AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो शो अपरिपक्व मुलांसाठी / मनांसाठी नव्हता. तसं अनेकदा स्पष्ट केलं गेलं होतं.
अपरिपक्व मुलांवर (त्यांना हवे ते) संस्कार करण्याची जबाबदारी केवळ पालकांची आहे.

आणि समाजातले हिरो लोक (सर्व प्रकारचे) जेंव्हा त्याची भलावण करतातत तेंव्हा अपरीपक्व मुलांना, मनांना चुकीचाच संदेश दिला जातो. > >आभा, एक जबाबदार पालक म्हणून इथे पालकांची जबाबदारी येतेच ना कि कुठल्या गोष्टी मुलांनी कधी accept करायच्या ह्याबद्दल शिकवणे. वर तुम्हीच म्हटल्याप्रमाणे गोष्टी relative आहेत म्हटल्यावर कुठली गोष्ट ग्लॅमरस आहे नि कुठली नाही हे पण बदलतेच राहणार. रोस्ट एव्हढेच किंवा अधिक आक्षेपार्ह गाण्यांचे शब्द सरास असतात नि ते मुलांनी उचलेले आहेतच. तिथे त्यांना समजवण्यामधे जे काही येते तेच रोस्ट्बद्दलही आहेच.

>>> चिनूक्स | 4 February, 2015 - 22:08

तो शो अपरिपक्व मुलांसाठी / मनांसाठी नव्हता. तसं अनेकदा स्पष्ट केलं गेलं होतं.<<<

१. अश्या मुलांची आणि मनांची व्याख्या......

२. असे शो होण्याची काही फार प्रचंड गरज आहे का?

चित्रपटातील गीते अप्राप्य व स्वप्नमय असतात इतके कळण्याचे मुलांचे वय असते. ज्ञानही असते.

समोर चाललेले संवाद प्रत्यक्ष आयुष्यात चाललेले आहेत हेही समजण्याचे त्यांचे वय असते. ज्ञानही असते.

सोनाक्षी होती की तिथे.. "अर्जुन इज नॉट अलाउड टु टच कार्ब्स" जोक तिच्यावरच होता ना Lol

अपरिपक्व मुलं / मनं - वय वर्षं १८च्या खाली आणि ज्यांच्या भावना दुखावू शकतात असे.
असे शो न होऊ नयेत, असं तुम्हांला का वाटतं? हा शो बघून मला मजा आली. माझ्या भावना वगैरे दुखावल्या नाहीत. या शोची गरज नाही, असं मला वाटत नाही.
कोणाला कशाची गरज हे तुम्हीआम्ही कसं ठरवणार?

मी ऑफिसातून निघालो आणि धागा पेटला. काही माझ्या मुद्द्यांसंबधित उत्तरफेक करतो. Happy

मी हा शो का पाहिला? वर कोणी म्हटल्याप्रमाणे मी स्वत: "मी नाही त्यातली आणि..." हा प्रकार आहे का?

सर्वप्रथम म्हणजे हि म्हण जरा घाण अर्थाची आहे. एकेकाळी ऑर्कुटवर असताना एका सभासदाने एका महिला सभासदासाठी वापरल्याने गदारोळ झाल्याचे आठवतेय. तर ते असो.
मी मागेच एका धाग्यावर लिहिले होते - मी एक कमालीचा वाह्यात मुलगा आहे - आता पुन्हा हेच बोल्डमध्ये लिहितोय. हे वाचून येथील लोकांना माझ्या या धाडसाचे आणि प्रामाणिकपणाचे प्रचंड कौतुक वाटू लागले असेलच. मला स्वताला कोणी माझ्यावर विनोदच काय घाण घाण शिव्या घातल्या तरी काही फरक पडत नाही. वाटल्यास भ ची बाराखडी ट्राय करून बघा. मी स्वताही माझ्यावर काहीही विनोद करू शकतो. तसेच जर हे आमच्या वाह्यात मुलांच्या ग्रूपमध्येच घडत असेल तर तिथे कंबरेखालचे, कंबरेवरचे असा भेदभावही आम्ही ठेवत नाही.

