ह्द्यधमनी रून्दीकरण (Angioplasty) बाबत

Submitted by bvijaykumar on 7 February, 2015 - 10:29

ह्द्यधमनी रून्दीकरण (Angioplasty) नुकतीच केली आहे . जोडीला मधुमेह आहे ... आहार कोणता घ्यावा ? कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ? वय - ३७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या डॉक ने चार्ट दिलाच असेल ना?

आजकाल देतात डॉक डिस्चार्ज होताना.
तो फॉलो करा. एखादी न्युट्रीशनॅलिस्ट असेलच सर्जरी नंतर हॉस्पिटलात , तिने ठरवूनच मिळतो ना नाश्ता , जेवण.

नाहितर परत एका दुसर्‍या डॉ जावून सुचवायला सांगा.

इथे जनरल वाचूनच माहिती देवू शकतील लोकं. तुमची शारीरीक स्थिती नक्की कळू शकत नाही.(म्हणजे, सर्जरी नंतर काही दिवस काय खायचे हे इतरांना कळणं कठिण).

तेलकट, तूपकट, गोड फळं नको. हलका व्यायाम. चांगली झोप घ्या.

सकाळी ओटमील वगैरे. नाश्त्यात उकडलेला मासा, भाज्या(पालेभाज्या, गवार, बीन्स्,दूधी वगैरे) किंचित तेलात परतलेल्या, कच्ची कोशिंबीर(कांदा, काकडी ज्यास्त करून),भाजीचा सूप, ताक(सकाळीच फक्त,
चहा कमी, कॉफी बंद्,भाकरी ज्यास्त(तांदूळ, नाचणी,ज्वारी एकत्र करून). मटण, चिकन बंद काही दिवस.

हा नाश्ता माझ्या साबांना दिलेला. . त्यावरून लिहिलेय.
जखम भरेपर्यंत काही वातूळ, पचायला जड खावू नका.
डाळी मध्ये मूगडाळ वगैरे बरी.

वय ३७!

ताबडतोब तुमच्यावर अँजिओप्लास्टी करणार्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्याकडून आहार आणि काय काळजी घ्यावी , व्यायाम करावेत याची यादी मागून घ्या.
खरे तर याबाबतचा पूर्णं सल्ला त्यांनी तुम्हाला हॉस्पिटलातून डिस्चार्ज होण्यापूर्वीच प्रत्यक्ष समजवून तसेच लिखित स्वरुपात द्यायला हवा होता. तसा दिला नसेल तर निदान पहिल्याच फॉलोअपच्यावेळी मागून घ्या.

डाएट चार्ट दिलेला आहे.... पण तुमचा मौलिक सल्ला अभिप्रेत होता ... मी खरोखरच ह्द यापासून (म ना पासून) धन्यवाद मानतो .

बी विजयकुमार ?
अहो काळजी घ्या. घाबरूनही जाऊ नका.

तुम्ही डॉ. अभय बंग यांचं " माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग" वाचलंय का ?

डाएट चार्ट दिलेला आहे.... पण तुमचा मौलिक सल्ला अभिप्रेत होता ... मी खरोखरच ह्द यापासून (म ना पासून) धन्यवाद मानतो .
---- साती यान्चा सल्ला अगदी योग्य आहे आणि त्यानुसार अम्मल करावा असे सुचवावे वाटते.

सद्यपरिस्थितीत ज्यान्नी तुमच्यावर Angioplasty शस्त्रक्रिया केली आहे त्यान्नाच तुमच्या सम्पुर्ण केसची व्यावस्थित माहित असेल. निव्वळ दिड ओळीच्या माहितीवर अशा महत्वाच्या विषयावर सल्ला मागणे वा देणे घातक प्रघात आहे असे मला वाटते. आरोग्यासाठी शुभेच्छा.

साती आणि झंपी यांच्याशी सहमत.
अश्या केसेस मध्ये डॉक्टरांचा सल्लाच.

याउपर करायचेच असल्यास एक करू शकता,
आपल्या या आजाराच्या एकंदरीत अनुभवासह डॉक्टरांनी काय सुचवलेय हे शेअर करू शकता. जर इथल्या कोण्या एक्सपर्टला त्यात काही खटकलेच तर तोच फार तर त्यावर शंका उपस्थित करू शकतो. उगाच कोणीही आपल्या तोकड्या ज्ञानाच्या जीवावर वा अनुभवातल्या एखाद्या पेशंटचा पाहिलेला आहार तुम्हाला सुचवणार नाही. अर्थात यात त्यांचाही दोष नाही, तुम्हीच विचारले असल्याने ते मदतीच्या हेतूनेच सांगणार, पण यात धोकानुकसान तुम्हालाच आहे. उदाहरणार्थ अमुकतमुक खाणे निषिद्ध असेल तर नेमके कोणी गैरसमजूतीने अमुक तमुक खाणे यात चांगले असते असे लिहिले की मग झाले ना..

