क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना बॅक टु बॅक डक Sad

इतका चांगला बॅट्समन टेस्ट मधे चालत नाही. बघुन वाईट वाटते. टेस्टची कसर किमान वनडे मधे त्याने भरुन काढायला पाहिजेच.

बिच्चारा रैना!!
बाल बाल बचावले. लाईन लागलीच होती.
काही प्रश्नः ऑस्ट्रेलियाची क्षेत्ररचना भारताच्या क्षेत्ररचनेपेक्षा जास्त प्रभावी होती का? असे वाटले तरी. म्हणजे एक दोन झेल सोडूनहि त्यांना काही त्रास झाला नाही, कारण जिथे चेंडू मारावा तिथे कुणितरी असायचाच. ११ पेक्षा जास्त लोक होते क्षेत्ररक्षणाला असा संशय यावा.
भारताचेच खेळाडू नेमके संशयित रीत्या बाद व्हावेत? lbw काय, ग्लोव ला बॉल लागून उडालेला कॅच? नशीब दुसर्‍या डावात रोहित शर्माला पहिल्याच बॉलला आउट दिले नाही. त्याची भीति वाटत नसावी ऑस्ट्रेलियाला!!

चला आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया नि भारत तिरंगी सामने!! नंतर वर्ल्ड कप, मज्जाच आहे. फक्त ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड मधे असल्याने इथे कदाचित लाईव्ह बघता येणार नाहीत. म्हणजे दिवसभर झोपून रात्री मॅच बघत बसायला मला काहीच हरकत नाही, फक्त शरीराला तशी सवय नाही.

रैना कसला बिच्चारा, उगाच त्याला हट्टाने घेत कसोटी संघातील एक जागा अडवतात. ज्याची संधी हुकतेय तो बिचारा..
पण एक बरेय त्याचे, इथले अपयश तो एकदिवसीयमध्ये रिफ्लेक्ट होऊ देणार नाही.. तिथे तो आपल्या नेहमीच्या साजेश्या शैलीत खेळेल, किंबहुना गेले ५-६ महिने तो तुफान फॉर्ममध्ये आहे.. विश्वचषकापर्यंत तसाच राहावा..

मुनफ वरचा हे लेख अतिशय वाचनीय आहे. त्याचा पेस का कमी झाला त्याचे पण उत्तर मिळते नि त्याच्या बोलिंगमागच्या uncomplicated approach चे पण उत्तर सापडते. impressive attitude !
http://indianexpress.com/article/sports/cricket/munaf-patel-a-fast-bowle...

सही खेळला रोहित, शेवटी धोनी आणि कंपनीने निराश केल जरा, अन्यथा २८०-२८५ सहज होते.. आता जिंकतील की नाही ठाऊक नाही पण २६७ चांगला स्कोअर आहे.. रोहित शर्मासाठी तरी जिंकायला हवे..

बाकी तो धवन खेळणे गरजेचे.. किंवा पुर्ण फ्लॉप तरी जाणे गरजेचे, जेणे करून त्याला बाहेरच बसवता येईल, अन्यथा अवघड जागेचे दुखने होणारेय ते..

मॅच हारलो

दुसरी कडे डिव्हिलिअर्स ने अवघ्या ३० बॉल मधे १००रन्स करुन इतिहास रचला ८ चौकार आणि तब्बल १० षटकार
Last 5 ovs 82/0 RR 16.40
क्रेझीएस्ट इनिंग

Batsmen R B 4s 6s SR

Hashim Amla (rhb) 148 --136 13 0 108.

AB de Villiers (rhb) 116 -- 34 8 12 341

या हिशोबाने अमला ने १०० बॉल वाया घालवले म्हणायचे Lol

48.5
Smith to de Villiers, SIX, full on the off stump, yorker missed, and it disappears over long-off, this is ridiculous
48.4
Smith to de Villiers, SIX, as good as the last ball was, this is pants, back of length, pulled over square leg, nailed it once more, everything has been nailed
48.3
Smith to de Villiers, FOUR, excellent yorker just outside off but de Villiers digs it out and squirts it past short long leg, that is very unlucky for the bowler
48.2
Smith to de Villiers, SIX, length now, back to pull and it carries towards the same boundary and just clears the long boundary and the tallest man on the field, Benn
48.1
Smith to de Villiers, SIX, whoops, yorker missed, de Villiers whacks it over wide midwicket, timed so well

रोहित शर्माच्या एका इनिंग मधे मारलेले सर्वात जास्त षटकाराची बरोबरी १६ षटकार मारुन डिव्हिलीअर्स ने केली १४९ रन्स ४४ बॉल मधे बनवुन आउट झाला. द आफ्रिका सर्वात जास्त रन्स बनवणाच्या रेकॉर्डच्या मागे अवघ्या ५ रन्स ने मागे राहिली.

AB 149 off 44

6s: 16
4s: 9
2s: 5
1s: 7
Dots: 7

याला म्हणतात कॅप्टन इनिंग नाहीतर आपला धोनी ३० बॉल मधे कुंथत कुंथत अवघे १९ रन्स काढले ते ही पावरप्ले सारख्या महत्वाच्या वेळेस

धोनी परत कशाला आला?
बाकी रैना बरा खेळला हे त्याच्यासाठी बरे झाले.
आपल्या संघात एका डावात फक्त एकाच फलंदाजाने धावा काढायच्या असा नियम असल्याने आपल्या धावा कमी पडतात. त्याउलट इतर संघात एक फलंदाज खेळला तरी बाकीचे ४०-४५ धावा काढतातच. त्यामुळे त्यांच्या धावा अधिक होतात.
एकूण लोकमत पहाता, स्वच्छता, शेतकर्‍यांना पैसे इ. पेक्षा वरील नियम बदलण्याचे काम सरकारने ताबडतोब हाती घ्यावे -
काय हे, वर्ष होत आले मोदी च्या कारभाराला, अजूनहि भारतीय संघात सुधारणा नाही. हेच काँग्रेसच्या राज्यात भारताने विश्वचषक जिंकला!
असे सचिन पगारे म्हणाले तर नवल नाही!! (त्यांच्या दृष्टीने कॉंग्रेसची ६० वर्षे म्हणजे मोदीच्या सहा महिन्याबरोबर असायला पाहिजेत)

भाउ, एक झकास व्यंगचित्र येऊ द्या. जरा मनाला तेव्हढाच दिलासा म्हणून, कारण सारखे सारखे भारत हरतो हे पाहून वाईट वाटते.

