कमीने

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मुळात गाण्यांचे प्रकारच एवढे आहेत, की प्रत्येक प्रकारावर स्वतंत्रपणे लिहीता येईल. त्यातल्या त्यात प्रेमगीत, विरहगीत वगैरेबद्दल बरेचदा बोललं जातं, पण आज ज्या प्रकाराबद्दल लिहीतोय, ते कुठल्या प्रकारचं हे नीटसं माहिती नाही. हे गाणं मात्र पहिल्यांदा ऐकल्यापासून आवडलेलं. इतकं, की त्याचे शब्द एका कागदावर लिहून काढून, सारं पाठ होईपर्यंत घोकंपट्टी करून करून ते वाचलं.

एखादं गाणं आवडलं, तर त्याचे शब्द श्रेष्ठ की धुन असल्या प्रश्नात न पडता, गाण्यातला आनंद घ्यावा असं मला वाटतं. (आळस!) आज इतक्या वर्षांनी पाहिलं, की गाणं लिहीलंय "गुलजारनी", आणि संगीत आहे "विशाल भारद्वाजचं"!

क्या करे जिंदगी इसको हम जो मिले,
इस की जाँ खा गए रात दिन के गिले ||

मेरी आरजू कमीनी, मेरे ख्वाब भी कमीने,
एक दिलसे दोसती थी, ये हुजूर भी कमीने ...

"नुसत्या शब्दांनी तेव्हढी मजा येत नाही बहुतेक!", असं वाटू लागतं, तेव्हाच कुठे तरी असाही विचार डोक्यात येतो, की "कदाचित आपलीच कुवत कमी असेल. शब्दांना सुंदर चाल लावून, सुरेल आवाजात, वाद्यांच्या सहाय्याशिवाय ऐकवलं, तर आपल्यालाच समजू येणार नाही." असं तर नसेल? अशाच विचारात पुन्हा गाणं ऐकू लागतो आणि शब्द आपला ताबा घेतात.

कभी जिंदगी से मांगा, पिंजरे मे चांद ला दो,
कभी लालटेन देके, कहाँ आसमाँ पे टांगो|

जीने के सब करीने, थे हमेशा से कमीने, कमीने, कमीने, कमीने |
मेरी दासतां कमीनी, मेरे रासते कमीने, इक दिलसे दोसती थी, ये हुजूर भी कमीने ||

पार्श्वसंगीत सुरू राहतं, ते आपल्याला विचार करायला वेळ देण्यासाठी. गाण्याचे पुढचे शब्द धडाधड कानावर आदळायला सुरूवात होत नाही. असले शब्द पचायला वेळही लागतोच.

जिसका भी चेहेरा छिला, अंदर से और निकला,
मासूमसा कबूतर, नांचा तो मोर निकला,

कभी हम कमीने निकले, कभी दुसरे कमीने.
कमीने, कमीने, कमीने |
मेरी दोसती कमीनी, मेरे यार भी कमीने,
इक दिलसे दोसती ती, ये हुजूर भी कमीने...

गाणं संपतं, पण आपल्या डोक्यातले विचार थांबत नाहीत. रिपीट मोडवर गाणं ऐकत डोक्यात विचारांची गर्दी सुरू होते.... असे शब्द आणि त्याची चाल. गायक तरी कसा गातोय, जणू ह्या कमीनेपणावर हळूवार प्रेम केल्यासारखा! शब्द समजून घेतल्याशिवाय, इतकं गोड गाणं उमटत नाही. "गोड" की "कडू"? नक्की काय म्हणावं ह्या गाण्याला?

कंपनीतलं काम संपता संपत नव्हतं, आणि आमचा तो जपानी मॅनेजर येड्यासारखा दर तासाला कामाचे स्टेटस विचारी. जपान्यांना देवनागरी समजत नसल्याचा फायदा घेत, ही आख्खी कविता मी एका कागदावर उतरवून डेस्कवर ठेवली होती. शिव्या द्याव्याश्या वाटल्या की एकदा वाचन करावं. झालंच मन मोकळं!

"इतक्या कमी वेळात काम होईल असे म्हणणारा आमचा सेल्सवाला कमीना, ही जबाबदारी अंगावर आमच्या अंगावर टाकणारा आमचा मॅनेजर कमीना. माझ्या घराकडे जाणारी रात्रीची शेवटची ट्रेन खरे तर १२:१० ला असूनही, लवकर निघता यावं म्हणून दुसर्‍या एका ट्रेनचे शेड्युल सांगून ११:४० ची ट्रेन घेणारा मीही कमीना!"