काळजी घ्या, शुभेच्छा Happy

जर इथल्या कोण्या एक्सपर्टला त्यात काही खटकलेच तर तोच फार तर त्यावर शंका उपस्थित करू शकतो. उगाच कोणीही आपल्या तोकड्या ज्ञानाच्या जीवावर वा अनुभवातल्या एखाद्या पेशंटचा पाहिलेला आहार तुम्हाला सुचवणार नाही. >>>>>>सहमत.

धन्यवाद !... झंपी, साती, चैतन्य आंग्रे, ऋन्मेऽऽष, उदय, नविन वाचक
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
मा.बो. वरील मते, सूचना वाचून समाधान मिळ्ते ... शेवटी डॉ. चा सल्ला शिरो धा र्य !! ....

१. अँजिओप्लास्टीची औषधे कधीच,

१. अँजिओप्लास्टीची औषधे कधीच, अजीबात, स्वतःहून बंद वा कमीजास्त करू नका.
२. आपली अँजिओप्लास्टी झाली म्हणजे जीवन संपलं असं काही समजू नका. उलट इंजिन ओव्हरहॉल होऊन आलंय, आता नीट चालेल हे लक्षात ठेवा.
३. डायबेटीस हा रक्तवाहिन्या बंद पाडण्याचा आजार आहे. तो संपूर्ण ताब्यात कसा ठेवता येईल ते पहा.
४. विडी सिगारेट तंबाकू (सर्व प्रकारची) संपूर्ण बंद करा. रक्तवाहिन्या बंद करण्यात तो महत्वाचा घटक आहे.
५. रक्त पातळ होण्याची औषधे सुरू आहेत. स्पाँटेनियस ब्लीडिंग उदा. दात घासताना रक्त येणे वगैरे झाल्यास तात्काळ डॉ.ना विचारा.
६. वेळच्यावेळी फॉलॉअपला जा.
७. कोणतेही "गावठी" (आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपथि वगैरे) इलाज करू नका.
८. व्यायाम करायचा आहे. त्यातही महत्वाचे कार्डिओ एक्सरसाईजेस. प्लस श्वसनव्यायाम उर्फ प्राणायाम. लाईफस्टाईल चेंज करणे गरजेचे आहे, ते मनापासून करावेसे वाटले तरच होईल.
९. जेवणाच्या सवयींत बदल करा.
१०. पुन्हा एकदा, गाडीची सर्विसिंग झालेली आहे. मशीन रिपेयर केलंय. मस्त एंजॉय करा, पण पुन्हा गाडी ग्यारेजला लावायची वेळ कशी टाळता येईल हेही पहा.

मी लिहिलेल्या वरील सूचना, विशेषतः व्यायामाबद्दलच्या, अन्जायनाच्या रूटीन तपासणीत ब्लॉक सापडून केलेल्या अँजिओप्लास्टीवाल्यांसाठी आहेत. पोस्ट इन्फार्क्ट (अ‍ॅटॅक येऊन गेलेल्यां)साठी सूचना थोड्या बदलतील. कारण अशा रुग्णांच्या हृदयाच्या स्नायूचा काही भाग निकामी होत असतो. वर सातीअक्कांनी सांगितलंय ना? ते सगळ्यात महत्वाचं आहे.
व्यायामाचे शेड्यूल तुमचे कार्डिऑलॉजिस्टच सांगतील. बहुतेक कार्डिऑलॉजिस्ट्सकडे योगप्रशिक्षक व रिहॅब प्रॉग्राम असतोच. त्याचे सदस्यत्व घ्या.

स्वानुभव......

वडलाची ६१ व्या वर्षी अँजिओप्लास्टी खाली आता ते ७२ वर्षचे आहेत आणि उत्तम तब्येत आहे. मुम्बई बस ट्रेन नी कामानिमित्त एकटे प्रवास करतात.

३ वर्षापुर्वी आपली तब्येत चांगली आहे म्हणुन कुणाला न सांगता रक्त पातळ होण्याची औषधे बंद केली . ६ महिन्यानी फरक जाणवायला लागला. डॉक्टारानी सगळे चेक करुन औषधे घेत नसल्यामुळे अशक्त पणा येत असल्याचे सांगितले . औषधे परत चालु केल्यावर ३ महिन्यात तब्येत नॉर्मल झाली.
तरी कितिही बरे वाटत असले तरी जो पर्यन्त डॉक्टार सांगत नाही तोपर्यन्त औषधे बंद करु नये.