AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषचे पुढचे येणारे विषय/ धागे.

१) सई आणी क्लासमेट्स

२) शाखा आणी बुन्धे

४) लग्नसन्स्था व त्याचे परीणाम

५) गर्लफ्रेन्ड आणी तिची मते

६) पाकीस्तानचा राष्ट्रीय दिन व त्यातली चीनच्या अध्यक्षान्ची मते

७) मायबोली वरच का लोक जास्त आहेत? आणी नसल्या इतर सन्स्थान्वर ते का नाहीत?/ आहेत?

८) मराठी मुलीनी घराबाहेर किती वाजेपर्यन्त असावे?

९) असे असन्ख्य लोकसन्ख्या वाढीनुसार वाढणारे ऋन्मेषचे बाफ.:दिवा:

ओ होळीला बोंब मारली की काळी शक्ती कशी बाहेर निघते आणि चैतन्य लहरींनी आसमंत कसा व्यापून जातो याचे animated चित्र नाही का बघितले तुम्ही? त्या चित्रावर क्लिक केलं नसेल तर क्लिक करा, तेवढं केलत तरी १०% अध्यात्मिक पातळी वाढते.

आगाऊ फारच फास्ट निघाले. अध्यात्मिक पातळी चटकन वाढणार त्यांची. अभिनंदन.

रश्मी, नाही हो, उलट मी इतकी संयमीत, छोटीश्शी, शॉर्ट पोस्ट टाकली आहे ना की बस्स! होऽ, अन त्यात पॅरॅग्राफ्स, अर्थात परिच्छेदही सोडले आहेत. Happy

मृण्मयी, धन्यवाद.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्यगायन करण्याची प्रथा आहे. - See more at: http://www.sanatan.org/mr/a/574.html#sthash.zInrVZoE.dpuf>>>> नेक्स्ट टाईम ए आय बीला होळीचा मुहूर्त साधायचा सल्ला देऊ, म्हणजे संस्कृतीरक्षक सुखावतील.

अश्चिग +१
ज्यांना हा कार्यक्रम आवडला त्यांच्याबद्दल आणि ज्यांना आवडला नाही त्यांच्याबद्दलही आदर आहे. कारण असले कार्यक्रम आवडणे किंवा न आवडणे व्यक्तीसापेक्ष आहे. मी कोरावर ट्रेंडिंग होता म्हणून जेमतेम पाहिला. नाही आवडला. AIB चा जुन्या जाहिरातींचा विडीयो खूप आवडलेला पण इतर शिव्यागाळ वालेच होते.

रोस्ट मिनिंग गुगल केले तर त्याचा एक अर्थ
3. NORTH AMERICAN informal
tease in a good-natured way.

असा येतो. याशिवाय अजून काही याचे अर्थ असतील तर मला ते माहित नाही. या नंतर मुद्दाम मी जेम्स franco चा रोस्ट पाहिला. पण या AIB मध्ये जे काही होतं ते खरंच मला आवडले नाही. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची कॉपी करायची असेल तर किमान इथलं पब्लिक काय आहे ते बघायला हवं. आणि १८+ आणि मच्युर व्यक्ती मध्ये फरक आहे हेही समजायला हवं. हा पहिलाच प्रयोग होता आणि त्यांना अपेक्षित पब्लिसिटी पण मिळाली.

टीवीवर नाही आला पण म्हणून युट्युब कोणीच पाहत नाही अस नाहीये. पण काहीकाही गोष्टी खरंच कहर होत्या. मुस्लिम संताकोल्ज काय, दीपिकाने TOI प्रकरणात एवढा आवाज केला आणि… म्हणजे काहीही! ठीके. मला नाही आवडला पण काही लोकांनी या कार्यक्रमामुळे जो एक stand बनवलाय तो कमाल आहे.

या शो मुळे
१) अमुक एका गोष्टी बद्दल माझं अमुक एक मत असेल तर मी कूल आहे कि अनकूल हे ठरवणं आणि
२) मला एक गोष्ट आवडली/ नाही आवडली म्हणून तिला डोक्यावर घेणं / जमेल तेवढ्या सोशल साईट्स वर बोल्ड आणि कॅपिटलने निषेध करणं.