त्यामुळे त्या शोबद्दल ऐकताच माझ्यासारख्या वाह्यात मुलाला उत्सुकता वाटणे साहजिकच होते. त्यातले विनोद मी व्हॉटसपवरच्या ग्रूपवर एंजॉयही करतो आणि फॉर्वर्डही करतो. पण हा शो बघताना मला लिटरली एक किळसयुक्त भिती वाटली. हे काय घडतेय. हा प्रकार असा चव्हाट्यावर आणण्यात कसली हिम्मत आहे. आजूबाजुचे जग किती सभ्य आहे वा असभ्य आहे हे काही सभ्यतेच्या निकषांवर ठरवले जाते. असभ्य वर्तन करणार्‍यांवरही त्या निकषांचा एक अंकुश असतो, आणि तो कितपत आहे यावर समाजाची सभ्यता टिकून राहते. तोच मोडीत काढला तर गेम ओव्हर.

इथे आक्षेप आहे या प्रकाराचे ग्लोरीफिकेशन करायचा जो प्रयत्न चालू आहे त्यावर.. आणि आता तर मला ज्याची भिती वाटत होती तेच होतेय.. इथे लोकांना त्या कलाकारांनी जे केले ते फार धाडसाचे वाटू लागले आहे, त्याचे कौतुक वाटू लागले आहे. हि सुरुवात आहे, कारण येणारी पिढी हि लहान मुलासारखी असते, तुम्ही ज्या गोष्टीचे कौतुक कराल तीच जास्त जोशात आणि जास्त प्रमाणात ते करणार.

मित्रांनो प्लीज, करण जोहार, अर्जुन कपूर, रणवीर सिंग वगैरेंना आधुनिक समाजसुधारकांचा दर्जा देऊ नका!.. त्यांच्या नावापाठी ग्लॅमर आहे म्हणून तुम्हाला आज कौतुक(!) वाटतेय, अन्यथा राखी सावंतने हेच केले असते तर तुमची मते वेगळी असती.. किंबहुना सी ग्रेडच्या सेलिब्रेटींनी हे केले असते तर मला फारशी चिंता वाटली नसती पण या कलाकारांच्या ग्लॅमरला भुलून आता हा प्रकार पसरणार याची मला जास्त भिती वाटतेय.

सिरीअसली, आणि यांना हे ग्लॅमरही यांना आपणच दिले आहे. कोण आहेत हे वरचे. चंदेरी दुनियेतले कलाकार. बस्स. जे चित्रपटांमध्ये स्वत:साठी काम करतात, देश वा समाज घडवायला नाही.

सुशांत - शाहरूख इथे असता, वा भविष्यात आला, तर मी नक्कीच त्याचा चाहता राहणार नाही हे नक्की! मी अंध चाहता नाही! त्याच्यातही बरेच दुर्गुण आहेत, जे मी स्विकारतोच. पण बॉलीवूड सुपरस्टार या नात्याने त्याला कित्येक युवा युथ आयकॉन म्हणून बघतात आणि तोच असा आदर्श ठेऊ लागला तर त्यापेक्षा मोठा गुन्हा नाही.

डान्स बारची अन या शो ची तुलना?? डान्स बारमध्ये होणारं "एक्सप्लॉयटेशन" कुठे दिसलं यात?

हो मग जरून त्याचा निषेध करा, मुलांना चूक-बरोबर काय ते नीट समजावा. सगळ्या जगाने तुमचं म्हणण ऐकावं म्हणून प्रयत्नही जरूर करा, पण बेकायदा अरेरावी / संस्कृती पोलिसिंग करू नका (तुम्ही करताय असं म्हणत नाहीये, जे करतायत किंवा करत असतील त्यांना) आणि आपल्यापेक्षा वेगळी मतं असली तर आदर करा इतकंच.