जपानमधल्या फास्ट इंटरनेटच्या जोरावर ट्रेनमध्ये ह्याच गाण्याचा व्हिडीओ पाहणं होतं. काहीकाही गाणी डोक्याचा ताबा घेतात जणू. "उशीर झालांय, जेवणाचे काय?" वगैरे क्षुल्लक प्रश्नांसाठी आता डोक्यात जागा नाही. रात्री उशीराच्या त्या ट्रेनमधे बाजूचे जवळपास सगळे लोक मोबाईलमधे गुंतलेले. आपापल्या राज्यात. मोबाईलवरच्या संवादात. कोणी हसू दाबण्याच्या प्रयत्नात, तर कोणी उसासे सोडण्यात गुंतलेले. त्यातल्याच काही जणांचं, "बाजूच्याने पाहिलं तर नाही ना?" अशा विचारात चेहेरा Straight करून पुन्हा मोबाईल पाहणं सुरूच!

परत गाण्याच्या व्हिडीओकडे लक्ष जातं, आणि डोक्यात नवे विचार - हे गाणं पडद्यावर आणताना दिग्दर्शकानं कलाकारांना कसं समजावलं असेल, जेणेकरून कलाकारांच्या चेहेर्‍यावर नेमके भाव आले असतील? गाण्याच्या परिणामकारकतेमधे, ते गाणं स्लो मोशनमधे शूट झालं असल्याचा कितपत परिणाम असावा? साडेपाच मिनीटांचं हे गाणं, पण त्यात सीन किती विविध प्रकारचे? ह्या प्रत्येक सीनबद्दल दिग्दर्शकाचं म्हणणं ऐकून कलाकारांच्या मनात काय विचार आले असतील? आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या कुठल्या घटनांची त्यांना आठवण झाली असेल? त्या घटनांचा विचार करून मनात कोणते भाव आले असतील? की एखाद्या गोष्टीचं closure झाल्याचं समाधान वाटलं असेल?

शेवटी कलाकारदेखील माणूसच. गोतावळ्यात माणूस स्वतःला हरवून बसतो. प्रवासात एकटेपणा मिळून जातो आणि तो माणसाला त्याच्या स्वतःच्याच जवळ आणू पाहतो. आपली ओळख विसरू देत नाही. प्रत्येकजण स्वतःवर प्रेम करतो.

आपली ओळख एवढी प्रिय? कमीने, कमीने, कमीऽने!

प्रकार: 
शब्दखुणा: 

आवडले.

रच्याकाने, कमीने ची सगळीच गाणी खास गुलजार ट्च असलेली आहेत, एकदम मरासिम टाइप्स वाटतात, साधे शब्द रचनेमधे प्रचंड अर्थवाही होउन जातात.

टायटल साँग आठव
आजा आजा दिल निचोडे, रात कि मटकी तोडे
कोई गूड लक निकालेम आज गुल्लक तोह फोडे
हर दिल दिलदारा मेरा तेलीका तेल
कौडि कौडी पैसा पैसा, पैसे का खेल

किंवा 'पहली बार मोह्ब्बत कि है' घे

थोडे भिगे भिगे से, थोडे लम्हे हम
कल से सोये वोये भी तोह कम है हम
दिल ने कैसी हरकत कि है
पहली बार मोह्ब्बत कि है
आखरी बार मोह्ब्बत कि है

आंखे डुबी डुबी सी सुरमई मध्यम
झिलें पानी पानी है बस तुम और हम
बात बडी हैरत कि है
पहली बार मोह्ब्बत कि है
आखरी बार मोह्ब्बत कि है

हे गाणं नाही ऐकलं मी अजून! आता ऐकते!
असामी, +१ आजा आजा दिल निचोडे मधली आजा के वन वे है ये जिंदगी की गली एक ही चान्स है ही ओळ!

पहली बार मोह्ब्बत कि है >>> +१ असामी! त्यातल्या या ओळी माझ्या खूप आवडत्या आहेत -

ख्वाबकी बोझसे कपकपाती हुई
हलकी पलकें तेरी
याद आता है सब
तुझे गुदगुदाना, सताना यूँही सोते हुए
गालपे टिपना, मिंचना बेवजह बेसबब
याद है...

अगदी गुलजार टच!

व्वा !!

