/बाय्को हसत बघत होते . मोस्ट एम्बॅरसिंग मोमेंट इन लाइफ!

शूंपी Lol

Rides wise मला Universal जास्त आवडले. > हे बरोबर आहे. pure adrenaline spike साठी डिस्ने Orlando शेंबडे वाटलेले. त्यामानाने वेस्ट कोस्टवरच्या California Adventure Park मधे १-२ जबरदस्त राईड्स आहेत.

अरे पण adrenaline spike साठी म्हणून डिस्ने ला गेलात तर शेंबडे कोण तुम्ही की ते पार्क?! Lol

तुमची मुलगी लहान आहे त्यामुळे मॅजिक किंग्डम आणि अॅनिमल किंग्डम तीला आवडेल. तिथल्या रिज़ॉर्ट मधेच शक्यतो राहा कारण एकतर थीमपार्क्स मधे येणे जाणे करायला त्यांच्या बसेस असतात. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या रिज़ॉर्ट हॉटेल्स ला एक्सट्रा मॅजिक अवर्स चा फायदा मिळतो. जनरल पब्लिक साठी पार्क उघडण्याच्या आधी तुम्हाला प्रवेश मिळेल. जरा लवकर उठून जावं लागेल पण तरीही ते करणंच ठीक असतं कारण ९, १० नंतर प्रचंड लाईनी सुरू होतात.

लंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो. १२ ते २ या लंच टाईम मधे सगळ्या राईड्स ला गर्दी अगदी कमी असते तेव्हा या वेळात सगळ्यात पॉप्युलर राईड्स ला जा.

लंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो. १२ ते २ या लंच टाईम मधे सगळ्या राईड्स ला गर्दी अगदी कमी असते तेव्हा या वेळात सगळ्यात पॉप्युलर राईड्स ला जा.
>>>>>

ही फार मस्त माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद!

फास्ट पास फक्त ३ च मिळतात. त्यात मध्ये पण काही restrictions असतात. उदा.. एपकॉट मध्ये सोरेन आणि टेस्ट ट्रॅक ह्यापैकी एकच फास्ट पास घेउ शकतो. तर एका राईड्चा फ्री पास घेउन दुसरी राईड सकाळी ९ वाजता केली तर २-३ तास waiting time वाचतो.

शक्यतो फास्ट पास ११ ते ५ च्या दरम्यान घ्यावा. सकाळी आणि पार्क बंद होताना तशी ही गर्दी कमी असते. त्यामुळे त्यावेळी फास्ट पास काही उपयोगाचा नसतो. फास्ट पास चे बुकिंग लवकर करावे. जायच्या दिवशी केले तर आपल्याला पाहिजे त्या वेळी आणि आपल्याला पाहिजे त्या राईड चा मिळत नाही.

तसे ३ फास्ट पास संपल्यावर परत ३ फास्ट पास घेता येतात. पण बहुतेक वेळा तोपर्यन्त सगळे फास्ट पास सोल्ड आउट झालेले असतात.

मॅजिक किंगडम, एपकॉट जरुर कारा. बाकीची पार्क मी केली नाहित म्हणुन त्याबद्दल नाही माहित.

मॅजिक किंगडंम जरी ९ वाजता उघडत असले तरी ८.३० पासुन आत सोडायला चालु करतात. बाकिच्या पार्क मध्ये ९ वाजल्याशिवाय आत सोडत नाहीत. सकाळी लवकर जाउन जास्तित जास्त राईड करुन घेता येईल.

आजकाल पार्क राईड चे अ‍ॅप आले आहेत. ते तुम्हाला real time गाईड करत असतात. मागच्या महिन्यात sea world मध्ये अ‍ॅप वापरले तर ते कुठली राईड करायची ते सांगते. तसेच प्रत्येक राईड मध्ये किती waiting time आहे ते फोन वर दाखवते. कुठल्या शो मध्ये सिट फुल झाले तर ते फोन वर सांगते त्यामुळे तिकडे जायचा वेळ वाचतो. डिसनी मध्ये पण असे अ‍ॅप असेल.

लंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो.>> +१

enjoy...

लंच टाइम ला तिथले सगळे रेस्टोरेंट्स अतिशय फूल असतात. त्यामुळे १२ ते २ हा लंच टाईम टाळून मग जेवायला जाणे. शक्यतो आपल्या जवळ सॅण्डवीचेस, फळं, नट्स, ग्रानोला बार्स ठेवा. म्हणजे भूक लागली तर लाईनीत उभे राहून वाट पाहतांना सुध्डा तुमचा क्विक लंच होऊ शकतो. >>> हे आत नेउ देतात का? एल ए च्या डिस्नीलॅण्ड मधे आम्ही गेलो तेव्हा बाहेरचे पदार्थ नेउ देत नव्हते. कदाचित कोरडे बार्स वगैरे चालतील.

दुसरे म्हणजे आमचा अनुभव सगळा डिस्नेलॅण्ड चा आहे. तेथे आजूबाजूला अनेक हॉटेल्स असल्याने जर त्यापैकीच एखादे बुक केलेले असेल तर मधे सरळ हॉटेल मधे जाता येते व एक दोन तास आराम करून परत पार्क मधे जाता येते, आणि मग रात्री उशीरापर्यंत थांबायला काही वाटत नाही. डिस्नीवर्ल्ड मधेही हे सहज करता येइल का?

ओरलँन्डो , तोक्यो , पॅरीस च्या डिस्नेलॅण्ड मध्ये तरे आम्ही बॅकपॅक मध्ये खायचे पदार्थ घेउन गेलो होतो आणि काही इश्यु आला नाही. एल ए मध्ये आजुन गेलो नाही. त्याचा नियम असा आहे की फिंगर फुड घेउन जाउ शकतो पण पिकनिक फुड घेउन नाही जाउ शकत.

डिसनीची तिकिटे एवढी महाग असतात की त्यात लंच टाईम मध्ये २ तास घालवणे नको वाटते.

Pages