हा प्रकार भयंकर वाढलाय. याआधी होताच पण फेबु, कोरा, ट्वी, सगळी कडे हेच. मायबोलीवर सुद्धा काही ठिकाणी जाणवलं असं.

इथे मला जे म्हणायचे आहे, अश्या आशयाच्या पोस्टची लिंक देतेय. http://qr.ae/Bh9Fj घरात गेली २ - २.५ वर्ष टीवी नसल्याने युट्युब वर बातम्या नाहीतर डॉक्युमेंटरीज किंवा काही ट्रेंडिंग गोष्टीच पाहिल्या जातात. त्यामुळे ते कॉमेडी नाईट / सर्कस वगरे शोज वर काय चालतं ते कॉलेज मध्येच कळतं.

AIB टीम ने त्यांच्याकडून केलेला खुलासा -

“I may not agree with you, but I will defend to death my right to get offended. How dare you? Baahar mil.” – Desi Voltaire

Dear everyone,
Let’s just all take a deep breath. They’re just jokes. Unfunny, crass or whatever you want to call them, they’re still just jokes. The AIB Knockout video has been taken down. While we’d love to claim that it’s because so many people watched it that it broke YouTube, the truth’s a little sadder.

First things first; no one person or force forced us to take this video down. This is not something that’s happened because of a 3 am phonecall or a morcha at our front door or a gunman on a grassy knoll. Under the circumstances, this is us being pragmatic. Allow us to explain.
People who’ve been following our work will know that we’ve always tried to experiment with content be it on Youtube or a live comedy show, with the sole intent of making people laugh and/or think. AIB Knockout was another such attempt to try something new and bring the roast format to a country where celebrities aren’t often known to laugh at themselves. To our pleasant surprise, we managed to bring together consenting adults who were willing to be made fun of by other consenting adults in a crowd full of (wait for it) consenting adults. And if we’re honest, it was a phenomenally entertaining evening. Were the jokes repetitive? Crass? It didn’t matter because they happened in the spirit of irony and good humour. It was just liberating to be able to say those things, things that people have thought in one form or another privately for years. A lot of the laughter that night came from that spirit (there’s your answer, people who wondered why everyone was laughing at terrible jokes).

The video came with a clear disclaimer with several age and content warnings. No one was forced to watch it, we didn’t buy airtime on every single TV channel on Earth to broadcast it. YouTube videos do not magically auto-play in front of you. And yet the videos got over 8 million views. Far more importantly, on the video page, the people who liked them outnumbered the people who disliked them by ten times to one. Yes, ten times.

The format was the same as any international roast i.e. insult comedy, delivered in the form of one-liners designed to be as rude as possible. It is performed with the understanding that none of the material is to be taken seriously—none of the performers actually mean the “offensive” things they say to each other on the night. We clarify this simply to provide context.

With the Knockout, in our own juvenile, idiotic way, we wanted to push the envelope of comedy in this country. But then the envelope pushed back. Things got to a point where people who have supported us, people who work hard to make what we do come to life, were put in a position where things could get deeply unpleasant for them. And that’s a problem. We can live with abuse, hate, anger, fury, rage, ignorance, bigotry and perhaps even bullying. But we don’t want anybody to get hurt because of us. And we do mean anybody.

We hope it’s clear by now that we never write with the aim of hurting people. That’s not our goal and we daresay that no comedian ever does that. We don’t go to work and say, “Hmm, let’s offend XYZ people from XYZ community today.” If we really wanted to piss off people and hurt them, we’d be selling credit cards over the phone.

Our job is to raid the newspapers, pop culture and life for observations and analogies and it’s okay if you think we’re juvenile or unfunny. We respect arguments that are critical, and as for the arguments we don’t, we respect your right to make them without impediment. It is a courtesy we wish worked both ways.

Over the last few days, we’ve found ourselves subject to more scrutiny, judgment and opinion than we’re worth. This Knockout shouldn’t matter. In a secure culture it wouldn’t matter.

We’re lucky to have support pouring in from all quarters. First up, from our fans, just the greatest people in the world, who have nothing but good cheer and encouragement and positive thoughts. We were pleasantly surprised that people in power who we have made fun of in the past, including people from both the so-called right wing and left-wing, went out of their way to convey support to us. It was fantastic to know that they stand for free speech as much as us. Friends in the media have told us to stay our course, pledging their support for our right to say anything, no matter how ridiculous. Thank you to anyone who has stated in the last few days that we have the right to say what we want, not as comedians but more importantly as citizens of this country.