आधी च्या काळी गुलजार आणि पंचम होते....आता पंचम ची जागा विशाल भारद्वाज नी घेतली आहे. गुलजारांचे हेच वैशिष्ट्य आहे की कथेतील पात्राची एकंदर पार्श्वभुमी लक्षात घेउन, ती व्यक्ती कशी बोलते, काय शब्द वापरते
या चा विचार करुन त्या अंगाने गुलजारांचे शब्द तरल पणे उमटतात. Happy

असामी, तुमच्या अक्ख्या पोस्टीला +१०१ % अनुमोदन.
त्याच गाण्यातील शेवटचे कडवे पण किती चमत्कृती पुर्ण असुन ही मस्त आहे, तरल-हळुवार आहे...

......याद है, पीपल के जिसके घने साये थे...
हम ने गिलहरी के सुखे मटर खाये थे....

ये बर्कत उन हजरत की है...
पहली बार मोह्ब्बत कि है
आखरी बार मोह्ब्बत कि है

कमिनेची सगळीच गाणी मला अतिशयच आवडतात…. एकूणच विशाल भारद्वाज - गुलजार ( एकत्र आणि एकेकटेही) माझ्या कमालीचे आवडीचे विषय.
कमिनेच्या सगळ्याच गाण्यात गुलझार सिग्नेचर दिसते, मग तो 'लालटेन' सारखा शब्द असो, किंवा 'जो भी सोये है खबरोमे उनको जगाना नही' सारखी ओळ असो.
जमिन पाण्यावर तरंगतीये (बंटी आणि बबली मधलं चुप चुपके) किंवा ढगांवरती जिने (वीर मधलं गाणं) ह्या गुलझारच्या fantacies असाव्यात असं मला वाटतं. अशीच एक fantacy कमिनेत दिसते ती म्हणजे ' को चाल ऐसी चलो यार अब के, समुंदर भी पुल पे चले'… क्लासीक गुलझारीश टच !

मागे एकदा बेकरीवर विशाल भारद्वाज दिग्दर्शक म्हणून आणि संगीत दिग्दर्शक म्हणुन अशी चर्चा झाली होती. त्याने दिग्दर्शीत केलेल्या सिनेमात विशाल भारद्वाजला संगीत दिगदर्शक म्हणून वेगळा काढणं अवघड आहे… कमिने हे असं एक उदाहरण.

ह्या गाण्याचं पिक्चरायझेशनचं श्रेय माझ्यामते दिग्दर्शकाला आणि एडिटरला… कारण हे विविध घटनांचं/शॉट्स चं मिश्रण आहे, आणि ते झकास जमलेलं मिश्रण आहे .

असाच फील असणारं स्टाईकर मधलं गुलझार - विशाल भारद्वाज गाणं म्हणजे
और फिर यू हुवा,
रात एक ख्वाब ने जगा दिया
फिर यु हुवा,
चांद की वो डली खुल गयी
और यु हुवा,
ख्वाब की वो लडी खुल गयी
चलती रही बेनुरिया,
जलते रहे
अंधेरोंकी रोशनी के तले
फिर नही सो सके, एक सदी के लिये हम दिलजले

गुलझार, विशाल भारद्वाज…. आणि टोटल खल्लास गाणं !!!!!!

छान लिहल आहेस.
पहेली बार मोहोब्बत की है आवडत आनि जवळच (स.प मधे शुट केल्यामुळे ) गाण कमीने मधल. Happy

अप्रतिम लिहिले आहेस! खूप दिवसांनी काहीतरी इतके पट्कन आवडले.
गाणे आवडीचे आहे ते तर झालेच पण त्याभोवतीचा तुझा लेख बेश्ट!

ऋयाम, कित्ती दिवसांनी???

मस्त लेख लिहिला आहेस. गाणं आवडीचंच. पण तुझ्या लेखामुळे पुन्हा एकदा ऐकलं.

कमीनेमधलं "पहली बार मोहब्बत" खूप आवडीचं म्हणून चिक्कारदा ऐकलं. त्या मानानं हे गाणं जरा साईडलाईन झालेलं. आता हे लूपमध्ये वाजतंय.

धन्यवाद! Happy

>ह्या गाण्याचं पिक्चरायझेशनचं श्रेय माझ्यामते दिग्दर्शकाला आणि एडिटरला… कारण हे विविध घटनांचं/शॉट्स चं मिश्रण आहे, आणि ते झकास जमलेलं मिश्रण आहे .>
बरोबर! बघताना वाटलं होतं, लिहीताना राहून गेलं.