Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नॉकआऊट!! नक्की कसला माहीत
नॉकआऊट!!
नक्की कसला माहीत नाही, पण एक आनंद होतोय एवढे मात्र खरे.
ज्याची बांधिलकी आणि निष्ठा कोणत्याही एका पक्षाशी नाही, अश्या कैक जणांना होत असावा.
BJP मुक्त दील्ली!!! ५ स्साल
BJP मुक्त दील्ली!!! ५ स्साल केजरीवाल!!!
"First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win." : Gandhi
<<नक्की कसला माहीत नाही, पण
<<नक्की कसला माहीत नाही, पण एक आनंद होतोय एवढे मात्र खरे.
ज्याची बांधिलकी आणि निष्ठा कोणत्याही एका पक्षाशी नाही, अश्या कैक जणांना होत असावा.>> +१००००
बाकी पोस्टस वाचून इंटरप्रीट होण्याइतकी स्थिर मनःस्थिती नाहीये आत्ता.

पण ज्या सर्वांनी आपसोबत माझंही कौतुक केलंय त्यांना विशेष आणि खूप धन्यवाद.
केजरीवाल फक्त २६,००० मतांनी
केजरीवाल फक्त २६,००० मतांनी जिंकले, ते ही बिजेपीच्या नवोदीत नुपुर शर्मा विरुद्ध !! गेल्या निवडणुकीत याच मतांतरांनी केजरीवाल यांनी शिला दिक्षित यांच्या विरुद्ध निवडणुक जिंकली होती. आआप चे उमेदवार इतरत्र ६०-६५ हजारांच्या मार्जिनने जिंकत आहेत.
टिपः किरण बेदी निवडणुक हरल्यात !!
किरण बेदीची सिट गेली.!!!
किरण बेदीची सिट गेली.!!!
मिर्ची तै : तुमच खास
मिर्ची तै :
तुमच खास अभिनंदन !! तुमच्या संयमाला सलाम !!
अरविंद केजरीवाल आणि आपच
अरविंद केजरीवाल आणि आपच अभिनंदन ! दिल्लीचा विकास होवो , देशाची राजधानी सुरक्षित समृद्ध होवो .
बीजेपीवाल्यांनी यातून धड़ा घ्यावा . पाच वर्षाचा जनादेश फक्त वाचाळ भाषण करण्यासाठी मिळालेला नसून काम करून दाखवण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे.. +१
पूर्णपणे सह्मत. गेल्या ९ महिन्यातला मोदी सरकारचा कारभार आणि वक्तव्ये पाहता हे लोक जनतेला गृहीत धरत येते. ९ महिन्यात विकास होत नसला तरी त्या दिशेने पावले तरी पडायला हवीत. मोदी नुसती बोलबच्चनगिरी करत फिरत आहेत. मन कि बात, स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया या नुसत्या घोषणा आणि गप्पा झाल्या कामे कुठेयत? मंत्रीमंडळात स्मृती इराणी सारखे बाहुले बसवले आहेत. मोदी अजूनही लोकसभा २०१४ च्या मोडमध्ये आहेत ( विरोधकांना बाजारू म्हणणे, केजरीवालला तुम्ही अनार्कीस्ट आहात तर जंगलात जा, नक्षली बना असे हिणवणे!! पंतप्रधानाने नक्षली, अनार्कीस्ट लोकांना उलट मुख्य प्रवाहात बोलावायचे असते!) 'सबका साथ, सबका विकास' ही फक्त घोषणा झाली. यांना मित्रपक्षाचे एवढेच काय स्वपाक्षातले पण काही लोक आपले वाटत नाहित हे काय 'सबका साथ' घेणार ? हा वेक अप कॉल आहे , मोदी सरकराने यातून बोध घेवून फेकुगिरी सोडावी आणि लोकानाची कामे करावीत.
मिर्ची, आपण फार संयमितपणे
मिर्ची, आपण फार संयमितपणे चर्चा केलीत, करता याबद्दल कौतुक आहेच.
तुम्हाला जो पक्ष आवडतो त्याला निर्णायक विजय मिळत असल्याने तुमचे अभिनंदन.
शुभेच्छा !
