Submitted by अवल on 15 January, 2015 - 21:40
ये, ये, टेक डोके खांदयावर
टीप तुझे डोळे, मऊशार पदराने
सांग तुझी सारी, सारी कहाणी
बोलून टाक, मनातले सारे काही
हलके करून टाक, सारे बोचणारे
थोपटून घे थोडे प्रेमाने, हक्काने.
सारी सारी पानगळ, सोसेल ही धरणी
तुला हवा तो, सारा ओलावाही देईल
जगण्यासाठी, नवी उभारीही देईल
नव्या आशांचा, मृदगंधही देईल
तुझ्या सुखांचा, अविरत आशीर्वादही
अन, "मी आहे“, हा आश्वासक खांदाही.
फक्त एक करशील,
कधीतरी मागे वळून, डोळाभर पाहशील?
उमललेली कोवळी पाने, हळुच दाखवशील?
फुलणारी कळी, आसुसून दाखवशील?
झळाळणा-या आनंदाचे दोन किरण, परावर्तीत करशील?
कसय ना,
अडी अडचणीला, काढावं लागतच, कोठारातूनच.
पण ते कोठार नेहमी नेहमी, फक्त उपसायचं नसत;
कधीतरी, आपणच, भरायचही असतं; हो ना
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
नितांत सुंदर, मनास भिडले अगदी
नितांत सुंदर, मनास भिडले अगदी
कसय ना, अडी अडचणीला, काढावं
कसय ना,
अडी अडचणीला, काढावं लागतच, कोठारातूनच.
पण ते कोठार नेहमी नेहमी, फक्त उपसायचं नसत;
कधीतरी, आपणच, भरायचही असतं; हो ना>>>>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी!!
खूप पटली कविता............:स्मित:
व्वा! अवल, खूपच सुंदर!
व्वा! अवल, खूपच सुंदर!
धन्यवाद दोस्तहो
धन्यवाद दोस्तहो
सुरेख! व्हॉट्स अॅप्ची थम्ब्स
सुरेख! व्हॉट्स अॅप्ची थम्ब्स अप वाली स्मायली
व्वाव!!!! खुप्प्प्प्पच
व्वाव!!!! खुप्प्प्प्पच सुंदर!! मनाला भिडणारं अगदी आतुन आलयं