ही जाहीरात कशाची आहे ?

Submitted by नितीनचंद्र on 14 January, 2015 - 07:08

मायबोलीवर एकच जाहिरात सध्या वारंवार दिसत आहे. काय प्रकार आहे ? कशाची आहे ही जाहिरात ?

मायबोलीने स्पॉन्सर केलेली आहे की स्पॅम आहे ?

यावर हे एक चित्र दिसते.

Maayboli Advertisement.gif

जाहिरात दाराचा हेतु समजत नाही. नक्कीच चांगला नसावा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाहिरात न बघणं आपल्या हातात आहे. जे आक्षेपार्ह/ संशयास्पद वाटतंय त्याची नवीन बाफ उघडून अधिक चर्चा कशाला?
अ‍ॅडमिनना कळवलं तरी पुरे आहे.

बाकी अधिक विस्तृत माहितीसाठी हे वाचा - http://www.maayboli.com/node/47946

तुम्ही काय सर्च देता त्यावर तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसतील हे ठरत असं काही आहे का? मला सध्या cheapest airfair ही जाहिरात दिसते आहे. परवा माबो छोट्या जाहिरातीत मैत्रीणीसाठी वर शोधत होते तर आता shaadi.com झलकुन राह्यलय!

तुम्ही काय सर्च देता त्यावर तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसतील हे ठरत असं काही आहे का?>>

त्यावरुन ठरतं, पण फक्त त्यावरुनच ठरत असेल असं नाही वाटत. मला अक्षरश: सगळ्या प्रकारच्या जाहिराती दिसतात.

तुम्ही काय सर्च देता त्यावर तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसतील हे ठरतं
<<
24.gif खरंय.

*
जाहिरात न बघणं आपल्या हातात आहे. जे आक्षेपार्ह/ संशयास्पद वाटतंय त्याची नवीन बाफ उघडून अधिक चर्चा कशाला?
अ‍ॅडमिनना कळवलं तरी पुरे आहे.
<<
+१०० 29.gif

*

अल्ला, तोबा, खामखाँ, तुम इत्ते बुढ्ढे होकर भी
चिल्लर चाले करते जारे, नै बोले तो सुन्ते नै 109.gif

जाहिरातीच्या डोक्यावर फुली चं चिन्ह आहे ते क्लिक करून ती जाहिरात का नकोय त्यावर क्लिक करा. जसं आक्षेपार्ह/ असंबद्ध इ पर्याय आहेत. ह्या जाहिराती गुगल टाकतं admin नाही. admin ला सांगण्यापेक्षा स्वतःच पर्याय निवडा.

मराठी न समजल्याने गुगल गंडत असेल आणि भलत्या जाहिराती दाखवत असेल असं वाटतं.
admin, जर प्रत्येक बीबी ला शब्द्खुणामध्ये देवनागरी बरोबर रोमन लिपीत इंग्रजी भाषांतरीत शब्द्खुणा टाकल्या तर फरक पडेल का?

जाहिरातीच्या डोक्यावर फुली चं चिन्ह आहे ते क्लिक करून ती जाहिरात का नकोय त्यावर क्लिक करा. जसं आक्षेपार्ह/ असंबद्ध इ पर्याय आहेत. ह्या जाहिराती गुगल टाकतं admin नाही. admin ला सांगण्यापेक्षा स्वतःच पर्याय निवडा. <<< हा पर्याय उपलब्ध असला तरी त्याचा काही उपयोग होतो का याबाबत मला हल्ली शंका येऊ लागली आहे.

गजानन, मी नको म्हणून क्लिक करतो. गुगल ते क्रोम मध्ये सेव करतो का माझ्या गुगल फ्रोफायलात माहित नाही. मला अजूनतरी वाटतं की ते बऱ्यापैकी काम करतं.
वर इब्लिसनी लिहिलं होतं तेच, मायबोलीला जाहिरातीतून उत्पन्न मिळतं ब्लोकरची किमान जाहिरात तरी करू नका. Happy (हेमावैम)

मला तर फ्री में अंग्रेजी सीखे दिसतेय
माझ्या ज्ञानाची (म्हणजे त्याच्या कमतरतेची) कीर्ती गुगलबाबापर्यंत कशी पोचली ?
असो. मी थोडासा जाज्ज्वल्य (बरुबर लिवलंय नव्हं?) मराठी बाण्याचा असल्याने आय डोन्ट माईंड Wink

मी गेला काही काळ मायबोलीवर दिसणार्‍या जाहीरातींमुळे फार त्रस्त झालो होतो. त्या जाहीरातीं चे चौकोन कोपर्‍यातल्या फुलीवर क्लिक करून बंद केल्याविना वाचण्याचा मजकूरही दिसत नसे व नवी विंडो वा टॅब उघडत असे व अरेबिक बडबड सुरु होत असे. पार वैतागलो होतो. मग थोडी शोधाशोध करून सेटींग्ज मधे जाउन गुगल क्रोम साठीचे अ‍ॅड्ब्लॉक एक्सटेन्शन अ‍ॅक्टीव्हेट केल बारकाईने जाहीराती कोणती कंपनी टाकतेय (अ‍ॅड्स बाय अबकडईफ ) ते पाहून तसे फिल्टर्स सुरु केले आता जरा मोकळा श्वास घेतोय.

तुम्ही काय काय शोधता (सर्च), कुठल्या प्रकारच्या सायटींना भेटी देता इत्यादी (प्रचंड) माहिती गोळा करून त्यावरून गूगल तुमचे प्रोफाइल बनवते (ही एक अतिशय किचकट प्रक्रिया आहे). आणि त्या प्रोफाइलच्या अनुसरे तुम्हाला जाहिराती दाखवते.

मला स्वतःला ही वरील जाहिरात कधीही दाखवली गेली नाही.

आता सदर जाहिरात तुम्हाला का दाखवतात ह्याचा शोध तुम्हीच घ्यायचा आहे! Wink अ‍ॅडमिन काहीही करू शकत नाहीत.