बीजेपीवाल्यांनी यातून धड़ा
बीजेपीवाल्यांनी यातून धड़ा घ्यावा . पाच वर्षाचा जनादेश फक्त वाचाळ भाषण करण्यासाठी मिळालेला नसून काम करून दाखवण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे>>> +१०१
बीजेपीवाल्यांनी यातून धड़ा
बीजेपीवाल्यांनी यातून धड़ा घ्यावा . पाच वर्षाचा जनादेश फक्त वाचाळ भाषण करण्यासाठी मिळालेला नसून काम करून दाखवण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे.
<<
<<
ह्याच्या इतका हास्यास्पद सल्ला आम आदमी पार्टीवाले, भाजपाला देताना पाहुन डोळे पाणावळे.
रुमाल आहे ना आंग्रे डोळे
रुमाल आहे ना आंग्रे डोळे पाणावले आहेत ते पुसायला
आज जाम दुःख झाल असेल नाही का !
वरती ऋन्मेषच्या पोस्टमद्घल <<< ज्याची बांधिलकी आणि निष्ठा कोणत्याही एका पक्षाशी नाही, अश्या कैक जणांना होत असावा.>>> हे वाचल तर लक्षात येईल काय म्हणायच आहे ते
बीजेपीने जी आश्वासन दिलेली आहेत ती पूर्ण करून दाखवावी . मग दिल्लीसारखी पाळी येणार नाही . आमच्यासारख्या सामान्य जनतेला काम कोण करतय त्याच्याशी मतलब . 2014 ला मोदीनि आश्वासन दिल होत म्हणून जनादेश त्यांना दिला गेला , यावेळी केजरीवाल प्रॉमिसिंग वाटत आहेत त्यांना . उद्या तिसर कोण असेल .नुसतेच् हसत राहण्यापेक्षा काम केलेल चांगलच कधीही
वरती बावरा मन यांनीही चांगले मुद्दे मांडलेत . बघा विचार करुन (जमल्यास )
४९ दिवसीय काम करून बहूमत आणि
४९ दिवसीय काम करून बहूमत आणि ९ महिन्यांचे भाषण चे ४ सीट्स
नक्की कसला माहीत नाही, पण एक
नक्की कसला माहीत नाही, पण एक आनंद होतोय एवढे मात्र खरे.
ज्याची बांधिलकी आणि निष्ठा कोणत्याही एका पक्षाशी नाही, अश्या कैक जणांना होत असावा. >> +१००
यावेळी पहिल्यांदा भाजपला मत दिल होत . पण ज्यासाठी भाजपला मत दिल त्यापासून फार दूर चाललाय भाजप
त्याच वेळी काँग्रेस फक्त ४ जागावर दुसर्या स्थानी . इथून त्यांचा झाला तर कमबॅक च शक्य आहे . यापेक्षा जास्त काय खाली जाणार ?
लोकांचा जोश, उत्साह बघून
लोकांचा जोश, उत्साह बघून एखादा सण असल्यासारखं वाटतंय.
इथे आणि बाहेरही बर्याच चर्चांमध्ये वाचलं होतं की आप नी खुप सार्या सवलती आणि घोषणा केल्या म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं ( जसं की फ्री पाणी, स्वस्त वीज इ.).. पण मला वाटत नाही की ते एकमेव कारण होतं कारण या घोषणा भाजपा आणि काँग्रेस नी पण दिल्या होत्या.
केजरीवालांनी बाजी मारली
केजरीवालांनी बाजी मारली शेवटी; अभिनंदन. अॅब्सोलुट मेजॉरिटी मिळाली हे एका अर्थी बरंच झालं; तक्रार करायला आता जागा नाहि. दिल्लीकरांना दिलेली आश्वासनं (दिड लाख कॅमेरे, मोफत पाणी इ.) पुर्ण करण्याची क्षमता त्यांना मिळो. (विसल ब्लोअरच्या आततायी भुमिकेतुन एखाद्या द्रष्ट्या, कामसु नेत्यात त्यांचं परिवर्तन होवो...)
"Speaking to media, Bedi
"Speaking to media, Bedi said, " I think I haven't lost, I did my best, I would lose if I hadn't done my best. Let the BJP introspect why they have lost."
She further added, "BJP gave me candidature without taking a single rupee from me. This is rare. I thank them for this." ऊप्स !
