एक बदललेले नाव

Submitted by jpradnya on 8 February, 2015 - 10:25

सजवलेल्या शामियान्यात ही
मैफिल अजून सुनीच का
नवीन देश नवीन वेश
पण कहाणी अजून जुनीच का

चुकलेल्या गणितांचा
हिशोब कुणी मांडावा
जीवापाड जपलेला बंध
असा का बर सांडावा

विचारांची वादळे
कशी व्हावीत शांत
असहय्य अवस्थेत
कसे जगावे निवांत

चालतोय ती कुठे जाते
माहीत नाही वाट
उसने अवसान सरण्याची
भीति वाटते दाट

जिवा शिवाच्या ह्या खेळात
उड़ी घेतल्ये स्वतः
डोई वरच्या गाठोडयात
उरलय तरी काय आता

एक हरवलेले स्वप्न
एक दूर राहिलेला गाव
आठवणींचे मोरपीस
अन् एक बदललेले नाव

~प्रज्ञा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त