There’s a larger cultural conversation going on here, where we’re at the very edges of what it’s okay to say. And it’s a conversation we need to have now because the world we live in is entirely too complicated to be run by silences. We still stand by our belief in the right to absolute freedom of expression for us and for anyone who has anything to say about anything at all. We hope to be part of an environment that supports that sort of expression without fear of persecution, intimidation and most importantly, annoyance. As always, in our own AIB way we’ll continue to strive towards creating that very environment.

In the meantime, we’d like to say thank you to our fans and everyone else who is standing by us. You guys make the struggle worth it. To everyone railing against us and against the stars that were present, to everyone who’s decided we’re destroying the fabric of our culture, to everyone who’s called us seditious pornographers while plotting the downfall of Indian Values And Civilization As We Know It, we would like to reiterate that we are just a bunch of comedians who work, and have always worked, without any malicious intent whatsoever.

We encourage any and all conversation on the subject of freedom of expression, for our own silly selves, and for people better, smarter and more courageous than us. For hundreds and thousands of artists, commentators and any and all citizens that do not have the privilege of social platforms and reach that we do.

We are also cooperating with the authorities and hope to resume normal service soon. We’d like some sort of cheerful resolution to this so we can focus on more important national issues, like the upcoming Cricket World Cup.

P.S. Best of luck Virat Kohli. Sorry for the jokes. We love you.

P.P.S. It’s a good thing nobody’s downloaded the file and put it on a torrent website or anything.

झरबेरा, तुझ्या मताबद्दल धन्यवाद.

ज्या वयोगटाच्या "संस्कारांबद्दल" आणि "मानसिकतेबद्दल" बोंबाबोंब चालू आहे, त्या गटापैकी एका व्यक्तीचं मत म्हणून हे मलातरी फार महत्त्वाचं वाटतंय. "मराठी मुलगी" असूनदेखील इतकं स्पष्ट, प्रांजळ, प्रामाणिक मत असल्याबद्दल, ते इथं इतक्या व्यवस्थित लिहू शकल्याबद्दल तुझं कौतुक!! जियो..

ते वरती प्रशूने इतके इंग्रजी रोमनमधे काय खरडलय? मायबोलि मराठीत, गेला बाजार हिंदीमधे नसल्यामुळे अनुल्लेख करण्यावाचून पर्याय नाही.
शो इंग्रजीमधुन केला होता का? शोमधील जोक्स इंग्रजीभाषेतून मारले होते का? तसे नसेल, तर खुलासा तरी इंग्रजीमधे का? तो का नाही हिंदीमधे केला? की "लिगल सोईची" म्हणून इंग्रजी बरी पडते? का असल्या भिक्कार शोचे समर्थक निम्मेअर्धे इंग्रजाळलेले म्हणून त्यांच्या सोईकरता इंग्रजीत खुलासा?
पण मग असे असेल, तर आख्खा शोच इंग्रजीमधे का नाही केला? सगळी शिवीगाळ/अश्लिल की कायसेसे/गलिच्छ वगैरे इंग्रजीतच बोलायचे होते ना! धन्द्यापुरती तेवढी हिंदी का वापरली? अन खुलाशाकरता मात्र इंग्रजी? हे गणित कळले नाही, पटले तर अजिबात नाही!

शो इंग्रजीमधुन केला होता का? शोमधील जोक्स इंग्रजीभाषेतून मारले होते का?>>> हो. जिथं हिंदी शब्द वापरले तिथं इंग्रजी सबटायटल्स पण दिले.