बेफी, हा कार्यक्रम कुठे युट्युब, डेलीमोशन किंवा अजून कुठे मिळाला, तर बघा, नाहीतर त्यावरचे न्युज, रिव्ह्यूज वाचा. तुम्ही काढत असलेला अर्थ आणि ह्या कार्यक्रमाचे स्वरुप अतिशयच वेगळे आहे..निदान त्याचे ट्रेलर्स तरी बघा युट्युबवर.. मग तुमचे मत कळवा. आणि हो, ते रसेल पीटर्सचे शोजपण बघा जमल्यास.

अपरिपक्व मुलं / मनं - वय वर्षं १८च्या खाली आणि ज्यांच्या भावना दुखावू शकतात असे.<<<

निर्भया प्रकरणात एक आरोपी ह्याहून लहान होता. त्यामुळे हे मत माझ्यापुरते बाद!

असे शो न होऊ नयेत, असं तुम्हांला का वाटतं?<<<

व्हायलाच हवे आहेत का असे माझे म्हणणे आहे. आपण कलाप्रांताच्या त्या दुर्गम कोनाला पोचलो आहोत का जेथे इतर सर्व कलाविष्कार यशस्वीरीत्या करून आणि जगभर गाजवून आपण कंटाळलेलो आहोत?

हा शो बघून मला मजा आली. <<<

ओके

माझ्या भावना वगैरे दुखावल्या नाहीत. <<<

ज्या शोवरील धाग्यावर कोणी फरिदा जलाल आईसमान मानण्याच्या लायकीची नाही असे म्हणण्यात येते त्या शो मुळे माझ्या भावना दुखावतात.

या शोची गरज नाही, असं मला वाटत नाही.<<<

सगळ्यात जास्त गरज कशाची आहे असे तुम्हाला वाटते असे विचारले तर काय उत्तर द्याल?

कोणाला कशाची गरज हे तुम्हीआम्ही कसं ठरवणार?<<<

हे आपण मायबोलीवर तरी कशाला ठरवतो मग? हे फक्त एक उदाहरण झाले. कलाकाराने अभिरुची उंचावावी इतके तरी मान्य आहे का?

सानी,

अगदी!

मी कार्यक्रम पाहिलेलाच नाही. त्यामुळे माझी मते वाचण्याच्याही पात्रतेची नसतील हे मी पहिल्याच प्रतिसादात गृहीत धरलेले आहे. Happy

त्यामुळे मी फक्त त्यांनाच उत्तरे देत आहे जे माझ्या प्रतिसादांवर काही लिहीत आहेत. जे इतर काही लिहीत आहेत त्यांना उद्देशून मी काहीच म्हणत नाही आहे. Happy

त्यामुळे त्या शोबद्दल ऐकताच माझ्यासारख्या वाह्यात मुलाला उत्सुकता वाटणे साहजिकच होते. त्यातले विनोद मी व्हॉटसपवरच्या ग्रूपवर एंजॉयही करतो आणि फॉर्वर्डही करतो. पण हा शो बघताना मला लिटरली एक किळसयुक्त भिती वाटली. हे काय घडतेय. हा प्रकार असा चव्हाट्यावर आणण्यात कसली हिम्मत आहे >> म्हणजे थोडक्यात आम्ही लपून छपून केले तर ठीक आहे पण त्यांनी तेच चव्हाट्यावर केले तर ते glorification झाले असे ? ह्यात त्यांची हिम्मत कि आपला भेकडपणा हे ज्याने त्याने ठरवावे.