बाकीच्यांनाही सुरू सापडला पाहिजे लवकर.

>>>
पराग, सुरू नाही .. सूर ....सूर

वीणा सुरूंचे धागे सारखे वाचत राहिले की असे होते. वाचू नका ते ::फिदी:

आज कोहलीने मुद्दाम खराब खेळ केला.
फलंदाजीतही आणि क्षेत्ररक्षणातही.

फिल्डींगच्या वेळी आरडाओरडाही असा चालू होता जसा तोच कॆप्टन आहे, आणि कॆमेराही सारखा त्याच्यावर, कॉमेंटेटरही त्याचीच चर्चा करत होते..

बहुधा एकदिवसीयमधूनही धोनीचा गेम करायचा हेतू आहे. Happy

अरे पुरे झाले त्या मुलांचे ऑस्ट्रेलियात जाऊन खेळणे. त्यांना परत बोलवा.
नि भारतात येऊन एक दोन वर्षे फक्त अफगाणिस्तान, कॅनडा, UAE वगैरे संघांशी खेळायला द्या. नाहीतर भारतीय क्रिकेटची अवस्था पण भारतीय हॉकी सारखीच होईल - काही वर्षे जगात अजिंक्य असा संघ, आजकाल कुणि विचारत नाहीत जगात!

भाऊ, एक व्यंगचित्र टाकाच!

शांत गदाधारी भीम शांत. अवास्तव अपेक्षा ठेवल्या कि अपेक्षाभंग होणे साहजिकच आहे. आहे तो बॉलिंग अ‍ॅटॅक (?) घेऊन भारताबाहेर जिंकणे हे फक्त आपण चांगले खेळणे ह्यावर अवलंबून न राहता त्याच वेळी इतरांनी वाईट खेळणे पण जरुरी होते.

इतरांनी वाईट खेळणे पण जरुरी होते.
अनेSक वर्षांपूर्वी, म्हणजे तुमच्या बाबांचा जन्महि झाला नसेल तेंव्हा आम्ही क्रिकेट मॅच बघायला गेलो की एक दगड विरुद्ध बाजूचा व एक दगड आपल्या बाजूचा असे ठेवत होतो. विरुद्ध बाजूच्या दगडाला चपलेने(असेल तर) नाहीतर काठीने मारायचे म्हणजे ते वाईट खेळतील नि आपल्या दगडाला फुले वहायची म्हणजे आपले लोक चांगले खेळतील. स्टॅटिस्टिकली ते पुरेसे प्रभावी ठरले होते. आता पण तेव्हढा एकच उपाय दिसतो आहे!

आता आपण प्रयोग करत आहे. वर्ल्डकप मधे आपला खेळ बघा.
ही सिरीज नाही जिंकली तरी चालत आहे. वातावरणाबरोबर कसे जमवुन घेता येईल याचा प्रयत्न चालु आहे.
जे इंग्लंड बरोबर झाले ते वर्ल्डकप मधे होउ नये म्हणुन टॉस जिंकला तरी आपण बॅटींग घेतली असावी. कारण वर्ल्डकप मधे टॉस न जिंकता त्या कंडीशन मधे खेळायला मिळाले तर नविन खेळाडुंना किमान अनुभव तरी हवा. नाहीतर अश्या कंडीशन मधे पहिली बॅटींग कोणताही अनुभवी कॅप्टन घेणार नाहीच. Happy

असामी,

आपल्या संघाच्या बॉलिंग ला अ‍ॅटॅक म्हणणं म्हणजे जत्रेत बंदुकीने फुगे फोडणार्या ला ब्लॅक कॅट कमांडो म्हणण्यापैकी आहे. let's face it, २०११ च्या वेळी सुद्धा आपली गोलंदाजी कच्चीच होती. पण उपखंडात चालून गेली. मला तर भारतीय गोलंदाजांनी जिंकून दिलेला एकही सामना (एकदिवसीय) असा पटकन आठवत नाही. अशा एक-दोन सामन्यांविषयी वाचल्याचं किंवा यु-ट्यूब वर व्हिडीओ वगैरे पाहीले आहेत (१९८३ फायनल, कुठलीशी शारजातला सामना वगैरे).

बहुतेक भारताने स्वतः १९९ वर ऑल आउट असलेले एकदिवसीय सामने गोलंदाजीच्या जोरावर जिंकले आहेत. त्यातले भारतातले किती आणि बाहेरचे किती बघावे लागतील

सुरुवात आहे जरा धीर धरा....lol.giflol.gif

आठवा तो २००७ चा २०/२० विश्व चषक.. पहिल्या मॅच हरले होते नंतर पाकिस्तान बरोबर टाय आणि मग डायरेक्ट विश्व चषक...lol.giflol.gif

पहिल्या पासुन वाजत गाजत गेले की मधीच कुठेतरी ठप्प..

त्यामुळे आशा ठेवुया नाहितरी आपन वर्तमाना पेक्शा इतीहासातच जास्त रमतो..Dolo.gifDolo.gifDolo.gif

Pages