मींटी कॉर्न

Submitted by Nira on 23 February, 2015 - 09:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मींटी कॉर्न
साहित्य-
१) स्वीट कॉर्न- पाव कीलो-धुवुन उकडुन घ्यावेत
२) पुदिन्यची पाने- धुवुन बारीक चीरलेली- १ वाटी
३) कान्दा- एक मोठा बारीक चीरुन
४) ऑलिव्ह ऑइल- २ झाकणे (त्याच बाटलीचे, आवडीच्या कंपनी चे)
५) व्हाईट व्हिनेगर- १ झाकण (त्याच बाटलीचे, आवडीच्या कंपनी चे)
६) मीठ- चवी नुसार
७) जीरे पुड- चवी नुसार

क्रमवार पाककृती: 

कृती-
एका मोठ्या बावुल मधे- ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर मिक्स करुन घ्यावे.
त्यात पुदिन्याची पाने घालुन हाताने चुरडुन घ्यावित.
त्यात चिरलेला कान्दा घालावा अणि हातानेच मिक्स करुन घ्यावे.
आता यात उकडलेले स्वीट कॉर्न घालावेत आणि मिक्स करावे.
अंदाजे मीठ आणि जीरे पुड घालवी आणि परत नीट मिक्स करावे.
५-१० मिनिटे (पुदिना जितका अवडतो त्या नुसार) सेट होवु द्यावे.

मींटी कॉर्न तय्यार!

अधिक टिपा: 

पोळी बरोबर किन्वा, नुसते हि चांगले लागते.

सजावटि साठी शेव घातली तरी चालेल (पण मग क्यालरीज मोजायच्या नाहीत)

माहितीचा स्रोत: 
असेच कोणा कडे तरी गेले असतना, चहा बने पर्यंत टीपोय वरील मासिकात वाचलेले :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरा, पाककृतीत इमेज डकवायसाठी तू जिथे आत्ता इमेज डकवली आहे ती तुझ्या पाककृतीमधे चिकडव. सिम्पल कट पेस्ट कर.

विनेगरमुळे नक्की काय फायदा होतो? मी व्हिनेगर कधीच वापरले नाही. पण ऐकले खूप आहे. चवीत फरक पडतो का?

व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑईल एका बाटलीत घालून त्यात मीठ, जिरेपूड घालायचे आणि झाकण बंद करून बाटली १० -१२ वेळा हलवायची. ड्रेसिंग छान मिक्स होते.

धन्यवाद बी!

चवी बरोबर पुढील फ़ायदे-
“Functional therapeutic properties of vinegar… include antibacterial activity, blood pressure reduction, antioxidant activity, reduction in the effects of diabetes, prevention of cardiovascular disease, and increased vigor after exercise.”

http://articles.mercola.com/sites/articles/archive/2014/06/14/vinegar-he...

निरा धन्यवाद. चांगले विनेगर कुठले त्याबद्दल काही सांगता येईल का? कुठल्याही भाजीत आमटीत ओतता येईल का? धन्यवाद.

छान.

घराजवळील किराणा दुकानातुन 'व्हाईट विनेगर' द्या असे सांगितले... अर्थात कॉमन वस्तू असावी.
व्हाईट याचा अर्थ डिस्टील्ड. अल्कोहोल पासुन डिस्टिलेशन करुन.
विनेगर फ़ळां पासुनहि बनवतात- त्याप्रमाणे नाव असते-
http://en.wikipedia.org/wiki/Vinegar

विनेगर ची चव- अत्यंत आंबट असते. तसेच त्याला १ प्रकारचा पंजट (रसायन शास्त्र प्रयोगशाळेत असतो तसा- असीडीक) वास असतो.
मरिनेट करणे, आंबट चवी साठी, पंजट फ़्लेवर साठी, वापरता येइल.
मी शक्यतो, सलड्स आणि नूड्ल्स मधेच वापरले आहे. (मला इतकेच येत Wink Happy )
अधिक माहिती-
http://www.tarladalal.com/glossary-vinegar-341i

छान ! मी असाच प्रकार कोथिंबीर वापरुन करते. त्यात थोडे ब्लॅक बिन्सही टाकते.

बी,
विनेगर बर्‍याच प्रकारचे मिळते. साधे व्हाईट विनेगर, सॅलड ड्रेसिंग पासून ते आयत्यावेळी बेकिंगसाठी बटरमिल्कला पर्याय म्हणून दूधात मिसळायला अशा बर्‍याच ठिकाणी वापरता येते. माझ्या घरी व्हाईट विनेगार, अ‍ॅपल सायडर विनेगर, बाल्समिक विनेगर आणि राईस विनेगर वापरले जाते.

धन्यवाद.
निरा तुला बरेच काही काही येते बुवा आणि तू सांगतेसही छान. तुझी पोष्टे शोधून शोधून वाचण्याइतपत चांगली असतात Happy

स्वाती२, नेहमीप्रमाणे अतिशय प्रेमळ, संथ, निर्विकार मजकुर लिहित असतेस Happy धन्यवाद. रोज रोज आपण गप्पा मारायला सुरुवात केली तर माझे डोके किती शांत होईल Happy

बरे हे विनेगर किती चमचे ओतायचे असते? शेवटचा प्रश्न Happy

बी,
सॅलड ड्रेसिंगसाठी शक्यतो १ भाग विनेगर आणि ३ भाग ऑइल असे प्रमाण ठेवायचे. जे काही सॅलड करायचे त्याला हलके कोट झाले पाहिजे. घटकांची मूळ चव ड्रेसिंगमुळे झाकली जाता कामा नाही. आपण कोशिंबिरीत लिंबू कसे पिळतो तसे.

-/\- धन्यवाद बी! ह.झा. चढ्वील्या बद्द्ल! Happy

मला माबो कर होवुन अगदिच २-३ आठवडे झाले आहेत.
हे पहिलेच लिखाण. सो तुम्हाला शोधायला लागणे सहाजिक आहे Happy

धन्यवाद स्वाती२!