मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार पूर्वी एक 'लवरबॉय' नावाचा पिक्चर होता ज्यात 'बाहोंमें लेके मुझे' असं एक गाणं होतं. त्याचा मुखडा संपल्यावर 'लवऽबॉय' अशी जी आर्त साद आहे ती मला का कोण जाणे पण 'लागोबा' अशी ऐकू यायची Proud कितीतरी वर्षं मला या लागोबाचा उलगडा झाला नव्हता.

(ट्रिविया: या गाण्याची चाल Barbra Streisand च्या Woman in love गाण्यावरून सही सही उचलली आहे)

थंडीच्या दिवसांत सकाळी सकाळी कॅन्टीनच्या रेडियोवर लागलेलं दबंग गाणं असं ऐकू यायचं -

चहा पाज रे चहा पाज रे
एक गरमागरम चहा पाज रे
थंडी वाजतीऽय... थंडी वाजतीऽय...
थंडी वाजतीय आणि कुडकुड करतायत दाऽऽत रे
चहा पाज रे

Lol

काल गाणे ऐकले ... ये अबोली

गूगल केले तर ये अबोली लाज गाळी .... असे शब्द मिळाले. इंग्रजीत.

मग लक्षात आले ते लाज गाली असे आहे

मला 'मधुबन मे राधिका नाचे रे' हे 'मधुबन मेरा ठिका ना छे रे' , म्हणजे मधुबन हे माझ ठिकाण नाही असच वाटायचा. एकदा गाण्याच्या भेंड्या खेळताना खरे शब्द समजले.

पिक्चर - माहित नाही

गाणं - तेरे नैना हस दिये बस गये दिल मे मेरे तेरे नैना ( गूगल)
मी समजलेलं -
तेरे मैना बस दिये बस गये मेरे दिलमे तेरे मैना!!!

साकीया आज मुझे नींद नहीं आयेगी
सुना है तेरी मेहफिल मे रस जगा है ....

साहिब बीबी और गुलाम मधली ही अप्रतिम कव्वाली मी कित्येक दशके अशीच ऐकत होतो आणि त्याचा अर्थही लागत होता.

पण ते ' सुना है तेरी महेफिलमे रतजगा है' असे आहे. रतजगा म्हनजे (रात्रभर ) जागरण- जाग्रण असे आहे. गम्मत म्हनजे त्याचाही अर्थ लागतोय Happy

https://www.youtube.com/watch?v=RIRVQ4vJrY4
-

दादा कोंडक्यांच ,' अगो हिल हिल पोरी हिला... ह्याच्या पुढचं, ' तुझा कप्पा ढिला ढिला' असंच ऐकू यायचं Proud
हे म्हणजे तिचा वरचा मजला रिकामा असेल असं वाटायंचं !!

<< दादा कोंडक्यांच ,' अगो हिल हिल पोरी हिला... ह्याच्या पुढचं, ' तुझा कप्पा ढिला ढिला' असंच ऐकू यायचं>>
मी पण असंच ऐकते Uhoh ... असं नाहीये का ते गाणं.
मग कोणते शब्द आहेत तिथे.

"देखो देखो ना प्रिटी वूमन" असे एक गाणे काही वर्षापूर्वी येऊन गेले. त्यातले "प्रिटी वूमन" शब्द बऱ्याच जणांना नीट ऐकू येत नसत. एकदा एका कार्यक्रमात एक हौशी गायक "देखो देखो ना कुडी घुमा" असे आत्मविश्वासाने गात असताना ऐकले आहे.

मी लहानपणी 'हिल हिल पोरी हिला, तुझ्या गप्पा लीला टीला' म्हणायची. खूप उशिरा खरे शब्द कळले.

'हिल हिल पोरी हिला.. या गाण्यात बरेच शब्द गोंधळात टाकणारे आहेत..

'चलजा होबा तुला'.. .. चल जा हो बाजूला

अजून एक उदाहरण..

एक अतिशय सुंदर मराठी गाणे आहे "राजा ललकारी अशी घे हाक दिली साद मला दे"

त्यात पुढे गायिकेच्या तोंडी एक ओळ आहे...
"कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया"

लहानपणी ही ओळ मला अशी ऐकायला येत असे:
"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या"

म्हणजे नवऱ्याच्या मामाला "आपला नवरा आता फळबागेत आला आहे" असे ती सांगत आहे वगैरे असे चित्रपटातील दृश्य असावे असे वाटत असे. Biggrin Biggrin (क्याय च्या क्याय)

"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या"

म्हणजे नवऱ्याच्या मामाला "आपला नवरा आता फळबागेत आला आहे" असे ती सांगत आहे वगैरे असे चित्रपटातील दृश्य असावे असे वाटत असे. (क्याय च्या क्याय)>> Rofl
अर्थ. पण भारी लावलात.

साकीया आज मुझे नींद नहीं आयेगी
सुना है तेरी मेहफिल मे रस जगा है ...>>

अरे बापरे , वरची पोस्ट वाचेपर्यन्त मी हे असच समजत होते Happy

ते फिजा मधलं एक गाणं आहे - मला त्याचे खरेखुरे शब्द नाही माहीत पण, 'म्हारा पाव म्हारा पाव' असं काहीसं ऐकल्यासारखं वाटतं...
एक जुनं मराठी गाणं आहे - 'हेच ते हेच ते हेच ते,चरण अनंताचे..' हे मला कितीतरी वर्षं ' हेच ते हेच ते हेच ते चरण अलंकार..' असं वाटायचं.. आणि (भीमसेनजींची क्षमा मागून) - 'अणुरणिया थोकडा'.. हे 'अंगणिया झोपला' असं वाटायचं....
त्याचप्रमाणे अजून एक भयंकर हिंदी गाणं आहे - शब्द माहितीच नाहीयेत पण तो गायक - एखादी व्यक्ती पोटात मुरडा आल्यावर एखादा कशी ओरडेल - तसा ओरडतोय असंच वाटतं ... (हे गाणं मी नेहेमी सा.कार्यक्रमात मोठ्याने लाऊडस्पीकरवर लावलेलं ऐकते...:अरेरे:) आणि ह्याच गाण्याचा ताल कांडपकेंद्रात जसा एक ठेका ऐकू येतो त्या टाईप आहे...

फिजा मधले हे गाणे की काय?

आजा माही मेरे आजा माही मेरे आजा माही मेरे आ
आ धूप मलूँ मैं तेरे हाथों में
आ सजदा करूं मैं तेरे हाथों में
>>>>>>> त्यात पाव दिसले नाहीत कुठे... Happy

http://giitaayan.com/viewisbsong.asp?id=11469#

Pages