केजरीवालांची टीम 'हनीमून पिरियड' न घेता उद्यापासूनच कामाला लागेल अशी अपेक्षा. पंप्रंना भेटून दिल्लीसाठी पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी करणार आहेत. तो मिळाला तर दुधात साखर. (अर्थात पंप्र तो इतक्या सहजासहजी देतील असं वाटत नाही)
सध्या माझ्या अकेंकडून अपेक्षा -

१. जगबुडी झाली तरी नैतिक, तात्विक वगैरे कसल्याही गोष्टीवरून ५ वर्षे सत्ता सोडू नये
२. ज्या ४ शेल कंपन्यांच्या देणग्यांवरून भाजपाने वादळ उठवलं होतं त्यांची शक्य तितक्या लगेच तपासणी करून संबंधित दोषींना गजाआड घालावे. पांढर्या कपड्यांवर डाग तर नकोच, पण डागाची सावलीसुद्धा नको.
३. शाझिया, बिन्नी, उपाध्याय, बेदी ह्या घरभेद्यांना कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेऊ नये.
४. वादग्रस्त मुद्द्यांवर सध्या लगेच टिप्पणी करायचं टाळावे.
५. वॉर्डरोब बदलावा !!
जगबुडी झाली तरी नैतिक,
जगबुडी झाली तरी नैतिक, तात्विक वगैरे >>>
वॉर्डरोब बदलावा >> निषेध
वॉर्डरोब बदलावा >> निषेध निषेध
आपल्याला तो केजरींचा मफलर लई आवडतो आणि दिल्ली मध्ये थंडी असतेच तर अजिबात बदलू नये!
केदारभौ, निदान आजच्या दिवस
केदारभौ, निदान आजच्या दिवस तरी भांडू नका

धनि, उन्हाळ्यात कुठे घालतात मफलर? त्यांचा मफलर निघाला म्हणजे दिल्लीतली थंडी संपल्याची नांदी असते
मग ह्या विचारसरणीत काँग्रेस,
मग ह्या विचारसरणीत काँग्रेस, सध्याचे बिहारी नेते मध्ये न तुमच्या (आप पार्टी नाही) मध्ये काय फरक? नो डिफरन्स ए? >> केदार.. यामधे भाजपाला पण घेकी.. त्यांनी काय घोडं मारलंय?
तुझ्या जागत्या पहारा कंमेंटचं पण मला आश्चर्य वाटलं.
माझे काय चुकले? या बाफवर जर
माझे काय चुकले? या बाफवर जर बेदी आणि शहा दिसले तर नवल वाटू नये
मी आज बातम्या बघितल्याच
मी आज बातम्या बघितल्याच नाहीत. दिवसभर फोनवर इलेक्शन कमिशनच्या साईटवरून अपडेट घेत होते. घरी आल्यावर टिव्ही बघत न बसता लगेच आप ऑफिसजवळ जावून आले. संध्याकाळी साडेसहा पर्यंत तरी तिथे बरीच गर्दी होती. त्यानंतर मात्र चॅनेल्सच्या गाड्या, पत्रकार परत जायला लागले.
आजपण मफलर होता का गळ्यात? आज नव्हती थंडी. मफलर इतकी तर अजिबातच नव्हती.
इथे फारसं लिहिलं नव्हतं, पण ही निवडणूक खूप जवळून फॉलो केली. माझ्या घरीच आपच्या प्रचारासाठी बाहेरगावाहून आलेले काही मेंबर होते. त्यांच्याकडून रोजच वेगवेगळ्या भागांमधली परिस्थिती कळत होते. त्यांच्यामूळे मुद्दाम प्रचारासाठी आलेल्या महाराष्ट्रातल्या (औरंगाबाद, बीड, मुंबई, पुणे, नागपुर, कोल्हापुर, अमरावती) बर्याच कार्यकर्त्यांना/नेत्यांना भेटले, बोलले. औरंगाबादहून तर प्रचारासाठी दोन हमाल पण आले होते. सगळ्यांकडून पॉझिटिव्ह माहिती कळत होती.
योगेंद्र यादव, मेधा पाटकर( या निवडणूक प्रचारासाठी आल्या नव्हत्या पण दुसर्या कामासाठी आलेल्या असताना कार्यकर्त्यांना भेटल्या), डॉ. सुनिलम या आपच्या नेत्यांशी गप्पा पण झाल्या.