Chinux, sorry for not typing in Marathi but my speed is very slow and I tried for two posts.
As a mother, I honestly feel 18 is not the age to be totally mature. Kids are under tremendous stress and peer pressure. The definitions of in things change very rapidly and no matter how much a parent tries, temptations are always there. ( My experience as a student councillor) It's very difficult to keep oneself away from these temptations. So Aasami I don't wish to deny my responsibility as parent, and precisely hence I am objecting these events. And also please note, I am not talking about those chosen few but about majority of kids.
My point is related to only and only young generation of my country simply because these kids are raised in a way when they are emotionally and pschycologically very much dependent on their families. I have been living outside India for last 15 years and can very well feel the difference between different cultures. Also I honestly believe that no parent from any culture would encourage or accept abusive language from kids.

मी कार्यक्रम पाहिलेलाच नाही. त्यामुळे माझी मते वाचण्याच्याही पात्रतेची नसतील हे मी पहिल्याच प्रतिसादात गृहीत धरलेले आहे. >> असं नाहीये.. पण तुम्हाला त्याचा अगदी वेगळा अर्थ लागलाय हे जाणवतेय.. Happy

त्यामुळे मी फक्त त्यांनाच उत्तरे देत आहे जे माझ्या प्रतिसादांवर काही लिहीत आहेत. जे इतर काही लिहीत आहेत त्यांना उद्देशून मी काहीच म्हणत नाही आहे.>>> हे मान्य Happy

<निर्भया प्रकरणात एक आरोपी ह्याहून लहान होता. त्यामुळे हे मत माझ्यापुरते बाद! >

हे अजिबातच कळलं नाही. निर्भया प्रकरणाचा काय संबंध? १८ वर्षांखालील व्यक्तींनी पाहू नये, असं सांगितल्यावर त्या वयाखालील व्यक्तींचा संबंधच यायला नको.

<व्हायलाच हवे आहेत का असे माझे म्हणणे आहे>

का होऊ नयेत, हा पुन्हा माझा प्रश्न. तुम्ही गजला वाचता आणि लिहिता, तुम्हांला त्या विषयातलं ज्ञान आहे, मी गजला वाचत नाही. मला त्यातलं कळत तर अजिबात नाही. पण गजल लिहिणार्‍यांनी / वाचणार्‍यांनी तसं करू नये, हे मी म्हणणार नाही. तुम्ही गजला लिहिल्याच पाहिजेत का, असं तुम्हांला कोणी विचारलं तर?

<सगळ्यात जास्त गरज कशाची आहे असे तुम्हाला वाटते असे विचारले तर काय उत्तर द्याल?>

मला गरज कशाची वाटते, याचा काहीही संबंध नाही. त्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याचा अधिकार आहे. मला ती कला आवडो अथवा न आवडो, त्यांच्या या अधिकारावर गदा आणणारा मी कोण?

<कलाकाराने अभिरुची उंचावावी इतके तरी मान्य आहे का?>

माझ्या मते अभिरुची सापेक्ष आहे. कोणीही कोणाच्या अभिरुचीची किंमत करू नये.

लुक हु इज टॉकिंग Biggrin
अपरिपक्व मनांना सहज नेट अ‍ॅक्सेस मिळु शकतो म्हणून मग किती लेखक बुधवार पेठ, एक्स्ट्रॉ मॅरिटल अफेअर्स ची सिरिज वगैरे चटोर लिखाण करणे बन्द करतात ?

ज्या गोष्टी लपून छपून करण्यामुळे कश्याबश्या तगतात त्या गोष्टी बिनधास्तपणे करण्यामुळे भारत देशात उद्ध्वस्त होतात.

माणूस सर्वत्र तसाच असतो, संस्कृती वेगळी असते.

आमची संस्कृती तुम्ही मान्य करा हा आग्रह असावा की नाही ह्याबद्दल चाललेले आहे.

तिथला काय आणि इथला काय, माणूस बदलत नसतो, काय झाकायचे आणि काय दाखवायचे हे बदलते.

म्हणून नागड्यांनी इतरांना खोटे ठरवणे योग्य होत नाही. (हे विधान मायबोलीवरील किंबा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला उद्देशून नाही).

ही ज्याची त्याची निवड आहे.