अरे ऋन्मेष, शो इंग्रजीतून होता, तर मरु दे ना तिकडे, काहीही बडबडूदेत ना त्या परकीय भाषेत.... काय फरक पडतो? Lol Proud
उलट तू तर असे म्हणायला पाहिजेस, अन तू म्हणले नाहीस तर अनेकजण पुढे येतिल म्हणायला की ना, इंग्रजी भाशेतील सौंदर्यपूर्ण शिव्या जर इथे प्रचलित झाल्या तर त्यामुळे देशी भाषांचा फायदाच होईल, अन अशा शिव्यांच्या त्या माहित झाल्यावर केलेल्या वापराने या देशी भाषा "समृद्धच" होतिल. Proud

@नंदिनी
तुमच्या पोस्टला उत्तर देण्याआधीच अजून ७-८ पोष्टी आल्या आणि माझी पोस्ट मागच्या पानावर गेली.
तुमचाही मुद्दा पटला संस्कृतीचा. Happy

आवडला कि नाही आवडला ते सांगा. बस. मग अजून त्यात संस्कृती आणि आदर्शवाद घालून काहीच अर्थ राहत नाही. मला हा फरक खूप जाणवला आणि हा stand खूप वाईट आहे कारण "ज्या वयोगटाच्या "संस्कारांबद्दल" आणि "मानसिकतेबद्दल" बोंबाबोंब चालू आहे" तश्या या आमच्या वयोगटात चुकीचे समज पसरायला वेळ नाही लागत. (मैत्रीखातर सिगरेट पिणे हि शुल्लक गोष्ट आहे जी या stand ला लागू पडते. हे फक्त एक उदाहरण आहे.)

काहींना रात्री ९ नंतर आणि काहींना सकाळी ११ पर्यंत प्रतिसाद देण्याची सोय बंद ठेवावी.

झरबेरा, अतिशय स्पष्टपणे इथे व्यक्त झाल्याबद्दल तुला शाबासकी!
तुझ्या पोस्टी, विशेषतः दुसरी पोस्ट, अतिशय आवडल्या.
<<आवडला कि नाही आवडला ते सांगा. बस.>> +१.

झरबेरा, रोहीत सारख्या मुलांचे विचार वाचुन अतिशय समाधान वाटत आहे. पालक म्हणुन वाटणारी काळजी थोडी कमी पण होत आहे. जियो पुत्तर!!!

काल इथे एक मुद्दा आलेला, त्या शो मध्ये आईचा अपमान झाला की नाही....

दुर्दैवाने आपल्याला समजत नाही, पण आईबहिणींवरून ज्या शिव्या त्या कार्यक्रमात सहजतेने वापरल्या जात होत्या त्या आईबहिणींचा अपमानच असतो.

>>>> दुर्दैवाने आपल्याला समजत नाही, पण आईबहिणींवरून ज्या शिव्या त्या कार्यक्रमात सहजतेने वापरल्या जात होत्या त्या आईबहिणींचा अपमानच असतो. <<<<
अरे बाबा, शिव्या देणार्‍या अन घेणार्‍यांच्या आईबहिणींचा अपमान असेल तर असेल तो, तेही त्यांनी मानला तर, मग बाकीच्या प्रेक्षक/श्रोत्यातील व अन्य आयाबहिणींना अन पुरुषांना त्याच्याशी काय घेणदेण असायला हवय? कशाकरता? व्यक्तिस्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याच स्वातंत्र्य आहे.... नै का?

अन काय हे ऋन्मेष, इतके सगळेजण सांगतात तरी तुला कळत कसे नाही की >>>शहानिशा, analysis, संस्कार असले सगळे पुचकट प्रकार कशाला <<< हवेत?

अन हा गुगल केलेला अर्थ बघतोस ना?
>>>> रोस्ट मिनिंग गुगल केले तर त्याचा एक अर्थ 3. NORTH AMERICAN informal tease in a good-natured way. <<<

तर >>> informal tease in a good-natured way<<< यातिल गुड नेचर वे मधे त्या शिव्या बसत असतील तर तुला कशाला हव्यात चौकशा/शहानिशा/अ‍ॅनॅलिसिस अन संस्कार वगैरे? नै का? Proud

limbutimbu पूर्ण शो इंग्लिश मध्ये होता. सर्व शिव्या ही इंग्लिश मध्ये होत्या. आणि शिव्या म्हणजे काय, आपल्या नेहमीच्याच परिचयाच्या, फ़क्त इंग्लिश मध्ये.

इंग्रजी रोमनमधे काय खरडलय>>>>>> AIB च्या फेसबुक पेज वर AIB टीमने या आरो-प्रत्यारोपांसंदर्भात केलेला खुलासा आहे.