बर्याच जेएनयु, जामिया मिलिया आणि डियु मधल्या स्कॉलर्स /प्राध्यापकांशी पण बोलणं झालं...या सगळ्यांच्या बोलण्यातून आप नक्कीच सत्तेत येईल असंच वाटत होतं. आपच्या मेन ऑफिससमोरून दिवसातून किमान २ चकरा तरी व्हायच्याच रोज. तिथे कार्यकर्त्यांची भरपूर वर्दळ जाणवायची. रिक्शावाले, ऑटोचालक, दुकानदार, दुधवाले, भाजीवाले, मेट्रोमधली पब्लिक, वॉचमन (मला एटीएम मशिन जवळच्या वॉचमननी पण विचारलं होतं मॅडम कुणाला मत देणार.. आणि वर आम्ही तर या वेळी झाडूलाच मत देणार असंही सांगितलं होतं) या सगळ्या लोकांशी बोलताना बहूमत मिळेल आपला असं वाटायचं.
मला एकदा हॉटेलात जेवायला गेल्यावर तिथे वेटर आणि कुक आपची टोपी घालून फिरताना दिसले होते. सगळ्याच वयोगटातले आणि आर्थिक स्थरातले लोक आपला सपोर्ट करत होते. तरूणाईचा उत्साह खूप होता. कॉलेजातली मुलं रोज प्रचारासाठी फिरताना दिसायची. रस्त्यावर चूकून कुणाकडून तरी पडलेली आपची टोपी झटकून डोक्यावर घालताना पण बघितलं मी मुलांना.
तरी असा विजय कुणालाच अपेक्षित नव्हता. ४८-५२ सीटचा अंदाज कार्यकर्त्यांकडून येत होता.
ही निवडणूक जिंकण्यापेक्षा मोठी लढाई आणि जबाबदारी आता आपवर आहे. जर आप ही जबाबदारी पेलू शकलं नाही तर आपचे तरूण कार्यकर्ते (राजकारणात, प्रचारात पहिल्यांदाच आलेले लोक) पुढे दुसर्या कुणावर विश्वास ठेवू शकतिल का अशीही शंका वाटतेय. असं काही होवू नये हीच अपेक्षा.
अल्पना, खूप सुंदर विश्लेषण!
अल्पना, खूप सुंदर विश्लेषण!
योगेंद्र यादवांकडून अजून ऐकायला आवडेल. तुम्ही ही दिल्लीच्या निवडणूकीच्या हवेबद्दल लिहा. विशेष म्हणजे तरूणाई च्या उत्साहाबद्दल वाचायला आवडेल.
झाली तरी नैतिक, तात्विक वगैरे
झाली तरी नैतिक, तात्विक वगैरे कसल्याही गोष्टीवरून ५ वर्षे सत्ता सोडू नये >>>> असं केलं तर मग त्यांच्यात आणि बाकी पक्षांमध्ये फरकच काय? जर असं काही केलं तर पुढच्या वेळी त्यांना मत देणार नाही हे नक्की. स्वच्छ राजकारण ही यांची युएसपी आहे ती टिकवून ठेवावी.
अर्थात यावेळी त्यांना राजिनामा द्यावा लागणार नाही बहूमतामूळे. गेल्यावेळीसुद्धा १४ फेब्रुवारीला नसता दिला राजिनामा तर काही दिवसांनी का होईना द्यावाच लागला असता. आयदर बहूमत टिकवण्यासाठी मनधरण्या आणि काँग्रेसला किंवा गेला बाजार भाजपाला आवडतिल असे निर्णय घेत बसणे किंवा न आवडणारे निर्णय टाळणं हे करावं लागलं असतं किंवा सत्ता सोडावी लागली असती किंवा मग त्यांचा पाठिंबा काढून घेतला गेला असता.
अल्पना, छान पोस्ट. अर्थात
अल्पना, छान पोस्ट.
अर्थात यावेळी त्यांना राजिनामा द्यावा लागणार नाही बहूमतामूळे. <<< या बहुमतामुळे फार अडणार आहे त्यांचं. कारण आता ब्लेमगेमला काहीच शिल्लक राहणार नाही.
बीजेपीला आता धडा चांगलाच मिळालेला आहे, शहाणे अस्तील तर आधी त्यांचे वाचाळवीर गप्प करायला हवेत. त्यांच्या चर्खमू विधानांनी अख्खा पक्ष गोत्यात आणून ठ्वलाय.
आपचा कम-बॅक लक्षणीय आहे.
