मराठी भाषा दिवस २०१५ - संयोजक हवेत

Submitted by webmaster on 25 January, 2015 - 22:24

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . गेली ५ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.

मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.

१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्‍यांची नावे बघून अ‍ॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या उपक्रमाची (किंवा कुठल्याही) सांगता झाल्यावर संयोजकांना लक्ष्य करून त्यांच्या विरुद्ध काहीच्या काही पोस्टी प्रतिसादांमध्ये आल्या तर त्याबद्दल मायबोली व्यवस्थापनाची भूमिका काय असेल?

मंजूडी,
तुमचा प्रश्न सोपा आहे पण उत्तर अवघड आहे, मायबोलीवर आपण नेहमीच प्रतिसाद स्वातंत्र दिलं आहे.

१) उपक्रम आवडला नाही किंवा काय खटकलं यासारख्या प्रतिसादांना योग्य शब्दात उत्तर देण्याचं स्वातंत्र्य संयोजकांनाही आहे.

२) वैयक्तीक चिखलफेक करणारे प्रतिसाद काढून टाकले जातील आणि योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल.

३) "अमूक करू नका , लोक शिव्या देतील" हे सांगूनही संयोजकांनी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला तर मायबोली प्रशासनाचे काम आयत्या वेळेस अवघड होते, तरीही आमच्याकडून मदतीचा प्रयत्न करू. आशा आहे की तशी परिस्थिती येऊ नये.

"अमूक करू नका , लोक शिव्या देतील" हे सांगूनही संयोजकांनी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला तर मायबोली प्रशासनाचे काम आयत्या वेळेस अवघड होते

कितीही लोकानुनयी काम केले तरी कुठल्यातरी गटाकडुन शिव्या ह्या येणारच. त्यामुळे संयोजकांनी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलेच बरे. Happy

उपक्रमास शुभेच्छा. माझ्या आवडत्या उपक्रमापैकी एक आहे हा. पण मला काही जमायचे नाही संयोजक व्हायला. Happy

वेबमास्तर, उपक्रम आवडला नाही किंवा अमूक एक गोष्ट खटकली/ आवडली नाही हे व्यक्त करणार्‍या "योग्य शब्दांतल्या" प्रतिसादांना हरकत नसतेच. प्रतिसाद स्वातंत्र्य आहे आणि संधी मिळतेच आहे तर घ्या गंगेत हात धुवून ही वृत्ती दिसून येते त्याचा खेद वाटतो.
उपक्रमाच्या काळात, संयोजन काळात आणि उपक्रम संपल्यावरही सर्व संयोजक 'योग्य शब्दांत'चं झूल डोक्यावर ठेवूनच असतात. नाहीतर ओरडा मिळतो. Happy
तुमचा दुसरा मुद्दा कळला, तिसरा मुद्दा कळला नाही.