>>> दीपांजली | 4 February, 2015 - 22:28 नवीन

लुक हु इज टॉकिंग खो खो<<<

अरे अरे, फारच वैयक्तीक झालात तुम्ही!

ह्या धाग्यातील मूळ विषय वैयक्तीक नाही आहे. Happy

बेफी मूळ मुद्दा हा उत्तर कुठे द्यावे असा आहे. तुम्हाला आवडले नाही. तुम्ही यु ट्युब वर विडिओ टाका, अन लाईक करा, कॉमेण्ट टाका, पेपर मध्ये लिहा असे मार्ग अनुसरा. पण नाही आवडले म्हणजे बंदी हा मुद्दा चुकीचा आहे.

चिनूक्स,

दुर्मीळ आहे हे की तुम्ही निव्वळ शाब्दिक पळवाटा युक्त असलेला प्रतिसाद दिलात.

तुमच्या प्रतिसादावर लिहिण्यासारखे खरोखरच खूप आहे पण ते ह्या ध्याग्याशी संबंधीत नाही.

मी एक सांगू का?

तुम्हीसुद्धा वैयक्तीक प्रतिसाद दिला आहेत. Happy

नाही. हा प्रतिसाद वैयक्तिक नाही. गजल हे उदाहरण आहे. तुम्हांला तसं वाटलं असेल तर क्षमस्व, पण यात तुमच्याऐवजी दुसरं कोणीही असू शकेल आणि गजलेऐवजी नाच, कथा, कविता, भारुड, कीर्तन असं काहीही असू शकेल. मुद्दा कलेवर बंदी आणण्याचा आहे.
तुम्हांला शाब्दिक पळवाटा वाटत असतील, तर तसं. पण हे माझं मत आहे.

आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. >> मुंबईमध्ये कुठल्यावेळी मुली जनरल डब्यामधून ग्रुप मधून प्रवास करतात? उगाच काहीपण टेपा लावू नको. स्वताला आवडलेल्या शोला, उगाच गफ्रे ने नाक मुरडले म्हणून अजून एक धागा सुरु केला असण्याची शक्यता जास्त वाटत आहे.

बाकी वाद आणि बंदी बद्दल, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती.

ह्या धाग्यातील मूळ विषय वैयक्तीक नाही आहे. >>>>>> तुम्ही तुमच्या किबोर्डचं थोबाड उघडलं की वैयक्तिक होतं ओ. कारण जेव्हा तुमच्या सारखे चान्स मिळाला की अश्लिल, चटोर लिखाण "कथेची गरज" म्हणून खपवणारे "हे असले कार्यक्रम चांगले नाहीत" अशी बोंब (कार्यक्रम पाहिलेला नसताना) मारत सुटतात तेव्हा होतो वैयक्तिक हा विषय.

अठरा हे वय बरोबर आहे का?

गझल (गजल नव्हे, गझल) आणि ह्या शोमधील यू एस पी ह्यांची तुलना होऊ शकते का?

>>>त्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याचा अधिकार आहे<<< त्या गाजलेल्या कलाकारांनी 'हा' मार्ग का निवडावा?

>>>माझ्या मते अभिरुची सापेक्ष आहे. कोणीही कोणाच्या अभिरुचीची किंमत करू नये<<<

पैसे मिळाले तर कोण किती पातळीपर्यंत स्वतःची बेअब्रू करून घेऊ शकतो, ह्याबद्दल तुमचे काय मत आहे?

<पैसे मिळाले तर कोण किती पातळीपर्यंत स्वतःची बेअब्रू करून घेऊ शकतो, ह्याबद्दल तुमचे काय मत आहे?>

त्यांची मर्जी. त्यांना मिळालेल्या पैशाशी, त्यांच्या अपमानाशी मला देणंघेणं नाही. मला न बघण्याचा आणि आवडून न घेण्याचा, आवडलं नाही हे सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे.