आपचा कम-बॅक लक्षणीय आहे. पहिल्या दिल्ली निवडणुकांनंतर लोकसभेदरम्यान आपवर प्रचंड टिका झाली 'भगोडे' म्हणुन. आपचे हे पहिलेच वर्ष होते. मागे कुठल्याही संघटनेचे, बड्या उद्योगधंद्यांचे व खानदानी राजकारणाचे सहाय्य नसताना व जनतेमध्ये प्रतिमा खराब झालेली असताना जे यश आपने मिळवले ते एखाद्या मुरलेल्या पक्षाला देखील शक्य झाले नसते. सिम्पली ग्रेट.
भारतीय राजकारणात आसाम गण परिषद हा ८५ साली स्थापन झालेल्या पक्षाने असेच लक्षणीय यश मिळवले होते. पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ होती. दुर्दैवाने आ.ग.प.चे नैतिक अध:पतन फारच झपाट्याने झाले. सुरुवातीच्या काळातले साम्यवादी नेते व एकूणच पक्ष स्वच्छ होता. केरळमध्ये ५०च्या दशकात साम्यवादी पक्षाला मिळालेली सत्ता अशीच नोंद घेण्याजोगी होती.
आपने या दोन्ही घटनांमधून शिकून नैतिक र्हास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली तर कॉन्ग्रेसची पोकळी भरून काढायला व टिकवून ठेवायला त्यांना मुळीच वेळ लागणार नाही.
भारतीय समाजकारणातील व त्यामुळे झालेली राजकारणातील भ्रष्टाचाराची बजबज कमी होईल, अशी एक निर्मळ मनाने आशा करतो.
नंदिनी, १. >> बीजेपीला आता
नंदिनी,
१.
>> बीजेपीला आता धडा चांगलाच मिळालेला आहे,
बरोबर.
२.
>> शहाणे अस्तील तर आधी त्यांचे वाचाळवीर गप्प करायला हवेत.
योग्य सल्ला आहे.
३.
>> त्यांच्या चर्खमू विधानांनी अख्खा पक्ष गोत्यात आणून ठ्वलाय.
असहमत. टण्या यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपला मिळालेली टक्केवारी बदलली नाही. भाजपच्या मतगाभ्यास धक्का पोहोचला नाहीये. भाजप दारुण रीत्या पराभूत झालेला असला तरी एक पक्ष म्हणून तो गोत्यात आलेला नाहीये. गोत्यात काँग्रेस आलाय.
आ.न.,
-गा.पै.
गापै, केवळ दिल्ली
गापै, केवळ दिल्ली विधानसभेबद्दल म्हणत नाहीये. कुणीतरी चार चांगली कामं केलेली असतात, पण येक कायतरी सनसनटी बोलतो आणी सगळे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो हे बीजेपीमध्ये अति चालू आहे. असले वाचाळवीर अजिबात कामं करणारे नसतातच हेही लक्षात घ्या..
सुरूवातीला नमोंनी मीडीयाशी डायरेक्ट बोलण्यावर बंधनं आणल्याचं वाचलं होतं, पण ते अमलात आणलेलं दिसत नाही.
(No subject)
१. या निवडणुकीतल्या मतांची
१. या निवडणुकीतल्या मतांची टक्केवारी बघून, 'भाजपने गड राखला' असं समाधान करुन घ्यायचं असेल तर ठीकच. पण मुद्दा तो नाही. विरोधी मतांची विभागणी न होता/ती वाया न जाता - त्या मतांचं इतक्या चटकन ध्रुवीकरण होऊ शकलं, हा आहे. यापाठीमागे जसं ते मत गोळा करणार्याचं स्किल आहे, तसंच 'ध्रुवीकरण होऊ शकणार नाही / आपणच ते मत खेचून घेऊ' हा प्रतिपक्षाचा गैरविश्वास आहे.
२. 'आप'विषयी असलेली नाराजी त्यांना दूर करता आली, यात त्यांच्या नवीन असण्याचंही योगदान आहे असं मला वाटतं. उगाच जुन्यापान्या इतिहासाची बोचकी त्यांच्या खांद्यांवर नाहीत. त्यामुळे 'चूक झाली' हे कबूल करुन झटकन पुढचा रस्ता पकडण्याची agility त्यांच्याकडे होती. अर्थात 'आप' एकाच ठिकाणी थांबून न राहता पुढच्या मार्गी लागलेत (course-correction), हे ज्यांनी पाहिलं नाही / ज्यांना पाहायचं नव्हतं त्यांच्यालेखी तो मुद्दा जिवंत राहिला.
