"पोपटी"

Submitted by विश्या on 3 February, 2015 - 04:09

वालाच्या शेंगा तयार झाल्या की त्या मडक्यात भरतात. मध्ये मध्ये थोडं मीठ टाकतात. मडका साधारण 90% भरून झाला की बाकीची जागा भाम्बुर्डी(भामरुड) च्या पल्याने भरतात.
वीट किंवा दगडाचे सारखे तीन तुकडे मांडून त्यावर हा मडका उपडा ठेवतात. मडक्याच्या सभोवतालीने काटक्या, लाकडाची ढालपी लावतात. नंतर त्यावर पेंढा टाकतात आणि तो पेटवतात. साधारण 5-10 मिनिटे पेंढा टाकल्यावार तो तसाच ठेवतात. नंतर पंधराएक मिनिटांनी वास येऊ लागल्यावर, वरची राख बाजूला करून तो काढतात आणि नंतर त्यातला भामरुडचा पाला काढतात. आणि मग कार्यक्रम सुरू करतात.
मडक्यामध्ये कांदा-बटाटा(मीठ मसाला) घालू शकता, तसेच वार-तिथी बघून अंडी, कोंबडी टाकु शकता.
ज्याने हे चाखलं आहे, त्याच्या तोंडाला हा फोटो बघून आणि ही कृती वाचून आत्ताच पाणी आलं असेल.
तर मग तयार व्हा, सीझन जवळ आलाय!10922864_772720682805792_8153750260239436689_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा एकदा हा जिटिजी करुयाच.

विश्या आता सिझन चालू आहे. आमची दोन वेळा करून झाली डिसेंबरमध्ये.

मस्त

माझ्याकडे मडके आहे. छोट्या प्रमाणात गॅसवर करुन पहाता येइल का? आसल्यास त्या पानांएवजी काय वापरता येइल Uhoh

वर्षा पानाऐवजी आत ओवा टाक आणि वरून बंद करायला केळीच्या पानाचा गोळा किंवा मक्याच्या कणसांची साले टाकलीस तरी चालतील.

गॅसवर मडके फुटण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा निखार्‍यावर कर.

गॅसवर मडके फुटण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा निखार्‍यावर कर. >> मी भाजी / आमटीला वापरलेय.
हे मडके गावाकडुन चुलीवर भरपुर वापरलेले आहे.

निखारे कुठुन आणु Uhoh

त्यापेक्षा एक्दा गॅसवर ट्राय करतेच Happy

माझ्याकडे मडके आहे. छोट्या प्रमाणात गॅसवर करुन पहाता येइल का? आसल्यास त्या पानांएवजी काय वापरता येइल>>>> शक्यतो गॅसवर नकोच मटक्याला तडा जाऊ शकतो आणि चुलीची चव नाही येत आणि माक्याच्ये कानिसाचा पाला वापरला तरी चालेल .

वर्षा निखारे म्हणजे कोळसे म्हणायच होत मला.

आणि जर गॅसवर आधी वापरल असेल तर मग ते मजबूत असेल. अशी गॅस वर वापरण्यासाठी मातीची भांडी मिळतात. पण विश्या ने म्हटल्याप्रमाणे त्याला खरपुस चव नाही यायची असे वाटते. तरी पण काही नाही पेक्षा करायला हरकत नाही.

https://www.youtube.com/watch?v=lPwjTfZWLOE

इथे तर कुकर मधे दाखवली आहे Happy

वर्षा निखारे म्हणजे कोळसे म्हणायच होत मला. >> हो ग. पण ते तरी एव्हडे पेटवायचे घरात म्हणजे

एखाद्या जाड तव्यात किंवा तंदूरीची शेगडी असते त्यावर ठेवता आले असते.

अग कुकरमध्ये तर पोपटीची खरपुस चव नाही लागणार.

ह्म्म जगु, जाड तव्याचा ऑप्शन पहता येइल >>>>>> कदाचित कोंड्याची शेगडे पण चालेल त्यावर जाळीदार पळते ठेवून पण भजते येते .