प्रशू, माझ्या सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने पण मला इंग्रजीतील एखाद दोन शिव्या वगळता बाकी शिव्या माहित नाहीत. अन ज्या एखाददोन माहित आहेत, त्यांचे नेमके अर्थ माहित नाहीत, बस्स, ही शिवी आहे इतकेच कळते. Proud

अन मराठि/हिंदीतील शिव्या थोड्याफार माहित असल्या तरी देण्याची हिम्मत होत नाही.

काय करणार? संस्कारच तसे आहेत ना?

नै तर ते बाकीचे बरेचजण जाहिररित्या करतात म्हणून आपणपण करुन बघाव अशी अनुकरणाची षोडशवर्षीय उतावीळ वृत्ती वाढत्या वयातही कायम राहून मी देखिल सर्रास शिव्या/अश्लिल बोलू लागलो असतो.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतोय, या चालीवर, कोण कुठे कसे शिव्याशाप देते याचे दु:ख नाहीये, पण असंख्य सामान्य जनांनी "अनुकरण" करावेच करावे या पद्धतिने अशा त्याज्य गोष्टींचा सर्रास मारा होत आहे त्याचे वाईट वाटते. असो.
कलियुग आहे, कोणत्याही गोष्टीला "प्रतिष्ठा, पैसा, अन प्रसिद्धी" मिळवून देण्याचे सामर्थ्य कलियुगातील "मानवात" आहे, तेव्हा हे असेच चालणार, हे असे चालणार, अन क्रियेला प्रतिक्रिया या न्यायाने त्याला विरोधही होणार हे सुनिश्चित.

मीही पाहिला तो कार्यक्रम . मलाही आजिबात आवडला नाही . पण त्याचबरोबर बंदी आणणे वगैरे ही अयोग्यच आहे .

फक्त माझी एक शंका आहे , तिथे रोस्ट व्हायला आलेले नसणार्यांबद्दलही बरच अश्लिल बोलल गेल (फरिदा जलाल , रीमा लागू , विराट) वगैरे . ते लोक या लोकाना कोर्टात खेचू शकतात का ?

लिंबू, हे सगळे फार उच्च दर्जाचे आहे व अनुकरणीय आहे असे येथे फारसे कोणी म्हणत नाहीये. पण त्यांनी ते सादर केले आहे, ते कसे केले आहे हा त्यांच्या व तेथील प्रेक्षकांचा प्रश्न आहे. ते कायद्यात बसत असेल तर ज्यांना ते आवडत नाही त्यांनी इग्नोर मारावे.

मला नाही वाटत केवळ ऋन्मेष ने हा धागा काढला म्हणून त्याचे गांभिर्य कमी होते .
हाच धागा कोणत्या प्रतिष्ठित आयडी ने काढला असता तर लोकानी " हम तुम्हारे साथ है" वाले नारे देत भरभरून चर्चा केली असती .

मन्जुतै + १०००० , पण म्हनून हा धागा टवाळकीचा विषय होत नाही .>>>>>>>>>>सहमत.

अन मराठि/हिंदीतील शिव्या थोड्याफार माहित असल्या तरी देण्याची हिम्मत होत नाही.>>>>

महित आहेत, याचा अर्थ आजुबाजुला ऐकुनच माहित झाल्या असतील ना? पण जसे आपण म्हणालात, संस्कार असल्यामुळे त्या देण्याची हिम्मत होत नाही. याचा अर्थ शिव्या देणे वा ना देणे हे त्या व्यक्तिवर अवलंबून आहे. फक्त AIB टीमने असे शब्द वापरले याचा अर्थ सर्व तरुणवर्ग अश्या गोष्टी अंगीकारेलच असे नाही.

महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आया - बहिणींच्या शिव्यांवरूनच मैत्रीतला सच्चेपणा ठरवला जातो. आणि तिकडचे लोक हा आपला 'अभिमान' असल्यासारखे, जगात भारी... म्हणून ही गोष्ट मिरवतात. आणि या अस्सल, मराठमोळ्या शिव्या (ज्या पांढरपेशा समाजात ban आहेत) त्या आपण ऐकून घेतो. याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्र ही गोष्ट थोड़ीच अंगीकारतो?

म्हणजे आपल्याला मराठी शिव्या चालतात फ़क्त इंग्लिश शिव्या चालत नाहीत, असे आहे का?

Pages