३. आता 'आप'वर मोठी जबाबदारी आलीय हे निश्चितच. पण ती स्वीकारताना खुद्द अरविंद केजरीवालांनी व्यक्त केलेला नम्रपणा आणि प्रांजळपणा अगदीच वाखाणण्याजोगा होता. किंबहुना त्यामुळे 'राजकारण कसं करावं' याच्या नव्या पध्दती निर्माण होण्याला जागा आहे अशी आशा वाटते.
भाजपा की काँग्रेस - या घासून गुळगुळीत झालेल्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कंटाळा आला तरी अजून कुठला आश्वासक पर्याय दिसत नसल्यानं, आळसावल्यागत छापा-काटा करत राहिलो तर नुसताच वेळ वाया! त्यात 'आप' लोकांना नव्यानं 'लोकसहभाग' (public participation) शिकवतीय / माहीत असलेल्यांना सामील व्हायचं आवाहन करतीय- हे थरारक आहे. आणि आत्तापर्यंत तरी त्यांचं म्हणणं लोकांना पटलंय ते दिसतं आहे. फक्त 'project done, I'm done' ही वृत्ती सगळ्याच व्हॉलंटिअर्सना सोडता आली पाहिजे.
'राजकारण' म्हणजे सहजी हस्तांतरण होऊ शकणारी वस्तू (product) नाही, किंवा कोणालातरी सेवाभावी बोलीवर राबवून घेऊन मिळणारी सेवासुविधा (service) नाही - हा खोल संस्कार आहे. समूहाच्या प्राधान्यक्रमांविषयी सगळयांनी मिळून निर्णय घेण्याची अखंड चालणारी कठीण प्रक्रिया + अंमलबजावणी : हे एका राजकीय पक्षानी फार वर्षांनी सांगितलं!
४. राजकीय पक्षाचं प्रभावक्षेत्र वाढतं तसतशी त्यांच्या धोरणांमधे सुसंगती राहते की नाही, आणि त्या पक्षाने स्वीकारलेला प्राधान्यक्रम (prioritization) मतदारांना आकर्षित करत राहतो की नाही - हे मोठं आव्हान. (नेतेमंडळी भ्रष्ट होतात की स्वच्छ राहतात, हा त्यामानानं आजच्या काळात पटकन निकालात निघणारा मुद्दा - पब्लिकसे कुछ छुपता नही।) अगदी साधं उदाहरण म्हणजे, 'विकास म्हणजे काय' याची एकमेकांपासून मूलभूतरित्या वेगळी असलेली हजारो उत्तरं असतील. त्यामुळे 'अजेंडानिश्चिती' हा कळीचा मुद्दा.
'मार्केट इकॉनॉमी'चा स्वीकार आपण केलाय, त्याला तर आज काही पर्याय नाही दिसत. 'एका स्तराचा विकास करा, मग तो खाली झिरपेल' (trickle down theory) हे मात्र काही खरं नाही - भारतीय वास्तवात तर तो फारच रक्तरंजित प्रवास होईल. So the question is how to unleash the spirit without being non-restrictive?
माझं वाचन/आकलन कमी आहे हा दोष मान्य करुन असं म्हणावंसं वाटतं की बहुतांश राजकीय नेतृत्वाची या मुद्द्याशी मती गुंग आहे.
५. कॉंग्रेसची पोकळी भरुन निघण्याची नितांत गरज आहे, पण ते तितकंसं सोपंही नाही. कॉंग्रेसमधे बदल होऊन ते ती स्पेस क्लेम करतील, असं काहीच लक्षण नाही. डाव्यांच्या मांडणीत benevolence असतो की नाही कुणास ठाऊक, पण अगदी असला जरी तरी ते आज non-relevant आहेत. बाकीच्या छोट्या पक्षांकडे आपल्याच (चुकांच्या) इतिहासाचं ओझं आणि नवं राजकारण उभं करण्याची दृष्टी / कुवत नसणं.
आणि 'आप'ला झटकन झपाझप वाढता येणार का? Organic growthची स्वतःची एक गती असते.
६. पण मरगळलेल्या राजकीय वातावरणाला एका वर्षात दोन परस्परविरोधी जबरदस्त रेटे मिळाले, हे छानच. घुसळण होत राहो - खलबली जारी रहे। 'आप'ने महाप्रचंड विजय मिळवल्याने आता या धाग्यावरचा लोकांचा वावर कमी होऊ नये!
Pages