<त्या गाजलेल्या कलाकारांनी 'हा' मार्ग का निवडावा?>

त्यांची मर्जी. 'हा' मार्ग मला काही वाईट वाटलेला नाही, ही वेगळी गोष्ट. Happy

>>>>ज्यांना ज्यांना ऋन्मेष ला धागेरीया झालाय त्यांनी पण त्याचे धागे इग्नोर करावेत. मारे त्याचे धागे वाचायचे खालचे प्रतिसाद वाचुन मनोरंजन करुन घ्यायच आणि परत येऊन टिमकी वाजवायची की तुला काय काम धाम नाही का , तुला धागेरीया झालाय का वगैरे वगैरे....
धागाकर्ता ऋन्मेष वाचलकी उघडायचच नाही आणि पहिल्या पानावर सतत याचे धागे असतात म्हनुन ओरडयच पण नाही गुपचुप आतल्या पानांवर आपल्याला हव ते शोधत फिरा>>>><<

+१
धागा काढण्यावर आगपाखड करायला तुमच्या घरची जागा वापरत नाहीत. आणि आश्चर्य म्हणजे तरी सुद्धा लोकं(ओरडाओरड करणारे) धागे वाचतात ह्यातच सर्व आलं.

----
बाकी, शोबद्दल ... थोडक्यात शो मध्ये दम नाहीये. सगळं स्टेज्ड असल्याने त्यात काय इतकं?
आता इथे (शो मध्ये) मला पैसे द्या, मी हसून घेइन माझ्यावरच केलेल्या जोक्स्वर.. आणि हा नाटकीपणा झेलण्यात/दाखवण्यात कसली आलीय हिंमत? आणि ते बघायला सुद्धा कसली हिंमत? its just a another show. ह्या शोला इतकं महत्व कशाला? संस्कृती, अब्रु वगैरे इथवर चर्चा कशाला?

जो चेष्टा करतो दुसर्‍याची, त्याची नेहमीच अपेक्षा असतेच , की टारगेटने(ज्याच्यावर चेष्टा केली तो) सुद्धा हसावं, दाद द्यावी. नाहितर तो (टारगेट) मुर्ख, रडक्या अशी दुषणं द्यायची, सेन्स ऑफ ह्युमर नाही वगैरे.
पण खरी गंमत तेव्हा असते जेव्हा टेबल उलटं फिरलं(आता रोज इतरांची चेष्टा करणार्‍यांचीच चेष्टा केली तर) मग त्यांची वाट लागते स्वीकारायला. हे खर्‍या जगात असे होते/चालते.
--------------------
पैसे मिळणार नसतील तर हे अ‍ॅक्टर्स येतील का दात दाखवायला आणि स्वतःवरचे जोक्स स्वीकारायला? एरवी, अबक ने तुझ्याबद्दल अशी कमेंट केली, तशी केली म्हणून कॅट फाईट्स चालते आणि मिडियाला खजिना मिळतो... त्यामुले बकवास शो. बकवास शो ह्या दृष्टीने की, किती तो नाटकीपणा? आणि फालतुपणा? विनोदा मध्ये सुद्धा एक क्लास असतो, पण तो नाही बाळगला तर तो बकवास व बळजबरी विनोद दिसतो; तसाच प्रकार आहे.
------------------------
बाकी, इथे मी एका आयडीचे मत वाचलेले विनोद बीबीवर, कोणाच्या व्यंगावर(जाडी, टक्कल वगैरे) जोक असु नये. जाडे असतील तर ते त्यांच्या घरचे खातात वगैरे. आणि आज ह्याच जोकवर त्या आयडीने हसावे?
पण चालायचेच. खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे असे असतेच म्हणा. Proud

<गझल (गजल नव्हे, गझल) आणि ह्या शोमधील यू एस पी ह्यांची तुलना होऊ शकते का?>

कोणी कशाप्रकारे व्यक्त व्हावं, हे ज्याचं त्याने ठरवावं.

Pages