फुल्सु

Submitted by टीना on 19 February, 2015 - 03:13

लागणारा वेळ - कधीच मोजला नाही.

लागणारे जिन्नस:
-> चिंच
-> वाळलेल्या लाल मिरच्या (किती तिखट आवडत त्याप्रमाणे ज्याचे त्याने ठरवावे)
-> १ मोठा कांदा बारीक चिरुन
-> ५ ते ७ लसणाच्या पाकळ्या
-> छोटा अर्धा चमचा जीरपूड
-> मीठ चवीसाठी
-> गुळ - किसुन घेतला तर बरा.. चवीसाठी
-> सांभार (कोथिंबीर)

fulsu 1.JPG

गुळ कुठाय नै विचाराच Angry .. तिथ ठेवायला विसरली

क्रमवार पाककृती:

-> मुठभर चिंच थोड्या कोमट पाण्यात भिजू घालायची. अर्ध्या एक तासात आग्गाऊचे सटरफटर काम आटपुन घ्यायचे. त्यातल्या बिया (असल्या तर) बाजुला करुन मिक्सी मधुन फिरवून घ्यायचं ( १ २ ३ - ३ २ १ असं .. माझा मिक्सी तसाच आहे म्हणून मी तसच फिरवते .. तुम्च्याकड जो प्रॉडक्ट असेन त्याप्रमाण तुम्ही हात साफ करु शकता ). चाळणीतन ते गाळून घ्यायचं ( हो! चाळणीतनचं गाळायचं .. गाळणीतून गाळू किंवा चाळू नये .. शेफ चे सर्व हक्क अबाधित आहे.. नसत्या शंका नको. ).

->आता त्यात बारीक चिरलेला कांदा + जीरपूड + खलबत्त्यात कांडलेल्या लसणाच्या पाकळ्या ( मिक्सी वाली यकसारखी पेश्ट नाय ) + मीठ + गुळ + वाळलेल्या लाल मिरच्यांचे फ्लेक्स ( डॉमिनोज वाले देतात त्यापेक्षा थोडूशे मोठे. परत का कस नै पुसायचं ) + बारीक चिरलेला सांभार सगळं टाकायच आणि कालवून घ्यायच.

फुल्सु तयार.. फ्रिजमधे ठेवली तर आठवडाभर पुरते फक्त खायच असेल तेव्हाच लसण आणि कांदे घालावे .

fulsu 2.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खायचं कशासोबत हे? Uhoh फक्त तोंडीलावणं आहे का? >> हो तोंडीलावणं .. पण आम्ही भाकरीसोबत पन खातो .. तिखट तेवढ जास्त लागतं मग ..

मस्त रेसिपी. भाकरीबरोबर मस्त लागतच असेल कारण आमच्याकडे आई http://www.maayboli.com/node/6556 ही भाकरीबरोबर करते. मूळ रेसिपी कुठची ही कल्पना नाही पण कदाचित तुमच्या बाजूचीच असावी.

सायो रेसिपी मस्तच .. पण मी या पद्धतीने नै करत कांद्याची चटणी .. पोह्यासाठी कापतात तसे कांदे कापुन मग साध्या भाजीत टाकतो तेच तिखट मीठ मसाला टाकुन बनवते .. गावं तेवढ्या चटण्या असं म्हणाव लागेल वाट्टे Proud

संपदा >> चुकली, मला नै जमली, टेस्ट कहा है अस बोलुन आपल्या नावानं शंख फोडायला ऩको म्हणून Proud

धन्यवाद

Pages