तिळाच्या वड्या

Submitted by saakshi on 15 January, 2015 - 04:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. तीळ - अर्धी वाटी
२.शेंगदाण्याचे कूट - पाव वाटी
३.गूळ - पाऊण वाटी बारीक किसून
४.तूप - ४ मोठे चमचे
५.वड्या थापायला २ ताटे

क्रमवार पाककृती: 

१.एका मोठ्या कढईत तीळ कोरडे भाजून घ्यावेत. आच मंद ठेवावी कारण जास्त ठेवल्यास लगेच करपतात. हलका रंग बदलेपर्यंत भाजावेत आणि बाजूला काढून ठेवावेत.
२.दोन ताटांना मागील बाजूस तूप लावून ठेवावे.
३.कढईत तूप टाकावे आणि गूळ टाकावा. गूळ वितळला की आच बंद करावी.
४.लगेच तीळ आणि शेंगदाण्याचे कूट टाकावे. मिश्रण भरभर एकजीव करावे.
५.तूप लावलेल्या ताटांवर पसरावे. मिश्रण गरम असल्याने वाटीच्या तळाला तूप लावून त्याने पसरावे.
६.पसरल्यानंतर लगेच वड्या पाडाव्यात.
७.थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात आणि गट्टम कराव्यात.

हा फोटो:

IMG-20150114-WA0027.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तितक्या... तिळगूळ घ्या गोड बोला :)
माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारिका३३३ , अर्र हा धागा बघ http://www.maayboli.com/node/14369 Happy
छान दिसत आहेत वड्या

सॉरी सॉरी... केला चेंन्ज Happy
कॉपी, पेस्ट करतांना गोंधळ झाला बहुतेक गं Lol

अतिशय सोप्पी रेसिपी. मोजुन १५ मिन मध्ये झाली. तुप आवडीचा पदर्थ असल्याने ४ ऐवजी ६ मोठे चमचे तुप घातले Proud हा घ्या फोटो.
til.jpg

गूळ कुठला वापरावा? चिक्कीचा गूळ उपलब्ध नसल्यास काय पर्याय आहेत?
गूळ उकळताना किती वेळ उकळायचा? दोन तारी, तीन तारी पाक वगैरे भानगड असते का इथे?